Submitted by अवल on 20 March, 2012 - 00:10
चैत्राची चाहूल लागली अन माझी बाग पुन्हा फुलू लागलीय
मधुमालती दुसर्यांदा बहरात आलीय. पण या वेळेस अगदी चहू बाजूंनी
सकाळी फुललेल्या या कुंदाच्या चांदण्या
या हंगामातले हे लिलीचे पहिले फूल
ही हिरवीगार झिपरी
अन हा चकचकीत पाम
अन हा गर्द हिरवा शेफ्लेरा (योग्य नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद शांकली मराठी नाव काय याचे ? )
नुकतेच रुजू लागलेले कृष्णकमळ. ही येउ घातलेली कळी तर नव्हे ?
हा गुलाब
पण माझ्या लाडक्या तू कधी फुलणार ? हा मोगरा माझ्या दारी गेल्या वर्षीपासून वाढतोय, पण अजून फक्त लाडच करून घेतोय.
अन ही माझी सर्वात लाडकी रातराणी ! पहा कशी लगडलीय कळ्यांनी ! रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना
वरच्या झिपरीच्या अन पामच्या फोटोतही सापडेल ती तुम्हाला.
अन मग माझ्या मनातला मोर असा हातावर उतरला
गुलमोहर:
शेअर करा
व्वाह.... रातराणी पहातानाच
व्वाह.... रातराणी पहातानाच नाकांत गंध भरुन गेला.
मस्त फुलबाग पण माझ्या
मस्त फुलबाग
पण माझ्या लाडक्या तू कधी फुलणार ? हा मोगरा माझ्या दारी गेल्या वर्षीपासून वाढतोय, पण अजून फक्त लाडच करून घेतोय.>>>>माझ्याकडे पूर्ण बहरलाय मोगरा. :टुकटुकः
पण अजून फक्त लाडच करून
पण अजून फक्त लाडच करून घेतोय.>> थोडेच दिवस थांब आता बहरेलच येत्या एक दोन महिन्यात
बाकी बाग छान फुललीये
मस्त गं अवल! तुझा 'मळा'
मस्त गं अवल! तुझा 'मळा' दाखवला होता तु... खुप सुंदर!
जिप्स्या... मोगर्याला फुलं यायला लागली तुझ्याकडे?
माझ्या पण मोगर्याला अजुन नाहीत फुलं! हो. अनंताला कधी नव्हे ते भरपुर कळ्या लागल्यात.
मस्तच गं.. किती सुंदर बाग आहे
मस्तच गं.. किती सुंदर बाग आहे तुझी...
जिप्स्या... मोगर्याला फुलं
जिप्स्या... मोगर्याला फुलं यायला लागली तुझ्याकडे?>>>>येस्स्स भरपूर कळ्या आल्या आहेत त्यातील काहिंनी कालपासुनच फुलायला सुरुवात केलीय.
मस्तच
मस्तच
आइग्ग !!! मस्त बाग. तुम्हि हि
आइग्ग !!! मस्त बाग.
तुम्हि हि सर्व झाडे कुंडीत कशी वाढवलीत ? काही खास माती,खते, का?
य्ये जिप्स्या! माझ्या
य्ये जिप्स्या! माझ्या मोगर्याला का नाही लागत कळ्या? त्याची आता छाटणी करुन काही उपयोग होईल का? कि माती जरा भुसभुशीत करु?
सुरेख ! रोज रात्री
सुरेख !
रोज रात्री उशीरापर्यंत हीच माझी सोबत करते पुस्तकं वाचताना > मस्त मस्त !
अवल सुंदर बाग फुललेय ग.
अवल सुंदर बाग फुललेय ग.
वा अवल - कित्ती छान फुललीये
वा अवल - कित्ती छान फुललीये बाग..........
आमच्याकडे पण आलाय मोगरा, बट
आमच्याकडे पण आलाय मोगरा, बट मोगरा, सिंगल मोगरा आणि मदनबाण..
आरती, कित्ती छान बाग आहे
आरती, कित्ती छान बाग आहे तुझी!
मला एन्वी फिलिंग आलंय (इक्कूसंच हं)
(मी एक एक करून नवीन झाडं जमवत आहे, हळू हळू कारण मला त्यांना मेन्टॅन करता येईल का हे बघायचय मग पसारा वाढवेन जरा :), तुझी बाग पाहून तर अज्जून हुरूप आलाय!! )
अवल, राव काय बागेतच राहता
अवल,
राव काय बागेतच राहता काय?
मस्त कलेक्शन....
मस्तच
मस्तच
वॉव सुंदर बाग... ह्या बागेत
वॉव सुंदर बाग... ह्या बागेत मस्त 'केन' ची खुर्ची टाकुन, कॉफी पीत, हातात आवडीच पुस्तक घेऊन बसायला कित्ती छान वाटेल.
जिप्सी ssssssssssssssss,
जिप्सी ssssssssssssssss, हिमस्कूल sssssssssssssssss
माझ्या मोगर्याला जळवायला जरा फोटो टाका ना मग माझाही फुलेल
धन्यवाद सर्वांना
जयू, काही नाही गं फक्त पाणी, प्रेम, अन थोडी निगा
जागू आमची आपली छोट्टीशी बाग तुझ्याकडे यायचय एकदा
बागेश्री अगं मीही अगदी चार कुंड्यांनी सुरूवात केली. फक्त हवी ती आणि तीच झाडं आणली इतकच
मानस असे रहायला मिळाले तर कित्ती छान . मग तिथे माझे नातलग - हरणं, वाघ येतील नाही ?
माधुरी, मी तेच करते. नवर्याच्या कधीची मागे लागलेय, एक मस्त झोपाळा आणू म्हणून ! पण बहुदा मी सारखी तिथेच बसेन म्हणून टाळतोय बहुदा
छान बाग आहे ...... मात्र,
छान बाग आहे ......
मात्र, सातत्याने निगराणी करणं गरजेचं असतं.
अवल, मस्त आहे बाग. आता यावच
अवल, मस्त आहे बाग. आता यावच लागणार बाग बघायला.:स्मित:
अवल, तुझी बाग अगदी अव्वल आहे
अवल, तुझी बाग अगदी अव्वल आहे हं!
सुंदर...
छान बाग फुलली आहे.
छान बाग फुलली आहे.
अवलच्या बागेला आमच्या बागेचा
अवलच्या बागेला आमच्या बागेचा छब्बू..
अवल & हिम्सकुल - काय सुंदर
अवल & हिम्सकुल - काय सुंदर बागा आहेत तुमच्या. वसंत ऋतु झळकतोय नुसता. मस्त मस्त !
मस्तच बाग पण सातपर्णीला नऊ
मस्तच बाग
पण सातपर्णीला नऊ पाने असुनही तिला सातपर्णी का म्हणतात
अवल,मस्त फुललेय बाग!
अवल,मस्त फुललेय बाग! रातराणीचा गंध मनात साठवत पुस्तकवाचन! मस्त!
अवल मस्तच.. हिम्सकुल.. अननस
अवल मस्तच..
हिम्सकुल.. अननस पण वाह
कसा लावतात?
जळवु नका रे.. एकेकजण चित्र
जळवु नका रे.. एकेकजण चित्र टाकुन!
हिम्सकूल तुमचीपण बाग
हिम्सकूल तुमचीपण बाग मस्त.
मधुमालती,रातराणी(यांची रोपे लागतात की फांदि लावून रोप करायचे ?), अननस कुंडीत फुलवण्याचा मीपण प्रयत्न करणार.
हिमकुल्स अहाहा मस्तय बाग..
हिमकुल्स अहाहा मस्तय बाग.. अबोली, लाल चाफा (?), मोगरा मस्त मस्त
तुमच्या कष्टाला फळ (सॉरी फुलं) आली
बरीच मेहनत लागत असेन ना ? ग्रेट
Pages