एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बागे, अग जेव्हा घना तिचे कौतुक करत होता तेव्हा माझ्या मनात आलेले की हे काय आहे मला तर ती आहे तशीच दिसतेय्...पण जेव्हा राधा त्याला सांगते की माझ्या केसांचे वळण मीच बदलेलेय् ई.ई. तेव्हा मला तिचे बोलणे अगदी पटलेले Happy

@भरत : हो मीही चक्रावलोच 'स्पिन्स्टर्स पार्टी' ऐकून. मुक्ता एक अभ्यासू नटी आणि चौकस व्यक्ती आहे. तिलाही या शब्दप्रयोगात विसंगती वाटू नये हे पाहून जरा आश्चर्य वाटलं.. का हल्ली हा शब्दप्रयोग रूढच झालाय 'हेन पार्टीज' साठी?

कसला मेकओव्हर !>>> लक्षात घ्या त्यांचं वेगळं आहे! मेकोव्हर म्हटलं की मेकोव्हर! Lol

राज्वाडेच ते शेवटी...

Wink

अरे पण ती कसली बॅचलर पार्टी, ४ वेडगळ टाळकी जमली फक्त रं.पा. प्यायला..
स्वतःचे २ काका , मुक्ताचे २ कलिग्ज एवढेच.. स्वप्नील चे मित्रं वगैरे नाहीतच का, तसही या सिरिअल मधे त्याचे मित्रं, कलिग्ज कोणीच नाही दाखवत.. हा फक्त घरच्यां गोतावळ्यात बसलेला असतो.
मुक्ताची बॅचलोरेट पार्टी पण काकु-अत्या मंडळात.. एकच काय ती मैत्रीण Uhoh

ऐ लिसन ना..पण मानव भारी सुटला होता बॅचलर पार्टी मध्ये!त्याचे काम स्वप्नील ने करून टाकले! Happy

स्वप्नील चा वन लायनर एकदम कॉमेडी सर्कस सारखा उस्फुर्त होता त्या दारुड्या लोकांचे ब्लॅकमेल व्हिडिओ घेऊन " चला, माझी रिटायरमेन्ट ची सोय झाली" Proud

हो ना मयू, तिच्यात फार काही बदल दिसलाच नव्हता, पण... Wink

काल मानव झिंगू लागल्यावर मला वाटलं आता तो मनातलं बोलणर आणि स्वप्नील ला सगळं कळणार पण सगळा फुस्का बार... Biggrin

मला पडलेलं एक कोडं - कालच्या सो कॉल्ड स्पिंस्टर पार्टी मध्ये फक्त कॉफीपानच झालं ना???? कारण त्या दोन्ही काकवा, झिंगून बोलत होत्या. का त्यांना कॉफीपण चढते ????????? Lol

पुलंच्या वा-यावरची वरात मध्ये लोकांना बाळंतकाढा पण चढलेला दाखवलाय.. त्यामानाने आयरीश कॉफी भलतीच भारी....

२ ही पार्ट्या बहकहवास..........
हा घना त्याच्या हापिसातील मंडळींना कश्शाकश्शाला बोलावित नाही. .....ते कसे? आणि त्या बायका काय कपातुन दारु, पित होत्या?

मी आता स्वप्नीलची चाहती बनत चाललेय Happy आज भारी काम केलं त्याने. जेव्हा तो सॉनियाबद्दल राधाला विचारतो तेव्हा तर मस्तच. " हि को>>>ण आहे ? गोड आहे हं" Lol

मस्त चाललीये मालिका.
रच्याकने, घनाला सासरी स्वत:च हाताने पाणी घेण्यात एवढं ऑकवर्ड का वाटलं ?

सुकन्या मोनेचा नवरा आला नाही का अजून? कोण असेल बरं??

मेंदीच्या प्रॉग्रॅमला राधाच्या सासरची मंडळीच दिसत आहेत? बाकी राधाचे कोणीच कसे नातेवाईक नाही दाखवत?

काल खुप आठवड्यांनी पाहिली मालिका. अगदीच टुकार चालु आहे. मेंदी कार्यक्रमाची काही निरिक्षणं -

काल मेंदी काढताना राधाच्या प्रत्येक हातात तीस एक बांगड्यांचा चुडा होता? लग्नासाठी स्पे. पुर्ण हातभर मेंदी कशी काढणार मग. Happy
मेंदीला पांढराशुभ्र ड्रेस ! घालु देत म्हणे. पण मला आपली डाग पडायची काळजी.
घनाची आई गोड आहे आणि काल दिसली पण गोड.
राधाचा 'मानव' इरिटेटिंग पण फनी आहे.
देवाचे आभार, आजीबाईंचा रोल कमी केला आहे.
स्वप्निलला घरचे लोक सोडुन दुसरे कोणी मित्र नाहीतच का? का सिरियलला परवडत नाहीत.
त्याला स्वतःच्या हाताने पाणी घ्यायला इतकं का ऑड वाटावं? तो काही चोरुन ड्रिंक्स तर घेत नव्हता फ्रीजमधुन. ( कै पण भंकसपणा)
मुक्ताला ती एक भोचक आत्या सोडता दुसरे नातेवाईकच नाहीत? मेंदीला सगळे घनाचेच लोक होते.
मेंदीला ती एक माठ मैत्रिण सोडता मैत्रिणी सुद्धा नव्हत्या. राधा इतकी हुशार आणि 'वेगळीच' आहे तर तिची एकमेव मैत्रिण इतकी सामान्य आणि माठ का बरं?

माणसांच्या बाबतीत कैच्या कै लो बजेट मालिका..

आता उद्या लग्नाला मुलाकडचे ४०० म्हणुन किती माणसे उभी करतात हे पाहायचे. की आमचा एक माणुस १०० माणसांना भारी आहे म्हणत चारजण उभे करतील???

ते संगीत झालचं नाही का<<<<<<<<<

झाले ना. संगीत म्हणुन वल्लीकाका हातात माईक घेऊन एक गाणे बेसुर गायला. बस्स..

झाले ना. संगीत म्हणुन वल्लीकाका हातात माईक घेऊन एक गाणे बेसुर गायला. >>>
हे का संगीत होतं? मला वाटलं मी मिस केलं. एक घरातल्या नोकराने ( हा सारेगम मधे असल्यामुळे याला स्पे. संधी दिलेली दिसते) आणि एक बेसुर्‍या काकाने गायलेलं गाणं एवढंच दाखवुन गुंडाळलं. खरं तर एक पुर्ण एपिसोड झाला असता संगीत आणि मेंदीचा.

बरोबर निरिक्षण आहे लोक्स.. अगदी हेच मनात आलं माझ्या.
शिवाय पहिल्यांदा मला मुक्ताचा ड्रेस आवडला. पण मेंदीच्या कार्यक्रमासाठी खरंच ऑड होता तो. डाग पडायची धाकधूक वाटत होतीच... पण ते उखाण्याचा कार्यक्रम मजेशीर झाला. दिग्या काका काय म्हणाला? गडद आणि काढत जुळत नाहीये. Lol जाम हसू आलं तेंव्हा. पण आजचा भाग एक तासाचा असायला हवा होता, असं वाटलं.

सगळ्याच बायका सुंदर दिसत होत्या आणि आज्जी तर जाम गोड दिसली. फ्रेश एकदम... परीसाठी आठवणीने तिने नेकलेस आणि कानातल्याचा सेट आणला. कौतुक वाटलं तिचं एकदम... Happy

कोणती मुलगी स्वतःच्या लग्नात असं म्हणू शकेल की मेंदी काढलीच पाहिजे का? अगदीच अरसिक बै Sad
नंतर म्हणेल मुलं झालीच पाहिजेत का?

खरंतर मुक्ताचे कॅरॅक्टर मुळीच नीट रंगवले नाहीये. उगीच आधी ज्याला त्याला विरोध आणि मग लगेच ती गोष्ट ती करणार. आत्यानी काहीतरी लहान मुलाला समजावं तसं सांगायचे मग तिला पटणार. आधी जेव्हढी ठाम मतं असणारी रंगवली होती/किंवा भासवले होते तशी मुळीच नाहीये. स्वप्नील बर्‍यापैकी मताला चिकटून राहणारा वाटतो, व अपरिहार्यतेने त्या गोष्टी कराव्या लागतायत किंवा हळूहळू मतपरिवर्तन होते हे कळते त्याच्याकडे बघून.

Pages