गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.
काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.
ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?
काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.
- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -
द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे
daily alarm = रोजचा गजर
'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'
नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे
सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या
दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या
आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी
चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित
अजून एक नमूद करावेसे वाटते की
अजून एक नमूद करावेसे वाटते की जे पुण्यामुंबई बाहेरून आले आहेत आणि ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये.. कारण अशाने न्यूनगंड येऊ शकतो आणि असे लोक मराठी बोलणे टाळतील..>>>
लंपन,
आपला सर्वसमावेशक दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे परंतू माझ्या मते असे काही नसते. 'पुणेरी' म्हणजेच प्रमाण मराठी असा समज नसावा. 'मराठी भाषा दिन' अंतर्गत घेतलेला हा उपक्रम नजरेखालून घालावात http://www.maayboli.com/node/33091
धन्यवाद!
चांगला धागा
चांगला धागा
>>> मी आपल्याला विनंती करु
>>> मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा.
Couldn't agree more!
संपुर्ण मराठी कसं लिहावं याचा
संपुर्ण मराठी कसं लिहावं याचा आदर्श वस्तुपाठ
http://www.maayboli.com/node/33505
मंदार, nice thread छान धागा.
मंदार, nice thread

छान धागा.
मंदार, आगे बढो..... चुकले,
मंदार, आगे बढो..... चुकले, यशस्वी घोड दौड चालुच राहुदे, मस्त, पटलेला, आणि अपिल झालेला लेख.
पण काही लोकांना तो नीट कळालेला दिसत नाही. असुदे. आपला नाइलाज आहे.
Completely disagree with the
Completely disagree with the article .
Actually , we should be comfortable with the words coming from other languages...that's the only way to sustain .
Look , English languages is so comfortable with the addition of new words ...
http://en.wikipedia.org/wiki/List_of_English_words_of_Hindi_or_Urdu_origin
अहो त्या ३३५०५ मधे दोन शब्द
अहो त्या ३३५०५ मधे दोन शब्द अमराठी आहेतच की फोन आणि फाईल.
प्रसाद, सहमत. कदाचित तुझा
प्रसाद, सहमत. कदाचित तुझा लेखनाच्या आशयाबद्दल गैरसमज झाला असावा.
लेखात मी तेच म्हटलं आहे. कुठलीही भाषा इतर भाषेतले शब्द आले तर समृद्धच होत जाते. अगदी जंगल हा भारतीय शब्द इंग्रजीत सर्रास वापरला जातोच.
माझं प्रस्तुत लेखनातलं म्हणणं इतकंच आहे की जिथे सहज प्रतिशब्द उपलब्ध आहेत तिथे इंग्रजीचा अनावश्यक वापर का?
अगदी जंगल हा भारतीय शब्द
अगदी जंगल हा भारतीय शब्द इंग्रजीत सर्रास वापरला जातोच.
जंगल हा शब्द इथून तिकडे गेला कि तिकडून इकडे आला ? कन्फ्युजन
जंगल हा शब्द भारतीय आहे. तो
जंगल हा शब्द भारतीय आहे. तो इकडून तिकडे गेलाय
तसंच बायको हा शब्द मूळ मराठी नाही. तो फारसी भाषेतून इकडे आला आहे.
असं चालूच राहतं.
अहो त्या ३३५०५ मधे दोन शब्द
अहो त्या ३३५०५ मधे दोन शब्द अमराठी आहेतच की फोन आणि फाईल.
भावनाओंको समझो
एनीवे, फोन आणि फाईल हे रूळलेले शब्द आहेत बोलीभाषेत. दूरध्वनी आणि कागदसंग्राहिका हे जवळचे वाटत नाहीत शब्द
तसंच बायको हा शब्द मूळ मराठी
तसंच बायको हा शब्द मूळ मराठी नाही. तो फारसी भाषेतून इकडे आला आहे.
अच्छा.. तरीच म्हटलं.. जौ दे पण
या निमित्ताने वैवकु ह्यांच्या
या निमित्ताने वैवकु ह्यांच्या गझलेवरच्या प्रतिसादात चर्चिलेला माझ्या एका शेराचा काही भाग विचारात घ्यायला हरकत नाही,
भासण्यासाठी जगाला खरा
आपला थोडाच मेकप बरा
आपण कोणीही मेकप ला बोलीभाषेत रंगभूषा म्हणत नाही. मेकप हाही शब्द इंग्रजीतून मराठीत आहे तसा स्वीकारला जाऊन रूढ झाला आहे असे वाटते.
आपण कोणीही मेकप ला बोलीभाषेत
आपण कोणीही मेकप ला बोलीभाषेत रंगभूषा म्हणत नाही. मेकप हाही शब्द इंग्रजीतून मराठीत आहे तसा स्वीकारला जाऊन रूढ झाला आहे असे वाटते.
>>> Lets create a thread on list of such words !
मंदार, तुझं म्हणण योग्य आहे!
मंदार, तुझं म्हणण योग्य आहे! पटलं! मराठीत इंग्रजी शब्द पेरण्याचे टाळण्याचा नेहमीच प्रयत्न असतो पण आता कटाक्षाने टाळेल!
मस्त, पटलेला, आणि अपिल झालेला
मस्त, पटलेला, आणि अपिल झालेला लेख.
>>>>>>>>>>>
मी मस्त "पेटलेला" असं वाचलं......
मी गोडबोलेंशी सहमत आहे. असा
मी गोडबोलेंशी सहमत आहे. असा एक धागाच काढा ज्यात इतर बाषेत रूढ झालेले मराठी शब्द आणि मराठीत समरसून गेलेले परभाषिक शब्द यावर माहिती असू द्या....
मंदार, गो अहेड..... आय मिन, काढ असा धागा. तिथे माहिती संकलित होऊ द्या.
चांगला प्रयत्न, प्रयत्ने
चांगला प्रयत्न,
प्रयत्ने वाळुचे कणं रगडीता तेल ही गळे
या लेखाला "नसे आमुची इंग्रजी
या लेखाला "नसे आमुची इंग्रजी मायबोली" हे शीर्षक जास्त चपखल बसेल.
>>जास्त चपखल बसेल. चपखल याचा
>>जास्त चपखल बसेल.
चपखल याचा नक्की अर्थ काय असावा ?
नसे आमुची इंग्रजी
नसे आमुची इंग्रजी मायबोली>>>>अनुमोदन
मंदार, काही इंग्रजी शब्द वापरले तर इंग्रजी मायबोली काय?
मायबोली म्हणजेच मातृभाषा तिच्यात थोडीशी सरमिसळ झालीये खरी पण तरीही मायबोली तिच. इंग्रजी नाही. त्यामुळे 'अशी अमुची इंग्रजी मायबोली' शीर्षक नै पटले.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/32336
प्रतिशब्दांसाठी भेट द्या
सहमत. उदाहरणे पटली.
सहमत. उदाहरणे पटली.
जिथे सहज प्रतिशब्द उपलब्ध
जिथे सहज प्रतिशब्द उपलब्ध आहेत तिथे इंग्रजीचा अनावश्यक वापर नको >>> पटले. उदाहरणेही पटली. पुढील वेळेपासून काळजी घेण्यात येईल.
चपखल = समर्पक लेख आवडला.
चपखल = समर्पक
लेख आवडला. मराठी अधिकाधिक बोलणार
मुद्दा आणि उदाहरणे पटली.
मुद्दा आणि उदाहरणे पटली.
पुढच्या वेळी लक्षात ठेवेन
ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए
ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये.. कारण अशाने न्यूनगंड येऊ शकतो आणि असे लोक मराठी बोलणे टाळतील..
>>>>>> अनुमोदन
ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए
ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये.. कारण अशाने न्यूनगंड येऊ शकतो आणि असे लोक मराठी बोलणे टाळतील.. >>>>> हे काय नविन..........म्हणजे पुण्यातल्याच लोकांना मराठी येत असा गैरसमज आहे का तिथल्या लोकांना ???????
मुल जेव्हा बोलायला सुरूवात
मुल जेव्हा बोलायला सुरूवात करतात तेव्हा त्यांना आई, बाबा असेच बोलायला शिकवा. माम्मी , पप्पा, मम्मा, पा अजुन काही... हे शब्द नको. सुरूवात इथुन करावायास हवी असे मलातरी वाटते..>>>>>>सहमत.
मंदार.......... १००% सहमत.............
Pages