गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.
काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.
ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?
काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.
- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -
द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे
daily alarm = रोजचा गजर
'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'
नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे
सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या
दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या
आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी
चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित
मस्तच हा मेदूवडा किस्सा,
मस्तच हा मेदूवडा किस्सा, गामाभाऊ.
पु.ल.देशपांडे यानी 'माझे पौष्टिक जीवन' लेखात म्हटले आहे की "मला पोस्टातील अगम्य भाषेविषयी कुतूहल असायचे. 'बटवडा' हा प्रकार तर मेदूवडा घराण्यापैकी आहे असेच मी समजत असे."
बाकी, तुम्ही म्हणता "मेदूवडा हा पूर्वी बराच लोकप्रिय पदार्थ होता...." पण मी (आणि मित्र) ज्या ज्या वेळी दक्षिण भारत सफरीवर असायचो, त्या प्रत्येक वेळी रस्त्याकडील टपरीवजा हॉटेलमध्ये मेदूवडा आणि डोसा हमखास मिळायचे. चटणीही जबरी चवीची.
दावणगिरी डोश्याने तर आजकाल कोल्हापूरात अक्षरशः उच्छाद मांडलाय. नाक्यानाक्यावर "आमच्याकडे दावणगिरी डोसा' मिळेल असे बोर्ड टांगलेले दिसतील. 'कांदा भजी' प्रकार तर आता आमच्याकडे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
असो. [@ मंदार - अवांतर झाल्याबद्दल राग मानू नये.]
अशोक पाटील
मुद्दा पटला.छान लिहीलंयस
मुद्दा पटला.छान लिहीलंयस मंदार!
<<ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? >> एकदम पटल
हा विषय चार वर्षांहून अधिक
हा विषय चार वर्षांहून अधिक पूर्वी चघळल्या गेला आहे इथे.
हे वाचा: http://www.maayboli.com/node/1114
इथे लिहीलेली कारणे विनोदी नसून खरी आहेत. तसेच आहे आता! भाषा बदलली म्हणायचे नि गप्प बसायचे.
अहो कृष्णाला झोपेतून उठवण्यासाठी एका जुन्या मराठी कवितेत लिहीले अहे 'दध्योदन भक्षी'. कारण तेंव्हा संस्कृतप्रचुर भाषा होती. आता या काळात, कवितेत जरी कुणि 'दध्योदन भक्षी' असे लिहीले तर नक्कीच ओरडा होईल. त्यामानाने इंग्रजी शब्द, हिंदी शब्द, अगदी वाक्येच्या वाक्ये वापरली तरी लोकांनी चालवून घ्यावे झाले. हेच पहा ना! http://www.maayboli.com/node/33466
यात वापरलेल्या कित्येक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आहेत, इतकेच नव्हे तर अगदी रोजच्या बोलण्यात ते मराठी शब्द प्रचलित असत (निदान मी भारतात होतो तेंव्हा , १९७० सालापर्यंत). पण??
झक्की, तुम्ही दिलेल्या
झक्की, तुम्ही दिलेल्या दुव्यावर, 'तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.' असं थुत्तरफोड लिहिलं आहे!
मग ते सर्वांना वाचता येईल असे
मग ते सर्वांना वाचता येईल असे करायचे असल्यास मला काय करावे लागेल? कदाचित फार जुने झाल्याने मायबोलीच्या प्रशासकांनीच तसे केले असावे!
न च जमले तर त्यातली माझ्या मते पटण्याजोगी कारणे मी इथे लिहीन. तुमचा स्वतःचा प्रतिसाद तिथे तुम्ही गंमत म्हणून लिहीला असला तरी, बरेच लोक कदाचीत तसे गंभीरपणेहि म्हणत असतील असे मला नक्की वाटते!! तुमची संमति असेल तर मी तेहि इथे लिहीन. कारण 'स्टाटस मेंटेन' करण्याबद्दल भारतीय महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध स्त्रीपुरुषांचे काय मत होते, त्याबद्दलची एक गोष्ट श्री एबाबा यांनी मागे खाजगीत सांगितली होती. त्याचा मराठी बोलण्याशी फारसा संबंध नसला तरी 'स्टाटस मेंटेन' करण्याबाबत भारतीय महाराष्ट्रीय लोकांची काय समजूत असते ते मोठे विनोदी वाटेल, निदान अमेरिकेतल्या लोकांना तरी!
कुणाला हवे असल्यास मी ते काम आनंदाने करीन
हो हो. अवश्य लिहा. दुवा चालत
दुवा चालत नाहीये, तेव्हा तिथलं सगळं तुम्हाला तुमच्या रंगिबेरंगीच्या पानावर नव्यानं डकवता आलं तर बघा.
माझ्या बहिणीची कन्या(ईयत्ता
माझ्या बहिणीची कन्या(ईयत्ता २री). "आपण walking ला जाऊया." असं मराठी बोलायला लागली कारण तिच्या बाईंनी शाळेत फक्त ईंग्रजी बोलायला सांगितले. तेव्हा माझ्या बहिणीने तिला समजावले कि, "असं अर्ध ईंग्रजी अर्ध मराठी नको बोलूस. पुर्ण वाक्य ईंग्रजीतून बोल आणि मग तेच वाक्य मराठीतून बोल. म्हणजे तुला एकाच वेळी दोन-दोन भाषा चांगल्या बोलता येतील".>>>> खरंच हा एकदम मस्त आणि प्रभावी उपाय आहे
छिद्रान्वेषीचा पैलवानांनी
छिद्रान्वेषीचा पैलवानांनी सांगितलेला किस्सा मस्तच
पण त्याचा (मला माहीत असलेला) अर्थः
प्रत्येक गोष्टीत काय टीकास्पद आहे तेवढेच बघून त्यावरच बोलणे
असो
हे अवांतरच झाले
>>सुबोध असेल ते अंगवळणी
>>सुबोध असेल ते अंगवळणी पडते... महापौर शब्द सोपा असल्याने रुळला.. प्रथमनगरनिवासीमहाजन ... असा संस्व्कृत प्रचुर शब्द असता तर चालला असता का?<<
रानडुक्करांनो, महापौर हा सोपा शब्दही संस्कृतच आहे जसा तुमचा प्रथमनगरनिवासीमहाजन! त्याशिवाय तुम्हाला पचवायला अवघड जाणारे आणखीच अवघड सत्य म्हणजे तो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेला आहे.
शब्द सावरकरांचा असो वा
शब्द सावरकरांचा असो वा कुणाचाही असो, तो सोपा असेल तरच लोकांकडून स्वीकारला जाणार.
वरती जोशी साहेबानी म्हटले की बँक हा शब्दच वापरणार, पतपेढी नाही.. कारण त्यांच्या तोच शब्द अंगवळणी पडला आहे. तसेच एस टी, डायवर हे शब्द लोकांच्या अंगवळणी पडलेले असेल तर लोक तेच बोलणार.
महापौर हा सोपा शब्दही
महापौर हा सोपा शब्दही संस्कृतच आहे जसा तुमचा प्रथमनगरनिवासीमहाजन!
संस्कृत फारसी इंग्लिश कोणताही असो, सोपा असावा म्हणजे झालं.
झक्की तुम्ही उदाहरणार्थ
झक्की तुम्ही उदाहरणार्थ दिलेला बाफ एकदम मस्त आहे.. भाडे, भाडेकरू, घरमालक, पावती, नियम, सदनिका, घर किती शब्द बदलल्यावर मुळ लेख मराठी येईल यावर विचार करतोय..
परदेसाई + १
परदेसाई + १
>>> झक्की तुम्ही उदाहरणार्थ
>>> झक्की तुम्ही उदाहरणार्थ दिलेला बाफ एकदम मस्त आहे.. भाडे, भाडेकरू, घरमालक, पावती, नियम, सदनिका, घर किती शब्द बदलल्यावर मुळ लेख मराठी येईल यावर विचार करतोय..
+२
या मूळ इंग्रजी लेखात व मूळ इंग्रजी प्रतिसादांत मधूनमधून मराठी शब्द घुसडल्यासारखे वाटत आहेत आणि लेख व प्रतिसाद रोमन लिपीऐवजी देवनागरीत लिहिले आहेत.
आजकाल तसेच बोलतात म्हणे
आजकाल तसेच बोलतात म्हणे भारतात! माझे रंगीबेरंगी पान वाचू शकलात तर आणखी मुद्दे सापडतील. काही कारणे पटतात, काही पटली नाहीत तरी ते वैयक्तिक मत समजून सोडून द्यायचे. बँक, स्टेशन, टेबल, कॉलेज हे शब्दच जर पुष्कळांना सोयीचे, सोपे, नेहेमीच्या वापरातले वाटत असतील तर काय करणार? जेवायला काय विचारल्यावर कोंबडी, बकरी असे म्हणण्या ऐवजी चिकन, मटन असेच पुष्कळदा म्हणतात.
अनेक वर्षांपूर्वी (१९५० च्या आसपास), जेंव्हा मी पुण्याहून नागपूरला जात असे, तेंव्हा तिकडच्या मराठीत नि पुण्याच्या मराठीत प्रचंड फरक असे. नागपूरला मराठीतहि हिंदी शब्द अनेक. तरी त्याला मराठीच म्हणत. आता इंग्रजी शब्द एव्हढेच.
एके काळी या मायबोलीवर लोकांना माझा धाक वाटायचा, की इंग्रजी शब्द वापरले तर मी नावे ठेवीन. पण आता मी संपूर्ण हार पत्करली आहे! हो, आता भारतात जायचे आहे, तिथे उगाच कुणि मला गांवढळ, अशिक्षित असे समजू नये! नाहीतरी तिथे काही काही जण मी मराठीत बोललो तरी इंग्रजीतच बोलतात (माना वेळावून, वेळावून, कुठले तरी अचाट शब्द शोधून)
माना वेळावून, वेळावून, कुठले
माना वेळावून, वेळावून, कुठले तरी अचाट शब्द शोधून>>>
बाकी काहीही म्हणा, मंदारच्या
बाकी काहीही म्हणा, मंदारच्या या धाग्याने मलाही एक प्रतिसाद लिहितांना स्क्रू ड्रायव्हर साठी 'पेचकस' हा जुना शब्द आठवला आणि स्लाइड रेंच करता 'सरकपाना' हा एक नवा अन साधा मराठी शब्द मी तयार केला. जिथे शक्य होईल तिथे मी हे अस करणार आहे, अन नवे शब्द लोकांना अर्थ कळण्यासाठी इंग्रजी शब्द ही लिहित जाणार आहे.
श्रीकांत, >>जिथे शक्य होईल
श्रीकांत,
>>जिथे शक्य होईल तिथे मी हे अस करणार आहे, अन नवे शब्द लोकांना अर्थ कळण्यासाठी इंग्रजी शब्द ही लिहित जाणार आहे.
मस्तच रे
छान उपयोग होतो आहे धाग्याचा.
श्रीकांत, अगदी योग्य पाउल
श्रीकांत,
अगदी योग्य पाउल उचललंत!
बिनधास्तपणे नवीन शब्द वापरीत चला आणि आम्हालाही सांगा! सरकपाना भारीच!
आ.न.,
-गा.पै.
मायमराठीचे सर्वात मोठे शत्रु
मायमराठीचे सर्वात मोठे शत्रु म्हणजे तथाकथित मराठी वृत्त वाहिन्या [चुकलो, न्यूज चॅनेल्स!] क्रिकेटच्या बातम्यांसाठी भरपूर वेळ दिला जातो पण त्यात मराठी शब्द जेवणातल्या लोणच्याच्या फोडीप्रमाणे फक्त अधून मधून वापरले जातात.
खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवरून मराठी भाषेत क्रिकेटचे 'धावते वर्णन' देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झाला. त्यावेळच्या समालोचकांनी [बाळ पंदीत, वि.वि.करमरकर इ.] अनेक सोपे मराठी प्रतिशब्द अक्षरशः शोधून काढले आणि रुळवले. उदा. झेल [कॅच], यष्टी [स्टंप] यष्टीरक्षक, [विकेटकीपर], पायचीत [एल.बी.डब्ल्यू], डाव [इनिंग], ओलीसुकी [टॉस], नाबाद [नॉटाआऊट], शतक [सेंच्युरी], फलंदाज [बॅटस्मन], गोलंदाज [बॉलर], आपटबार [बंपर / बाऊन्सर] बदली [सबस्टीट्यूट], कर्णधार [कॅप्टन], उपकर्णधार [व्हाईस कॅप्टन], षटक [ओव्हर], निर्धाव षटक,[मेडनओव्हर] वगैरे. आजकाल मात्र हे सर्व शब्द मोडीत काढून, अट्टाहासाने इंग्रजी शब्द वापरण्याची 'फॅशन' येते आहे.
याबाबतीत वर्तमानपत्रेही मागे नाहीत. सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅदम ट्रूसो संग्रहालयात बसवला, तेंव्हा त्याचे छायाचित्र आणि बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध् करताना पुण्याच्या 'सकाल' चा मथळा ओता, " सेम टू सेम "! [खरं तर 'सेम टू सेम' हा शब्द इंग्रजी भाषेतही वापरला जात नाही. कोणी वापरलाच तर त्याला स्लँग' समजलं जाईल.]तसंच राहुल द्रविडने २०० झेल घेण्याचा विक्रम केला, त्या बातमीचा 'लोकसत्ता'चा मथळा होता " कॅची....." इंग्रजीत 'कॅची'चा अर्थ 'वेधून घेणारा, आकर्षित करणारा [ विशेषण] असा होतो.]
एकूण काय, मराठी माध्यमातून काम करणार्या मंडळींना मराठी किंवा इंग्रजी कोणतीच भाषा धड येत नसावी. त्यामुळे एकाच दगडात दोन भाषांचा खून पाडण्याची किमया ते करून दाखवतात !
मुंबईतल्या दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याची सक्ती करू पहाणार्या [आणि त्यासाठी 'राडा' करण्यास मागे-पुढे न पहाणार्या] संघटनांनी, धेडगुजरी मराठी वापरणार्या वाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांच्या वर कारवाई करावी. तरच या मंडळींचे डोळे उघडतील.
-बापू करंदीकर
बापू, १०१% सहमत.
बापू, १०१% सहमत.
कॅची शब्दावर कॅच - कॅची अशी
कॅची शब्दावर कॅच - कॅची अशी कोटी होती ,म्हणून तोशब्द वापरला, त्यात काय चुकलं?
जाउ दे जामोप्या, तुम्हाला
जाउ दे जामोप्या, तुम्हाला नाही कळणार. बरं चला सांगतोच - मराठी वृत्तपत्रात हा इंग्रजी शब्द मथळा म्हणून वापरला म्हणून चुकलं. काय लिहीलं आहे त्यातल्या शब्दार्थ आणि मथितार्थ यातला फरक समजेल ना तुम्हाला जामोप्या, तो सुदिन.
बापू करंदीकर, १०० % सहमत.
बापू करंदीकर, १०० % सहमत. याला एकंच उपाय. तो म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करणे.
आ.न.,
-गा.पै.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद
इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद नाही करता येणार गा.पै. अनेक कारणं आहेत पण तसं करणं महाकठीण आहे.
शिवाय शासकीय पातळीवर जे करायचं त्यावर आपले काही नियंत्रण नसते.
तेव्हा वैयत्तिक पातळीवर जे करता येईल ते करावे हेच उत्तम
जुनी मायबोली चाळता चाळता सहज
जुनी मायबोली चाळता चाळता सहज दिसलं म्हणून ----
गृहपाठः- या लेखातील (http://www.maayboli.com/node/23480) जास्तित जास्त इंग्रजी शब्द काढून परत लिहा.
वैयत्तिक पातळीवर जे करता येईल
वैयत्तिक पातळीवर जे करता येईल ते करावे हेच उत्तम
चिमण, ------------------ बर्
चिमण,
------------------
बर्याच वेळेला आजूबाजूच्या लोकाशी, ऑफिसमध्ये, मित्रमैत्रिणींबरोबर बोलताना लक्षात आलं की त्यातले बरेच जण नियमित जिम मध्ये जातात, वजन आटोक्यात असतं पण एक कॉमन तक्रार असते की काही करा, पोट मात्रं कमी होत नाही.. अरेरे काय करावे?
मी ज्या जिम मध्ये जाते, तिथली इन्स्ट्रक्टर अतिशय इनोव्हेटिव्ह आहे. आठवड्यातून ३ दिवस हार्डकोर अॅब्ज ची बॅच घेते. मी गेला एक महिना अटेंड करून पाहिल्या बॅचेस आणि मला फरक जाणवला बर्यापैकी. तुम्हालाही थोडाफार फायदा व्हावा यासाठी हा धागा.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बर्याच वेळेला आजूबाजूच्या लोकाशी, कार्यालयात, मित्रमैत्रिणींबरोबर बोलताना लक्षात आलं की त्यातले बरेच जण नियमित व्यायामशाळेत जातात, वजन आटोक्यात असतं पण एक सर्वसाधारण तक्रार असते की काही करा, पोट मात्रं कमी होत नाही.. अरेरे काय करावे?
मी ज्या व्यायामशाळेत जाते, तिथली प्रशिक्षक अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना राबवते. आठवड्यातून ३ दिवस फक्त पोट कमी करण्याचे वर्ग घेते. मी गेला एक महिना वर्गात भाग घेऊन करून आधीच्या वर्गांना आणि मला फरक जाणवला बर्यापैकी. तुम्हालाही थोडाफार फायदा व्हावा यासाठी हा धागा.
संस्कृत भाषेत प्रचंड ज्ञान
संस्कृत भाषेत प्रचंड ज्ञान लिहुन ठेवले आहे. एक दिवस जगाची भाषा संस्कृतच असेल.
@ जामोप्या इथे असलेल्या मराठी
@ जामोप्या
इथे असलेल्या मराठी माध्यमात शिकलेल्या (तुमच्यासकट) अनेकांपेक्षा माझं मराठी चांगलं आहे.
>>स्वतः आणि स्वतःच्या मुलाना कॉन्वेंटमध्ये घालून नव्या काळाला तेच कसे योग्य आहे, याचे रडगाणे गायचे.. वैयक्तिक पातळीवर इतके करता येईल नै का?
माझ्या मुलांचं वय काय, शाळेत जायच्या वयाची आहेत की लहान आहेत, ती कुठल्या माध्यमात शिकतात या वैय्यत्तिक बाबी मी मायबोलीवर लिहू इच्छित नाही. अन्यथा तुम्हाला याचेही सडेतोड उत्तर दिले असते. शिवाय माझ्या कुटुंबियांबद्दल (मुलांबद्दल) ही तुमची शेवटची टिप्पणी असेल अशी मी आशा करतो. हा शेवटचा इशारा समजा. अन्यथा तुमच्याबाबत तेच केल्यास बोंबा मारु नये.
शिवाय लेखात काय म्हटलंय ते समजून घ्या आणि मग बोला अशी विनंती/सूचना तुम्हाला अनेकदा करुनही तुम्ही पुन्हा पुन्हा फिदीफिदी सारखं मूर्खपणा करतच आहात. विषय काय बोलताय काय?
Pages