गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.
काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.
ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?
काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.
- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -
द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे
daily alarm = रोजचा गजर
'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'
नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे
सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)
टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या
दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या
आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी
चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित
व्वा.वा. I AGREE WITH U....
व्वा.वा. I AGREE WITH U....
सहमत.
सहमत.
उदय "आपल्याशी सहमत आहे" असं
उदय "आपल्याशी सहमत आहे" असं म्हण रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदारशी पूर्णपणे सहमत! माझ्या
मंदारशी पूर्णपणे सहमत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या माहितीत असे काही लोक आहेत जे इंग्रजी शब्दांसाठी स्वत: प्रतिशब्द निर्माण करतात...स्वत:च्या लेखनात ते तसे लिहितात..मात्र बोलतांना साध्या आणि सहज मराठीऐवजी इंग्रजीचा वापर जास्त करतात.
त्यामुळे,जोवर केवळ इतरांना दाखवण्याकरता नव्हे तर मला स्वत:ला आपल्या भाषेत बोलायला जास्त आवडतं असं मनापासून वाटत नाही तोवर हे आंग्लाळलेपण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
आता आणखी एक गंमत....जे शब्द आपल्या मराठीत आपण सर्रास वापरतो..त्यातले किती शब्द परभाषेतून आलेत ह्यावर अहमहमिकेने चर्चा होईल हे निश्चित...तेव्हा मंदारराव, कमरेचा पट्टा आवळा आणि व्हा युक्तिवादाला तयार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपूर्ण सहमत !!! . . पण मि हा
संपूर्ण सहमत !!! . . पण मि हा प्रयोग माझ्यापूरता केला होता . . पण फसला . .![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
काही इंग्रजी शब्द टाळता येत
काही इंग्रजी शब्द टाळता येत नाहीत मंदारबुवा! ,सावरकरांनी मराठीवरचा फारसी प्रभाव नष्ट करुन मराठीचे 'संस्कृत'करण करण्याचा घाट घातला होता. तुम्ही बघा तसे काही करता येते का....
अगदी सहमत आहे.
अगदी सहमत आहे.
उदाहरणे पटली.
उदाहरणे पटली.
ह्म्म्म....
ह्म्म्म....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेम्स बाँड, तिसरा परिच्छेद
जेम्स बाँड, तिसरा परिच्छेद बघा. मी तेच म्हटलंय त्यात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'प्रिंटरची' शाई कशी वाचवावी
'प्रिंटरची' शाई कशी
वाचवावी -लेखक मंदार जोशी www.maayboli.com/node/33430,
मायक्रोलेव्हल गप्पा -लेखक मं जो www.maayboli.com/node/32505....
प्रिंटरला 'मुद्रक' म्हणु शकता कि मंदारसर. दुसर्या सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण.
एक सहज करता येण्यासारखी गोष्ट
एक सहज करता येण्यासारखी गोष्ट जी आपण सहसा करत नाही ती म्हणजे आपल्या कंपनीमधल्या अमराठी सहकार्यांशी त्यांची सोय म्हणून हिंदी, इंग्रजीत बोलण्यापेक्षा मराठीत बोलायला सुरुवात करा... येताजाता काही मराठी शब्द शिकवा... एखाद्-दुसरा चांगला हलकाफुलका मराठी चित्रपट अथवा विनोदी नाटक बघायला घेउन जा.... हळूहळू तेही तोड्कमोडक का होइना मराठी बोलायला लागतात... आणि माझा अनुभव असा आहे की त्यांनाही मराठी शिकण्याची इच्छा असते आणि बर्याच जणांना मराठी बोलायला आवडते ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदार चांगला धागा सुरु केला
मंदार चांगला धागा सुरु केला आहेस
श्री. मंदार जोशींनी हा धागा
श्री. मंदार जोशींनी हा धागा काढून आमच्यासारख्या इंग्रजीच्या नावाने बोंब असणार्या लोकांसाठी एक चांगली सोय करून दिलेली आहे. या धाग्याद्वारे आम्हांला आता बर्याच इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ ज्ञात होणार आहेत, परिणामी डिक्शनरी... सॉरी शब्दकोश घेण्याचा खर्चदेखील वाचणार आहे. लगे रहो.
सहमत.! >>आणि माझा अनुभव असा
सहमत.!
>>आणि माझा अनुभव असा आहे की त्यांनाही मराठी शिकण्याची इच्छा असते आणि बर्याच जणांना मराठी बोलायला आवडते ही<<
आमच्या कंपनीतही काही दिवसापूर्वी 'सिमेन्सचा' एक अमराठी, सॉफ्टवेअर इंजिंनीयर(मराठी शब्द) आला होता. माझा बॉस आणि तो सुरवातीला हिंदी आणि इंग्रजी मध्ये बोलत होते. पण मी तेथे गेल्यानंतर मला आणि माझ्या बॉसला आपापसात मराठीत बोलताना पाहून तो ही मग आमच्याशी मराठीतच बोलू लागला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>प्रिंटरला 'मुद्रक' म्हणु
>>प्रिंटरला 'मुद्रक' म्हणु शकता कि मंदारसर.
लेख परत एकदा वाचा. मुद्रक हा शब्द प्रिंटर हे जे यंत्र आहे त्याला उद्देशून तो शब्द वापरला आहे. आपण मराठीत जेव्हा मुद्रक म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ "ज्याने मुद्रण केले आहे तो" म्हणजेच व्यक्तीला उद्देशून तो शब्द वापरला जातो. तेव्हा तुमचा मुद्दा चुकीचा आहे.
उदा. Printer and Publisher = मुद्रक व प्रकाशक
>>मायक्रोलेव्हल गप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चू़क कबूल बरं का. आणि हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. सूक्ष्म पातळीवरच्या गप्पा किंवा तत्सम असं शीर्षक करता येईल. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन हो
सहमत
सहमत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुल जेव्हा बोलायला सुरूवात
मुल जेव्हा बोलायला सुरूवात करतात तेव्हा त्यांना आई, बाबा असेच बोलायला शिकवा. माम्मी , पप्पा, मम्मा, पा अजुन काही... हे शब्द नको. सुरूवात इथुन करावायास हवी असे मलातरी वाटते..
सर्वांच्याच माईंडमधे असलेली
सर्वांच्याच माईंडमधे असलेली बात ! काँग्रॅच्युलेशन्स आणि धन्स ..
आपण सर्वांनीच मॅक्सिमम पुअर मराठी लिहायचा ट्राय करायला पाहीजे यावर सगळेच अॅग्री असतील. फक्त प्रॅक्टिकली आता ते दिसायला पाहीजे.
लेख / कविता / कथा / कादंबरी
लेख / कविता / कथा / कादंबरी यांचे नाव इंग्रजी / हिंदी किंवा अन्य दुसर्या कोणत्याही भाषेत असणं यात मला तरी काही वावगं वाटत नाही.
अर्थात हे माझे वैयक्तित / वैयक्तिक / व्यक्तिगत मत आहे
उदा : व पु यांचे पार्टनर. बेफिकीरजी यांचे गुड मॉर्निंग मॅडम .
असे बरेच उदा देता येईल.
भुक्कड ही कादंबरी देवनागरी
भुक्कड ही कादंबरी देवनागरी इंग्रजी मधे आहे का ?
युरी गागारीन.... एकदम सहमत
युरी गागारीन.... एकदम सहमत आहे ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो. मला पटले. पुढच्या वेळेस
हो.
मला पटले. पुढच्या वेळेस लक्षात ठेवेन. धन्यवाद.
उत्तम धागा....
उत्तम धागा....:स्मित:
मंदार अत्युत्कृष्ट धागा
मंदार
अत्युत्कृष्ट धागा
सहमत.. शुद्ध मराठीत बोलले की
सहमत.. शुद्ध मराठीत बोलले की लोक एकदम विचित्र नजरेने पहातात.. २-४ विंग्रजी शब्दांची पेरणी केली की मग तुम्ही त्यांच्यातलेच एक होऊन जाता.. असो शक्य तेवढे शुद्ध मराठीत बोलतोच; तरी अजून काळजी घेईन.. अजून एक नमूद करावेसे वाटते की जे पुण्यामुंबई बाहेरून आले आहेत आणि ज्यांचे मराठी 'पुणेरी' नाहिए अशा लोकांच्या मराठीला हसू/ हिणवू नये.. कारण अशाने न्यूनगंड येऊ शकतो आणि असे लोक मराठी बोलणे टाळतील..
सुकी कोंबडी काजू सहित>>>तो पा
सुकी कोंबडी काजू सहित>>>तो पा सु
सहमत. मला तर देवनागरी सोडून
सहमत.
मला तर देवनागरी सोडून मधेच रोमन लिपीत लिहायचे जरा अवघडच वाटते.
इंग्रजी चित्रपटांची नावे सोडल्यास, मी सहसा असे करतच नाही.
लेख परत एकदा वाचा. मुद्रक हा
लेख परत एकदा वाचा.
मुद्रक हा शब्द प्रिंटर हे
जे यंत्र आहे
त्याला उद्देशून तो शब्द
वापरला आहे. आपण
मराठीत जेव्हा मुद्रक
म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ
"ज्याने मुद्रण केले आहे तो"
म्हणजेच
व्यक्तीला उद्देशून
तो शब्द वापरला जातो.
तेव्हा तुमचा मुद्दा चुकीचा आहे.
उदा. Printer and
Publisher = मुद्रक व
प्रकाशक>>> मंदार जोशी hi.m.wikipedia.org/wiki/अभिकलित्र या विकि दुव्यावर प्रिंटरला मुद्रकच म्हण्टले आहे.
लिंक ओपन होत नसल्यास 'अभिकलित्र' असे गुगल करा.
मंदार, १००% सहमत.
मंदार, १००% सहमत.
Pages