अर्धी वाटी मूग डाळ
दीड वाटी तांदूळ
१ टेबलस्पून शुध्द तूप
१०-१२ कढीपत्ता पाने
१ टीस्पून जिरे
पाव चमचा मिरी दाणे
मीठ
१०-१२ काजू तुपावर खरपूस भाजून
आवश्यकतेनुसार पाणी
मूग डाळ कोरडीच थोडी भाजून घ्यावी. भाजून थंड झालेली डाळ व तांदूळ पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावे.
पॅन/ कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडवावेत. कढीपत्ता, मिरी दाणे घालून थोडे परतावे.
त्यात निथळलेले तांदूळ व डाळ घालून व्यवस्थित परतावे. आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून शिजवावे. वाढताना ही खिचडी वरून काजू घालून वाढावी.
सोबत आंध्र स्टाईलने टोमॅटोची चटणी देतात. परंतु कैरीचा छुंदा/ लोणच्याबरोबरही ही खिचडी मस्त लागते.
आंध्रात किंवा दक्षिण भारतात ही खिचडी खास करून नैवेद्यासाठी बनवली जाते. अतिशय सौम्य व रुचकर असा हा पदार्थ आहे. गरम/ गार दोन्ही प्रकारे छान लागते. हिरव्या केळीच्या पानांत किंवा द्रोणात ही गरमागरम खिचडी घालून देतात. वरून साजूक तूप!
छान आहे. एक वेगळा प्रकार.
छान आहे. एक वेगळा प्रकार.
मस्त! ही अगदी सेम टू सेम
मस्त! ही अगदी सेम टू सेम मद्रासी पोंगलची रेसिपी!
मुंबईत माटुंग्याला एका ष्टालवर मस्त मिळतं पोंगल!
आता करून पहातो घरी!
बित्तुबंगा कुठे? कुठे?
बित्तुबंगा कुठे? कुठे?
आहा! झकास एकदम!
आहा! झकास एकदम!
येस्स... पोंगल सारखीच
येस्स... पोंगल सारखीच वाटत्येय ही खिचडी.
मस्त लागते. शुद्ध तूप मस्त, त्याशिवाय मजा नाही. सोबत मद्रासी पापड... यम्मी
मामी, इथे माझी पोष्ट वाचा
मामी, इथे माझी पोष्ट वाचा
येस्स बित्तु, ही पोंगल खिचडीच
येस्स बित्तु, ही पोंगल खिचडीच असावी! पण मी ज्या प्रकारे पोंगलची कृती पाहिली आहे त्यात कधी हिंग होता, कधी मिरच्या वगैरे होत्या. पण ह्या वरच्या प्रकारात ह्यापैकी काहीच नाही. फार भन्नाट लागतो हा प्रकार. यम्मी नाश्ता म्हणूनही खायला हरकत नाही! सोबत सागु / काकडीची दह्यातील मोहरी फेसून केलेली कोशिंबीर देखील मस्त कॉम्बो आहे.
बित्तु अय्यप्पन चा पत्ता दिल्याबद्दल थँक्स! सहर्ष समस्त खादाडीप्रेमी मुंबईनिवासी सुहृदांस कळविण्यात येईल.
लाजो, मामी, देवचार... धन्स!
मस्त वाटतोय हा प्रकार. करुन
मस्त वाटतोय हा प्रकार. करुन पहाण्यात येइल
छान आहे प्रकार. मी दह्याबरोबर
छान आहे प्रकार. मी दह्याबरोबर खाणार !
धन्यवाद बित्तु.
धन्यवाद बित्तु.
छानच झाली होती ही खिचडी. मी
छानच झाली होती ही खिचडी. मी कालच केली. तुपाबरोबरच ओरपली.
खुपच सुदर दिसत आहे. पाहुन च
खुपच सुदर दिसत आहे. पाहुन च खावी शी वाटत आहे..मी नक्किच करुन पाहिन
अरुंधती, धन्यवाद ! प्रिंट
अरुंधती,
धन्यवाद !
प्रिंट घेतली आहे, या प्रमाणे बघु जमता का घरी !!
कालच केली !!फक्त इतकी मऊ झाली
कालच केली !!फक्त इतकी मऊ झाली नाही पन छन लागत होती!!आज नाश्त्याला पण खाल्ली !!!
सौम्य आणि रुचकर !!मस्त!!!!
धन्स रोचीन. काल आमच्याकडेही
धन्स रोचीन. काल आमच्याकडेही रात्री जेवायला हीच खिचडी होती. नाश्त्यालाही मस्त लागते.
वर्षा, प्राची, दीपा, दिनेशदा, अनिल... धन्यवाद!
आत्ताच केली ही खिचडी. काय
आत्ताच केली ही खिचडी. काय मस्त लागते आहे.
इतक्या सात्विक आणि चविष्ठ पाककॄतीबद्दल अरुंधती कुलकर्णी यांचे शतशः आभार!
खावीशी वाटत आहे धन्यवाद या
खावीशी वाटत आहे
धन्यवाद या नावीन्यपूर्ण प्रकाराच्या माहितीबद्दल
आता सगळे नीट वाचतो, नुसता फोटो पाहूनच प्रतिसाद लिहिला
पाकृ आणि फोटोही एकदम छानच
पाकृ आणि फोटोही एकदम छानच आहे. करून बघणार नक्कीच.
अहाहा..! पोंगल... तोंपासु..
अहाहा..! पोंगल... तोंपासु..
पोंगल, नाकु बागु इष्टम....
खूप दिवस या रेसिपीच्या शोधात
खूप दिवस या रेसिपीच्या शोधात होते.
आजच करते रात्री.
आज केली होती ही खिचडी. मस्त
आज केली होती ही खिचडी. मस्त चव!
मला फार आवडते ही खिचडी.
मला फार आवडते ही खिचडी. आमच्या इथल्या साउथ इंडीयन रेस्टॉरंटमधे पोंगल म्हणून मिळते. रेसेपीबद्दल धन्यवाद अरूंधती.