Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाएपिसोडमध्ये आधीचेच थोडे
महाएपिसोडमध्ये आधीचेच थोडे थोडे तुकडे दाखवले मालिकेचे.
नाही झाला वाटतं. लग्न तर
नाही झाला वाटतं. लग्न तर शुक्रवारी आहे अशी जाहिरात येते आहे.
आधीचेच तुकडे दाखवले. शनिवारी
आधीचेच तुकडे दाखवले. शनिवारी जोरदार जाहिरात करत होते
ओ जाना डार्लिन्ग टुमारो,,,एस
ओ जाना डार्लिन्ग टुमारो,,,एस टी च्या थांब्यावर येशील का ........काय मस्त गाण आहे..मला माझे एन.सी.सी कॅम्प चे दिवस आठवले..आम्ही हे आणि असलीच गाणी बोलत खुप धमाल करायचो
आधीचेच तुकडे दाखवले. >>
आधीचेच तुकडे दाखवले. >> ओह्ह.. मग महाएपिसोड कशाला म्हणवायचा..
अरे पण मला एक सांगा, आपल्या मराठी लग्नात संगीत, मेहंदी कधीपासून प्रघात पडला?
अगं परवा आत्या म्हणते ना,
अगं परवा आत्या म्हणते ना, आपल्याकडे पद्धत नाही पण आमच्याकडे इंदोरात करतात म्हणुन आपणही करु....
आपल्याकडे पद्धत नाही पण
आपल्याकडे पद्धत नाही पण आमच्याकडे इंदोरात करतात म्हणुन आपणही करु...>> अच्च्छा आत्त कळालं, निव्वळ हा कार्यक्रम करता यावा म्हणून आत्याला सडनली इंदोरी केले होते आणि ती चमत्कारिक हिंदी आपल्या गळ्यात मारलीय
सही आहे ना ते गाणं एकदम. पण
सही आहे ना ते गाणं एकदम. पण तो एपिसोड कधी दाखवणार आहेत?? हा आठवडाभर तेच एपिसोड्स आहेत का??
महाएपिसोड नाही हो, काल १
महाएपिसोड नाही हो, काल १ तासाचा दाखवला तो "Story so far".
आज रात्री संगीत असावं बहुतेक .............
ओके thanks..
ओके thanks..
अरे पण मला एक सांगा, आपल्या
अरे पण मला एक सांगा, आपल्या मराठी लग्नात संगीत, मेहंदी कधीपासून प्रघात पडला?
<<
बागेश्री,
यात काही नवीन नाही, मराठी लोकांनी कधीच्याच अॅडॉप्ट केल्यायेत कि या प्रथा , आय मीन ज्यांना आवडतं ते करतात . :).
मला आठवतय त्या प्रमाणे बहुदा हम आपके-दिलवाले दुल्हनिया पासून मी नॉर्थ इंडियन स्टाइल ची मेन्दी-संगीत फंक्शन्स ट्रेन्ड पाहिलीये, अशी अनेक मराठी लग्नं आणि नॉर्थ स्टाइल मोठ्या मेन्दी पार्टीज तर ढिगानी पाहिल्यायेत मराठी लोकांना करताना (पुण्यात तरी.)
माझ्या नात्यात तर किती तरी मुलींनी केली होती संगीत-मेन्दी फंक्शन्स.. माझ्या लग्नात छोट्या प्रमाणात केली होती मेन्दी पार्टी पण भावाच्या लग्नात आम्ही पण मस्तं डान्स-सन्गीत-मेन्दी पार्टी ठे वली होती.
इतक्यात तर नात्यात जी लग्नं झाली, सगळ्यांनी सीमान्त पूजनाच्या नंतर्/सीमान्त पूजन स्किप करून (किंवा सीमान्त पूजन मेन लग्नाच्या दिवशी ठेऊन )आदल्या दिवशी फक्त डीजे नाइट स्टाइल संगीत ठेवलं होतं.
सगळ्याच प्रथा मुळ आपल्या कल्चर मधे असायलाच हव्यात थोडीच आहे, जे एन्जॉय करतो ते करावं, हौसेला मोल नाही.
माझ्या सासरी तर चुडा पण लाल भरतात.
आज मानव ने शाहरुख खान मस्स्त
आज मानव ने शाहरुख खान मस्स्त केला !
आज मानव ने शाहरुख खान मस्स्त
आज मानव ने शाहरुख खान मस्स्त केला !
>>>
बोले तो??
राधा पार्लर मधे जाउन येते आनि
राधा पार्लर मधे जाउन येते आनि अचानक सुंदर दिसायला लागते
पण घना ज्या पदध्तीने तिला तु खरंच् खुप सुंदर दिसते अस म्ह्णतो ना,,,बास मी फीदा.,..कुठल्याही मुलीली वाटेल..हाय्ला आपल्याला पण असली कमेंट मिळायला हवी
निंबे, क क क क क क किरण वाला
निंबे, क क क क क क किरण वाला शाहरुख आठवतोय ना? तो डरावना शाहरुख त्याने काल रंगवला. तो घना आणि राधाचे लग्न मोडावे म्हणून काही ना काही कॢप्त्या लढवतो आहे.
खरंय अंकुडी... मी पण फिदा...
खरंय अंकुडी... मी पण फिदा...
पण राधाचे ऑड मॅचिंग पाहण्याने डोळ्यांना होणारा त्रास अजूनही कायम आहे. कॉश्चुम डिझायनरला राधा म्हणजे अशीच मिसमॅच कपडे घालणारी एक विचित्र पात्र म्हणून रंगवायचीये की मुक्ता तिचेच ड्रेसेस सिरियलमध्ये घालते, हे समजायला मार्ग नाही.
सुकन्या मोनेच्या साड्या मात्र सगळ्या एक से एक आहेत. इतकी जाड झालेली असूनही मेक-अप आणि साडी खुप छान कॅरी करण्याने ती अतिशय सुंदर दिसतेय. सुखद....
कुहू फारच प्रेमळ नणंद आहे. राधाचं सासर एकूणच फार मस्त. ती पण रमायला लागलीये त्यांच्यात.
एकूणच, घरच्यांची कटकट नको म्हणून एकदाचे लग्न करुन लग्नानंतर आपापले आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे, हा राधा आणि घनाचा प्लॅन असावा, पण तो कसा फिसकटतो आणि ते नेहमीप्रमाणे संसार कसे करायला लागतात, याची प्रक्रिया मालिकेत दाखवायची असावी.
कुहू फारच प्रेमळ नणंद आहे.>>>
कुहू फारच प्रेमळ नणंद आहे.>>> +१ सानी,, ती माझ आवडत पात्र आहे भारी करते ती
कुहूचे 'खरे' प्रेम तुम्ही
कुहूचे 'खरे' प्रेम तुम्ही पाहिलेले दिसत नाही
कुहूचे 'खरे' प्रेम तुम्ही
कुहूचे 'खरे' प्रेम तुम्ही पाहिलेले दिसत नाही >>>>>>>>
तो सिन पण काय भारी येड्चाप घेतला आहे ना,,लाजुन तीन वेळा चेहरा लपवुन घेते चेहर्याच्या ओंजळीत आनि मग त्याला म्ह्ण्ते,,तु बाजुला करायचे अस्तात हात..परत करु या काय सीन होता
पण घना ज्या पदध्तीने तिला तु
पण घना ज्या पदध्तीने तिला तु खरंच् खुप सुंदर दिसते अस म्ह्णतो ना,,,बास मी फीदा>>>> अगदी अगदी...मी पण...
राधा खूप काही वेगळी दिसत नव्हती मी इमॅजिन करत होते प्रचंड मेकओव्हर होईल की काय आता?
काल चक्क लाजत वगैरे होती
असं वाटत होतं स्वप्निल हात पकडणार राधाचा इ. इ. पण त्यांचं वेगळंच आहे ना
कसला मेकओव्हर ! काहीही फरक
कसला मेकओव्हर ! काहीही फरक वाटला नाही. फक्त पतियाळा सलवार व ओढणी मध्ये जरा बदल इतकाच फरक वाटला मला. केसांचे वळण तर तेच वाटले!
हो , आहे तशीच दिसत होती
हो , आहे तशीच दिसत होती मुक्ताई
केसांची वळण सेम च, फक्त नीट विंचरून दिले होते.. फसवलं पार्लर वालीने तिला
स्वप्नील जोशीची अॅक्टिंग बाकी भारी..त्याच्या एक्स्प्रेशन्स वरून तो (कधीचाच) मुक्ताच्या प्रेमात पडलाय असं वाटतं.
बाकी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे काही तरी असणार.
केसांची वळण सेम च, फक्त नीट
केसांची वळण सेम च, फक्त नीट विंचरून दिले होते.. फसवलं पार्लर वालीने तिला :फीदी:
बाकी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे काही तरी असणार.>>> मी एके ठीकाणी वाचलय पुढे काय होणार पण उगाच स्पॉईलर का टाका ज्याला हवे त्याने विपुत विचारा लिन्क देण्यात येईल
>>कसला मेकओव्हर ! काहीही फरक
>>कसला मेकओव्हर ! काहीही फरक वाटला नाही.
हो ना, मीही विचार करत होते की हिच्यात काय वेगळं आहे म्हणून हा असा डोळे फाडफाडून बघतोय. 'हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी' ह्या ओळी आठवल्या. म्हणजे मुक्ताला चिंचेचं झाड म्हणायचं नाहिये पण प्रेमात पडल्यावर माणसाचं असं होतं असं म्हणायचं आहे.
म्हणजे मुक्ताला चिंचेचं झाड
म्हणजे मुक्ताला चिंचेचं झाड म्हणायचं नाहिये >> म्हण की तेच तर तिचे वेगळेपण आहे. नुसतच ग्लॅमरस दिसण्याला अभिनय समजणार्या अनेक नायिका आहेत मालिकांमध्ये. पण मुक्ता जराही ग्लॅमरस न दिसता बावनकशी अभिनय करते.
पार्लरमधे जाऊन आल्यावर तिचा मेकओवर होणार अशीच समजूत होती माझी पण. तो नाही झाला म्हणून अपेक्षाभंग झाला पण तितकेच बरे पण वाटले. राधा या व्यक्तीरेखेला तो शोभलाच नसता. सेन्सीबल गोष्ट केली राजवाड्यांनी - त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
हो पण त्यासमोर घनश्यामची
हो पण त्यासमोर घनश्यामची प्रतिक्रिया अतिशयोक्त नाही का वाटली? तो गंमत करतोय असंही वाटत नव्हतं.
बॅचलरचे स्त्रीलिंग स्पिन्स्टर कसं काय? स्पिन्स्टर म्हणजे प्रौढ कुमारिका (लग्नाचे वय उलटून गेलेली ) बॅचलरेट पार्टी म्हणायला हवं होतं. हा शब्द संवादलेखिकेनेच नव्हे तर त्या प्रसंगाशी संबंधित कोणीही ऐकलेला असू नये?
लग्नाला दोनच दिवस राहिलेत तर ती पार्टी, संगीत, मेहंदी (नंतर हलदी नाही का?)
कसं उरकणार?
माझ्या नात्यात तर किती तरी
माझ्या नात्यात तर किती तरी मुलींनी केली होती संगीत-मेन्दी फंक्शन्स.. माझ्या लग्नात छोट्या प्रमाणात केली होती मेन्दी पार्टी पण भावाच्या लग्नात आम्ही पण मस्तं डान्स-सन्गीत-मेन्दी पार्टी ठे वली होती.>>
थोडा विषय वेगळा आहे पण, रविवारीच मझ्या दिराच लग्न झाल. त्यात माझ्या आत्ये सासुने मेंदी संगीत ठेवलेल. यंगस्टर साठी डिजे वगैरे होताच पण त्या शिवाय त्यांनी एक पारंपारीक गाणी आणि फुगड्या घालणार्या स्रियांचा एक ग्रुप बोलवलेला होता. ४०-५० वय असलेल्या बायका. पण मस्त उत्साहाने केल त्यांनी सगळ.
कसला मेकओव्हर ! काहीही फरक
कसला मेकओव्हर ! काहीही फरक वाटला नाही. << पण जेव्हा घना राधाचे गुणगान करतो तेव्हा राधा त्याला बोलते की मी काही विशेष केले नाही..फेशियल केलेय एवढेच, केसांचे वळण मीच बदलले आहे
ए लिस्सन....!
ए लिस्सन....!
लिस्सनतोय. तुम्ही टॉका (का
लिस्सनतोय. तुम्ही टॉका (का रायटा?)
Pages