Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा: बुवा! आता मॅरॅथॉनच्या
वा: बुवा! आता मॅरॅथॉनच्या तयारीचा ग म भ न कसा सुरु करायचा ते सांगा.. ४-५ महिने उशीरच केलात धागा उघडायला..
उशीरा म्हणजे? तुमची पळून झाली
उशीरा म्हणजे? तुमची पळून झाली का?
मी दोन वर्षांपुर्वी पळालो होतो हाफ.
हा जरा माहितीपर लेख. रनर्सवर्ल्ड वेबसाईट म्हणजे सध्याची नं १ गो टू साईट म्हणावी लागेल रनिंगबद्दल वाचायला.
http://peakperformance.runnersworld.com/2012/03/whats-the-best-long-run-...
मी पण विचार करतोय. येवु द्या
मी पण विचार करतोय. येवु द्या टीपा.
या वेळी पुणे ते तिहार अशी रेस
या वेळी पुणे ते तिहार अशी रेस आहे
इथे जरा राबता वाढवा रे. मी
इथे जरा राबता वाढवा रे.
मी सध्या एक दिवसा आड पळतो. मला तेच बरं पडतं. विकडेज ला ४ किंवा ६ मैल पळतो आणि विकेंडला थोडा लांबचा पल्ला. ह्या विकेंडला ८ मैल जायचं आहे.
रोज पळू म्हंटल तरी शक्य होत नाही, ६ मैल पळून पाय, गुडघ्यांचे बारा वाजलेले असतात. आपलं शरिर कसं प्रतिसाद देतय ह्याकडे लक्ष देणं खुप महत्वाचे वाटते. पळताना कधी खुप दमायला झालं किंवा पाय दुखावलेत असं वाटलं तर थोडं चालावं. एखाद्या दिवशी खुप थकलो आहे असं वाटलं तर जाऊ नये किंवा अगदी थोडं पळावं. एकदा सुरवात केली की तंद्री लागते आणि कदाचित आपण टार्गेट पुर्ण ही करतो.
पळणे अगदी पहिल्यांदाच सुरु केले असेल तर पेस वगैरे पेक्षा सगळी मॅरॅथॉन वेळेत (मॅक्स टाईम संपायच्या आत) पुर्ण करायचा गोल ठेवावा. थोडी सवय असेल तर पेस कडे लक्ष द्यावे.
अजून बरच काही वाचलय, स्वत:चा अनुभव पण वाढतोय. आठवेल तसं आणी महत्वाचे वाटेल ते लिहेनच इथे.
बुवा, मी १ वर्षापूर्वी पर्यंत
बुवा,
मी १ वर्षापूर्वी पर्यंत महिन्यातून एकदा ताशी ६ मैल वेगाने ७-८ मैल पळत असे. हेच अंतर आणि हाच वेग मी मागचे ४ वर्षे कायम राखला. कधी वाढवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तोपर्यंत मॅराथॉन वगैरे असा विचारच केला नव्हता. तुमच्या लेखातून प्रेरणा घेऊन पुन्हा सराव चालू केला आणि मागच्या समरपर्यंत हे अंतर थोडासा वेग कमी-जास्त करून रडत-खडत ९-१० मैलांपर्यंत नेऊ शकलो. बस्स.
पण मागच्या वर्षी ऐन मॅराथॉनच्यावेळी (म्हणजे १३.१ मैलांची हाफ मॅराथॉन जी मी टारगेट करत होतो) भारतात जावे लागले त्यामुळे तो पूर्ण सीझनच हुकला. पण आल्यावर तयारी चालू केली तरी अंतराच्या बाबतीत सुधारणा आजिबात होत नवह्ती
मात्र मागच्या ७-८ महिन्यांपूर्वी माझ्यासाठी बरेच सेटबॅक घडवून आणणारी फूड अॅलर्जी कळून आली आणि त्याचवेळी योगाही नित्यनेमाने सुरू झाले तर जादुच्या कांडीप्रमाणे महिन्याला एक मैल वाढवत (कुठलाही ओवर टेनिंगचा धोका न पत्करता) आता मी १६ मैलांपर्यंत ताशी ६ मैलांच्या वेगाने धाऊ शकतो. पण खरी गम्मत पुढे आहे.
हाफ मॅराथॉनचं टार्गेट ठेवलं होतं ते आता फार चॅलेजिंग वाटत नाही, फुल मॅराथॉनची आस लागली आहे.
वेग वाढवून हाफ मॅराथॉनची वेळ सुधारण्याचे सगळे प्रयत्न फसले. ६.२-६.३ च्या वर पूर्ण गणित कोलमडतं.
फ्युएल बेल्ट, गेटोरेड, केळी वगैरे पंचपक्वान्न करून १६ आकडा गाठता येतो त्यामुळे अजून त्यादृष्टीने सुधारणेला फार वाव नाही.
१६ मैलांनंतर मॅराथॉनच्या दिवशीचं स्पिरिट अजुन २ मैल वाढवून देईन पण त्यानंतर १ मैल चालणेही अवघड जाते त्यामुळे ऊरलेली मॅराथॉन चालून पूर्ण करणेही शक्य नाही.
अशीही 'कॅच २६.१' सिच्युएशन तयार झाली. तळ्यात ना मळ्यात.
१६ मैलांनंतर स्टॅमिनाचा प्रॉब्लेम नाही पण पाय आजिबातच बाद होतात.
६ मे ची NJ मॅराथॉनपर्यंत सुधारणा घडवणे अशक्य आहे म्हणून हाफलाच रजिस्टर करीन.
सध्या मी आता लेग मसल्स ट्रेनिंगसाठी पायांच्या व्यायामावर भर देतोय, जे मी आधी आळशीपणामुळे कायम आवरतं घ्यायचो.
विब्रम किंवा फुट ग्लोवचा काही अनुभव आहे का तुम्हाला? त्याने काही फायदा होतो का?
हांगाशी!! आत्ता कसा धागा
हांगाशी!! आत्ता कसा धागा मार्गाला लागला..मुहूर्तही गुढीपाडव्याचा. सगळ्यांना शुभेच्छा!!
अरे तू तर एकदम च्याम्पियन
अरे तू तर एकदम च्याम्पियन झालायस पळायला! मी काय बाबा तुला सल्ले देणार!
तरी तू विब्रम बद्दल लिहीलस म्हणून लिहीतो. तुला जर सध्या पळताना काही त्रास होत नसेल तर माझं मत आहे आजिबात नादी लागू नकोस विब्रमच्या. फूट ग्लोव मुळे तुमची gait बदललते. तुम्ही आपोआप फोरफूट किंवा मिडफूट स्ट्राईक करायला लागता. तुझी सध्याची पळण्याची कार्डियोवास्क्युलर क्षमता बघता तू आरामात बदललेल्या गेट नी सुद्धा भरपूर पळशील आणि इंजुरी व्हायची शक्यता वाढते. फोरफूट स्ट्राईक मध्ये एकिलिस टेंडनवर खुप ताण येतो. सवय नसताना भरपूर माईल्स झाले की दुखावला जातो. ह्यात आणखिन एक महत्वाची बाब अशी आहे की पळताना आजिबात जाणवत नाही. पळून झाल्यावर आधी पोटर्या प्रचंड दुखतात आणी नंतर एकिलिस दुखायला लागतो (स्वानुभव).
बाकी १६ मैलाच्या अडसराबाबत माझं म्हणणं आहे पेस कमी करावा. अख्खं डिस्टनस पळून काढता आलं पाहिजे मग ते किती हळू का असेना. मसल मेमरीत ते बसलं पाहिजे म्हणजे थोडक्यात मसलला त्या अंतराचा अंदाज यायला पाहिजे. मला सध्याच्या ट्रेनिंग मध्ये एकच खुप प्रकर्षाने जाणावले ते म्हणजे कधीही घाई करण्यापेक्षा थोडा जास्त वेळ घेऊन गोष्टी केल्या तर इंजुरीची शक्यता कमी होते (तू घाई करतोयस असं मला आजिबात म्हणायच नाहीये). माझं मत आहे की तू सध्या हाफ करताच रेजिस्टर कर आणी ती फक्त एक स्टेपिंग स्टोन होईल तुझ्या फूल करता. ती झाल्यावर हळू हळू विकेंड लाँग रन्सचे मायलेज वाढवणे सुरु ठेव. पुढच्या एन वाय वगैरेच्या फूल ला रेजिस्टर कर. मलाही पळून पहायची आहे फूल पण सध्या येवढी तयारी नाही.
पायाच्या व्यायामांमध्ये माझा भर पुर्वी (रनिंग करत नसताना) स्क्वॉट्स वर होता. पुर्वी कधी इतकं पळालो ही नाही त्यामुळे गुडघे दुखणे हा प्रॉबलेम कधी आला नाही. ह्यावेळी गुडघे आतल्या बाजूनी दुखायला लागले. वाचन केल्यावर लक्षात आलं की हॅमस्ट्रिंग मसल टाईट (इनफ्लेक्सिबल) असला की रनर्स नी ही समस्या उद्भवते. प्रयोग म्हणून कधी फारसे न केलेले हँमस्ट्रिंग कर्ल सुरु केले आणि जादू केल्या सारखी गुडघे दुखायचे थांबले. आता पळणे आणी इतर वेट ट्रेनिंग बरोबर हॅमस्ट्रिंगचे व्यायाम नियमीत करतो.
चमन, सही! बुवा, नोव्हेंबरात
चमन, सही!
बुवा, नोव्हेंबरात टर्कीट्रॉट (5k) पळायची (!!!!!???) इच्छा आहे. सध्या अक्षरशः ५-७ मिनिटांवर धावणं शक्य होत नाही. जॉग करावं लागतं किंवा चालावं लागतं. ५-७ मिनिटाअंत किती धावून होतं ते अंतर मोजलेलं नाही. तुम्ही (आणि चमन) अगदी सुरवातीच्या दिवसांतलं फटीग बॅरियर कसं ओलांडलंत?
अक्का, नोव्हेंबरात ही म्हणजे
अक्का, नोव्हेंबरात ही म्हणजे भरपूर वेळ आहे ते बेस्ट झालं. एकदम आरामात सुरवात कर. आधी १०-१५ जमेल तेवढं फास्ट चालण्यापासून सुरवात कर. थोडी सवय झाली की शेवटचा मिनीट किंवा अर्धा मिनीट वेगात चालण्याऐवेजी सावकाश पळायच. जसे दिवस जातील तसं चालणेही वाढवायचे आणि पळायची मिनीटं ही. साधारण एक सव्वा तास सतत चालता आलं की मग तेवढच पळायची मिनीट वाढवत वाढवत शेवटी १ सव्वातास तुला पळता येइल. हाता वेळ भरपूर आहे.
सही चमन. द्या जरा ज्ञानामृत
सही चमन. द्या जरा ज्ञानामृत
दिवस १ - इझि रनिंग - अगदि हवा तेवढा वेळच. ३ मिनिटे असले तरी.
दिवस २ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ३ - इझि रनिंग १ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने ८ मिनिटे लागतील.
दिवस ४ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ५ - इझि रनिंग १ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने
दिवस ६ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ७ - इझि रनिंग १ १/२ मैल - ५.५ किंवा ६ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन चालून परत धावने.
दिवस ८ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ९ - फास्ट रनिंग १ मैल - ७.५ किंवा ८ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १/२ मैल
दिवस ८ - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ९ - फास्ट रनिंग २ मैल - ७.५ किंवा ८ च्या स्पिडने १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १ मैल
दिवस १० - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस ११ - रनिंग २ मैल मिनिमम ३ मैल टारगेट १ मैलानंतर विश्रांती घेऊन परत १ मैल, परत एक मैल
दिवस १० - नो रनिंग - क्रॉस ट्रेन किंवा सायकल
दिवस १२ - रनिंग ३ मैल
दिवस १३ - नो रनिंग
दिवस १४ - रनिंग ३.५ मैल
देअर यू गो! असे वाढवत वाढवत न्यावे. फक्त नो रनिंगचे टाईम टेबल पाळायचे नाही. पाळले तर दोन्ही. सहसा नेपरविल रन साईटवर असे वेळापत्रकच असायचे. ते मी फॉलो केले होते. मला फायदा झाला.
पण मी कुठलिही अर्ध मॅरेथॉन पण पळालेलो नाही. सायकलचा स्टॅमिना वाढविन्यासाठी मी धावने सुरू केले. पण शिकागो बाईक रेसिंग साठी मला आवश्यक वाटले होते. ह्या वर्षी http://www.chicagobikeracing.com/index.php/rides सिझन मिस करत आहे.
धन्यवाद बुवा!! थोडा पेस कमी
धन्यवाद बुवा!! थोडा पेस कमी करून बघतो आता. ५.५ च्या स्पीडने अंतरात १-२ मैल वाढत असतील तर चांगलंच आहे.
मृण्मयी,
फार्फार कष्टप्रद दिवसांची आठवण करून दिलीस.
मला पळायची आवड बंगळूरमध्ये सुरू झाली, मी कोरमंगलाला रहात असतांना तिथे एका मोठ्या बागेत मस्त मातीचा जॉगिंग ट्रॅक होता आणि आजूबाजूला गर्द झाडांची सावली. मी मुंबईहून बंगळूरला गेल्याने तिथली तुलनेने थंड हवा, भरपूर झाडी, लाल मातीचे ट्रॅक वगैरे वातारवणातले बदल जास्तवेळ ताजंतवानं ठेऊ शकत होते, म्हणून पळतांना ऊत्साह थोडा जास्त वेळ टिकण्यास मदत झाली.
दहा मिनिटांपासून सुरुवात झाली आणि मग प्रत्येकवेळी एखाद-दुसरा मिनिट वाढवत नेला. एक दिवसाआड पळायचंच असं ठरवून मनाची तयारी केली की अर्ध काम होतं.
दर विकेंडला मागच्या विकेंडपेक्षा ५ मिनिटं वाढलीच पाहिजे हे कटाक्षानं पाळलं आणि मग त्यादिवशी टार्गेट गाठलं म्हणून स्वतःला ट्रीट करत असे. ही पाच मिनिटं वाढवायला जे काही कष्ट पडतात त्यासाठी काय केलं हे सांगतो.
त्याआधी त्यामागची थोडी थॉट प्रोसेस.
सवय नसतांना एखादी गोष्ट नव्याने करायला घेतली आणि ती गोष्ट जर कष्टदायक असेल (उदा धावणे) तर मन ती गोष्ट रेटायला तयार होत नाही. एकतर स्नायुंना सवय नसते त्यामुळे वेदनेचा जन्म होताच ती वेलीप्रमाणे आपले हात पाय पसरायला सुरुवात करते. तुम्ही जेवढा त्या वेदनेचा विचार करता तेवढी ती जास्त जोमाने फोफावते. शरीराचा मेंदू नेहमी तुमच्या विरूद्ध काम करतो. कारण तेच- त्याला स्वतःची सहजावस्था, स्थायीभाव सोडायचा नसतो. ह्यात भर पडते तुमच्या हृदयाच्या पंपिंग क्षमतेची. वेदना आपले हात पसरतांना तुम्ही जास्त जास्त साशंक होऊ लागता. तुमचे विचार फक्त अजून किती वेळ? किती मिनिटं? किती सेकंद? किती अंतर? हा रस्ता उन्हाने प्रसरण पावला का? च्यायला कधी हा त्रास संपतोय? कोणी तुला सांगितलंय ही मरमर करायला? पपू. पितश्री तुझ्या आळशीपणाचा उद्धार करत असतांना निर्लज्ज्यासारखं दूर्लक्ष्य करत होतास आणि आता ही थेरं करतोय? च्यामायला एवढीच मेहनत पोरीवर घेतली तर एखादी पटेल तरी ? बाकीचे काय मस्त मजा करतायेत यार आपल्याच नशिबात काय हे? असे एक ना दहा विचार, सगळे निगेटीव. ह्याचा परिणाम तुमच्या मनाचं शरीराशी असलेलं कनेक्शन कमजोर होऊन होऊन तुटत रहातं आणि एका पॉईंटला हे विचार एवढे पावरफुल होतात की तुम्हाला थांबण्यावाचून पर्याय रहात नाही.
आता ह्या अपयशामागे दिसून न येणार्याही चूका आहेत
१) पळण्याच्या आधी शरीर व्यवस्थित हायड्रेट नसणे, ह्यासाठी फक्त पळण्याच्या आधीच नव्हे तर पूर्ण दिवसभर भरपूर पाणी पिलं पाहिजे.
२) पळण्याच्या दोन-तीन तास आधी चहा-कॉफी सारख्या अॅसिडिक गोष्टी घेणे.
३) पळण्याच्या आधी स्ट्रेचिंग वगैरे करून स्नायुंना गरम (वार्म्-अप) न करणे. तुम्ही जरी सकाळी ऊठलेले असाल तरी तुमचे बरेचसे स्नायु अजूनही शिथिल आणि जडच असतात. तश्यात तुम्ही पळायला सुरुवात केली की वेदनेचा लवकर जन्म होतो. (ईंज्यूरी डेवलप होण्याचे हे कारण नंबर १)
४) पळण्याच्या आधी ५ मिनिटे काही तरी गोड न खाणं. सगळ्यात ऊत्तम केळी. संत्री-मोसंबी, सफरचंद ही चालेल. हे तुमच्या बॉडीला ज्यादा पोटॅशिअमची कुमक देऊन घामाद्वारे होणार्या मिनरल्सचा र्हास भरून काढतात. अगदीच घरात काही फळं नसल्यास अर्धाग्लास साखरपाणीही चालेल. गेटोरेड वगैरे हीच गरज भागवतात म्हणून मसल पूल्-क्रँप वगैरेची शक्यता कमी होते.
आणि सगळ्यात मोठ्ठी चूक...
५) पळतांना दम लागला की तोंडाने श्वासोच्छवास करणे. ज्यावेळी शरीराच्या मेंदूला, आता श्वास लागलाय आणि ही संकटाची चाहूल आहे, आणिबाणी आहे काही तरी केले पाहिजे अशी जाणीव होते तेव्हा ते ज्यादा लागणार्या प्राणवायूची गरज भागवण्यासाठी तोंडाचा वापर करते.
तुम्ही नकळत दम लागला म्हणून छातीचा भाता चालता ठेवण्यासाठी जोराजोरात श्वासोच्छवास करायला सुरूवात करता तेव्हा आपोआपच तोंड हे श्वसनाचे मुख्य इंद्रिय म्हणून वापरल्या जाते. पण तोंडाद्वारे घेतलेली बरीचशी हवा फुफुस्सांपर्यंत पोहोचण्याआधीच अन्ननलिकेत एक्झिट घेते आणि ती नाकावाटे आत न आल्याने त्यातला प्राणवायू वेगळा होऊन तो योग्य ठिकाणी पुरवला जात नाही, आणि म्हणून तुम्हाला अजूनच प्राणवायूच्या कमतरतेला तोंड द्यावे लागते आणि तुम्ही अजून जास्त वेगाने स्वतःला दमवून घेता.
पळतांना कटाक्षाने पहिल्या सेकंदापासून नाकावाटेच आणि तेही पडणार्या प्रत्येक पावलाच्या लयीत श्वासोच्छवास केला पाहिजे.
समजा दहा मिनिटे पळण्याईतपतच माझा सध्याचा स्टॅमिना आहे तर...
वरच्या सगळ्या चूका टाळल्यास तुम्ही अजून जास्तीची पाच मिनिटे नक्की पळू शकता. बाकी चांगले शूज, कंफर्टेबल आऊटफिट, आल्हाददायक वातावरण, संगीत ह्या गोष्टीही खूप मदत करतात.
वरील ऊपायांनी अशी दहा ची पंधरा मिनिटे झाली की..... होणार नाहीत....नाही पंधरा मिनिटे होऊच द्यायची नाहीत....साडे चौदाव्या मिनिटाला घड्याळ बंद करायचे, काढून ठेवायचे, किंवा त्याकडे आजिबात दूर्लक्ष करायचे आणि हळूहळू हातपाय पसरणार्या वेदनेचा बिलकूल अनुल्लेख करायचा
साडेचौदाव्या मिनिटांपासून खालील गोष्टी करायच्या म्हणजे मी तरी करयचो....
१) आवडते गाणे अथ पासून ईति पर्यंत म्हणायचे.
२) गाणे येत नसल्यास 'दुर्गे दुर्गट भारी' चालीत पूर्ण म्हणायचे.
३) रस्त्यावर दिसणार्या प्रत्येक माणसाकडे लुडलूमच्या बोर्न किंवा जान्सनसारखे असे बघायचे की पुढच्या सेकंदाला त्याने तुमच्यावर हल्ला केल्यास तुमची स्ट्रॅटेजी काय असणार. त्या स्ट्र्टेजीचा विचार करायचा.
४) ईंजिनियरिंगमधल्या प्रत्येक वर्षातल्या आपल्या लायनीची आठवण काढायची. लायनीबद्दल आपल्याला नक्की काय आवडत होते ह्याचा सखोल विचार करायचा.
५) हे करणं तुम्हाला आवडत असेल तर ऑफिस, कॉलनी मधल्या लायनी, अश्या सुस्थळांचा विचारसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त एकाच पळण्यात सगळा कोटा संपवू नये.
६) आई वडिलांनी आपल्याला असे पळतांना, घाम गाळतंना बघितल्यावर 'अजि म्या ब्रम्ह पाहिले' सारखा कृतकृत झालेला त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणावा.
७)बीअर ढोसून आणि मिसळ ओरपून भसाभस फुगणार्या आपल्या प्रिय मित्रांना डोळ्यांसमोर आणून आपली स्लीमट्रीम बॉडी पाहून त्यांची कशी जळणार ह्याचा विचार करून सुखी व्हावे.
८) मॉल मध्ये चुकून एखादी जूनी क्लासमेट भेटली तर तिने स्वतःला मेन्टेन ठेवल्याबद्दल अॅप्रिशिएट केले असा विचार करून होणार्या गुददुल्यांचा आनंद घ्यावा.
९) ज्यावेळी हळूहळू वाढणारी वेदना असे सुखावह विचार जन्मताच मारून टाकायला सरावते तेव्हा आपण आपला प्लान बदलून सगळ्या रागीट विचारांना जन्म द्यावा
नकार दिलेली लाईन
नो पार्किंगमधून आपली गाडी ऊचलणारा पोलीस.
गणिताचा मास्तर
ऑफिसमधला मॅनेजर
लायनीचा बॉयफ्रेंड
उधारी बुडवणारा मित्र.
आणि सगळ्यात शेवटी ढेरी सुटलेला आपला स्वतःचा देह.
ह्या सगळ्यांवर दात ओठ खात, चरफडत सगळा राग काढून धाऊन झालं की मग मला नाही वाटत अजून कुठली प्रेरणा ऊरली असेल.
आता हळूहळू वेग कमी करून १-२ मिनिटं चालून थोडं थांबा आणि थंड डोक्याने घड्याळ बघाल तर काटा विसावं मिनिट पार करून गेला असेल. स्वतःला शाबासकी द्या आणि मस्त नारळपाणी प्या.
ह्या द्वंद्वानंतर तुम्ही स्वत:ला आआणि स्वतःच्या शरिराला जास्त चागलंए समजू लागता हे नक्की.
चमन, किती सही लिहीतो आहेस.
चमन, किती सही लिहीतो आहेस. सगळे उपाय नक्की करून पाहणार. पळतानाचा स्टॅमिना बेक्कार आहे.
बुवा ते गुढघ्याच्या मागे दुखते ते जाते का? मला फ्लेक्झिबिलिटी कमी असल्याने गुढघे न वाकवता पायाची बोटं धरणे (पश्चिमोत्तासन का?) असले व्यायाम करताना गुढघ्याच्या मागे खूप विचित्र दुखते. हॅम्स्ट्रिंग कर्ल्स करून बघते आता..
चमन , बुवा मस्त लिहिताय. माझी
चमन , बुवा मस्त लिहिताय.
माझी पार वाट लागली आहे राव, ५ ~ ५.५ मैलाच्या पुढे गेलो की माझा उजवा गुढघा दुखायला लागतो. बुवा तु सांगितल्याप्रमाणे उड्या मारत पळण्याचा प्रयत्न केला पण ५-१० मिनिटांनी परत लय बदलते. इतका वैताग येतो की गुढघा काढुन खांद्यावर घेऊन फिरावसं वाटतं.
बुवा, चमन खूप आणि मनापासून
बुवा, चमन खूप आणि मनापासून धन्यवाद!
>>>साधारण एक सव्वा तास सतत चालता आलं की मग तेवढच पळायची मिनीट वाढवत वाढवत शेवटी १ सव्वातास तुला पळता येइल
सॉरी. बुवा. म्हणजे नेमकं काय ते कळलं नाही. चालायला काही त्रास नाही. दोन तास पण न थकता चालता येतं. (पण त्यात दम नाही हे जाणवलंय.)
चमन तुझ्या टिप्स फारच आवडल्या. बढिया लिहिलंय.
>>.......ह्याचा परिणाम तुमच्या मनाचं शरीराशी असलेलं कनेक्शन कमजोर होऊन होऊन तुटत रहातं आणि एका पॉईंटला हे विचार एवढे पावरफुल होतात की तुम्हाला थांबण्यावाचून पर्याय रहात नाही.
हे टाळण्याचा प्रयत्न करेन.
तुमच्या सूचना पाळून टर्कीट्रॉट पूर्ण करू शकले तर दोघांनाही प्रत्येकी किलोभर पुडाच्या वड्या स्वहस्ते करून पाठवेन!
मृ, सुरूवातीला हा Couch to 5k
मृ, सुरूवातीला हा Couch to 5k प्लॅन रेफरन्स म्हणून वापरू शकतेस. अगदी तंतोतंत पाळायचा असं नाही, पण एक गाईडलाईन म्हणुन बरेच जण वापरतात सुरुवातीला.
याचे आयफोन अॅप्स वगैरे पण उपलब्ध आहेत बहुतेक.
धन्यवाद प्रिया! आवडली ती
धन्यवाद प्रिया! आवडली ती वेबसाइट. ९ आठवड्यांच्या तक्ता उतरवून घेते. 'इंज्युरी प्रिव्हेंशन' आणि 'रनिंग टिप्स' उपयोगी वाटल्या.
मी मागच्या वर्षी (कशीबशी) ५के
मी मागच्या वर्षी (कशीबशी) ५के पळाले होते. तयारी वगैरे जेमतेमच होती. यंदा जुलै महिन्यात परत ५के साठीच रेजिस्टर केलंय. या वेळेला नीट ट्रेन करून जाईन आणि स्वतःचा पोपट करून घेणार नाही असा प्लॅन आहे :p
इथल्या टिप्स चा फायदा होईल. बुवा , चमन: very inspiring.
चमन मस्त माहिती देतोयस
चमन
मस्त माहिती देतोयस पण.
बर एक शंका आहे.
जर ओव्हरवेट असेल आणि रनिन्ग सुरु करायच म्हणलं तर गुढघ्यांवर खुप ताण येइल.
अशा वेळी काय करावं की रनिन्ग करु नये फक्त जोरात चालण सुरु ठेवावं?
सॉलीड धागा....असाच धागा
सॉलीड धागा....असाच धागा कुणीतरी सायकलींगवरती पण काढा राव..सध्या मी सायकलींग मोडमध्ये आहे
चमन कसलं भारी!
चमन कसलं भारी!
मॅरॅथॉन वरुन माझ्या मित्राने
मॅरॅथॉन वरुन माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा आठवला...
तो लहान असताना त्याने त्याच्या वडिलांना विचारले,"मॅरॅथॉनमधे सुरुवातीला खुप लोक पळतात, पण शेवटपर्यंत अगदिच कमी लोक असतात, असं का?" त्यावर त्यांनी ऊत्तर दिले,"बाकिचे आपले घर जवळ आलं कि घराकडे वळतात."
चमन बीअर ढोसून आणि मिसळ
चमन
बीअर ढोसून आणि मिसळ ओरपून भसाभस फुगणार्या आपल्या प्रिय मित्रांना डोळ्यांसमोर आणून आपली स्लीमट्रीम बॉडी पाहून त्यांची कशी जळणार ह्याचा विचार करून सुखी व्हावे.>>>> आयला! म्हणजे मी एवेएठि ला बियर ढोसत असताना तुझ्या डोक्यात हे विचार होते होय रे? आता तुझ्या समोर उभाच राहणार नाही पुढच्या ए वे ए ठि ला (बियर पीत असताना तर आजिबात नाही)!
बस्के, मी लिहीलय ते रनर्स नी ह्या सहसा खुप पळण्यानी होणार्या त्रासाबद्दल आहे. मला वाटतं नॉर्मल केस मध्ये कोणालाही सवय नसताना गुडघे न वाकवता जर पायांच्या अंगठ्याला बोटं टेकवायचा प्रयत्न केला तर गुडघ्यात दुखेल. ते दुखणं बहुतेक त्याच व्यायामाच्या सरावाने हळु हळू कमी होईल.
श्री, उड्या मारत न पळून म्हणायचे होतं का? असो, वेगवेगळे उपाय करुन पाहायचे पण सावकाश कसलीही घाई न करता. वजन थोडं जास्त असेल तरी गुडघे दुखू शकतात सुरवातीला.
आक्का, अगदीच दम नाही असं नाही. दम आहे फक्त पळण्यात थोडा जास्त एंड्युरन्स लागतो, ह्रदय थोडं आणखिन मजबूत होऊ शकतं. उदा. देतो
सध्या साधारण २०मिनीट एकंदरित व्यायामाचा गोल ठेवू (तुला वाढवायचा तर वाढवू शकतेस).
आधी नॉर्मल, आपल्याला जास्त धाप लागणार नाही अशा वेगात चालायला सुरवात करायची.
शरिर थोडं वॉर्म अप झालय ह्याची जाणीव झाली की चालायचा वेग थोडा आणखिन वाढवायचा. १-२ मिनीट वेगात चाललल्यावर मग अगदी ३० सेकंद (किंवा तुला वाटेल तितकं जास्त किंवा कमी) पळायचं.
मग परत नॉर्मल स्पीडला चालायचं. जरा दम आटोक्यात आला की हे परत रिपीट करायचं. साधारण १-२ आठवड्यांनंतर तुला लक्षात येइल की तुला धाप कमी लागतेय आणि तुला जास्त वेळ पळायला जमतय. करुन बघ आणि इथे येऊन लिही.
तुम्ही डाएट काय ठेवतायत ते
तुम्ही डाएट काय ठेवतायत ते लिहा ना कुठेतरी.
चमन, साडेचौदाव्या मिनिटांपासून करायच्या गोष्टी भारी. मला त्या दीड मिनीटांपासूनच करायला लागतील सध्या.
चमन, साडेचौदाव्या
चमन, साडेचौदाव्या मिनिटांपासून करायच्या गोष्टी भारी>> अगदी ..पण मला फिमेल व्हर्जन पाहिजे.. एवढ मी पळणार नाही.. पण रनिंग खरच सुरु करायचं आहे.. धाप इतकी लागते कि लाज वाटते.. .सध्या फास्ट चालणं एवढाच गोल ठेवला होता. हे प्रयोग नक्की करून बघेन..
वजन थोडं जास्त असेल तरी गुडघे
वजन थोडं जास्त असेल तरी गुडघे दुखू शकतात सुरवातीला. >>> नाही रे बुवा वजन जवळपास १४० आहे , जवळपास २३ BMI आहे, आणि त्रास फक्त एकाच (उजव्या ) गुढघ्याला होतो. सध्या नी सपोर्ट वापरायला सुरुवात केलीय. बघुयात काही फरक पडतो का
फिरभी हम पळेंगाच !
श्री
श्री
चमन, मस्त मजेशीर आणि उपयुक्त
चमन, मस्त मजेशीर आणि उपयुक्त लिहीलं आहेस
श्री डॉक्टर ( स्पोर्ट्स
श्री डॉक्टर ( स्पोर्ट्स स्पेशालीस्ट) कडे जावून चेक केलंय का .. नवर्याला पण एकच गुडगे दुखीचा त्रास होता (म्हणजे आहे ,जाणार नाही आता ) . तो badminton पण खेळतो.. त्यामुळे कि कशा मुळे तरी प्रोब्लेम झालाय डॉक्टर नि पळणं कमी करायला सांगितलंय ..तो हि सोडत तर नाहीच.. पण नि क्याप, हा सपोर्ट तो सपोर्ट सगळी आयुधं घालून पाळतो आता
आयला! म्हणजे मी एवेएठि ला
आयला! म्हणजे मी एवेएठि ला बियर ढोसत असताना तुझ्या डोक्यात हे विचार होते होय रे? >> काय मजाक करून राह्यले बुवा तुम्ही. आम्ही तीन्-तीनदा तुमचा लेख काढून मोटिवेशन साठी वाचावा आणि तुम्ही असे भलतेसलते आरोप करून राह्यले, ह्या गुन्ह्यासाठी आता तुम्हाला अजून एक बाटली बीयर पाजणार म्हणजे पाजणारंच. झक्कींना आजच एक ज्यादा बाटली आणायची सांगून ठेवतो, बाराबाफचं काँट्रॅक्ट त्यांच्याकडेच आहे ना.
श्री >> ईंटर्नल ईंजूरीची शंका निरसन करण्यासाठी डॉक्टरांकडून एकदा OK certificate घेऊन मगच पुन्हा पळणं चालू करा. फिजिकल थेरपी किंवा स्पोर्टस् साठीचा वेगळा डॉक्टर असतो त्याचाही सल्ला घेऊन बघा.
गुडघ्यांच्या आसपासची दुखणी जरा गंभीरपणेच घ्यायला हवी. एक्स रे वगैरेत कळेलच काय आहे ते.
जर ओव्हरवेट असेल आणि रनिन्ग सुरु करायच म्हणलं तर गुढघ्यांवर खुप ताण येइल.
अशा वेळी काय करावं की रनिन्ग करु नये फक्त जोरात चालण सुरु ठेवावं? >> झकासराव बरोबर. सुरूवात भराभर चालण्यानेच केलेली चांगली. किती ताणायचे आणि कुठे थांबायचे, कुठवर सोसतेय आणि कुठवर चावतंय हे आपल्याला आपोआप सरावाने कळायला लागते. पळणं थाबवूनही दोन-तीन दिवसात वेदना थांबत नसल्यास डॉक्टर जरूर गाठावा.
Pages