Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
"सजग" या शब्दाचा अर्थ काय?
"सजग" या शब्दाचा अर्थ काय?
सजग म्हणजे जागृत/जागरूक
सजग म्हणजे जागृत/जागरूक असलेला ...
(जाग्रत नव्हे :फिदी:)
सजग नागरिक मंच म्हनजे आपल्या हक्कांबद्दल आणि कर्तव्याबद्दल जागरूक असलेल्या (मूठभर) नागरिकांचा समूह .
मावंदे - पूर्वीच्या काळी
मावंदे - पूर्वीच्या काळी तिर्थयात्रेवरून सुखरूप परत आल्यावर तिची 'सांगता झाली' म्हणून उद्यापन करायचे त्याला मावंदे म्हणत.
@ माधव होय, "सांगता झाली" या
@ माधव
होय, "सांगता झाली" या (च) अर्थाने मावंदे वापरले जाते. मग ती यात्रा असो वा देवाला लावलेला कौल फळला म्हणून असो.
पु.ल.देशपांडे यांच्या 'पूर्वरंग' प्रवासवर्णन पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात :
"यात्रा सफल झाली की मावंदे घालायचे. अक्षरांचे धन असलेल्या लेखकाने पुस्तकाचे मावंदे घालायचे. पुढली पाने वाचकांनी गोड मानून घ्यावी ही विनंती". म्हणजेच एक काम सफलरित्या पूर्ण झाले म्हणून देवाला दाखविलेला उतराईचा नैवेद्य या अर्थाने 'मावंदे'.
'तिनका' चा अर्थ काय?
'तिनका' चा अर्थ काय?
तिनका म्हणजे काडी ना? `तिनका
तिनका म्हणजे काडी ना? `तिनका तिनका जोड कर घर बनाना' असं ऐकलंय
हो
हो
तिनका म्हणजे गवताची काडी !
तिनका म्हणजे गवताची काडी ! (मायबोलीवर टाकतात ती नाही , ती आगपेटीतली .)
चोर की दाढी मे तिनका...
तृण वरुन आलेला शब्द असावा
तृण वरुन आलेला शब्द असावा तिनका.
चल उड जा रे पंछी, अब ये देस हुआ बेगाना या गाण्यात आहे ,
तिनका तिनका चुनकर नगरी एक बसायी
वरील सर्वांना धन्स. 'तिनका'
वरील सर्वांना धन्स. 'तिनका' चे वाक्य असे होते: ...इंग्रजांनी दिलेला इं. भाषेचा तिनका आपल्या कामास का आला..
आँधीमधल्या "इस मोड्से जाते
आँधीमधल्या "इस मोड्से जाते है" या गाण्यातपण तिनका हा शब्द येतो.
इस मोड्से जाते हैं
कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेझ कदम राहे
पत्थरकी हवेलीको शीशेक घरोंदोमें
तिनकोके नशेमनतक इस मोड से जाते हैं!
नशेमन = घोसला = घरटं
त्या वाक्यात बुडत्याला काडीचा
त्या वाक्यात बुडत्याला काडीचा आधार या अस्सल मराठी वाक्प्रचाराचा अर्धवट वापर केला आहे तर .
अर्थात इंग्रजी भाषेचा आधार नसता तर भारतीय बुडले असते हे फारच धाडसी अन टोकाचे गृहीतक आहे . त्यामानाने हिंदी शब्दाची मराठी वाक्प्रचारात विनाकारण भेसळ परवडली म्हणायची
हिंदी गाण्यांमध्ये वापरल्या
हिंदी गाण्यांमध्ये वापरल्या गेलेल्या या वाक्प्रचारांचा नक्की अर्थ काय?
सजदा करना (भक्तीयुक्त प्रेम? मी तरी असाच अर्थ घेत आले आहे अजूनपर्यंत या शब्दाचा!)
गरवाँ लगाना (नैने मे बदरा छाये.... या गाण्यात शेवटी ओळ आहे "ऐसे मे बलम मोहे गरवाँ लगाये..." म्हणजे काय?)
गरवा = गळा (throat) आता लागेल
गरवा = गळा (throat) आता लागेल अर्थ
चिजांचा धागा पण बघत जा गाण्यांच्या अर्थाकरता.
गरवा = गळा (throat) आता लागेल
गरवा = गळा (throat) आता लागेल अर्थ >>>
तरी नाही लागला अर्थ मला?
नैनो मे बदरा छाये
बिजली सी चमके हाये
ऐसे मे बलम मोहे गरवाँ लगाये.... (अशात साजण/सखा मला गळा लावतो??? बोले तो??)
हो निंबुडा. गरवा लगाना = गले
हो निंबुडा. गरवा लगाना = गले लगाना. इथे अरुंधतीने दिलाय बघ.
ओके समजलं. मूळ गाण्यात गरवाँ
ओके समजलं.
मूळ गाण्यात गरवाँ लगा ले असं आहे. मी ते गरवाँ लगाये असं ऐकत होते आज पर्यंत
बरं सजदा चा अर्थ नाही सांगत आहे अजून.
सजदा = देवाला पूर्ण शरण जाऊन
सजदा = देवाला पूर्ण शरण जाऊन केलेले वंदन
सजदा = देवाला पूर्ण शरण जाऊन
सजदा = देवाला पूर्ण शरण जाऊन केलेले वंदन
>>>
धन्यवाद, माधव
म्हणजे मी घेतलेला "भक्तीयुक्त प्रेम" हा अर्थ अगदीच काही चूकिचा नाही तर!
तणका/तनका म्हणजे नक्की काय
तणका/तनका म्हणजे नक्की काय होतो त्याचा अर्थ?
मला आजवर 'गरवा लगाये' म्हणजे 'दरवाजा लावणे' असेच वाटायचे.
बी
बी
मला आजवर 'गरवा लगाये' म्हणजे
मला आजवर 'गरवा लगाये' म्हणजे 'दरवाजा लावणे' असेच वाटायचे.

>>>
म्हणजे मग मी वर दिलेल्या गाण्यात त्याचा अर्थ असा लागेल
"ढग दाटून आले आहेत. विजा चमकत आहेत. तर अशा वेळी हे माझ्या साजणा, दरवाजा लावून घे"
बी, हसवलंस बाबा
>>> मला आजवर 'गरवा लगाये'
>>> मला आजवर 'गरवा लगाये' म्हणजे 'दरवाजा लावणे' असेच वाटायचे.
'गारवा लागतोय' असा पण अर्थ निघू शकेल.
वरच्या ओळींचा अर्थ असा असू शकेल.
'विजा चमकत आहेत, ढग दाटून आले आहेत, पाऊस यायला लागला आहे आणि म्हणून गारवा लागतोय.'
"ढग दाटून आले आहेत. >>> ओ, ते
"ढग दाटून आले आहेत. >>> ओ, ते 'नैन' कुठे गेले मग?
सगळे सुटलेत ओ, ते 'नैन' कुठे
सगळे सुटलेत
ओ, ते 'नैन' कुठे गेले मग? >> गुड क्वेश्चन!
>>> "ढग दाटून आले आहेत. >>>
>>> "ढग दाटून आले आहेत. >>> ओ, ते 'नैन' कुठे गेले मग?
'नैन' हा शब्द प्रतिकात्मक आहे. 'नैन' चा अर्थ नभ असा घेता येईल. परमेश्वराचे नैन म्हणजे नभ. नभात ढग दाटून आले आहेत, विजा चमकत आहेत, गारवा लागतोय . . . असा अर्थ लागू शकेल.
चालूद्या!!
चालूद्या!!
इथे हिन्दीतल्या तिनकाचा अर्थ
इथे हिन्दीतल्या तिनकाचा अर्थ पटापट दिला पण मराठी तनक्याचा अर्थ देत नाही कुणी? काय म्हणाव :*(
मराठी तनक्याचा अर्थ देत नाही
मराठी तनक्याचा अर्थ देत नाही कुणी? >>>
आधी वाक्यात उपयोग करून दाखवा, मग आम्ही अर्थासाठी तर्क-वितर्क लढवतो
परमेश्वराचे नैन म्हणजे नभ. नभात ढग दाटून आले आहेत, विजा चमकत आहेत, गारवा लागतोय >>>
मास्तुरे, कै च्या कै शिकविताय की विद्यार्थ्यांना
<<तणका/तनका म्हणजे नक्की काय
<<तणका/तनका म्हणजे नक्की काय होतो त्याचा अर्थ?<<
आमच्या इकडे तणका म्हणजे झणका/झटका/ फणकारा या अर्थी वापरतात.
Pages