एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुहूच्या फेबुच्या अल्बममध्ये राधा आणि घनाच्या लग्नाचे फोटो आहेत.

हो, कालच लेकीने मला ही न्युज दिली. पण एपिसोड दाखवायच्या आधीच असे फोटो टाकणे माझ्या मते तरी योग्य नाही. एनीवेज, दिग्दर्शक नी ती काय ते पाहुन घेतील.

काल जाम बोअर झालं.. घनाला एवढी झोप का येतेय? कधीतरी कामावरही जा म्हणावे...

साधना Happy

मूळात ते फोटो उपलब्ध झाले कसे? हा त्या मालिकेच्या प्रसिद्धीचा एक भाग असू शकतो Happy

लग्न आलं पण इतक्यात? काय घाई आहे? Uhoh
एकूणात 'हे मी आयुष्यात कधीही करणार नाही' असा डायलॉग मारल्यामारल्या पुढच्याच क्षणी तेच काम करून टाकणे- हा ह्या सिरियलीचा युएसपी असावा!

इथे खाली 'डेट इन्डियन सिंगल्स' म्हणून जाहिरात आली, त्यावर साडी नेसलेली एक बाई! आणि गंमत म्हणजे तिच्या गळ्यात पाच पदरी मंगळसूत्र होतं Proud

इथे खाली 'डेट इन्डियन सिंगल्स' म्हणून जाहिरात आली, त्यावर साडी नेसलेली एक बाई! आणि गंमत म्हणजे तिच्या गळ्यात पाच पदरी मंगळसूत्र होतं

एकदम सेफ डेटींग.... समुद्रकिनारी पोलिस पकडायला आले तर मंगळसुत्र दाखवायचे Happy

मूळात ते फोटो उपलब्ध झाले कसे? हा त्या मालिकेच्या प्रसिद्धीचा एक भाग असू शकतो

ह्म्म.. तिने स्वतः काढलेत ते फोटो नी टाकलेत. प्रसिद्धीचा म्हटले तर नक्की सांगता येणार नाही, प्रसिद्धी की निराशा ते...... मला लग्न दोन दिवसांवर आलेय हे परवाच्या प्रोमोवरुन कळले, आता फोटो टाकलेत म्हणजे लग्नही झाले, म्हणजे सगळे लवकरच फुस्स होणार. मला तरी फोटोबद्दल ऐकल्यावर असेच वाटले.....

दोघेही हुकमी एक्का आपल्या हातात आहे म्हणतहेत पण लग्नाच्या आधी या दोघांना घरच्यांचा मनाविरुद्ध एकही गोष्ट करता आली नाही, तर लग्न झाल्यावर काय करणार कप्पाळ??????????? आमचे जमत नाही म्हटले तर लग्नाआधीपर्यंत चांगले जमत होते, लग्नानंतर कमीतकमी वर्षभर तरी एकमेकांना समजण्यासाठी संधी द्या असे म्हणतील घरचे. कुठल्या मुद्द्यावर लग्न तोडणार आहेत देव जाणे?? की लग्न तोडायचेय हेच विसरलेत आता दोघेजण?????

आता फोटो टाकलेत म्हणजे लग्नही झाले, म्हणजे सगळे लवकरच फुस्स होणार.>>>> हे सगळे गृहीत धरून मालिका बघायची सोडत नाही आहात ना? Proud

पण ते दोघे आपले वेगळे आहे, जगावेगळे आहे, हुकुमाचा पत्ता आपल्या हाती आहे असे सारखे म्हणतायत ना?
मला संशय येतोय की या दोघांचे हे मॅरेज फॉर/ऑफ कन्व्हेनियन्स आहे. आपापल्या घरच्यांची लग्न कर लग्न कर ही ब्याद बंद व्हावी म्हणून, त्यांच्यासाठी लग्न करायचे आणि मग स्वतःचे स्वतःचे स्वतंत्र्य आयुष्य जगायचे असा प्लान असावा.
घनश्यामला त्याचे काका तुझ्या आयुष्यातले स्वातंत्र्याचे शेवटचे दिवस साजरे करण्यासाठी बॅचलर'स नाइट करूया असे सांगतात, त्यावर तो राधाला म्हणातो की लग्नानंतरच तर मला स्वातंत्र्य मिळणार आहे(की असेच काहीसे).
हा प्लान कसा ओम्फस होतो ही पुढची कथा असावी.

तेच की. ओम्फस म्हणजे काय ते कसे प्रेमाने संसार करू लागतात, तेच.
परवाच एक प्रसंग पाहिला- राधा म्हणते 'मी डबा वगैरे नेणारच नाहीये'. पुढच्या शॉटमध्ये हातात डबा! Lol तसंच काहीसं.

माझी काही दिवस मिस झाली आहे सिरिअल..
हे दोघे शेवटी लग्न करणारच आहेत.. मग अगदी पहिल्यांदा जेव्हा भेटतात (फॅमिली सकट), तेव्ह नक्की काय ठरवलेले असते?

मग स्वतःचे स्वतःचे स्वतंत्र्य आयुष्य जगायचे असा प्लान असावा.>>> बरोबर! आणि मग अचानक त्यांना साक्षात्कार होईल की वी आर मेड फॉर ईच अदर. मग सुरू होईल त्यांची खरी प्रेमकहाणी!
लोकं प्रेमात पडून लग्न करतात, हे दोघे लग्न करून प्रेमात पडले असं दिग्दर्शकाला दाखवायचं असावं Proud

तेच की. ओम्फस म्हणजे काय ते कसे प्रेमाने संसार करू लागतात, तेच.

तेच तर.. सुरवातीपासुनच दोघेही आपले वेगळे आहे म्हणताहेत. लग्नानंतर राधाला लग्न मोडायचेय तर घरच्यांसाठी डब्बा, आजीकडुन नॉनवेजसाठी परवानगी हे सगळे कशाला??

उलट आधीपासुन त्यांनी कोरडे वर्तन ठेवले असते तर लग्न तोडणे शक्य झाले असते. दोघांनीही लग्न आणि एकमेकांना स्विकारलेय हे त्यांच्या देहबोलीवरुन दिसतेय पण तोंडाने मात्र नन्ना चाललाय Happy

लग्नाच्या पहिल्या दिवसापासुन प्रेमाने संसार करणार हे आताच सपष्ट दिसतेय.

मग अगदी पहिल्यांदा जेव्हा भेटतात (फॅमिली सकट), तेव्ह नक्की काय ठरवलेले असते?

बहुतेक ते दाखवले नाही. मी तो भाग पाहिला नाही. पण दोघेही एका कोप-यात जातात, काहीतरी बोलतात नी लगेच पसंती कळवतात असे काहीसे दाखवले असे मुलगी म्हणाली.

मग सुरू होईल त्यांची खरी प्रेमकहाणी!

मग एका प्रेमाची दुसरी गोष्ट सुरू होईल. सराने नविन सिरीयल चालु करावी. हे प्रकरण लग्नानंतर संपवावे आणि निवांतपणे आता 'एका प्रेमाची दुसरी गोष्ट' की 'एका संसाराची दुसरी गोष्ट' ह्याचा विचार करावा. सोबत एखादीतरी सिरीयल प्रेक्षकांना कंटाळा यायच्या आत संपवली याचे श्रेयही घ्यावे.

हो पण आपण एकमेकांवर प्रेम करतोय याचा साक्षात्कार प्रत्येकाला कसा होतो ते दाखवतील. लग्न बिग्न मोडायचे नाहीत.
सेम टु सेम ससुराल गेंदा फूलची थीम आहे. तिथे सुहाना नमुना होती, इथे राधाशिवाय बाकीचे लोक मोठ्ठे नमूने आहेत.
राधाचे कॅरॅक्टर दर एपिसोडमधे कणाकणाने विरघ़ळते आहे ते नाही आवडले. तसेच बदल घनश्याममध्ये पण दाखवायला हवे होते.
साखरपुड्यात राधाला नवी साडी नेसायला लागल्यावर ती घनश्यामकडे बघते की याने कुठे कपडे बदललेत, तर तसं नसतं असं उत्तर मिळतं. तसंच चाललंय. घनश्याम एक दिवस फक्त जॉगिंगला गेला. बाकी काय फरक पडला त्याच्यात?

घनश्यामच्या खोलीत लावलेले पोस्टर कोणाचे आहे? त्यावर खाली एक रबर स्टँपचा ठसा पण आहे.

राधाचे कॅरॅक्टर दर एपिसोडमधे कणाकणाने विरघ़ळते आहे ते नाही आवडले >> यावर काही म्हणायचा इतका मोह होतोय पण तो मी आवरलाय. त्याबद्दल भरत तुम्ही मला कुठली तरी मायक्रोवेव्ह मिठाई करुन देणे. Proud Light 1

अनुमोदन.

मंजू आणि भरत- अनुमोदन. तीच कहाणी असणार असा मलाही संशय आहे.

सेम टु सेम ससुराल गेंदा फूलची थीम आहे. तिथे सुहाना नमुना होती, इथे राधाशिवाय बाकीचे लोक मोठ्ठे नमूने आहेत.
राधाचे कॅरॅक्टर दर एपिसोडमधे कणाकणाने विरघ़ळते आहे ते नाही आवडले. तसेच बदल घनश्याममध्ये पण दाखवायला हवे होते.

<< मी पण हेच लिहिले होते या आधीच्या कुठल्या तरी पेज वर :).
खरच sGP डोक्यात असेल तर लग्न होणे ही तर सुरवात आहे.. अजुन सुहाना आय मीन राधा अजुन त्या फॅलिमीत रुळणार, मग प्रेम, स्कुटर इ. सगळे आवडणे मधे बराच वेळ जाइल :).
फक्त ची SGP ची सुहाना स्टुपिड-रिकामटेकडी आहे , राधा इंटेलिजन्ट-करिअर माइंडेड आहे :).

Anyways, पण स्वप्नील सही अ‍ॅक्टिंग करतोय, मुक्त बर्वे-विनय आपटे आहेतच.

सेम टु सेम ससुराल गेंदा फूलची थीम आहे>>>>>>>>>>>>< कसं काय? सगेंफू मध्ये सुहानाचं लग्न मुलगा न बघता मनाविरुद्ध होतं.ईथे राधा तिच्या मनाने लग्न करतेय. तिथे ईशान लग्नाळु होता आणि त्याला मुली पसंद करायच्या नाहित्.ईथे घनाचा स्कोअर ६४ मुली नाकारन्याचा Happy
बाकि ,राधा अक्ख्या घरासाठी १ छोट्या डब्ब्यात भुर्जी आणते? वरुन "मी भरलाय डब्बा, सगळ्यांना पुरेल असा आहे " असं काहितरी बोलते Lol

बाकि ,राधा अक्ख्या घरासाठी १ छोट्या डब्ब्यात भुर्जी आणते? वरुन "मी भरलाय डब्बा, सगळ्यांना पुरेल असा आहे " असं काहितरी बोलते

अख्खे घर सोडा, त्या तिघांनाही पुरत नाही. शेवटचा घास तर कहरच....

आज संध्याकाळी ६ वाजता स्पेशल महाएपिसोड आहे. 'अशी ही बनवाबनवी' संपली की लगेच... बहुतेक आज राधा-घनाचे लग्न लागणार!!!!!!!!!!!

पण मला हे कळत नाहिये की व्हेज-नॉनव्हेजचा मुद्दा इतक्या उशीरा का आला? हा पत्रिकेवर विश्वास आहे की नाही, मंगळ आहे की नाही ह्याइतकाच कळीचा मुद्दा आहे. Proud

आज संध्याकाळी ६ वाजता स्पेशल महाएपिसोड आहे. 'अशी ही बनवाबनवी' संपली की लगेच... बहुतेक आज राधा-घनाचे लग्न लागणार!!!!!!!!!!!>>>>>
?????

Pages