Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑफीसमधे कुकींग स्पर्धा आहे.
ऑफीसमधे कुकींग स्पर्धा आहे. त्यामधे एक मेन कोर्स (भाताचा पदार्थ किंवा भाजी) आणि डेझर्ट बनवायचे आहे. थीम - scary. पदार्थ scary दिसला पाहीजे. वेळ - दोन्ही मिळून २ तास.
काही युक्त्या असतील तर प्लीज लिहा.
पदार्थ फक्त scary दिसायला
पदार्थ फक्त scary दिसायला पाहिजे कि रुचकरही हवा....... हा हा हा sss
स्वर.. पालकचा भात करायचा.... पण रंग थोडा काळसर पणाला झुकणारा असावा. तर अगदी थोडासा हिरवा ठेवावा.(शेडींग साठी) . तो ट्रे मधे भात पसरावा. त्यावर वांग्याचे तळलेले लांब सापासारखे पसरावे, मशरुम तळलेले त्याला डोळ्याच्या जागी काळेमिरि लावणे. ते भातावर लावणे. उकडलेले नुडल्स..... भातावर पसरावे...अळीं प्रमाणे...असा सिन करावा.
भात करायचा नसला तर... रस्सा भाजी करायची...यात कांदा टोंमंटो बरोबर थोडी कोथींबिर्/पालक टाकला तर काळसर रंग येईल... मग त्यावर वरीलप्रमाणे वांगी, मशरुम ,नुड्ल्स टाकावे.
स्वर, scary food images असं
स्वर, scary food images असं सर्च कर. बर्याच आयडिया मिळतील. विद्याच्या कल्पना छान आहेत.
बटाट्याच्या फिंगर चिप्स कसे
बटाट्याच्या फिंगर चिप्स कसे करतात? ते mcdonalds मध्ये मिळतात ना ते.
हसरी अगदी तसेच हवेत का घरगुती
हसरी अगदी तसेच हवेत का घरगुती वर्जन चालेल?
मी मा. वे. मधे साधारण १ मि. बेक करते. मग हलवुन थोडेसे बटर मीठ मीरपुड घालुन हलवते व परत मावेत १ ते १.५ मि. बेक करते. हवे असल्यास शेवटच्या टप्प्यात चीझ पण टाकु शकतेस.
(यात शक्यतो ते चिप्स पसरवुन ठेवावे, एकावर एक येउ देउ नयेत.)
दोन्हीही चालेल मला. पण मा.
दोन्हीही चालेल मला. पण मा. वे नाही आहे.
मवा, मी चायनीज पालक आणते (तू
मवा, मी चायनीज पालक आणते (तू बेबी स्पिनाच वापर), त्याची भाजी चांगली होत नाही, तो पालक मी पालक दाल, पालक पिठलं करून खाते. मस्तं लागतं
हसरी याचे घरगुती व्हर्जन
हसरी याचे घरगुती व्हर्जन म्हणजे, बटाटे तसे कापून उकळत्या पाण्यात (मीठ घातलेल्या) मिनिटभर ठेवायचे. मग हवे तर ते भर तेलात तळायचे किंवा नॉन स्टीक
पॅनवर, अगदी थोडेसे तेल घालून, मंद आचेवर हलक्या हाताने परतायचे.
मंद आचेवर केल्यास तसाच सोनेरी रंग येतो.
मिरींडा घालुन करायच्या केक ची
मिरींडा घालुन करायच्या केक ची कृती माहिती आहे का कोणाला?
दिनेशदा एक विनंती सर्व नविन
दिनेशदा एक विनंती सर्व नविन मायबोलीकरासाठी मसाले(जुन्या मायबोलीवरचेही)एकत्र संकलित करून नविन धागा सुरू कराल का?उन्हाळ्यात वेगवेगळे मसाले करणे सोपे जाईल्!सर्व मसाले एकाच धाग्यावर मिळू शकतील.
लाल तिखट करायचे झाल्यास,
लाल तिखट करायचे झाल्यास, मिरच्या कोणत्या घ्याव्यात? किती उन दाखवावे? ह्या विषयावर चर्चा असल्यास क्रुपया लिंक द्या. मला सापडली नाही. १ किलो तिखटाला किती मिरच्या लागतील?
सुचरिता, चांगली कल्पना आहे.
सुचरिता, चांगली कल्पना आहे. मला वाटतं मसाले या नावानेच तो बीबी होता.
लीना,
घरात कितपत तिखट खातात ? त्यानुसार ब्याडगी / शंकेश्वरी / काश्मिरी अशा
मिरच्यांचे मिश्रण घ्यावे. एक किलो चांगले तिखट होण्यासाठी साधारण १ किलो ३००
ग्रॅम मिरच्या लागतील.
त्यानंतर त्यांना २/३ दिवस कडक ऊन दाखवावे लागेल. मग सगळ्यात कठीण भाग
म्हणजे त्यांचे देठ काढणे. (सवय नसेल तर हाताची आग आग होते.) देठ काढतानाच मिरच्या नीट वाळल्या आहेत कि नाहीत ते कळते. देठ खुटकन निघाला, तर चांगल्या वाळल्या, असे समजायचे. देठ काढताना काही बियाही वेगळ्या होतात. त्या पण वेगळ्याच ठेवायच्या.
मिरच्या काही जणी भाजून घेतात. भाजताना जपून, कारण फार ठसका लागतो. नीट
खुटखुटीत वाळल्या असतील तर भाजायची गरज नसते.
दळणार कशावर ? मिक्सरवर दळायच्या असतील तर भाजायची गरज नाही. मिक्सरवर त्या गरम होतातच. हाताने फिरवायचे एक यंत्र असते. त्याने छान पूड
होते. डंकावर ( या गिरण्या मुंबईत आहेत, तिथे लोखंडी पहारीने कुटून मसाले
करतात ) द्यायच्या असतील, तरी भाजायची गरज नाही.
तिथे व्यवस्थित चाळूनही देतात.
पहिले चाळलेले तिखट लालभडक असते. ते वेगळे ठेवायचे. मग चाळणीवर राहिलेला
चाळ आणि बिया एकत्र कुटायला सांगायच्या. हे तिखट रंगाला कमी असले तरी
चवीला तिखट असते. ते पापडात वगैरे वापरता येते.
तिखट बरणीत भरताना, त्यात हिंगाचे मोठे खडे, तळाशी व वर ठेवायचे. तिखट पूर्ण
थंड झाल्याशिवाय बरणीत भरायचे नाही.
दिनेश, केवढी ती माहिती
दिनेश, केवढी ती माहिती तुम्हाला, तिखटाची. लिहलंपण आहे अगदी व्यवस्थीत.
आता मलापण वाटायला लागलं आहे की तुम्ही हे सगळं संकलीत कराव.
आर्च, उलट मलाच या मुलींचे
आर्च, उलट मलाच या मुलींचे कौतूक वाटतेय. आजही हे सगळे घरी करायची
त्यांची तयारी आहे.
मायबोलीवर पाककृतींचा, युक्त्यांचा खजिना जमा झाला आहे. कुणातरी व्यावसायिक
आणि तज्ञ व्यक्तिंने संकलन करायला हवेय आता.
मागे दिपांजलीने मिर्चीची
मागे दिपांजलीने मिर्चीची कुठली छानशी रेसेपी दिली होती, ( भरीत किंवा भाजी काय ते आठवत नाही, कारण त्या वेळी मी रोमात होते, सदस्य नव्हते ) ती कृपया परत पहायला / वाचायला मिळेल का? लिंक तरी मिळेल का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18591 टुनटुन ही लिंक उपयोगी आहे का बघा तुम्हाला.
प्रज्ञा खूप खूप धन्यवाद गं.
प्रज्ञा खूप खूप धन्यवाद गं. हीच रेसेपी मनात घर करुन बसली होती, परदेशात असताना त्या मिर्च्या आणुन भाजुन भरीत केले पण ही रेसेपी विसरले.
धन्यवाद दिनेशदा, माहिती
धन्यवाद दिनेशदा, माहिती सांगितल्याबद्दल नाही बरं का, कारण मागे तुम्हीच म्हणला होतात आभार नाही मानायचे म्हणुन.. कौतुकाबद्दल आभार... आता मिरच्या आणुन करेन तिखट तेव्हा कळवेन कसे काय झाले ते...
आई ग. दिनेशदा, खरेच मस्त
आई ग. दिनेशदा, खरेच मस्त माहिती. राजमाचिकर गिरनी आठवली पुण्यातली,
सुपारी, मसाले तिखट दळत. मस्त वासेस यायचे तिथून.
मटकी ला इंग्रजीत काय म्हणायचे? आज मुलीने मटकी उसळ खाल्ली. मी तिला मट़की भिजविली थोडे मोड आण्ले इत्यादी इंग्रजीतून सांगत होते तर हे ब्रसेल्स स्प्राउट्स आहे का असेच तिने विचारले. विकेट गेली माझी. मिसळ म्हणजे काय हे ही मला इंग्रजीत नीट सांगता येइना. ती मिक्स्ड उसळ म्हटली आणी गेली.
कुणला चिचवणी/चिंचवणी कृती
कुणला चिचवणी/चिंचवणी कृती माहिती आहे का?
मटकीला Moth bean म्हणतात असे
मटकीला Moth bean म्हणतात असे विकीदादा म्हणाले.
चिंचवणं हा वर्हाडातलाच
चिंचवणं हा वर्हाडातलाच पदार्थ आहे ना बी? गजानन महाराजांच्या पोथीत शेगावात घडलेल्या कथेत वाचलाय हा पदार्थ.
तिखट बरणीत भरताना, त्यात
तिखट बरणीत भरताना, त्यात हिंगाचे मोठे खडे, तळाशी व वर ठेवायचे. >>>> आणखी एक
तिखटाच्या, मसाल्याच्या, हळदीच्या बरणीत मी बिबवे घालून ठेवते.
अश्विनी, मटकीला गुजराथी लोक
अश्विनी, मटकीला गुजराथी लोक मठ म्हणतात, म्हणून इंग्लीशमधे पण इथेतरी तोच
शब्द वापरतात.
नलिनी, बिब्ब्याबद्दल उलटसुलट ऐकलेय खुप.
ओगलेआज्जींनी तो सुपारी वगैरेमधे वापरायला सांगितलाय. त्याचे तेल काढताना मी
आजोळी बघितलेय (दाभणीने टोचून, दिव्यावर धरुन.) त्याच्या गोडांब्या खातात हे
पण माहित आहे.
पण घरात बिब्बा आणला तरी, अंगावर फोड येणार्या एक बाई पण मला माहित आहेत.
आरे दम आलु ची लिन्क द्या ना
आरे दम आलु ची लिन्क द्या ना कोणितरी. नवर्याने आणुन ठेवलेले आहेत. मला कुठे येतात करायला? आले झाले इकडे?
इथे बघा
इथे बघा जमल्यास.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59995.html?1144170363
आलु आणतानाच नवर्याने दम दिला की काय? गंमत करतेय. पण अजून रेसेपी सापडल्यावर त्या पण लिन्क देते.
आलू आणणार्यांनाच दम द्यायचा
आलू आणणार्यांनाच दम द्यायचा की झालं
नलिनी, बिब्ब्याबद्दल उलटसुलट
नलिनी, बिब्ब्याबद्दल उलटसुलट ऐकलेय खुप.>> मी पण ऐकलेय काही लोकांना बिब्बे उभरल्याबद्दल.
गावाकडून ' तूर ' आलेत ...
गावाकडून ' तूर ' आलेत ... त्याची उसळ करतात का? रात्री भिजवून ठेवावे लागतात का की असेच कुकर ला शिजतील ? अजुन काही करता येईल का ?
चमकी,तूर म्हणजे हिरव्या शेंगा
चमकी,तूर म्हणजे हिरव्या शेंगा आहेत का? जर त्या असतील तर हे दाणे किमान तासभर पाण्यात भिजवुन ठेवावे.तोंडली उभी चिरुन त्यात हे दाणे बरोबरीने घालुन रसदार भाजी वाटलेला मसाला घालुन करावी.कुकरमधे करुन एक शीटी काढावी्ए दाणे मूग्-उडिद डाळ वापरुन खमंग पॅटिस्,पुलाव,दाणे वाफवुन सारण करुन पराठे,बेसन पिठ्-गहु पिठ व उकडलेले दाणे मिक्सरमधुन काढुन त्याच्या तिखतमिठाच्यापुर्या,भिजवलेले कच्चे दाणे वाटुन त्यात बेसन +कांदा +मेथी घालुन भजी असे तिखटाचे बरेच प्रकार करता येतील.
Pages