"मी मराठी.."
लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.
आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.
१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू
**** महत्त्वाची घोषणा ****
लोकहो:
आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव
आणि आता अक्षर आहे:
मेघा२५ तुम्ही यार्डात
मेघा२५ तुम्ही यार्डात जाणार्या गाडीत बसलात! ..>>> हो ना.. मला टाईप करायला फार वेळ लागतो. तोपर्यंत अक्षर गायब झाले.
बघ की हह... मला चटकन 'र'चं
बघ की हह... मला चटकन 'र'चं काही आठवेचना... आणि बघते तर माझ्या अख्ख्या पोस्टीच्या जागी फक्त ','
हिम्याने तोच प्रतिसाद एडिट करून नवं उत्तर लिहिलंय.
हिम्या, पण तरी मिळणार नाही तुला कॅडबरी!
१. मराठी नाव - रवि २.
१. मराठी नाव - रवि
२. महाराष्ट्रातील गाव - रत्नागिरी
३. मराठी कलाकाराचे नाव - रूही बेरडे
४. मराठी पुस्तकाचे नाव -राधेय
५. मराठी लेखक/लेखिका - रणजित देसाई
६. मराठी कवी/कवयित्री - पु र रेगे.
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - रात्रीस रोज चाले
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - रात्र थोडी सोन्गे फार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - राम राम गंगाराम
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रसातल्या शेवया
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - रावस (चालेल का?)
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - रायगड
१३. मायबोली आयडी - रॉबिनहूड
१. मराठी नाव - राधा २.
१. मराठी नाव - राधा
२. महाराष्ट्रातील गाव - रेंदाळ
३. मराठी कलाकाराचे नाव - रमेश देव
४. मराठी पुस्तकाचे नाव - रारंगढांग
५. मराठी लेखक/लेखिका - विजया राजाध्यक्ष
६. मराठी कवी/कवयित्री - राजा बढे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - रुपेरी वाळुत माडांच्या बनात ये ना
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - रात्र थोडी सोंगे फार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - रात्र आरंभ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रोट
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - राघु
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - रतनगड
१३. मायबोली आयडी - reema
मंजू.. एक कॅडबरी मिळालीये
मंजू.. एक कॅडबरी मिळालीये मला... पुढची बोनस आहे..
HH आडनाव चालणार आहे. प वरून
HH आडनाव चालणार आहे. प वरून शिरीस पै असं उदाहरण संयोजकांनीच दिलंय, तर र वरून विजया राजाध्यक्ष का नाही?
हिम्सकूल मला शेवेची भाजी राजस्थानी/माळवी पदार्थ म्हणूनच माहीत होता.
१. मराठी नाव - रोहित २.
१. मराठी नाव - रोहित
२. महाराष्ट्रातील गाव - रत्नागिरी
३. मराठी कलाकाराचे नाव - रितेश देशमुख
४. मराठी पुस्तकाचे नाव - रंगावली
५. मराठी लेखक/लेखिका - रणाजीत देसाई
६. मराठी कवी/कवयित्री - रमेश तेंडुलकर
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - राजसा जवळी जरा बसा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - रात्र थोडी सोंगे फार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - रंगत संगत
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रस्सा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - रेडा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - राजगड
१३. मायबोली आयडी - रुनी
ही एंट्री केवळ रेडा लिहायला
ही एंट्री केवळ रेडा लिहायला टाकली
ही एंट्री केवळ रेडा लिहायला
ही एंट्री केवळ रेडा लिहायला टाकली >>> रेडा .... एकमेव सुसंस्कृत प्राणी ...... (वेद म्हणणारा ;))
मयेकर चालणार हो तुमचे नाव..
मयेकर चालणार हो तुमचे नाव.. कारण. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनाव चालणार आहे..
डीजे,
डीजे,
हो की मयेकर. हे सोपे झाले. मी
हो की मयेकर. हे सोपे झाले. मी उगाच डोकेफोड केली लेखकांसाठी
रानडुक्कर नाही सुचलं कोणाला
रानडुक्कर नाही सुचलं कोणाला ??
भरत मयेकर अभिनंदन!
भरत मयेकर अभिनंदन!
१. मराठी नाव - राजु २.
१. मराठी नाव - राजु
२. महाराष्ट्रातील गाव - राजापुर
३. मराठी कलाकाराचे नाव - रविंद्र महाजनी
४. मराठी पुस्तकाचे नाव - रानफुले
५. मराठी लेखक/लेखिका - रत्नाकर मतकरी
६. मराठी कवी/कवयित्री - श्रीकृष्ण राऊत
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - रम्य ही स्वर्गाहुन लंका
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - राईचा पर्वत
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - रात्र आरंभ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रव्याचे लाडु
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - राघु
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - राजमाची
१३. मायबोली आयडी - rahulphatak
(No subject)
१. मराठी नाव - लक्ष्मण २.
१. मराठी नाव - लक्ष्मण
२. महाराष्ट्रातील गाव - लासलगाव
३. मराठी कलाकाराचे नाव -लता मंगेशकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - लमाण
५. मराठी लेखक/लेखिका - गोपाळ लिमये
६. मराठी कवी/कवयित्री -लांजेवार ज्योती
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - लागती गे काळजाला तीर् हे तेढे तुझे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - लंकेत सोन्याच्या विटा
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - लक्ष्मीची पाउले
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- लापशी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव -लांडगा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लिंगाणा
१३. मायबोली आयडी - लोला
१. मराठी नाव - ललिता २.
१. मराठी नाव - ललिता
२. महाराष्ट्रातील गाव- लोणावळा
३. मराठी कलाकाराचे नाव - लक्ष्मीकांत बेर्डे
४. मराठी पुस्तकाचे नाव- लज्जा
५. मराठी लेखक / लेखिका - लक्ष्मण माने
६.मराठी कवी / कवयित्री - हेमा लेले
७.मराठी गाणे किंवा कविता - लहानपण देगा देवा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण -लहान तोंडी मोठा घास
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव- लालबाग परळ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - लाडू
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - लांडगा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लोहगड
१३. मायबोली आयडी - लोला
१. मराठी नाव - लता २.
१. मराठी नाव - लता
२. महाराष्ट्रातील गाव - लातुर
३. मराठी कलाकाराचे नाव - लीला गांधी
४. मराठी पुस्तकाचे नाव - लमाण
५. मराठी लेखक / लेखिका - लक्ष्मीबाई टिळक
६.मराठी कवी / कवयित्री - सई लळीत
७.मराठी गाणे किंवा कविता - लाज लाजरी गोड गोजीरी,ताई तु होणार नवरी...
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - लहान तोंडी मोठा घास.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - लालबाग परळ
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - लाडु
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - लांडगा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लोहगड
१३. मायबोली आयडी- लालु.
१. मराठी नाव - लीला २.
१. मराठी नाव - लीला
२. महाराष्ट्रातील गाव - लाटवडे
३. मराठी कलाकाराचे नाव - ललिता पवार
४. मराठी पुस्तकाचे नाव -
५. मराठी लेखक/लेखिका -
६. मराठी कवी/कवयित्री - लक्ष्मीबाई टिळक
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - वाचवा वाचवा!
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण -लहान तोंडी मोठा घास
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव -
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- लाडु
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - लांडगा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लोहगड
१३. मायबोली आयडी -
खिन्न, हताश, निराश झालेली
खिन्न, हताश, निराश झालेली बाहुली!
१. मराठी नाव - लता २.
१. मराठी नाव - लता
२. महाराष्ट्रातील गाव - लातुर
३. मराठी कलाकाराचे नाव - ललिता पवार
४. मराठी पुस्तकाचे नाव - लक्ष्यवेध
५. मराठी लेखक/लेखिका - लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी
६. मराठी कवी/कवयित्री - लक्ष्मण सरदेसाई
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - लटपट लटपट तुझं चालणं..
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - लष्कराच्या भाकर्या भाजणे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - लेक चालली सासरला
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- लसुण चटणी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - लालसरी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - लोहगड
१३. मायबोली आयडी - ललिता-प्रिती
लाडू, लांडगा, लोहगड ...
लाडू, लांडगा, लोहगड ... प्रत्येक पोस्टीत आहे. संयोजक इथे कॉपी चाललीये.
चिंगी, वर दिलेला नियम १ वाचा
चिंगी, वर दिलेला नियम १ वाचा कृपया
हह, लासलगाव अगदी हमखास गाव
हह, लासलगाव अगदी हमखास गाव लहानपणच्या नाव-गाव मधलं
लोकांना एक कॅडबरी मिळाली की त्यांनी खेळातून निवृत्त व्हायचे असाही नियम हवा!
लासलगाव अगदी हमखास गाव
लासलगाव अगदी हमखास गाव लहानपणच्या नाव-गाव >> अगदी पौर्णिमा तेव्हाचं डोक्यात फीट आहे
निवृत्तीचा नियम चालेल कारण खेळ फार वेळखाऊ आहे आणि कामातून लक्ष पार उडवणारा खेळ!
कामातून लक्ष पार उडवणारा
कामातून लक्ष पार उडवणारा खेळ!>>> हह इकडे फिल्डिंग लावून बसलीये बहुतेक
संयोजक, एका आयडीला पाहिल्या बक्षिसावेळी कॅडबरी द्या, पुढच्या बक्षिसावेळी रफल्स लेज् किंवा मग टूथब्रशच
हो मंजुडी रिफ्रेश मारून
हो मंजुडी रिफ्रेश मारून किबोर्ड झिजणार आहे माझा
हह, आता तू झोप. आम्ही तुझी
हह, आता तू झोप. आम्ही तुझी जागा लढवतो.
संयोजक नविन अक्षर द्या.
भरत पहिला, दुसरा तिसरा नंबर
भरत पहिला, दुसरा तिसरा नंबर क्लेम झाल्यावरच मग मी माझी पोस्ट टाकली आहे.. खरतर कॉपी करणं सहज शक्य असुनही. असो. पुढच्यावेळी नाही टाकणार.
संयोजक, प्लीज प्लीज हे अक्षर बाद करु नका.
Pages