आभाळ..

Submitted by मी मुक्ता.. on 2 March, 2012 - 01:15

इतरांची चंद्रांनी लगडलेली आभाळं कुतूहलाने, काहीशा असूयेनेच पहायचे ते दिवस..
माझं कोरं आभाळ टुकूटुकू बघत रहायचं सैरभैर होऊन, येऊ घातलेल्या चंद्रांच्या वाटेकडे..
एकेक चंद्र जमू लागला आभाळात तसं सजत गेलं आभाळ माझंही..
आता 'मी'च माझ्या आभाळाकडे असूयेनं पहावं असंही वाटू लागलं..
निवडून निवडून आलेला एक एक चंद्र माझ्याकडे..
'अगदी माझ्यासारखा'.....
दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..
सूर्य आला की मावळायचं असतं हे गृहितच धरलेलं सगळ्यांनी..
वाट सोडून मन मानेल तसं धावावं असं कोणालाच वाटलं नाही,
अगदी हक्काचं आभाळ असूनदेखिल..
मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
कोणापाशीच मिळाला नाही चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
जितक्या उत्कटतेने आभाळभर चंद्र सजवलेले,
तितक्याच अलिप्तपणे निरोप देतेय आता एकेकाला...
चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित..
वेड्या अट्टहासापायी प्रत्येक वेळी कोसळणारं..
प्रत्येक चंद्रासाठी नव्याने उंच उडणारं..
माझं आभाळ कोरंच बरं आहे..
आता चंद्राळण्याचं वजन परत नाही सहन होणार त्याला...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुक्ते,
आशय छान!
वाचताना वाटलं मनस्वी जगतानाचे फायदे तोटे मांडलेस जणू...!
आणि वाटलं असा एक- एक चंद्र मिळवत जाणं हाच कवितेच्या नायिकेचा स्थायी स्वभाव असावा!
आणि हो चंद्राळण्याची सवय जडलीये आकाशालाच तेव्हा चंद्रांचं रिकामपणाच उलट सोसवणार नाहीसं वाटलं...

मग माझ्यासारखं कोण होतं?
माझ्यासारखं काय होतं?
>> हा शोध अगम्य.. माझ्यासारखं नसलेलं (डिफरेन्सेस) एन्जॉय करायला शिकलं की गणित सुटतंच Happy

शब्दांची मुक्त उधळण
>> दरम्यान काय झालं हे खरंच आठवत नाही..
पण अगदी 'माझ्यासारख्यांत' काहीतरी राहून गेलं एवढं खरं..
एक दिवस जाणवलं,
कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
सगळ्यांनीच समजूतदारपणे मान्य केलं एका दिशेने प्रवास करायचं..>> छान Happy

सर्वांना धन्यवाद..! Happy

क्लिओ..
अं.... नाही चालणार असं मला वाटतय.. Happy

विदिपा,
खरंय... स्फुट विभाग खरच माबोवर असावा का?

अनिल तापकीर,
Happy मलाही लिहिताना असंच वाटलेलं. म्हणजे अगद्दी सेम अस्स्स... वाटताना कविता वाटली, लिहिताना वाटली नाही. वाचताना परत वाटली म्हणून कविता विभागात टाकली..

बागेश्री..
काही गणितं सोडवायची नसतात.. सोडून द्यायची असतात.. Lol (अशी सवय लागलीये इंजिनिअरींग ला..) Wink

सत्यजित,
नेमकं काय कळालं नाही?

फालकोर,
Happy Happy सगळ्याच प्रक्रिया एका वेळेला वेगवेगळ्या फेज मध्ये असतात.. जोडण्याच्या आणि दुरावण्याच्या पण.. तुम्हाला करेक्ट लिंक लागलेली बघून भारी वाटलं..

सर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार... Happy

सुरूवात छान...
नंतर मी किंवा ही कविता दोघांपैकी कुणीतरी एक गडबडलो...

मला 'एका चंद्रासाठी' ची आठवण आली...

निंबुडा, गिरीश,
खूप खूप आभार.. Happy

आनंदयात्री,
सुरूवात छान...
धन्यवाद.!

<<नंतर मी किंवा ही कविता दोघांपैकी कुणीतरी एक गडबडलो...

मला 'एका चंद्रासाठी' ची आठवण आली...>> 'एका चंद्रासाठी' ची आठवण आली असेल तर माझ्यामते तू च गडबडला असावास..!

मला 'एका चंद्रासाठी' ची आठवण आली...>> 'एका चंद्रासाठी' ची आठवण आली असेल तर माझ्यामते तू च गडबडला असावास..!
>>>
अरे, मलाही 'एका चंद्रासाठी' चीच आठवण झाली होती. माझ्या या आधीच्या पोस्टीत मी मुक्ताकडे या कवितेची विचारणाही केली होती की माबोवर ही कविता सापडत नाहीये म्हणून. पण मग ब्लॉगवर सापडली आनि मी तो प्रतिसाद एडिटून टाकला.

अ‍ॅक्चुअली, 'एका चंद्रासाठी'ची आठवण आली म्हणून मी गडबडलो हे कन्क्लुजन कुठून आलं तेच कळलं नाही मला! पण आता तुलाही त्याच कवितेची आठवण आली म्हणजे तुलाही काहीतरी सेम वाटलंच असावं! असो.

>>>...कोणत्याच चंद्राने हट्ट नाही केला अमावस्येला उगवायचा..
...चंद्राळण्याचा खुळा अट्टहास..
...क्षितिजाकडे झुकता झुकता एकेक चंद्र दुसर्‍या आभाळाचा सूर्य होऊ लागला,
सहजपणे..
...चंद्र कधीच नाही, फक्त आभाळचं माझं होतं कदाचित.. <<<
जियो ! काय सुरेख लिहिलय्स गं Happy एकेक कल्पना ! त्यांची नात्यांशी जोडलेली वीण ! अफालातूनै ! धन्स गं !