Submitted by अनिल तापकीर on 28 February, 2012 - 04:13
नदीकिनारी माझे आहे गाव |
भैरवनाथ आमचा तो देव ||
खंडोबा डोंगराच्या माथ्यावरी |
महादेव आहे नदीच्या किनारी ||
गावाच्या मध्ये विठ्ठल सुंदर |
करंजाई, विरोबा शिवेवर ||
भोवताली शेताचा शिवार |
रानामंदी पिकं डौलदार ||
मुळा नदी गावाला वरदान |
तिच्यामुळे गाव पिकविते सोनं ||
असे प्रेम माया आपुलकी |
नाही तिथे सुडाची भाऊकी||
असे माझे गाव सुंदर |
त्याचा मला अभिमान थोर||
मला नेहमी अभिमान वाटणाऱ्या माझ्या मुलखेड गावाविषयी सुचलेली कविता
गुलमोहर:
शेअर करा
छान
छान
छान! वर्णनावरून गाव मस्तच
छान! वर्णनावरून गाव मस्तच असणार हे जाणवतच आहे.
पण कविता वर्णनापलीकडे गेल्यासारखी वाटली नाही. पुलेशु
पु ले शु साहेब व मायबोलीवर
पु ले शु साहेब व मायबोलीवर असणाऱ्या सर्व मान्यवरांना एक विनंती करू इच्छितो कि, मी एक फक्त नववी पास इतके शिक्षण घेतलेला, व सध्या शेती नि एक वाहनचालकाची नोकरी करणारा अडाणी माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडून खूप चुका होणारच. आपण सर्वांनी केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी अनमोल असेल. शिवाय मी संगणक देखील शिकलेलो नाही फक्त सरावाने काही गोष्टी जमतात इतकंच. असो. धन्यवाद.