२७ फेब्रुवारी, महाकवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, जो आज सन्मानाने ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. खुद्द पु. लं. नी म्हणले आहे ‘फलज्योतिषी माणसाचे जन्मनक्षत्र पाहतात. मला त्या शास्त्रातले अजिबात गम्य नाही. त्यामुळे माझे जन्मनक्षत्र मला ठाऊक नाही. परंतु माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या ‘विशाखा’ नक्षत्रावर..’
कुसुमाग्रजांनी आपल्या असामान्य प्रतिभेने अनेक पिढ्या प्रभावित केल्या आहेत... आम्हीही त्यातलेच एक.
कुसुमाग्रजांनी आपले आत्मचरित्र कधीच लिहिले नाही पण त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली वेगवेगळी श्रद्धास्थाने, प्रेरणास्थानं त्यांच्या अनेक लेखांतून डोकावतात.
आज कुसुमाग्रज जन्मशताब्दी सांगता दिनाच्या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांना आदरांजली अर्पण करत Expressions Unlimited सादर करत आहे दृकश्राव्य कार्यक्रम.... कवी कुसुमाग्रज ते नाटककार वि. वा. शिरवाडकर हा जीवनप्रवास ....कुसुमाग्रजांच्या शब्दात.... ' वाटेवरच्या सावल्या – कुसुमाग्रजांची आनंदयात्रा'...
वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग १)
वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग २)
वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ३)
वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ४ )
वाटेवरच्या सावल्या - कुसुमाग्रजांची आनंदयात्रा (भाग ५ - अंतीम)
जबर्या - आता ऐकून परत
जबर्या - आता ऐकून परत प्रतिसाद देतो.
हे एकदम झ्क्कास काम केलत बाई
हे एकदम झ्क्कास काम केलत बाई आपण. शतशः धन्यवाद !
जबरी ! अजून ऐकतेय..... भारीच
जबरी ! अजून ऐकतेय..... भारीच एकदम !
बाप रे केव्हढ काम केलय रार ! नमस्कार बाई तुला / तुम्हाला ( आदरार्थी म्हणायलाही आवडेल पण आत्ता तरी बहुवाचक वापरलेय ) ! रच्याकने Expressions Unlimited बद्दल थोडं लिही ना ... कोण कोण, काय काय ,कसं अन कधी केलत हे सगळं. तेही लिही ना. आवडेल वाचायला
झक्कास. आज रात्री निवांतपणे
झक्कास. आज रात्री निवांतपणे ऐकेन
शतशः सहस्रशः धन्यवाद!
घरी गेल्यावरच ऐकता येईल
घरी गेल्यावरच ऐकता येईल
फारच अप्रतिम!
फारच अप्रतिम!
मस्त, Expressions Unlimited
मस्त, Expressions Unlimited बद्दल जाणून घ्यायला आवडेल.
फारच छान काम केलत.
फारच छान काम केलत. धन्यवाद.
आता ऐकते.
सगळे ऐकले - केवळ अप्रतिम
सगळे ऐकले - केवळ अप्रतिम !
तुम्हा सर्वांचे आभार मानावे तितके कमीच !
छान
छान
stutya upkram.pahila bhag
stutya upkram.pahila bhag awadla.nemke kay challey he kalayla wel lagla .surwat ankhi kahi sopya boli wapratil havi jyane jast lokanna eikawese watel.
Manasi
सुरेख! ! !
सुरेख! ! !
खूप सुंदर.. कविता ऐकतांनाच
खूप सुंदर.. कविता ऐकतांनाच अशी मनात भिनते आहे. फार आवडले. आणि "expression unlimited" बद्दल आणि या प्रवासाबद्दल वाचायला अगदी आवडेल
ऐकायचं आहे फुरसतीने. विकेंडला
ऐकायचं आहे फुरसतीने. विकेंडला नक्की. तूर्तास फक्त पोच.
धन्यवाद रार.
अप्रतिम !! केवढं मोठ्ठ काम
अप्रतिम !! केवढं मोठ्ठ काम केले आहे ! खूप आनंद दिला तुम्ही. अनेक धन्यवाद.
धन्यवाद रार. एक से बढकर एक
धन्यवाद रार.
एक से बढकर एक आहे हे सर्व.
खूपच आवडलं.
---------------------------------------------
अवल यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन.
एकदम मस्त! अनेक धन्यवाद!
एकदम मस्त!
अनेक धन्यवाद!
खूपच छान! फार आवडलं !
खूपच छान! फार आवडलं !
अप्रतिम! धन्यवाद रार!
अप्रतिम! धन्यवाद रार!
कार्यक्रम ऐकलात्/पाहिलात आणि
कार्यक्रम ऐकलात्/पाहिलात आणि आवडल्याचं आवर्जुन सांगीतल्याबद्दल सगळ्या ग्रुपतर्फे तुमचे मनापासून आभार.
खरं तर वेळात वेळ काढून कार्यक्रम ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानायला हवेत...तुम्ही सगळे का धन्यवाद देताय !
कार्यक्रमाबद्दल, अनुभवाबद्दल आणि Expressions Unlimited बद्दल लिहिते एक-दोन दिवसात.
परत एकदा कार्यक्रम ऐकल्याबद्द्ल धन्यवाद.