एक कविता
मला आवडते
झुंजुमुंजु पहाटे होणारी
तुझ्या बांगड्यांची किणकिण
आणि निरव रात्री
झोपेत होणारा
तुझ्या पैजणांचा आवाज
मला आवडतात तुझ्या
बनारसी रेशिम साडीवरचे
जरतारी सोनेरी बुंदके
आणि राजस्थानी ओढणीचे
नरम मुलायम चंदेरी काठ!
मला आवडतो
थंडगार काळ्या फरशीवर
उमटलेला तुझ्या
चारवेढी जोडव्यांचा ओरखडा
आणि मला आवडतो
तुझ्या हनुवटीवर गोंदलेला
पाच ठिपक्यांचा डाग हिरवा!
मला आवडते
तू रंगवलेल्या मधुबनी चित्रातले
पिवळसर हिरवपोपटी रान
आणि पदराआडून दिसणार्या
मीरेच्या चेहर्यावरील उत्कट भाव!
मला आवडते
तुझ्या नाकात टोचलेल्या
बेसरबिंदीची जांभळी झाक
आणि कानात घातलेल्या
झुमक्यांची मोहक हालचाल.
मला आवडतात
घडीची पोळी उलटताना
तुझ्या नाजूक बोटांचा नाच
आणि कपाळावरची बट सारताना
तू झटकलेला पिठाचा हात.
मला आवडतो
करकरीत कच्च्या कैरीत
दात रुतवताना
तुझ्या ओठातून ओघळून
पडलेला आंबट थेंब
आणि मिठात घोळवलेली
चिंच चाखताना
घट्ट मिटलेले तुझे डोळे!
माझ्या काळ्या-पांढर्या-करड्या
परिटघडीच्या जगाचे
रोजच धागे उसवतात
तेंव्हा तू काढलेल्या
रुमालावरचे गच्छी टाके
माझे मन सुखावतात.
सुंदर
सुंदर
सुंदर, चित्रदर्शी, मोहक व
सुंदर, चित्रदर्शी, मोहक व धुंद वातावरण निर्मीती करणारी रचना. धन्यवाद सकाळी सकाळी ही वाचायला दिल्याबद्दल बी.
-'बेफिकीर'!
सुंदर !
सुंदर !
माझ्या
माझ्या काळ्या-पांढर्या-करड्या
परिटघडीच्या जगाचे
रोजच धागे उसवतात
तेंव्हा तू काढलेल्या
रुमालावरचे गच्छी टाके
माझे मन सुखावतात.
>>> व्वा!!
शेवटच्या कडव्याने कवितेला एक वेगळीच उंची दिली आहे. खूप आवडली कविता बी. वारंवारीता वाढवा की राव!!
खूप छान........
खूप छान........
धन्यवाद मित्रहो.
धन्यवाद मित्रहो.
मस्त!!
मस्त!!
अ फ ला तू न !!!
अ फ ला तू न !!!
आवडली. ते गच्छी म्हणजे कच्छी
आवडली.
ते गच्छी म्हणजे कच्छी आहे ना?
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद. हो कच्छी आहे तो टाका
धन्यवाद. हो कच्छी आहे तो टाका
सुंदर शब्दरचनेमुळे काव्याला
सुंदर शब्दरचनेमुळे काव्याला वेगळीच गती मिळाली आहे. मला ह्या कवितेतला भावार्थ फारच भावला.
सहज मांडलेले भाव भावले. "मला
सहज मांडलेले भाव भावले.
"मला आवडतात
घडीची पोळी उलटताना
तुझ्या नाजूक बोटांचा नाच
आणि कपाळावरची बट सारताना
तू झटकलेला पिठाचा हात." >>>
मोहकता, सौंदर्य चांगलं टिपलंय.
बी अत्यंत सुरेख कविता..
बी अत्यंत सुरेख कविता..
मस्तच.
मस्तच.
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
व्वा! मस्त!!
व्वा! मस्त!!
वा मस्त आहे
वा मस्त आहे
बी, कविता छान आहे
बी, कविता छान आहे
ट्युलिपच्या Mee Amour.. ह्या मुक्तकाचा खूप प्रभाव वाटला ह्या कवितेवर.
आवडली
आवडली
बी....... कविता फार गोड
बी....... कविता फार गोड

म्हणजे आता "ती" वेळ आली समजायची का रे...........
मस्त रे!
मस्त रे!
छान आहे रे बी! मस्त
छान आहे रे बी! मस्त
डिटेलिंग आवडलं..
डिटेलिंग आवडलं..
ट्युलिपच्या Mee Amour.. ह्या
ट्युलिपच्या Mee Amour.. ह्या मुक्तकाचा खूप प्रभाव वाटला ह्या कवितेवर.>>> अगदी!!
पण छान आहे.. मोहक.. सुंदर.. डीटेल्...आवडलं.