भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.
नुसती रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात.बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो. तो मी मे महीन्यात अगदी वेळ काढून घेतला.
आमच्या घरापासून १५ मिनीटांच्या अंतरावे एक मठ आहे. त्या मठीच्या आवारात २-३ बकुळीची झाडे माझ्या लहानपणापासुन पाहते. मागिल मे महिन्यात लेकीला सुट्टी पडल्या पडल्या ही फुले वेचायला जायचा चंग मनाशी बांधला. ह्या फुलांचा सडा प्राजक्ताप्रमाणे सकाळीच पडत असावा असा माझा भ्रम होता म्हणून एक दिवस लवकरच उठून आम्ही सहपरीवार बकुळीच्या झाडाखाली गेलो. पण तिथे तेंव्हा अगदी ४-५ फुले पडलेली सापडली. झाडावर पाहीले तर झाड फुला, कळ्यांनी गच्च भरले होते.
तिथल्याच एका माणसाला विचारले असता त्याच्याकडून संध्याकाळी ही फुले पडतात असे समजले. मग आम्ही संध्याकाळी ही फुले वेचण्यासाठी गेलो तर नुकतीच सडा पडायला सुरुवात झाली होती. माझी मुलगी बालपणीचा फुले बकुळीची फुले वेचण्याचा पहिला अनुभव घेत होती तर मी मोठेपणी लहान होऊन हा अनुभव घेत होते आणि माझे मिस्टर आमच्या दोघींच्या आनंदात सामिल झाले. वेचता वेचता जमलेल्या ओंजळभर फुलांचा वास घेताना मन धुंद होऊन गेल. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया अशा काहीतरी गाण्याच्या ओळी मनामध्ये आपोआप गुणगुणल्या जात होत्या.
पिक्चमध्य स्लोमोशन दिसते तशी बकुळीची फुले हळूवार येउन खाली पडत होती. एक फुल वेचल की बाजुला दुसर येऊन पडायच. आमच्या दोघींची घाई झाली होती फुले वेचण्याची. फुले वेचून आम्ही एका रुमालात ठेवली. १५-२० मिनीटे आम्ही ह्या सुगंधी पुष्पवृष्टीचा आनंद घेत होतो.
ती रुमालभर फुले घेउन आम्ही घरी आलो. घरी गेल्या गेल्या पहिला एका पानावर ती फुले ठेऊन फोटो काढले.
नंतर त्याचे गजरे करायला घेतले. बकुळीचा गजरा करणे म्हणजे अतिशय सोप्पे काम. एखाद्या नारळाच्या, ताडाच्या पातीचा धागा काढून किंवा बिनपानांचे जे वेल असतात अमरवेल सारखे त्यात बकूळीची फुले बिनासुईने ओवली जातात. कारण ह्या फुलाला आधीच होल असते. कदाचीत ह्या कारणामुळेच बकुळीला दुसरे नाव ओवळी असे पडले असावे. दोर्यात गुंफतानाच सुईची गरज भासते पटापट ओवण्यासाठी.
हा गजरा केसात माळल्यावर १-२ दिवस ह्याचा सुगंध केसात दरवळत असतो. कालांतराने ही फुले बदामी, बदामी वरून चॉकलेटी रंगाची होऊ लागतात पण बकुळीच्या सुगंधात मात्र काही कमतरता येत नाही. ह्या फुलांची अजुन एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. पुर्वी वह्या-पुस्तकांच्या पानांमध्ये ही फुले ठेवण्याचा माझा छंद होता. ही फुले असलेल्या पुस्तकाची पाने उघडल्यावर त्यातुन सुगंध दरवळत असे.
बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात. बकुळीला फळे धरतात.
बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.
मस्तच. गोव्याला मंगेशी च्या
मस्तच.
गोव्याला मंगेशी च्या देवळाबहेर बकुळीचा गजरा घेतल्याची आठवण झाली एक्दम
छान एकदम जागु. तीन वर्षामागे
छान एकदम जागु. तीन वर्षामागे गोव्यात घेतलेला बकुळीच्या गजर्याची फुल कागदासारखी झाली आहेत. पण अजुन वास येतोय.
जागु, मस्तच... परिजातका नंतर
जागु, मस्तच... परिजातका नंतर आता बकुळ... लहानपणीची आठवण आली. माझ्या शाळेच्या रस्त्यावर असेच मोठे झाड होते. मी पण फुलवेडी असल्याने फुले गोळा करायची. ८-१० फुले मिळाली तरि खुप आनंद व्हायचा. पण गजरा करण्याएवढी जमा व्हायची नाही. म्हणुन तिथेच गजरे विकत असलेल्या मुलीकडून गजरे २५ पैशांना विकत घेउन घालत असे. लहानपणीची आठवणीना उजाळा मिळाला.
अनन्या... सुरंगी ची फुले वेगळी असतात. ती पिवळसर्,जरा Orange रंगाला झुकणारी असतात. पण त्याचाहि वास असा धुंद करणारा असतो. पुर्वी वसईवाल्या बाईकांकडे हमखास मिळायचे त्याचे गजरे..... आता माहीत नाही.
मस्त सुगंध दरवळला आजोळची
मस्त सुगंध दरवळला
आजोळची आठवण झाली.
मस्तच. आम्हीही लहानपणी खूप
मस्तच.
आम्हीही लहानपणी खूप वेचायचो ही फुलं.
अनन्या सुरंगी वेगळी. तो लेखही
अनन्या सुरंगी वेगळी. तो लेखही मी मागिल वर्षी टाकला होता. थोड्यावेळात शोधून लिंक देते.
अवनी, सीमा विद्याक, अश्विनी, ललिता धन्यवाद.
ही सुरंगीची लिंक. अजुन काही
ही सुरंगीची लिंक. अजुन काही फुलांच्या लिंक आहेत त्या शोधून देते.
http://www.maayboli.com/node/24503
वा छान फोटो आहेत. बकुळीची
वा छान फोटो आहेत. बकुळीची फुलं पाहीलीच नाहित कित्येक वर्षात.
लहान पणी पुण्यात आलोकी शनिवार वाड्यात जायचो. तिथे एक झाड होतं
बालगंधर्व जवळचे झाड मलाही
बालगंधर्व जवळचे झाड मलाही आठवतय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला पण झाडे आहेत.
गोव्याला माझ्या घराच्या आजूबाजूला होतीच. पण सगळ्यात कौतुकाचे ते मुंबई, फोर्ट
मधले.
इरॉसकडून फ्लोरा फाउंटनच्या कारंज्याच्या दिशेने जाताना, चौकात ज्यावेळी प्रवेश
करतो, तिथे आपल्या उजव्या हाताला (हायकोर्ट, हाँगकाँग बँकेच्या दिशेने ) एक झाड आहे. एवढ्या गजबजाटात ते टिकून आहे शिवाय फुलेही ढाळत असते.
मस्त. बकुळीच्या फुलांचे फोटो
मस्त. बकुळीच्या फुलांचे फोटो पण खूप आवडले. धन्यवाद गं.:स्मित:
जागु तै ! मस्त. आता पुढच फुल
जागु तै ! मस्त. आता पुढच फुल कोणत?
पुढच फुल मनाला जे आधी
पुढच फुल मनाला जे आधी स्पर्शेल ते.
mast
mast
झकास फोटो!!
झकास फोटो!!
जागू, तुझे असे लेख वाचताना
जागू, तुझे असे लेख वाचताना मधली बरीच वर्षे अचानक गायब होतात आणि ते रम्य बालपण परत आठवते.
शोभा, आत्त आठवतंय ते ओवळीची फळे ! मी विसरलेच होते.
धन्स जागू बालपणीची आठवण करून दिल्याबद्द्ल.
यो, मंजू धन्यवाद. प्रज्ञा
यो, मंजू धन्यवाद.
प्रज्ञा ह्या आठवणी म्हणजे खरच जादू आहे. थेट भुतकाळात्/बालपणात नेऊन सोडतात आपल्याला.
छान !!!!!!!!!!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!!!!!!!!!
त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ
त्या सगळ्या बकुळ फुलांची
शपथ तुला आहे...
मनातल्या मोर पिसाची
शपथ तुला आहे..
जागु,मस्तच आजकाल पहायला नाही
जागु,मस्तच आजकाल पहायला नाही मिळत बकुळीची झाडे, फुले अनुमोदन !
एक विनोद,
बकुळी मी प्रथमच पाहतोय..
धन्स !
माझ्याघरी पंढरपुरात
माझ्याघरी पंढरपुरात ह्याच्याही पेक्षा डेरेदार वृक्ष आहे बकुळीचा आमच्या वाड्यातले झाड ९० एक वर्षाचे तरी असावे
मी आजवर दुसरे बकुळीचे झाड् फक्त गोंदवल्याला महाराजांच्या मठात पाहिले तेही फार लहान आहे अजून आणि आता हे तिसरे तुमच्या लेखात !!!
मला फार आवड्तो बकुळ त्याची फुले फळे मी अशीच चावून खातो औषधी असतो हा
फार दुर्मीळ झाला आहे तो अता
माझ्या दारातला बकुळ विठ्ठलाला वहावा अशी फार मनापासूनची इच्छा आहे माझी !! पण मीच जायचे सोडून दिले आहे ...आता त्या बकुळासाठीतरी जाईन म्हणतोय.... बघू योग आलाच तर...... त्याच्या मनात आले तर होईलही
प्राजुचा एक बेहतरीन शेर आहे ...............
मोगरा तुलाच ठेव ठेंगणा तुझा
माळते विशाल धुंदला बकूळ मी
असो फोटो व लेखन खूप आवड्ले
हार्दिक आभार
~वैवकु
जागू, आमच्या बाजूला कवडींच्या
जागू, आमच्या बाजूला कवडींच्या अंगणात पण बकुळ होता.. आणि तो आमच्यासाठीच आमच्या कुंपणात सडा सांडायचा!
कवडीआ़जी गेल्या, बंगला गेला आणि बकुळीचा बहरही गेला.. हे उरणचे झाड आहे ना?
मस्तच ग पण कोण जाणे माझं
मस्तच ग पण कोण जाणे माझं मात्र डोकं दुखायला लागतं फारवेळ हा गजरा डोक्यात घातला तर. लांबनच आवडतात ही फुले
खूप छान. लहानपणिच्या आठवणी
खूप छान.
लहानपणिच्या आठवणी जाग्या झाल्या.
छान आहे लेख
छान आहे लेख
आजकाल कुठे मिळताच नाहीत हि
आजकाल कुठे मिळताच नाहीत हि फुले.
काहीतरी अनमोल , कोणालाही न कळण्यासारखे गमावल्याची आठवण करून दिलीस तू जागू.
जागू, तुझे असे लेख वाचताना मधली बरीच वर्षे अचानक गायब होतात आणि ते रम्य बालपण परत आठवते.+१११ हुरहूर मात्र दिवसभर राहते
पुण्यात तर बघायलाही नाही मिळत हे फुल.
नुतन, इब्लिस, अनिल, वैभव,
नुतन, इब्लिस, अनिल, वैभव, जाईजुई, कविन, अनुजा, सन्जना, मृणाल धन्यवाद.
मस्त फोटो सुंदर
मस्त फोटो सुंदर लेख...!!
ब़कुळ म्हंटलं की मला फक्त हे एक गाण आठवत, काय तो पाडगावकरी मोहरलेला ब़कुळ... दुसरं कडव तर जिवघेण..
दिल्याघेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात
त्या सगळ्या बकुळफुलांची शपथ तुला आहे
शुभ्र फुले रेखित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस, "चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा !"
फुलांतल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे
छान आहे लेख आणि फोटो.
छान आहे लेख आणि फोटो.
सावंतवाडी फक्त २ कारणांसाठी
सावंतवाडी फक्त २ कारणांसाठी आवडली होती.एक म्हणजे राणी पार्वतीदेवी शाळेत जाऊन वेचलेली बकुळीची फुले
आणि दुसरे कारण म्हणजे नरेंद्र डोंगर!
अन्जू धन्स. देवकी
अन्जू धन्स.
देवकी
Pages