भले मोठे ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुले म्हणजे जणूकाही एक एक नक्षीदार कुडीच.
नुसती रुपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुले संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात.बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो. तो मी मे महीन्यात अगदी वेळ काढून घेतला.
आमच्या घरापासून १५ मिनीटांच्या अंतरावे एक मठ आहे. त्या मठीच्या आवारात २-३ बकुळीची झाडे माझ्या लहानपणापासुन पाहते. मागिल मे महिन्यात लेकीला सुट्टी पडल्या पडल्या ही फुले वेचायला जायचा चंग मनाशी बांधला. ह्या फुलांचा सडा प्राजक्ताप्रमाणे सकाळीच पडत असावा असा माझा भ्रम होता म्हणून एक दिवस लवकरच उठून आम्ही सहपरीवार बकुळीच्या झाडाखाली गेलो. पण तिथे तेंव्हा अगदी ४-५ फुले पडलेली सापडली. झाडावर पाहीले तर झाड फुला, कळ्यांनी गच्च भरले होते.
तिथल्याच एका माणसाला विचारले असता त्याच्याकडून संध्याकाळी ही फुले पडतात असे समजले. मग आम्ही संध्याकाळी ही फुले वेचण्यासाठी गेलो तर नुकतीच सडा पडायला सुरुवात झाली होती. माझी मुलगी बालपणीचा फुले बकुळीची फुले वेचण्याचा पहिला अनुभव घेत होती तर मी मोठेपणी लहान होऊन हा अनुभव घेत होते आणि माझे मिस्टर आमच्या दोघींच्या आनंदात सामिल झाले. वेचता वेचता जमलेल्या ओंजळभर फुलांचा वास घेताना मन धुंद होऊन गेल. बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया अशा काहीतरी गाण्याच्या ओळी मनामध्ये आपोआप गुणगुणल्या जात होत्या.
पिक्चमध्य स्लोमोशन दिसते तशी बकुळीची फुले हळूवार येउन खाली पडत होती. एक फुल वेचल की बाजुला दुसर येऊन पडायच. आमच्या दोघींची घाई झाली होती फुले वेचण्याची. फुले वेचून आम्ही एका रुमालात ठेवली. १५-२० मिनीटे आम्ही ह्या सुगंधी पुष्पवृष्टीचा आनंद घेत होतो.
ती रुमालभर फुले घेउन आम्ही घरी आलो. घरी गेल्या गेल्या पहिला एका पानावर ती फुले ठेऊन फोटो काढले.
नंतर त्याचे गजरे करायला घेतले. बकुळीचा गजरा करणे म्हणजे अतिशय सोप्पे काम. एखाद्या नारळाच्या, ताडाच्या पातीचा धागा काढून किंवा बिनपानांचे जे वेल असतात अमरवेल सारखे त्यात बकूळीची फुले बिनासुईने ओवली जातात. कारण ह्या फुलाला आधीच होल असते. कदाचीत ह्या कारणामुळेच बकुळीला दुसरे नाव ओवळी असे पडले असावे. दोर्यात गुंफतानाच सुईची गरज भासते पटापट ओवण्यासाठी.
हा गजरा केसात माळल्यावर १-२ दिवस ह्याचा सुगंध केसात दरवळत असतो. कालांतराने ही फुले बदामी, बदामी वरून चॉकलेटी रंगाची होऊ लागतात पण बकुळीच्या सुगंधात मात्र काही कमतरता येत नाही. ह्या फुलांची अजुन एक गंमत म्हणजे ही फुले मावळली तरी पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात. पुर्वी वह्या-पुस्तकांच्या पानांमध्ये ही फुले ठेवण्याचा माझा छंद होता. ही फुले असलेल्या पुस्तकाची पाने उघडल्यावर त्यातुन सुगंध दरवळत असे.
बकुळीपासुन सुगंधी साबण, अत्तर तयार करतात. बकुळीच्या सालीचा उपयोग आयुर्वेदात दातांच्या उपचारासाठी करतात. बकुळीला फळे धरतात.
बकुळीच्या झाडाखाली कृष्ण बासरी वाजवून गौळणींना आकर्षीत करत असे असा महाभारतात बकुळीच्या झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या बकुळीसोबर प्रेमभावनाही जुळलेल्या आहेत.
मस्त मस्त. बकुळीची फुले
मस्त मस्त. बकुळीची फुले म्हणजे माझा विकपॉइंट.
मस्तच गं!
मस्तच गं!
बकुळीची फुले. वॉव.
बकुळीची फुले. वॉव.
सुंदर फुले आणि गजरा....
सुंदर फुले आणि गजरा....
जागु मस्तच आजकाल पहायला नाही
जागु मस्तच आजकाल पहायला नाही मिळत बकुळीची झाडे, फुले
केपी, वत्सला, स्वाती, चिमुरी,
केपी, वत्सला, स्वाती, चिमुरी, केदार धन्यवाद.
सुंदरच!!! खुप लहानपणी पाहिलं
सुंदरच!!! खुप लहानपणी पाहिलं होतं हे झाड! पण त्या फुलांचा टिपिकल सुगंध अजुनही ओळखीचा वाटतोय.
खूपच छान. जागू , तुम्ही
खूपच छान.
जागू , तुम्ही नेहमीच छान लिहिता .
फोटोही स्टेप बाय स्टेप छान असतात.
जागुतै मस्त मला घरात बसुन वास
जागुतै मस्त मला घरात बसुन वास आला, आत्ताच येउ का ???????
छान. इथेही सुगंध आला बरं का !
छान. इथेही सुगंध आला बरं का !
काय मस्तेने {मी हे वाक्य
काय मस्तेने
{मी हे वाक्य "बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया" नेहमी ते गरब्यातले "पंछीडा ओ पंछीडा "या गाण्यातल्या शेवटच्या ओळी ...धर्ती वर गाते }:अओ:
छान आहे लेख...!!!
छान आहे लेख...!!!
जागू, मला निगवर येईपर्यंत
जागू, मला निगवर येईपर्यंत 'ओवळी' म्हणजेच बकूळ हे माहितच नव्हत. लहानपणी शाळेत जाताना ही 'ओवळीची' फुले गोळा करत आणि फळे खात खात, शाळेला उशीर व्हायचा. कित्येक वेळा फळाचा गर, घशात चिकटायचा आणि फार हाल व्हायचे. पण खूप फळे खाल्ली.
लहानपणाची आठावण दिल्याबद्दल धन्यवाद!
जागु, खुपच छान लेख आणि फोटो
जागु, खुपच छान लेख आणि फोटो पण....
बकुळीचा सुगंध पण आला बरं का... मला पण खुप आवडतो हा सुगंध..:)
मस्त वाटले वाचुन...
जागू, पानावरची बकुळीची फुले
जागू, पानावरची बकुळीची फुले बघून मस्त वाटले. माझ्या क्लासच्या वाटेवर बकुळीचे झाड होते.
जागू, मस्त वर्णन आणि फोटो
जागू, मस्त वर्णन आणि फोटो सुद्धा! फुलांप्रमाणेच तुझं लेखन पण असंच बहरू देत.
मला 'गर्भश्रीमंत' हा शब्द फार म्हणजे फारच आवडला.या फुलाचे एकदम चपखल वर्णन करणारा शब्द!!
मस्तच
मस्तच
जागू, मस्त गं! बकुळीचे झाड
जागू, मस्त गं! बकुळीचे झाड आमच्याही अंगणात होते. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत फ्रॉकचा ओचा करून मी सकाळी सात वाजता बकुळीची फुले वेचायला जायचे. पण सगळी फुले अगोदरच वेचली गेलेली असायची!! वाड्यातील इतर मुली, मोठी माणसे पहाटे पाच पासून बकुळीच्या फुलांना वेचायला सुरुवात करायची.... त्यामुळे मी घरी उरली सुरली, चिखलात माखलेली, सुकलेली बकुळ फुले घेऊन यायचे. त्यांचाही सुंदर वास यायचा. फक्त केसांत त्यांचा गजरा माळता यायचा नाही (व त्याच वेळी वाड्यातील इतर मुली हातभर लांब गजरे माळून मिरवायच्या) याचे मात्र वाईट वाटायचे!! नंतर बालगंधर्वच्या बाजूला फिरायला गेलो की तेथील झाडाखाली पडलेली बकुळ फुले वेचून त्यांवर समाधान मानायचे मी!
आम्ही मित्र बकुळीची फुले
आम्ही मित्र बकुळीची फुले खायचो (जास्त नाही थोडीच). ताई-आई चिडायच्या मग, कदाचीत म्हणूनच खात होतो.
जागु, केळीच्या पानावर ठेवलेले
जागु, केळीच्या पानावर ठेवलेले फुलांचे सगळेच प्रचि मस्त आहेत. पुण्याला शनिवारवाड्यात सुद्धा बकुळीची झाडं पाहिली होती ( खुप लहानपणी). तीच पहिल्यांदा आणि शेवटी. मला आता अनावर इच्छा झाली आहे या शनि-रविवारी जावुन परत एकदा बघुन यायची. इतक्या वर्षांनी राहिली असतील कि नाही शंकाच आहे.
पुणेकर, पुण्यात इतरत्र कुठे बकुळीचं झाड आहे का? (सार्वजनिक ठिकाणी)
मस्तच
मस्तच
माझं अगदी आवडतं फुल. गावाला
माझं अगदी आवडतं फुल. गावाला आमच्या आवारात झाडं होती. सुकलेले गजरे आम्ही कपड्यात ठेवायचो. छान वास येतो कपड्यांना. बकुळीची फुलं तिन्हीसांजेला पडतात. अगदी पांढरीशुभ्र असतात तेंव्हा. पण आजी त्यावेळी झाडाखाली जाऊ द्यायची नाही. जनावर (म्हणजे) साप वगैरे पायाखाली येईल ह्या भितीने.
जागू तू नेहेमी माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या करतेस. आणि मग तो दिवस बालपणच्या आठवणी आणि त्या अनुसंगाने ते सुखाचे दिवस घेऊन येतो. किती छोट्या छोट्या गोष्टीत निख्खळ आनंद असायचा. खरच त्याबद्दल धन्यवाद.
आर्या, शमा, साक्षी, दिनेशदा,
आर्या, शमा, साक्षी, दिनेशदा, प्रितिभुषण, आबासाहेब, शोभा, प्रिती, शांकली, स्वाती, कंसराज, अरुंधती, सुसुकु, मनिमाऊ, जिप्सि, आर्च सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
प्राजक्ता ....मल तर तुझ्य
प्राजक्ता ....मल तर तुझ्य ह्या मस्त मस्त फोटो तुन पन बकुळीच्या फुलन्चा सुवास येतोय..... अती सुदर
जागु........ कुठल्याकुठे
जागु........ कुठल्याकुठे मनाला भरकटवलंस.........
आहाहा.. मनभरून वास घेतला आज कित्येक वर्षांनी...
धन्स जागु..
सुहास्य, वर्षू धन्यवाद.
सुहास्य, वर्षू धन्यवाद.
व्वा! जागू....... शाळेत २
व्वा! जागू.......
शाळेत २ वृक्ष होते. १) बदाम २) बकुळी.
त्यामुळे आमच्या अंगणात/बागेत खूप बदाम पडत.....घर शाळेशेजारीच असल्याने ........(बहुतेक पक्ष्यांकडून!....जागू, बरोबर?)
बकुळीची फुलं आम्हीही वेचून गजरे करून केसात माळत असू. तेव्हा बहुतेकींच्या वेण्या...त्याही लांब.... असायच्या. बॉब केलेल्या फार थोड्या मुली असायच्या.
हो मानुषी हे पक्षांचच काम.
हो मानुषी हे पक्षांचच काम. धन्स.
फारच सुंदर. बकुळीचा वास अगदी
फारच सुंदर. बकुळीचा वास अगदी इथपर्यंत पोहोचला.
मी विचार करतच होते आत्ता पुढच
मी विचार करतच होते आत्ता पुढच फुलझाड कोणत असेल जागुदी च्या लेखात. मागच्या वेळेस प्राजक्त आणि आत्ता बकुळ. सगळे फोटो खरच सुंदर आहेत. मला बकुळीच्या फुलांचा सुगंध फार आवडतो. बकुळीची फुले वेचायला जायची कल्पना तर मस्तच. खास करून तुमच्या लहान मुलीसाठी.
भारतात असताना आईच्या मैत्रिणीने मला एक बकुळीचे झाड दिले होते. मी घरी घेवून आले पण आमच्या घराजवळ ह्या झाडा साठी जागा न्हवती. मग मी ते झाड आईच्या Farm house वर नेवून लावले. आई ने माझ्या नंतर त्याची खूप काळजी घेतली आणि आत्ता ते झाड मस्त मोठ झाल आहे. खूप फुले येतात आणि त्या फुलांचा अभिषेक आमच्या देवघरावरच होतो. आईने तिथे आत्ता झाडाभोवती पार बांधला आहे संध्याकाळी निवांत बसायला.
जागुदी ह्या बकुळीच्या फुलांना सुरंगीची फुले असं सुद्धा म्हणतात का?
Pages