Submitted by असो on 17 February, 2012 - 19:05
इंटरनेटचे व्यसन असू शकते का ? असल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? आऱोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का ?
हे व्यसन कसं सोडवता येतं ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इंटरनेटचे व्यसन असू शकते का ?
इंटरनेटचे व्यसन असू शकते का ? >>>>> अर्थात!!!
असल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? आऱोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का ? >>>> सविस्तर नंतर लिहीते!
हे व्यसन कसं सोडवता येतं ?>>>>
पुण्याच्या मुक्तांगणमध्ये हे व्यसन सोडवण्यासाठी खास कार्यक्रम आहे!
मंदारने ह्यावर एक लेख लिहिला
मंदारने ह्यावर एक लेख लिहिला होता मागे..
Ayushhya hech vyasan aahe
Ayushhya hech vyasan aahe
हो आहेच ! बिग टाइम.
हो आहेच ! बिग टाइम.
पुण्याच्या मुक्तांगणमध्ये हे
पुण्याच्या मुक्तांगणमध्ये हे व्यसन सोडवण्यासाठी खास कार्यक्रम आहे!>>>>> आयला खरचं की काय ? ?
स्वत:च्या लेखाची रिक्षा इथे
स्वत:च्या लेखाची रिक्षा इथे फिरवणं योग्य वाटत नाही पण सेनापती आणि केदार२० च्या पोस्ट नंतर धाडस करतो आहे.
अनिल, तुला आक्षेप असल्यास लिंक काढून टाकेन.
व्यसन:
http://www.maayboli.com/node/25474
ईन्टरनेट हे व्यसन बनू शकते.
ईन्टरनेट हे व्यसन बनू शकते. इतर व्यसनांइतके त्याकडे त्याज्य दृष्टीने न बघितल्यामुळे त्याचे दुष्परीणाम गंभीरपणे घेतले जात नाहीत.
प्रकृतीवर डायरेक्ट परीणाम होत नसतीलही पण ह्यामुळे सोशल लाईफ म्हणजेच सामाजिक जीवनावर नक्कीच परीणाम होउ शकतो. स्वकेंद्रीतपणा, दुसर्याचे म्हणणे न ऐकून घ्यायची वृत्ती, तोंडी (लेखी) हिंसकपणा, केलेल्या छोट्याश्या कामाचीही जाहिरात बेफाम करत सुटणे अशी काही लक्षणे आढळायला सुरुवात होते.
नीट पाहिल्यास आपल्या आजूबाजूला ह्याची उदाहरणे दिसू शकतील. कदाचित मायबोलीवरही
सर्वांचे आभार. मंदार, उत्तम
सर्वांचे आभार.
मंदार, उत्तम लेख आहे. अभ्यासपूर्ण लिहीलंय. धन्यवाद या लिंकबद्दल .
मंदार यांचा अप्रतिम लेख
मंदार यांचा अप्रतिम लेख मुख्यतः सायबर कॅफेत चालणार्या व्हिडीयो गेम्संच्या नशेबद्दल आहे; तो 'इंटरनेट' वापराला तसा "फिट्ट" बसत नसावा. मला वाटतं कुठल्याही चांगल्या गोष्टीचाही अतिरेक झाला कीं तें व्यसनच; पूर्वीही मुलांत कांही " पुस्तकातले किडे " असायचेच, आतां ही बरेच मोबाईलवेडे रस्तोरस्तीं दिसतातच ! "इंटरनेट" किंवा मोबाईलसेवा इ.च्या अफाट उपयुक्ततेबरोबरच आलेला हा व्यसनाधिनतेचा धोका आहेच व तो पालकानी , मित्रानी सतर्क राहून काबूत ठेवला पाहिजे, हें निश्चित.
Give a man a fish and you
Give a man a fish and you feed him for a day; Teach him to use the Internet, and he won't bother you for weeks!
- साभार @ http://calum.org/posts/teach-a-man-to-fish
बोला आता यापूढे काय
बोला आता यापूढे काय बोलतां..???
चंबू यांचा प्रतिसाद फेसबुक
चंबू यांचा प्रतिसाद फेसबुक आणि त्विटरवर अत्यंत फालतु लिहिणार्यांच्या बाबतीत अत्यंत मार्मिक होय.
शेवटी 'अती सर्वत्र वर्जयेत' हेच खरं. कोणत्याही गोष्टीच्या (कांही अपवाद वगळून उदा. समाजसेवा) अतिरेकाला व्यसनाचेच रूप यायला लागते
हो. नि ते मला लागले आहे. आता
हो. नि ते मला लागले आहे.
आता मुक्तांगणहि इन्टरनेटवरच ना? मग कसे व्हायचे?
दारूच्या व्यसनापेक्षा बरे!!
इंटरनेटचे व्यसन असू शकते का ?
इंटरनेटचे व्यसन असू शकते का ? >>>>> व्यसनच आहे .(स्वानुभव)
असल्यास त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? >>>>>>>> कामात दुर्लक्ष, चुका, वेळा पाळता न येणे सध्या तरी इतकेच
आऱोग्यावर काही परिणाम होऊ शकतात का ? डोळे दुखताहेत, मान मोडलीये
हे व्यसन कसं सोडवता येतं ?>>>>> उपाय कळल्यास मलाही सांगा.
चंबू एकदम तोड डाला, फोड डाला
चंबू
एकदम तोड डाला, फोड डाला यानंतर काही शिल्लकच राह्त नाही.
चंबूने बोलती बंद केली
चंबूने बोलती बंद केली सगळ्यांची.
म्हणूनच मी सुट्टीवर गेलो की
म्हणूनच मी सुट्टीवर गेलो की फार रेषेवर येतंच नाही.
ओर्कुट, थोबाड पुस्तक ,ट्विट ह्यांच्याशी संबंध ठेवलेला नाही. फोनवरून गरजेपुरते मेल्स आणि मायबोली पाहिली पुरे असते.
थोबाड पुस्तक
थोबाड पुस्तक
चंबू !!
चंबू !!