पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुकर मध्ये सांग करतात ते माझ्यकडे ओव्हन नाही आहे. शिवाय मि १ ल्याच वेळी करतेय तेव्हा चुकायला नको.
मिश्रण किती घट्ट करायचं ते सांग कि तू दिलेल्या प्रमाण घेउन करु?

मिश्रण एकदम घट्ट किंवा पातळ करु नकोस. साधारण इडली पिठासाखि consistency ठेव.
अधि कुकर गरम करुन घ्यायचा, खाली कुकरची जाळी ठेव, अनि शिटी नको लावुस. कुकरच्या भांड्याला आधी तुप लावुन मैदा किवा गव्हाचे पीठ भुरभुरुन घे नंतर मिश्रण ओत. अनि केक ठेवल्यावर मिडियम वर ठेवायचा. केक झाल्यावर वास दरवळतो, किंवा ३५ मिनीट् नंतर टेस्ट करुन बघा सुरी किवा टुथपिक वापरुन

कूकरमध्ये केक करताना भात करताना लावतो तसं पाणी घालायचं असतं की नसतं? की ओव्हन ईफेक्ट येण्यासाठी नुसताच कूकर गरम करायचा? Uhoh (अगदीच गंगूबाई प्रश्न आहे ना हा! :()

कूकरमध्ये केक करताना भात करताना लावतो तसं पाणी घालायचं असतं की नसतं? की ओव्हन ईफेक्ट येण्यासाठी नुसताच कूकर गरम करायचा?

हो नुसता कुकर तापवायचा. म्हणुन तर तो केक साठी वापरल्यास लवकर खराब होतो.

कूकर मध्ये रेती घाला, ज्यास्त तापून कूकर खराब होत नाही वर तपमान वाढून केक पण मस्त होतो.
मग लिंबाचे पाण्याने धुवायचा कूकर हो.

भाजणीची थालपिठं करताना कांदा-कोथिंबिरीबरोबर मी कोबीपण घालते बारीक आणि उभा (ज्युलिअन) चिरून. मस्त मस्त लागतात थालपिठं. कोरडी होत नाहीत.

monalip, पिठ पेरून वाल्या भाजीत बेसना एवजी भाजणी वापरता येते का? >> हो नक्कीच. भाजी लवकर व जास्त रुचकर नी पौष्टीक होते.
मी सि. मिरची, पडवळ यात तर भाजणीच वापरते. शिवाय, संपवायचीच असेल तर - उरलेल्या भाजीत / वरण / आमटीत तांदुळ पीठ , भाजणी , भाकरी पीठ घालुन थालीपीठ लावायचे, कोरडे होत नाही जास्त.

ईथे कोणीतरी egg pakoda ची recipe टाकली होति ना? आता मिळत नाहीये. Please को़णाकडे असेल तर लिन्क द्या.

थालिपिठात अजुन किसलेला गाजर, बिट, दुधी, कोथिंबीर असे पदार्थ टाकुन त्याला अजुन पौष्टीक बनवता येतात.

बेबी स्पिनाच चं काय करायचं ? नुसतं खायचं नसेल पण पौष्टीक हवं असेल तर ? मुलींना सलाड ड्रेसिंग्स आवडत नाहीत. बेबी कॅरट्स मी मीठ-साखर-लिंबू घालून देते, ते ठीक खातात, पण स्पिनाच नाही खात.

>>बेबी स्पिनाच
भाजी, पराठे काहीही करता येईल. एरवी करतो ते सगळं. पास्त्यात घालता येईल.

स्पिनाचचं सूप करता येईल. चिरून पराठे, धिरडी, थालिपिठं यांत घालता येईल. कच्चीच खायची असतील तर सँडविचमधे (लेट्यूसऐवजी) घालता येतील पानं.

मवा http://www.maayboli.com/node/19207 ईथे बघ. हे सूप फार छान लागतं. मुलं आवडीने पितात (स्वतःच्या आणी मैत्रिणीच्या मुलांचा आलेला अनुभव.) अजून एक म्हणजे जाडसर पोळी लाटून त्यावर अथवा ग्रोसरी स्टोअर मधे रॅप सँडविच साठी तयार पोळ्या मिळतात त्यावर क्रीम चीज पसरावं. ह्यावर पालकाची पानं, रंगीत भोपळी मिररच्या आणी गाजर, काकडीच्या लांब सळ्या कापून त्या ठेवाव्या. चवीला मीठ मिरपूड पसरवून घट्ट गुंडाळी करावी. ३" च्या चकत्या कापून सर्व कराव्या. सगळ्या भाज्यांचे रंग उठून दिसतात. आणी मुलं पण आवडीने खातात.आणी बाकी काही नाही तर भाजी आहेच.

मवा, पालकाची प्युरे करुन मस्त हिरव्या पुर्‍या कर. भरपूर उत्साह असेल तर टोमॅटो, गाजर वगैरे प्युरे करुन हिरव्या बरोबर लाल रंगाच्या पुर्‍याही करु शकतेस.

सायो, आयडीया छानच आहे, आत्ता नाही पण नंतर कधीतरी करेन. पालक पुर्‍या तर आवडीने खातात घरी, पण लाल पुर्‍या पण ट्राय करेन आता.

फ्रूट फालुदा कसा करतात? सब्जा बी किती वेळ भिजत ठेवायचं? आणि काय काय सामान लागतं?

संध्याकाळी एका मैत्रिणीला करायचाय, लवकर पाकृ मिळाली तर तिला लगेच सांगू शकेन Happy

प्रज्ञा, सब्जा बी अर्धा तास भिजवले तरी पुरते. फालुद्यासाठी कॉर्नफ्लोअरच्या शेवया,
एखादे सिरप, आईस्क्रीम स्कूप्स, थंड दूध, फळांचे आणि सुक्या मेव्याचे तूकडे, एवढेच लागते.

दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, दीड कप पाण्यात थोडी साखर घालून घट्ट शिजवायचे आणि त्याची शेवेच्या साच्याने बारीक शेव, बर्फाच्या पाण्यात पाडायची. आयत्यावेळी निथळून घ्यायची.

मिल्कमेड्चा टिन ३-४ महिन्यापूर्वी उघडला होता, आता वापरला तर चालेल का? fridge मध्ये ठेवला होता. टिनवर काहिहि लिहिलेले नाही कि उघडल्यानन्तर किती दिवसात वापरा ते...

मिल्कमेड्चा टिन ३-४ महिन्यापूर्वी उघडला होता, आता वापरला तर चालेल का?>>>वापरू नका. टाकून द्या.

फालुदा मिक्स असेच पाकिट असते. पण त्या शेवया शिजवाव्या लागतात. पाकिटात सुकवलेल्या असतात. मुसलमानांच्या सणांच्या आसपास, ओल्या शेवेचे, भिजवलेल्या सबज्याचे पाकिट मिळते.

Pages