खुप वर्षांपूर्वी मी हैद्राबादचे प्राणीसंग्रहालय बघितले होते. तिथली रचना मला इतकी आवडली होती, कि नंतर बाकी कुठ्ल्या झू मधे जायला मी तयारच नसायचो. न्यू झीलंडमधे पण यापूर्वी झू मधे जायचे टाळलेच होते.
नेटवर तिथले आकर्षक फोटो बघून जावेसे वाटले. प्राणी बघण्यापेक्षा मला तिथल्या रचनेत जास्त रस होता. (आफ्रिकेतल्या माणसाला प्राण्यांचे काय कवतिक असणार ? )
मला तो परिसर खुप आवडला. प्रत्येक प्राण्याला भरपूर जागा होतीच शिवाय शक्य तितके नैसर्गिक वातावरण उपलब्ध करुन दिले होते. (सिंहाचा मुद्दाम लोंग शॉट देतोय) मला कौतूक वाटले कि जिथे जिराफ, झेब्रे ठेवले होते त्या परिसरात, खास केनयात दिसणारी जांभळ्या फुलांची झुडूपे होती.
आधी न बघितलेल्या प्राण्यात, आकाराने अगदी छोटी (म्हणजे ८/१० इंच ) माकडे होती. तिथले खास म्हणजे उडण्याचा आळस असणारे पक्षी बघितले.
पक्षी बघण्यासाठी पिंजर्यातच मचाण वगैरे होते. बरेचसे स्थनिक पक्षी दिसले. तिथल्या अनेक पिंजर्यांच्या आत आपण जाऊ शकतो. न्यू झीलंडमधे साप नाहीत, पण काही खास प्रकारच्या पाली दिसतात. त्याही तिथे आहेत (त्यांच्या पोहोतुकुवाचे परागीवहन एक पालच करते.)
तिथले माहितीफलक पण अगदी रंजक होते (एक नमुना देतोय) मी भारतात असताना, इंद्रा, जिप्सी यांचे फ्लेमिंगो बघायला जायचे प्लान ठरत होते. मला त्यांच्याबरोबर जायला जमले नाही, पण ते पक्षी मात्र दिसले तिथे.
एक प्रगतीशील प्राणीसंग्रहालय म्हणून या प्राणीसंग्रहालयाला नावाजले जाते. कदचित पुढच्या भेटीच्या वेळी, ते आणखी आकर्षक झाले असेल.
मला तिथे जास्त वेळ काढता आला नाही, ( हे झू आणखी एका मोठ्या वेस्टर्न स्प्रिंग नावाच्या उद्यानाला लागूनच आहे. ) त्यामूळे हि अगदी त्रोटक चित्रझलक..
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
आले आले.. अजून काही फोटो
आले आले.. अजून काही फोटो आले... कित्ती मस्त जागा आहे. सहीच..
मस्त फोटो दिनेशदा !! हे फोटो
मस्त फोटो दिनेशदा !!
हे फोटो बघून मलाही माझ्याकडचे ह्युस्टन झू चे फोटो येथे द्यावेत असे वाटते आहे.
माकडाचा उडी मारतानाचा फोटो
माकडाचा उडी मारतानाचा फोटो खुप आवडला. एकदम ग्रेसफुल (ह्याला मराठी शब्द काही केल्या आठवला नाही).
छान फोटो. हिरवेगार दिसते आहे
छान फोटो.
हिरवेगार दिसते आहे त्यामुळे प्राणी, पक्षी छान बागडताना दिसत आहेत.
कंसराज, अवश्य. खरे तर हे फोटो
कंसराज, अवश्य. खरे तर हे फोटो माझ्या मनासारखे आलेले नाहित.
सुनिधी, ती माकडं एवढी चपळ आणि चुळबुळी होती कि मला नीट फोकस करता येत नव्हते. पण प्राणी अॅक्टिव्ह असणे हेच तर त्या झूवाल्यांचे यश आहे.
आणि अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते.
मस्त प्रचि... प्रचि १० मधले
मस्त प्रचि... प्रचि १० मधले कासव खरे आहे का? (खूप मोठं दिसतय म्हणुन विचारलं)
हो चिमुरी, कासव खरे आहे. ते
हो चिमुरी, कासव खरे आहे. ते जमिनीवरचे कासव होते, समुद्रातले नाही. समुद्रातली यापेक्षा मोठी असतात.
बापरे कासव किती मोठं आहे.
बापरे कासव किती मोठं आहे.
शिवाय वाघ, सिंह सुद्धा एकदम मस्त.
>>अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते. >> हेच महत्वाचं आहे ना.. आपल्या इथे ती शिस्तच नाहीये मुळी.
प्रचि २१ मधे अगदी आयडिअल पोझ
प्रचि २१ मधे अगदी आयडिअल पोझ आहे १९, २० पण सही आहेत...
छान.. आमचं जिजामाता उद्यान
छान..
आमचं जिजामाता उद्यान असे कधी होणार..
सहीच दिनेशदा, मस्त आहेत फोटो
सहीच दिनेशदा, मस्त आहेत फोटो
प्रची १५ आणि १६ कोणते प्राणी आहेत? माकडच का ?
हो केदार, माकडेच आहेत ती.
हो केदार, माकडेच आहेत ती.
दिनेशदा प्रचितील हिरवळ
दिनेशदा प्रचितील हिरवळ खासच... फ्रेश वाटलं
जमिनीवर झोपलेला फ्लेमिंगो पहिल्यांदाच बघतोय.
अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते.>>> नशिबवान प्राणी.
अ प्र ति म.
अ प्र ति म.
प्रचि आवडली. अवांतर : मेलबर्न
प्रचि आवडली.
अवांतर : मेलबर्न मध्ये दोन झु आहेत. एक जे शहराच्या अगदी जवळ आहे ते साधारण ऑकलंड झु सारखेच आहे. दुसरे शहराबाहेर आहे ते ओपन रेंज झु आहे. प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांना बरीच मोठी जागा दिली आहे. त्यामुळे प्राणी बघण्यासाठी आपल्याला काचेच्या मोठ्या खिडक्या असलेल्या बसमधुन नेतात. प्राणी बर्यापैकी मोकळ्या वातावरणात असल्याने खुप तुकतुकीत वाटतात.
शाळकरी मुलांना झु मध्ये जाण्यासाठी विकएण्ड आणि शाळांच्या सुट्टयांमध्ये तिकीट काढावे लागत नाही!
दिनेशदा खूप सुंदर
दिनेशदा
खूप सुंदर प्रची...मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल...
प्रची १४ मधील खालील उजव्या कोपर्यातील जगाचा नकाशा दाखवण्याची पद्धत सही वाटली (न्युझीलंड मध्यावर ठेवून काढलेला नकाशा)
मस्त दिनेशदा.. मुंबई शहराच्या
मस्त दिनेशदा..
मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल.>> +१ पण दर्जा टिकवू शकतील की नाही याबद्दल शंका राहील मात्र
दिनेश, छान रपेट. भुईवर पाय
दिनेश, छान रपेट. भुईवर पाय दुमडून विसावलेला फ्लेमिंगो पहिल्यांदाच बघितला.
मस्त दिनेशदा,मिनेसोटा झू ची
मस्त दिनेशदा,मिनेसोटा झू ची आठवण करुन दिली.
ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने
ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने !
(खरं तर जपानपेक्षाही, न्यू झीलंडला सूर्य आधी दर्शन देतो. उगवत्या सूर्याचा देश, असा मान त्यांना मिळाला पाहिजे.)
मुंबईला वाशी ब्रिजच्या जवळ, म्हणजे त्याच्या पश्चिमेला बराच मोठा भाग दलदलीचा आणि मॅनग्रोव्हचा आहे. विक्रोळी ला हायवेलगत पण अशी मोठी जागा आहे. तिथे वॉटर पार्क वगैरे होण्यापेक्षा, असे काहीतरी व्हायला हवे.
मुंबई शहराच्या भाग्यात ईतके
मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल.>> यंदाच्या म्हापालिकेच्या निवडणूकीत एकाही पक्षाने हा मुद्दा वचननाम्यात घेतलेला नाही... उलट आहे तेच उद्यान कसे बंद पाडता येईल यावर सर्व पक्षियांचा डोळा आहे...
आहाहा!!सुंदर फोटोज.. सर्व
आहाहा!!सुंदर फोटोज..
सर्व पशुपक्षी तजेलदार दिसतायेत..
'फ्लेमिंग्वासन''
सर्व फोटो अप्रतिम आहेत!
सर्व फोटो अप्रतिम आहेत!
ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने
ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने !
प्रचि१७ खासच , प्रचि ११. उडीबाबा मस्तच. ही माकड पिंजर्यात आहेत का ?
मजा आली पहाताना
मस्त !!
मस्त !!
सुरेख !
सुरेख !
मस्त
मस्त
झक्कास...
झक्कास...
मस्त दिनेशदा....
मस्त दिनेशदा....
अप्रतिम ,
अप्रतिम , दिनेशदा.
हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयाबद्दल १०० % सहमत.
Pages