ऑकलंड झू

Submitted by दिनेश. on 14 February, 2012 - 13:58

खुप वर्षांपूर्वी मी हैद्राबादचे प्राणीसंग्रहालय बघितले होते. तिथली रचना मला इतकी आवडली होती, कि नंतर बाकी कुठ्ल्या झू मधे जायला मी तयारच नसायचो. न्यू झीलंडमधे पण यापूर्वी झू मधे जायचे टाळलेच होते.
नेटवर तिथले आकर्षक फोटो बघून जावेसे वाटले. प्राणी बघण्यापेक्षा मला तिथल्या रचनेत जास्त रस होता. (आफ्रिकेतल्या माणसाला प्राण्यांचे काय कवतिक असणार ? )
मला तो परिसर खुप आवडला. प्रत्येक प्राण्याला भरपूर जागा होतीच शिवाय शक्य तितके नैसर्गिक वातावरण उपलब्ध करुन दिले होते. (सिंहाचा मुद्दाम लोंग शॉट देतोय) मला कौतूक वाटले कि जिथे जिराफ, झेब्रे ठेवले होते त्या परिसरात, खास केनयात दिसणारी जांभळ्या फुलांची झुडूपे होती.

आधी न बघितलेल्या प्राण्यात, आकाराने अगदी छोटी (म्हणजे ८/१० इंच ) माकडे होती. तिथले खास म्हणजे उडण्याचा आळस असणारे पक्षी बघितले.
पक्षी बघण्यासाठी पिंजर्‍यातच मचाण वगैरे होते. बरेचसे स्थनिक पक्षी दिसले. तिथल्या अनेक पिंजर्‍यांच्या आत आपण जाऊ शकतो. न्यू झीलंडमधे साप नाहीत, पण काही खास प्रकारच्या पाली दिसतात. त्याही तिथे आहेत (त्यांच्या पोहोतुकुवाचे परागीवहन एक पालच करते.)

तिथले माहितीफलक पण अगदी रंजक होते (एक नमुना देतोय) मी भारतात असताना, इंद्रा, जिप्सी यांचे फ्लेमिंगो बघायला जायचे प्लान ठरत होते. मला त्यांच्याबरोबर जायला जमले नाही, पण ते पक्षी मात्र दिसले तिथे.

एक प्रगतीशील प्राणीसंग्रहालय म्हणून या प्राणीसंग्रहालयाला नावाजले जाते. कदचित पुढच्या भेटीच्या वेळी, ते आणखी आकर्षक झाले असेल.

मला तिथे जास्त वेळ काढता आला नाही, ( हे झू आणखी एका मोठ्या वेस्टर्न स्प्रिंग नावाच्या उद्यानाला लागूनच आहे. ) त्यामूळे हि अगदी त्रोटक चित्रझलक..

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

गुलमोहर: 

मस्त फोटो दिनेशदा !!

हे फोटो बघून मलाही माझ्याकडचे ह्युस्टन झू चे फोटो येथे द्यावेत असे वाटते आहे.

कंसराज, अवश्य. खरे तर हे फोटो माझ्या मनासारखे आलेले नाहित.
सुनिधी, ती माकडं एवढी चपळ आणि चुळबुळी होती कि मला नीट फोकस करता येत नव्हते. पण प्राणी अ‍ॅक्टिव्ह असणे हेच तर त्या झूवाल्यांचे यश आहे.
आणि अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते.

हो चिमुरी, कासव खरे आहे. ते जमिनीवरचे कासव होते, समुद्रातले नाही. समुद्रातली यापेक्षा मोठी असतात.

बापरे कासव किती मोठं आहे. Happy
शिवाय वाघ, सिंह सुद्धा एकदम मस्त.

>>अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते. >> हेच महत्वाचं आहे ना.. Sad आपल्या इथे ती शिस्तच नाहीये मुळी.

दिनेशदा प्रचितील हिरवळ खासच... फ्रेश वाटलं

जमिनीवर झोपलेला फ्लेमिंगो पहिल्यांदाच बघतोय.

अर्थातच प्रेक्षकदेखील खुपच शिस्तीने वागत होते. त्यांना चिडव, खायला घाल असले प्रकार अजिबात नव्हते.>>> नशिबवान प्राणी.

प्रचि आवडली.
अवांतर : मेलबर्न मध्ये दोन झु आहेत. एक जे शहराच्या अगदी जवळ आहे ते साधारण ऑकलंड झु सारखेच आहे. दुसरे शहराबाहेर आहे ते ओपन रेंज झु आहे. प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांना बरीच मोठी जागा दिली आहे. त्यामुळे प्राणी बघण्यासाठी आपल्याला काचेच्या मोठ्या खिडक्या असलेल्या बसमधुन नेतात. प्राणी बर्‍यापैकी मोकळ्या वातावरणात असल्याने खुप तुकतुकीत वाटतात.
शाळकरी मुलांना झु मध्ये जाण्यासाठी विकएण्ड आणि शाळांच्या सुट्टयांमध्ये तिकीट काढावे लागत नाही! Happy

दिनेशदा
खूप सुंदर प्रची...मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल...

प्रची १४ मधील खालील उजव्या कोपर्‍यातील जगाचा नकाशा दाखवण्याची पद्धत सही वाटली (न्युझीलंड मध्यावर ठेवून काढलेला नकाशा) Happy

मस्त दिनेशदा..

मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल.>> +१ पण दर्जा टिकवू शकतील की नाही याबद्दल शंका राहील मात्र Happy

ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने !

(खरं तर जपानपेक्षाही, न्यू झीलंडला सूर्य आधी दर्शन देतो. उगवत्या सूर्याचा देश, असा मान त्यांना मिळाला पाहिजे.)

मुंबईला वाशी ब्रिजच्या जवळ, म्हणजे त्याच्या पश्चिमेला बराच मोठा भाग दलदलीचा आणि मॅनग्रोव्हचा आहे. विक्रोळी ला हायवेलगत पण अशी मोठी जागा आहे. तिथे वॉटर पार्क वगैरे होण्यापेक्षा, असे काहीतरी व्हायला हवे.

मुंबई शहराच्या भाग्यात ईतके सुंदर नैसर्गीक जंगल आहे की मनात आणले तर जागतीक दर्जाचे झू ईथेही ऊभे साहू शकेल.>> यंदाच्या म्हापालिकेच्या निवडणूकीत एकाही पक्षाने हा मुद्दा वचननाम्यात घेतलेला नाही... उलट आहे तेच उद्यान कसे बंद पाडता येईल यावर सर्व पक्षियांचा डोळा आहे... Sad

ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने ! Lol
प्रचि१७ खासच , प्रचि ११. उडीबाबा मस्तच. Happy ही माकड पिंजर्यात आहेत का ?
मजा आली पहाताना Happy

मस्त !!

अप्रतिम , दिनेशदा.
हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयाबद्दल १०० % सहमत.

Pages