खुप वर्षांपूर्वी मी हैद्राबादचे प्राणीसंग्रहालय बघितले होते. तिथली रचना मला इतकी आवडली होती, कि नंतर बाकी कुठ्ल्या झू मधे जायला मी तयारच नसायचो. न्यू झीलंडमधे पण यापूर्वी झू मधे जायचे टाळलेच होते.
नेटवर तिथले आकर्षक फोटो बघून जावेसे वाटले. प्राणी बघण्यापेक्षा मला तिथल्या रचनेत जास्त रस होता. (आफ्रिकेतल्या माणसाला प्राण्यांचे काय कवतिक असणार ? )
मला तो परिसर खुप आवडला. प्रत्येक प्राण्याला भरपूर जागा होतीच शिवाय शक्य तितके नैसर्गिक वातावरण उपलब्ध करुन दिले होते. (सिंहाचा मुद्दाम लोंग शॉट देतोय) मला कौतूक वाटले कि जिथे जिराफ, झेब्रे ठेवले होते त्या परिसरात, खास केनयात दिसणारी जांभळ्या फुलांची झुडूपे होती.
आधी न बघितलेल्या प्राण्यात, आकाराने अगदी छोटी (म्हणजे ८/१० इंच ) माकडे होती. तिथले खास म्हणजे उडण्याचा आळस असणारे पक्षी बघितले.
पक्षी बघण्यासाठी पिंजर्यातच मचाण वगैरे होते. बरेचसे स्थनिक पक्षी दिसले. तिथल्या अनेक पिंजर्यांच्या आत आपण जाऊ शकतो. न्यू झीलंडमधे साप नाहीत, पण काही खास प्रकारच्या पाली दिसतात. त्याही तिथे आहेत (त्यांच्या पोहोतुकुवाचे परागीवहन एक पालच करते.)
तिथले माहितीफलक पण अगदी रंजक होते (एक नमुना देतोय) मी भारतात असताना, इंद्रा, जिप्सी यांचे फ्लेमिंगो बघायला जायचे प्लान ठरत होते. मला त्यांच्याबरोबर जायला जमले नाही, पण ते पक्षी मात्र दिसले तिथे.
एक प्रगतीशील प्राणीसंग्रहालय म्हणून या प्राणीसंग्रहालयाला नावाजले जाते. कदचित पुढच्या भेटीच्या वेळी, ते आणखी आकर्षक झाले असेल.
मला तिथे जास्त वेळ काढता आला नाही, ( हे झू आणखी एका मोठ्या वेस्टर्न स्प्रिंग नावाच्या उद्यानाला लागूनच आहे. ) त्यामूळे हि अगदी त्रोटक चित्रझलक..
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
दिनेशदा, अॅनिमल प्लॅनेट
दिनेशदा, अॅनिमल प्लॅनेट किंवा नॅशनल जिऑग्राफिक चॅनेल बघितल्या सारखे वाटतेय. क्लास फोटोज!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तिकडे मीअर कॅट पण ठेवलाय हे बघून खूप आश्चर्य वाटले.
आणि झू मधल्या फ्लेमिंगोंचे पण रिंगिंग केलंय! ती लोकं अचाट आहेत! मला तर अशी खात्री आहे की देशातल्या प्रत्येक पक्ष्याचे रिंगिंग केलं असेल त्यांनी; आणि प्रत्येक वॉर्म ब्लडेड प्राण्याला अँटीरेबीज दिलं असेल!! (मला वाटतं आणि ही अतिशयोक्ती नसावी!!)
फ्लेमिंग्वासन.........
मस्त आहे झू.
मस्त आहे झू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त प्रचि ते फ्लेमिंग्वासन
मस्त प्रचि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते फ्लेमिंग्वासन घातलय त्याने>>>>:हहगलो:
छान फोटो
छान फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते लिहायचेच राहिले
ते लिहायचेच राहिले शांकली.
न्यू झीलंड हा कुठल्याही देशापासून दूर असल्याने, तिथले पक्षीही वेगळ्या तर्हेने उत्क्रांत झालेत. उदा. २२ नंबरचा जो पक्षी आहे तो झाडावर चढताना पण चोचीचा आणि पायांचा वापर करतो. आकाराने देखील तो जरा मोठाच असतो. असाच एक पक्षी तर दुसर्या पक्ष्यांच्या बिळातील पिल्ले ओढून खातो.
तिथे एक पक्षी समुद्रकिनार्यावरच्या दगडाखालचे किडे पकडण्यात पटाईत असतो, आणि यासाठी त्याची चोचही वाकडी (तीदेखील उजव्याच बाजूला) झालेली आहे. वाकडी चोच असणारा तो जगातील एकमेव पक्षी आहे.
तिथे चिमण्याही बिनघोर फिरताना दिसतात. बागेत वगैरे असणार्या मोकळ्या हॉटेलमधे तर त्या टेबलावर येऊनही खरकटे खाताना दिसतात. (माणसे तिथे असतानाच.) आणखी एका पक्ष्यांची अख्खी कॉलनीच इथे सादर करणार आहे.
सर्व प्र चि अप्रतिम. खूपच
सर्व प्र चि अप्रतिम. खूपच विस्तार दिसतोय या प्राणीसंग्रहालयाचा.......... किती सुरेख ठेवलंय.......
सर्व प्राणी-पक्षी अगदी आनंदाने रहात असतील.............
तरी पण अभयारण्याची सर कशालाच येणार नाही - पूर्ण निसर्गातच प्राणी, पक्षी, वनस्पती वाढले पाहिजेत - आपण तिथे फक्त अभ्यास करायला वा निरीक्षण करायला किंवा नुसता दर्शनाचा आनंद घ्यायला जायचे - पण त्यांच्यात कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करायची नाही....... प्राणीसंग्रहालयात तेथील प्राण्यांना आयते खायला मिळत असल्यामुळे ते प्राणी वा त्यांच्या पुढील पिढ्या (लगेच नाही पण काही काळाने) जीवनसंघर्षाला मुकतील व त्यांची जगण्याची नैसर्गिक शक्तिच गमावून बसतील (जसे लॅबोरेटरीमधील उंदीर निसर्गातल्या उंदरांइतके बिलकुल चपळ नसतात- त्यांना पिंजर्यातून बाहेर सोडले तर ते स्वतःचा बचाव करुच शकत नाही ) हे पूर्णपणे वैयक्तिक मत, कोणाला एखादे वेळेस आवडणारही नाही...... याठिकाणी का लिहितो आहे असंही वाटलं - पण परत असे वाटले की हे कोणीतरी लिहायला पाहिजे......
दिनेशदा - फार विषयांतर झालं किंवा अनाठायी वाटत असेल तर जरुर सांगा - मी हे उडवायला (डिलीटायला) तयार आहे.
शशांक, मलाही
शशांक, मलाही प्राण्यांना/पक्ष्यांना पिंजर्यात कोंडायची कल्पना सहन होत नाहीत. पण काळाच्या ओघात (उदा. बिबळ्याच्या रेट्याने वाघ ) जर एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असेल, तर ती जपायला हवी.
तिथे किवीच्या संरक्षणासाठी काय प्रयत्न केले जातात, ते पण मग लिहीन. (ते सगळे प्रत्यक्ष बघता येते.) तिथे त्यांना नैसर्गिक जीवन जगण्यास प्रवृत्त केले जाते.
मला तिथले कर्मचारी किती मन लावून प्राण्यांवर, झाडांवर प्रेम करतात ते पण दिसले.
असे कर्मचारी पण मिळाले पाहिजेत.
सिंगापूरचा एक अनुभव लिहिण्यासारखा आहे. तिथे एक इच्छा विहिर आहे. लोक त्यात नाणी टाकतात. तिथला एक कर्मचारी ती नाणी जपून बाहेर काढत होता.
तिथे मला जवळच एक चिमणी जखमी पडलेली दिसली. ती त्या संग्रहालयातली नव्हती, पण बहुतेक पंख्यामूळे जखमी झाली होती. मी त्याला तसे सांगितल्यावर तो हातातली नाणी टाकून धावत गेला, तिला वाचवायला.
शशांक, मलाही
शशांक, मलाही प्राण्यांना/पक्ष्यांना पिंजर्यात कोंडायची कल्पना सहन होत नाहीत. पण काळाच्या ओघात (उदा. बिबळ्याच्या रेट्याने वाघ ) जर एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असेल, तर ती जपायला हवी.>>>> अनुमोदन.
मला तिथले कर्मचारी किती मन लावून प्राण्यांवर, झाडांवर प्रेम करतात ते पण दिसले.
असे कर्मचारी पण मिळाले पाहिजेत.>>>>> हे त्या देशाचे, प्राण्यांचे, झाडांचे भाग्यच............
सिंगापूरचा एक अनुभव लिहिण्यासारखा आहे. तिथे एक इच्छा विहिर आहे. लोक त्यात नाणी टाकतात. तिथला एक कर्मचारी ती नाणी जपून बाहेर काढत होता.
तिथे मला जवळच एक चिमणी जखमी पडलेली दिसली. ती त्या संग्रहालयातली नव्हती, पण बहुतेक पंख्यामूळे जखमी झाली होती. मी त्याला तसे सांगितल्यावर तो हातातली नाणी टाकून धावत गेला, तिला वाचवायला.>>>> आपल्याकडे माणूस पडला तर पहात नाही - चिमणी न प्राणी तर दूरची गोष्ट.......
फोटो मस्तच मैसुरचं
फोटो मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैसुरचं प्राणीसंग्रहालयासुद्धा खूपच छान मेन्टेन केलेले आहे, तिथे गेल्यावर आवर्जुन भेट द्यावी असं
दिनेशदा, फारच छान फोटो आहेत.
दिनेशदा, फारच छान फोटो आहेत. माहिती पण मस्त!
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त च मस्त...
मस्त च मस्त...
Pages