'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा १

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2012 - 00:42

नमस्कार मंडळी,

स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' या विषयावरील आपल्या परिसंवाद विशेषांकाचे संपादक मंडळ तयार झाले असून मंडळाचे काम सुरू झाले आहे.

या संपादक मंडळातील मायबोलीकर आहेत
नीधप
अगो
स्वाती२
नानबा
पराग
सानी
नादखुळा

हा उपक्रम संयुक्तातर्फे होत असला तरी संपादक मंडळातही संयुक्ताबाहेरच्या व पुरूष मायबोलीकरांचाही सहभाग आहे ही यावर्षीची एक विशेष बाब. लिंगनिरपेक्षता यासंदर्भात विचारांचे आदानप्रदान व्हायचे तर ते योग्यच आहे.

हे झालं संपादक मंडळाबद्दल. पण हा अंक तुमच्या विचारांशिवाय, लेखांशिवाय घडूच शकत नाही. तेव्हा स्त्री, पुरूष, नवे, जुने, साधे, फोडणीचे, आटपाटनगरातले, दंबद्विपावरचे, अल्लड नवथर, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अश्या सगळ्याप्रकारच्या मायबोलीकरांनी लेखण्या/ कीबोर्डस सरसावून सज्ज व्हा.

हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.
शब्दमर्यादा १०००.
तुम्हाला रोजच्या व्यापातून वेळ काढणे कठीण जात असेल हे लक्षात घेऊन लेख पाठवण्यासाठी मुदतवाढ करीत आहोत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख आता २० फेब्रुवारी अशी आहे.
लेखन पाठवायची जागा http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1

चला तर मग लिहायला घ्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी

विषय समजला, आवडला, कानोकानी मधील सर्व मजेदार संभाषणही चटकदार वाटले.
बक्षिसाचे काय हो?
Happy
१००० शब्दांतून पाठवतोच मी माझा अभिप्राय.....

संयोजक संयुक्ता : तुला एक विनंती आहे : पुढच्या परिसंवादाच्या वेळी गडबड होऊन देऊ नकोस, यावेळी असं दिसतंय की तुझा तुलाच विषय नक्की गमलेला नव्ह्ता......

असो.....

आठवण ठेवा....

माझी नव्हे, बक्षिसाची Happy

नमस्कार मोहिनी

माझ्यानंतरची पहिली मायबोलीकरीण तूच दिसलीस नि म्हटलं मैत्री करुया.....चालेल ना? Happy

इथे सगळी गमाडी जम्मत चाललेय्........आपणही त्यात सहभागी होऊया.........

गप्पा मारता मारता कळेलंच की लिंग निरपेक्ष मैत्री होऊ शकते की नाही ते...........! काय म्ह्णतेस? Happy

मग लेख अधिक परिपूर्ण होईल असं कदाचित संयोजक संयुक्तालाही वाटत असावं......ती सांगेलच मला .......................

विश ऑल ऑफ यू गुड लक.......... Wink

दीपक जी आपले आभार! Happy उद्यापर्यंत मुदत आहे आणि या विषयावर खूप विचार असूनही अजून लेख लिहिला गेला नाही, आपल्या शुभेछानंतर कदाचित जमेल! Happy आपला लेख आपण पाठवला का?

सानी, त्या लिंकवर दिवाळी अंक असे दिसतेय. मी पाठवलाय पण नसेल मिळाला तर कळवणार का ?>>>>>>> सेम प्रॉब्लेम........मलाही असेच वाटले की चुकीच्या ठिकाणी पोस्ट झाले म्हणून पण पोच मिळाली..... Happy

सानी, परत पाठवला. या बीबीवरच्या लिंकवर पाठवलाय (पण तिथेही दिवाळी अंक असेच दिसतेय.)

दिवाळी अंक असंच दिसणारे. त्यात काही चूक नाहीये. लिंक बरोबर आहे. तुम्हाला तुमच्या आयडीशी संलग्न असलेल्या इमेल आयडीवर पोच मिळाली असेल तर लेख आम्हाला पोचलाय. Happy

दिनेशदा, नक्की http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1 इथेच पाठवलात ना?

मी स्टेप बाय स्टेप समजवते. Happy

http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1 ही लिंक उघडल्यावर तुम्हाला सर्वप्रथम असं चित्र दिसेल.

lekh_submit.jpg

मग मेसेजबॉक्स मध्ये लेख लिहून 'सुपूर्त करण्यायोग्य' वर क्लिक करा.

lekh_submit1_0.jpg

आणि मग सबमिट करा.
lekh_submit2.jpg

मग मायबोलीशी संलग्न इमेल आयडीवर तुम्हाला पोचपावती मिळालेली असेल. तुम्हाला पोचपावती मिळाली, म्हणजे आम्हाला लेख मिळालाच म्हणून समजा. Happy

पण अपूर्ण ठेवलं असेल तर तिथेच पा खु मधे जायचं की मिळतं ते लिखाण Happy
सानीची पोस्ट यापुढे सगळ्याच विशेषांकांना वापरता येईल.

अश्विनी तुला बेस्ट विशेस ............मी लेखाचे तीन रकाने लिहिले होते नऊ तारखेपर्यंत.........नंतर ते नाहिसे झाले....!! आता पुन्हा लिहायला बसतोय......बघतो जमते काय.....:)

धुळ्याचे श्री. वाडिले नावाचे एक माझे मित्र माझ्याबरोबर परळमध्ये काम करतात्...........सहज आठवले म्हणून सांगितले...................

अरे....! आत्ताच मी वाचले की लेख पाठवण्याची मुदत २० तारखेपर्यन्त वाढवली आहे.........!! सही..... Happy

>>.मी लेखाचे तीन रकाने लिहिले होते नऊ तारखेपर्यंत.........नंतर ते नाहिसे झाले....!! >>

दीपक,
http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1
या दुव्यावर जा
तिथून माझे सदस्यत्व मधे जा.
तिथल्या पाउलखुणांमधे तुमचे अप्रकाशित लेखन तुम्हाला दिसेल.

स्वाती२

धन्यवाद्..........बारकाईने लक्ष देऊन मला मदत केल्याबद्दल.....

बाय द वे, मला क्रुदंत शब्द नीट टाईप करता येत नाहियेत .... आत्ताचा क्रु बघा ना कसा आला !! Happy जसं संस्क्रूत या शब्दामध्ये किंवा क्रुपण या शब्दामध्ये क्रु / क्रू असायला पाहिजे तो कसा टाईप करावा बरं इथे?

नीधपने पा खु लिहिल्यामुळे मी वाचूनही डोक्यावरुन गेलं होतं.......तुझ्यामुळे कळलं......पुन्हा धन्यवाद....कीप इन टच हं ! Happy

इथे एक गंमत मला आवडली....ती म्हणजे इथे दुवा देतात.......:-) म्हणजे आपण त्यांच्या दुव्यावर इथे असतो.........

कृपया अशीच मदत करत रहावी.........माझा दृढ्निश्चय आहे की मी इथे जम बसवणार्.........कृती केल्यानेच फळ मिळते..........पृष्ठभागावर माशी बसली..

अरे वा.......जमते आहे.....मजा आहे Happy

धन्यवाद देशपांडे मॅडम.

नमस्कार मंडळी......

शेवटी लेख पाठवला..........समाधानकारक होता.......वर्ड कौन्ट पाहिला तर बरोब्बर १००० निघाला....!! खरंच सांगतो ठरवून काही केला नाही..........बघूया संपादक मंडळ काय म्हणतंय ते...........चला.............जेवायची वेळ झाली......जातो.........गुड नाईट.

बेफिकीर, तुम्ही हे वाचलेत का ? Happy

हा परिसंवाद-विशेषांक असल्याने अंकामधे प्रामुख्याने आपल्या विचारांवर/ अनुभवांवर/ अभ्यासावर आधारित लेख अपेक्षित आहेत.

परिसंवादासाठी विनोदी, करमणूकप्रधान लेखन करणे अपेक्षित नाहीये पण विचार किंवा अनुभव मांडताना एखाद्याची लिहिण्याची शैली नर्मविनोदी असू शकते. वर ठळक केलेल्या निकषांमध्ये बसणारे लेख चालतील Happy

ओ बेफिकिरः

थोडे हलके म्हंजे किती हलके ते तुमच्या मनातले आम्हाला कसे कळणार हो? काय ते लिहा नी पाठवून द्या.....संपादक मंडळ बसलंय ना तिथे.....ते ठरवतील हो काय ते...........

तुम्ही थोडी फिकीर करत जा, असे मी थोडे थोडे हलके हलके सुचवू शकतो का? Happy

सानी, धन्यवाद.........

Where is the time to hate, when there is so little time to love!!!!

कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय............म्हणजे तुझ्या पेज वरील "आवडीचं वाक्य" सोडून अजून कुठेतरी...........

कुठे बरं?..........

दीपक भिडे, 'सातवा आसमान' ह्या हिंदी चित्रपटातल्या गाण्यातले शब्द आहेत ते. Happy

बेफि, दुसरा (विनोदी शैलीत लिहिलेला) लेख पाठवताय ना? आज लेख पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे, बरंका! Happy

Pages