कळले नाही...!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी थांबले आणि संपले कधी, कळले नाही
वाटेत एकटी राहीले कधी, कळले नाही

मी उन्हात सुद्धा जात राहीले तुझ्याच मागे
पायाचे तळवे पोळले कधी, कळले नाही

ऋतू आले गेले, वाट पाहीली तरी तुझी मी
ते वेडे वय अन् सरले कधी, कळले नाही

मी बेरीज करता सारे काही वजाच झाले
अन् शून्य फक्त हे उरले कधी, कळले नाही!

विषय: 
प्रकार: 

सुरेख!

rmd,
तुमचि लेखनाचि शैली खरोखरच अतिशय सुन्दर आहे. प्रतिसादासाठि शब्द लागतात, आणि ते माझ्याकडे
नाहित, जे काहि लिहिलेले आहे ते जगला असाल तर धन्य आहात, आणि न अनुभवता लिहिलेले आहे, तर परमधन्य आहात .....
आपल्या प्रतिसादाची अपेक्षा करु का ?
परब्रम्ह