मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा

Submitted by मंदार-जोशी on 10 February, 2012 - 02:01

आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्‍या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्‍या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.

GagoGaneshUL.jpg

टीपः काही सदस्यांची नावे राहून गेली असल्यास क्षमस्व. तसेच हे पान सगळ्यांसाठी खुले आहेच. फक्त नियमित जे येतात त्यांपैकी काहींची नावे गुंफली आहेत इतकेच. लालबागचा राजा यावरून नाव सुचले म्हणून मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा हे शीर्षक.

गुलमोहर: 

भन्नाट ! अप्रतिम ! उदय आणि पद्मजा फार फार सुरेख आर्ट आहे ही. मला यात सामावुन घेण्यासाठी तुमचे आभार. Happy

सेना Proud

अप्रतिम.......कला. पजो, उदय भन्नाट बनला आहे बाप्पा! Happy
मी आणी योगुली बाप्पाचा दात झालोय. Proud

मलाही यात सामावुन घेण्यासाठी तुमचे अनेक आभार Happy
माझे नाव ज्या पोझिशनला आणि ज्या साईझचे आहे, त्यावरुन माझे काही अकलेचे तार Biggrin

१. मी रहात असलेला देशाची आपल्या देशापासूनची वर्ल्डमॅपमधली पोझिशन- मी गगोवर कुठून येते, हे सुचवत असावी. Lol
२. माझा वावर कमी असल्याने छोटा साईझ Wink
३. अमित जर मेंदूच्या जागी असेल, तर आम्ही गुडघ्याच्या जागी. Proud

---------------------------------------------------------------------------------------------------------------

आता इतरांच्या पोझिशनविषयी: उदय आपल्याला चित्रातून काय मेसेज देऊ पहात आहे? याविषयी माझी कल्पना Wink
मंदारः गगोचा चेहरा-मोहरा आहे. Happy
डॉक, उकाका आणि देवकाका: गगोची आदरस्थानं, म्हणून शोभेच्या आणि वरच्या पोझिशनला... मुकुट Happy
अश्विनी आणि आशिषः रोमात असतात का? फक्त कान देऊन ऐकता का? बोलत नाही का? (असा उदयचा आक्षेप असेल.) Proud
मनीमाऊ आणि आर्या: फार गप्पा मारता बुवा तुम्ही (इति उदय) Lol
शोभा, मयुरी, राखी, पजो: तुम्ही ममा आणि आर्याची री ओढता का? Lol
दक्षिणा, स्मिता: फक्त खाण्याच्या गप्पा मारता का? की जेवायला जाते, एवढेच बोलायला येता?:हाहा:
योगुली आणि नेहा: तुमचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का? Biggrin
अंकिता: खाल्लेले अन्न पचवण्याविषयी बोलता का? Lol
किश्या, गिरी, अमित, सुशांत, कौतुक, मुकु, राजे, निखिल: तुम्ही खरे गगोकर! ठाण मांडून बसता वाट्टं Lol
नचिकेत: तुम्ही आपले इन्टरप्रिटेशन दिलेच आहे. त्याहून चांगले मी काय सांगू? Proud
सचिन आणि चातकाविषयीचे तारे बाकीच्यांनी तोडा Wink Rofl

सानी, तुला मेंदुची जागा द्यायला हवी होती (पण मग तु दिसली नसतीस, म्हणुन त्याच्या जवळपास).
काय बाई तु हुशार ! Wink

उदय आणि पजो, सुंदरच.
अस्ल्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीत माझ नाव गुंफल गेलय हे बघुन जीवन आज कृतकृत्य झाल.

सानी, मी बर्याचदा गगो फक्त ऐकत असतो (रोमात) म्हणुन माझ स्थान कानापाशी असाव Happy

नाही सचिन, तू आणि चातक फक्त कानगोष्टी ऐकता. गगोला डायरेक्ट अ‍ॅक्सेस करत नाही बहुतेक तुम्ही, म्हणून तुमचं स्थान कानानंतर Lol

माफी असावी...सविस्तर लिहायचे होते...पण कामानिमत्त..सतत बाहेर आहे... सानी थोडेफार योग्य विचार लिहीले आहे... नाव ठरवताना जरा असेच विचार होते.... असो...

सविस्तर लिहीलच....

धन्यवाद पजो.... अप्रतिम रंगसंगती केल्याबद्दल...त्याच्या शिवाय उठून दिसले नसते...

धन्यवाद सर्वांचा...

चित्रात माझे नाव नाही....
नसुन ही असल्यासारखे आहेच.... मग वेगळे का लिहावे... Happy

छान!

सानी... Happy

clap-animated-animation-clap-smiley.gif

व्वाह्!!!क्या बात है!!!
उदयवन तर खूपच कमालीचा कलाकार आहे...
पजो आणी उदय च्या कल्पनाशक्तीचं खूप खूप कौतुक!!!!!
फार्रच सुंदर कल्पना आणी मांडणी!!!

जबरी...भन्नाट आयडीया आहे आणि अप्रतिम कला...
उदय, प्रजो आणिं मंजो मला बाप्पांजवळ जागा दिल्याबद्दल तुमचे शतकोटी आभार...

अश्विनी आणि आशिषः रोमात असतात का? फक्त कान देऊन ऐकता का? बोलत नाही का? (असा उदयचा आक्षेप असेल.) फिदीफिदी

सानी - लईच मेंदू चालविलायस की...ब्येष्ट Happy

Pages