मै मै मै कारटून, बज रहा है बार बार दिलका टेलिफून

Submitted by pradyumnasantu on 4 February, 2012 - 18:47

एक वृद्ध सद्गृहस्थ मुंबईच्या रस्त्यावरून
भर दुपारी चालताहेत एक मळकी पिशवी हातात घेऊन,
संगीत ऐकू येते त्यांच्या खिशातून:
मै मै मै कारटून, बज रहा है बार बार दिलका टेलिफून
सद्गॄहस्थ सांगतात, "मित्रहो, ही आमची मोबाईलची ट्यून"

समोशांची गाडी दिसते,पाउल त्यांचे तिथे थबकते
फोन घेतात: "हेलो, हो हो मीच बोलतोय
थोडं थांबता का? नाही ऐकू येत काही, मी बिझी आहे हो खाण्यात.
(समोसेवाल्याला)समोसे द्याहो दोन,
घाला चटणी अजून
अजून, अजून,
जीभ खूश झाली तर ऐकवील मस्तशी धून.
(फोनवर)थोड्या वेळाने फोन करा ना साहेब. एक मिनिट हं, हा समोसेवाला काय म्हणतोय पाहतो
काय बाबा, सव्वाशे रुपये?
खिसे चाचपतात
पैसे नाहीत
होय होय गडबड कसली,आणून देतो
माझा एक सौदा होतोय एवढ्यात
देतो तुझे पैसे अर्ध्या तासात..."
समोसेवाल्याला वाटते फसवतात
तो देतो एक मुस्कटात.
"अरे अरे अरे बुडवतो काय मी? मारो मत बेटा सुन..."
फोन वाजतो
मै मै मै कारटून, बज रहा है बार बार दिलका टेलिफून...
(फोनवर) "हैलो साहेब,.... (समोसेवाल्याला)..अरे अरे मारू नको रे, दोन समोशांसाठी?
काय रे हे संकट गरीबापाठी"
"हेलो साहेब... आवाज? गूंज थी वो. अनुपमला दिलिपसाबनी दिलेली, कर्म मध्ये. फोन ठेवतो.
पुन्हा फोन वाजतो: मै मै मै कारटून, बज रहा है बार बार दिलका टेलिफून
"हेलो, साहेब, मी आता इथून निघालोच,
आपण नका घेउ डोकं फिरवून
सौदा झाल्याबरोबर येइन मी तुमचेही पैसे घेउन."
एक हवालदार येतो
समोसेवाल्याला एक सणसणीत देतो ठेवून
दुसरी त्या गृहस्थाला भडकाऊन
पाहतो गृहस्थाच्या पिशवीत डोकावून
क्या है इसमे? सोना?
पडेगा थाने आना
त्याला नेतो पोलिस स्टेशनला
इन्स्पेक्टर जागा झा्ला
क्या है बे
कौन है ये बु्ढ्ढा साला
साब ये छुपा रुस्तम है
इसके पिशवीमे है सोना
बावनकशीवाला
इन्स्पेक्टर पिशवीत डोकवतो
दरडावून, किसका है ये?
मेरा है साब, खुद कमाया है
क्या है नाम
मै बदनाम
नाचीजको पुकारते है अनिलकुमार विख्यात
काय सांगता? ते संगीतकार प्रख्यात
अनिलकुमार विख्यात
आपण?
जी सरकार
इन्स्पेक्टर आदराने प्रणाम करतो
(हवालदाराला) मूर्खा, इतक्या थोर साहेबाना
तू चोर म्हणुन घेउन आला?
जा त्वरीत जीप घेउन
ये पोचवून
जिथे जायचे तिथे त्याना
*
स्थळ: चोरबाजारातील एक दुकान
दुकानदार: आईये, आईये, साब, बहोत दिनोके बाद तशरीफ
गृहस्थ: आपकी सेवामे लाया हूं मेरा तिसरा गोल्डमेडल
याद है फिल्म "सब होगा मंगल"?
त्याच्या गीतसंगीतासाठी मिळालेलं हे मेडल
बोला याचं काय मिळंल?
दुकानदार: दूंगा दो हजार
"दो हजार? अरे यार
कमसे कम वो गाने तो याद कर"
संगीतकारसाब, आपका म्युझिक था बढिया
लेकिन मेरे नोट भी कम बढिया नही
चाहिये तो रखिये
अरे यार ऐसा मत कर
गोल्ड मेडल बेच रहा हूं विचार कर
"अच्छा ठेव. दे दो हजार"
भुकेनं घरात सगळेच बेजार"
पैसे घेउन जाऊ लागतो
पुन्हा सेल-फोन वाजतो
मै, मै मै......
जी. कोण? यशजी? कहिये साब.
इस बुढ्ढेकी कैसे याद आई?
गाने चाहिये? मिलेंगे
क्या देंगे आप?
गोल्ड-मेडल गॆरंटीड? नको साब, बोला रोकड्यात
काही नाही आजकाल मेडलच्या सोन्यात
काय नाव पिक्चर?
"हमारा भी है घर?"
वा वा सुंदर
मग असं करा
द्या रोख एक हजार
मोफत समोसे या वडा महिनाभर
आणि किराणा दो महिनोंका,
क्यूंकी
हमाराभी है घर.
ओके यशजी, सौदा पक्का? यशजी, ऐकणार माझी जुनी ट्यून? ऐका तर:
"मै मै मै कारटून, बज रहा है बार बार दिलका टेलीफून"
जोरात हसतो
चलो, समोसावालेके पैसे जो देने है
नही तो और थप्पडभी खाने है
आपली जुनी ट्यून गुणगुणतो
जिया हो जिया हो जिया कुछ बोलदो, अरे हो दिलका परदा....
अरे, देवसाबच्या घरी गेलं पायजे
देवसाब गेले, मुलाला भेटलं तरी पायजे
नाहीतर
आम्ही जाऊ तेव्हा कोण येणार?
जातो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आभार एम्.कर्णिक, विभाग्रज
एम्.कर्णिक: विनोदाचे अवगुंठन करण्याचा इरादा नव्हता. अनवधानाने तसे झाले असावे. पण ही अवगुंठनाची कल्पना छान वाटली. तशी कविता लिहावीशी वाटते. पुढच्या कवितेत तसा प्रयत्न करत आहे. ती कविता असेल एका इब्लिस म्हातारीविषयी. म्हातारीची वाट पहा.