Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22
फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!
कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नादखुळा -
नादखुळा - म्हणजे खुप छान या अर्थी वापरतात .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनन्दघन क्षणान्चा रावा फुलुन यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा
manakawadaa | 25
manakawadaa | 25 मार्च, 2009 - 13:53
>>>> चक्कित जाळ !!
केदार लै भारी लिस्ट दिलीस बघ भावा!!!
dakshina | 25 मार्च, 2009 - 15:30
टक्कुरं फिरलंय काय तुझं
dakshina | 26 मार्च, 2009 - 09:43
कोल्हापूरात प्रपोज करताना मुलिला मुलं 'रिस्पॉन्स देणार का?' असं विचारतात....
Kedar_Japan | 26 मार्च, 2009 - 10:28
'रिस्पॉन्स देणार का?' असं विचारतात....>>>> हे हे हे कैच्या कै आहे हे...
अजुन काही...
जाग्यावर पलटी
आबा घुमिव (गाडी जोरात हाणा असे म्हणाय्चे असेल तर)
इस्कटल्येला
दगुड
टक्कुर फिरलय व्हर र तुज?
जाग्यावर पल्टी
पाखरु ()
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
manakawadaa | 26 मार्च, 2009 - 11:38
मुलं 'रिस्पॉन्स देणार का?' असं विचारतात>>>>
हो हो असे किंवा 'रिस्पॉन्स हाय काय? असे
आंबं पाडू नकोस - थापा मारू नकोस
manakawadaa | 26 मार्च, 2009 - 14:36
आरुन फिरुन गंगावेश
dakshina | 26 मार्च, 2009 - 17:04
>> 'रिस्पॉन्स हाय काय? <<
दाडवान तोडीन.....
आणि हावरट माणसाला कोल्हापूरात हागुरडा म्हणतात..
dakshina | 26 मार्च, 2009 - 17:20
कोल्हापूरचे विशेष करून ९६ कुळी मराठा लोक, हाक मारल्यावर 'ओ' देण्याऐवजी 'जी' म्हणतात.
इथे नणंदेला 'दिवाणसाब' म्हणतात.
dakshina | 26 मार्च, 2009 - 17:35
गंडवणे/फसवणे - गंडीव्/फशिव...
dakshina | 26 मार्च, 2009 - 17:38
तिरळा / तिरळी - टर्का/टर्की
dakshina | 27 मार्च, 2009 - 10:41
अरे काय? कोल्हापूरी पेशल शब्द संपले?
sharad-patil | 27 मार्च, 2009 - 15:18
दक्स,
कितीतरी शब्द आहेत. पण आपण पुण्यात येतो आणि कोल्हापुरी विसरून जातो.
उदा.
मायंदाळ = भरपूर
कोरड्यास = भाकरी बरोबर खाण्यासाठी भाजी किंवा आमटी
आमटी हा पेशल कोल्हापुरी शब्द आहे असे मला वाटते.
मागे कुणीतरी दळप हा शब्द काढला होता.
वरतीकडे (वरल्या अंगाला) = पश्चिमेकडे आणि खालतीकडे (खायल्या अंगाला) = पूर्वेकडे हे शब्द कोल्हापुरातच वापरले जातात असे मला वाटते.
म्होरं = पुढे
रां#@ या शब्दात रा जितका जास्त वेळ तोंडात घोळवला जातो तितकी शब्दाची तीव्रता वाढते.
आरून फिरून गंगावेस = फिरून फिरून त्याच गोष्टीवर परत येणे. पुण्यात यालाच 'फिरून फिरून भोपळे चौक' म्हणतात.
सपक = अळणी
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
manakawadaa | 30 मार्च, 2009 - 11:00
>>>>हावरट माणसाला कोल्हापूरात हागुरडा म्हणता>>>>>>>
त्वांड
किनी - जसे हो किनी, मी किनी एकदा..., त्याने किनी....
खारी साखर - मीठ
मोळा - खिळा
निकारडं - रॅक
manakawadaa | 30 मार्च, 2009 - 11:12
>>>वरतीकडे (वरल्या अंगाला) = पश्चिमेकडे आणि खालतीकडे >>>
हो असे किंवा उगवतीला / मावळतीला...
कोल्हापुरात सगळीकडेच तृतीय पुरुषी क्रियापद वापरले जाते
जसे, येतयस काय, गेलेलस काय तिकडं
बर्याच महिला पण बोलताना, गेलो होतो, मी जातो, मी येतो असे वापरतात
manakawadaa | 30 मार्च, 2009 - 11:14
डोक्यावर पडलयस काय....
यावर सध्या आम्ही कोणाच्या? असे विचारतो
Kedar_Japan | 30 मार्च, 2009 - 11:57
बर्याच महिला पण बोलताना, गेलो होतो, मी जातो, मी येतो असे वापरतात
>>> होय हे मात्र एकदम बरोब्बर्!!...याचे कारण कोल्हापुरात बहुतेक करुन सगळ्यांची सरदार्-सरकार घराणी होती...आणि त्याकाळी सर्व महिला मंडळे स्वतः ला आणि दुसर्यांना सुद्धा अहो-जाहो, करीत, आम्ही गेलो होतो...आम्ही आलो होतो..वैगेरे आदरार्थी उल्लेख करत असत..
आता सरकारे वैगेरे गेली असली तरी बोलायची पद्धत मात्र तिच आहे
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
dakshina | 30 मार्च, 2009 - 15:13
वगळणे - ढिस करणे.
केरसूणी - साळूता
नॉनव्हेज - खाटखूट
माकड - वांडर
खोली बांधणे - खोली काढणे.
भेटला होता - गाठ पडलेला
रेडिमेड कपडा - उक्ता
शोधणे - हुडकणे
किंम्मत न देणे - वास न लावणे किंवा न हिंगलणे...
शेवटचा - ढोक
gajanandesai | 30 मार्च, 2009 - 15:42
दक्षिणा, आक्षी तराट सुटली हैस
कोल्हपुरा
कोल्हपुरात आपण बार्गेनिन्ग करतो त्याला जिकिरि म्हणतात्.चुक असेल तर प्लिझ दुरुस्त करा...
लयि भारि....
लयि भारि....:हाहा:
अजुन एक
अजुन एक :
शिप्पारस करणे- आगाऊपणा करणे.
रस्त्यावरचा विक्रेता :
काक्काय आलंय बघा...काक्काय आलंय बघा.....काक्काय आलंय बघा.
घेता का इस्काटु.....घेता का इस्काटु.....घेता का इस्काटु.....
खाऊंदे गरीब....खाऊंदे गरीब....खाऊंदे गरीब....
पुष्कर
पुष्कर
कोल्हापुर साइड्ला... काका-काकी असेच म्हणतात.. काकु म्हणत नाहीत.
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
त्याला काय
त्याला काय काय म्हणायचेय रे...ते विक्रेते नाही का फास्ट म्हणतात तसे का़क्काय!!!
काकु म्हणत
काकु म्हणत नाहीत<<< म्हण्त्यात की!
अस्सल
अस्सल कोलापुरी म्हनत नाय वो... पन काकी म्या कोलापुरातच ऐकला हाय
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
रहाण्याची
रहाण्याची जागा शोधायला कोल्हापूरात आलो असताना कालच ऐकलेला एक वाक्प्रचार..
ते लई किर्यानिष्ट ल***चं आहे!
पहिल्यांदाच ऐकलंय हे.जाणकारांनी खुलासा करावा!!!
किर्यानि
किर्यानिष्ट >>> circuit, psycho, कटकट करणार
कामाचा
कामाचा खोळम्बा करु नको किम्वा कामाची खोटी करु नको.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनन्दघन क्षणान्चा रावा फुलुन यावा
निष्प्राण या जिण्याचा आषाढ मेघ व्हावा
पुंगी टाईट
पुंगी टाईट होणे - टेंशन येणे
अरे
अरे मनकवडा, कोल्हापुरी आहेस होय!
लय भारी राव!
म्या बी बाघतू काय भर टाकता आली तर शब्दकोषात !
व्हयं बघ
व्हयं
बघ बघ्..मोठी डिक्शनरीच तयार करू...
टांगा पलटी
टांगा पलटी घोडं फरार...! ---> पेचाचा पण विनोदी प्रसंग
काटाकिर्रर्रर्र --> खूप छान ! (पोरगी,वस्तु,पदार्थ्....काहीही!)
वळख ना पाळख आन लोकमान्य टिळक --->अनोळखी पण अंगावर येणारी व्यक्ती.
कलमाड---> काटा काढणे.(अजुनही बर्याच ठीकाणी वापरला जातो हा शब्द!)
शिस्तीत
शिस्तीत जेवा.....म्हणजे सावकाश जेवा:)
लै
लै भारी....म्हणजे खुपच छान
म्हन्ती....क
म्हन्ती....करती...म्हणजे काय म्हण्तेस....किंवा करतेस
पुष्कर -
पुष्कर - शिप्पारस...
दिस धोंडा
दिस धोंडा फुडतूया
(सूर्य एवढ्या प्रखरतेनं तळपतोय की त्याच्या उष्णतेच्या तडाख्याने दगडही फुटू शकेल)
ते
ते शिप्पारस आणि काटाकिर्र् सोडले तर बाकीचे शब्द आमच्याइथे पण वपरतात.
बुक्का
बुक्का पड्णे म्हणजे खुप दमणे
आपण "बस्ता
आपण "बस्ता बान्धणे" हा वाक्प्रचार जसा वापरतो तशा अर्थाने मिरज /सांगली /कोल्हापुर कडे "कपडे काढणे" वापरतात.
मिरजेत नवा होतो तेव्हा आमचे शेजारी गम्भीर पणे सान्गत होते की मुलाच लग्न महिन्यावर आलय , कपडे काढायला पाहिजेत.
कपडे
कपडे काढायला पाहिजेत.>>>> होय... मी ही ऐकलाय हा शब्दप्रयोग ...
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
अस्सल
अस्सल कोल्हापुरी शब्द कसे असतात त्याची एक झलक.
मी पाचवी-सहावीत असतानाची एक गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक पहेलवान (व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर) रहायचा. एकदा त्याला काही रिपोर्ट लिहायचा होता. त्यासाठी कागदावर टेबल तयार करायचं होतं. पण काही केल्या त्याला पट्टी पेन्सिल घेऊन कागदावर सरळ रेघ मारता येईना. दोन तीन असफल प्रयत्नांनंतरचे पहेलवानाचे उद्गार,
"र्याग वडायचं काम लई माँड@@चं तेच्या मायला धरून!"
मी आणि माझा एक मित्र जवळ होतो. आमची हसून हसून मुरकुंडी वळली. मग आम्ही त्याचे 'अवघड' काम करून दिले. त्याने आम्हाला चॉकलेटसाठी चार आणे दिले.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
शरद माँड
शरद माँड हा कोल्हापूरी लोकांचा खूप आवडता शब्द आहे... आठवण करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद!
म्माँड
म्माँड सारखाच... त्वाँड पण आहे..
मस्तच शरद राव
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
>>>"र्याग
>>>"र्याग वडायचं काम लई माँड@@चं तेच्या मायला धरून!"
कोल्हापुरात काळ्या मसाल्याला तिखट / चटणी / (काही ठिकाणी बुक्का) असे म्हणतात...
पण़ बुक्का वेगळा असतो... हा वारकरी लोक आमटीत घालतात
बुक्का केला असा वाक्प्रचार पण आहे - जसे एखाद्याचा बुक्का केला - बेदम मारले
मनकवड्या -
मनकवड्या - 'बुक्का पाडला' असं ही म्हणतात..
Pages