घन भरुन येती....

Submitted by पल्ली on 20 December, 2011 - 00:12

Ghan bharun yeti....jpg

देवकी पंडीत ह्यांच्या सुरेल आवाजात माझ्या आठ गाण्यांचे रेकॉर्डींग मुंबईला 'स्वरलता' स्टुडीओ मध्ये झाले. गाण्यांना संगित दिले आहे नरेंद्र देशपांडे ह्यांनी. आणि संगित संयोजन आहे शैलेश दाणी ह्यांचे. फाऊंटन म्युझिक कंपनीने मार्केटिंगसाठी कौल दिला आणि आता योग्य वेळ पाहून ते सि.डी. प्रकाशित करतील.
तसं माझ्या गाण्यांबद्दल किंवा सिडीबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे फारसं काहीच नाही. बहारीनला असताना पाऊस खूप मिसला होता, तेव्हा जे काही खरडलं त्याला नरेंद्रनं सुंदर चाली लावल्या आणि देवकी ताईनी अक्षरशः त्या गाण्यांचं सोनं केलं. प्रत्येक कविता लिहिल्यावर अर्थातच माझा प्रथम श्रोता म्हणजे माझा नवरा. तो प्रत्येक वेळी काही सुधारणा, टीका किंवा कौतुक असं काही ना काही प्रांजळपणे द्यायचा. (न देऊन सांगतो कुणाला! Proud ) गाणी झाल्यानंतर त्याची आणि देवकी ताईंची प्रतिक्रिया अशीच होती कि व्याकरणात घट्ट न बसता ही गाणी - हे शब्द सहज आहेत. जी अगदी साध्या माणसालाही भावतील. हेच ह्या शब्दांचं वैशिष्ठ्य आहे. ठरवून काहीच केलं नाही. बस्स. घडत गेलं. आतापर्यंत स्वामींनी साथ दिलीय. पुढेही त्यांची कृपा राहो आणि तुम्हा सर्वांना ही सिडी आवडो ही श्रीचरणी प्रार्थना. शुभम भवतु |

--------
--------
DSC00626.JPG
--------
--------
DSC00625.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अरे वा!!!!!
आता आम्ही गीतकार पल्लीचे दोस्त आहोत म्हटलं. Happy

अभिनन्दन आमचे आधी आणि मग पल्लीचे. Happy

पेपरमध्ये काल की परवाच अ‍ॅड पाहिली आणि कविताला दाखवली.

अरे देवा. रिलीजच नव्हती झाली होय. उगाच मी त्या दिवशी दुकानदाराला शोधाशोध करायला लावली. वरुन देवकी पंडीतने गायले आहे आणि तुम्ही अजुन आणली नाहित असेही ऐकवुन आले. आता दुसर्‍या दुकानात जाउन घ्यायला हवी. Proud

तुझे अभिनंदन पल्ली Happy

व्वा पल्ले क्या बात!
जबरदस्त.. मनापसून अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!

Pages