Submitted by दक्षिणा on 11 January, 2011 - 23:55
अलिकडे बर्याच मैत्रिणींनी शंका उपस्थित केली की वजन कमी करताना खायचं किती आणि नक्की काय? कशात फॅट्स जास्त? कशात कमी? मग कोणता लो कॅलरी पदार्थ खाल्ला तर पोटभर होईल? याची चर्चा करता करता रमा ने सुचवलं की एक डाएट रेसिपीजचा बीबी सर्वांसाठीच उघडू.
अखेर आज मुहुर्त लागला...
या बीबी वर तुम्ही केलेली/तुम्हाला माहित असलेली लो कॅलरी, लो फॅट, लो कोलेस्ट्रॉल रेसिपी लिहा. ब्रेकफास्ट/लंच्/डिनर्/स्नॅक्स्/वन डिश मिल... काहीही चालेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी जेव्हा कॉलेजला जायचे
मी जेव्हा कॉलेजला जायचे तेव्हा असं करायचे.
सकाळी चक्क मऊभात आणि तूप. मेतकूट मला आवडत नाही जास्त. आणि नुसता तूपभात आवडतो. मग एक कप कॉफी. (भारी आहे हे कॉम्बो )
दुपारी डब्यात २ पोळ्या (घडीच्या पोळ्या), भाजी, एखादी चटणी किंवा लोणचं.
४ वाजता वगैरे स्नॅक्स हवंच असं नाही, पण ६ ला घरी आलं की एखादा लाडू, किंवा मग कधीतरी सामोसा आणऊन एखादा वगैरे...आणि अर्धा कप कॉफी.
रात्री ८ ल जेवण. दीड पोळी, भाजी, ताकभात किं वरण/आमटी भात. शक्यतो १२ महिने ताक पिते मी. दुपारच्या वेळसाठी बाटलीतून नेत असे. काही त्रास होतो म्हणून नाही, खूप आवडतं मला. अगदीच खूप सर्दी असेल तर नाही घेत. (मनाची नाही, जनाची ठेवायची म्हणून )
आता हे मी करत नाही. पण आहार म्हणून उत्तम आहे.
रच्याकने,
पुण्यात फुले मंडईच्या इथे एक दुकान आहे, तिथे ताज्या भाजलेल्या बर्याच प्रकारच्या लाह्या वगैरे मिळतात. ते लोक लाह्या भाजतच असतात बहुतेक वेळा, तिकडून लाह्या आणून मी ऑफिसमधे नेत असे कधीतरी. एकदम हलक्या असतात, नुस्ता कुरकुरेसार्ख्या खायलापण मजा येते. पण हे दुकान अगदी कोपर्यात होतं. आता माहिती नाही.
अरे मस्तच. धन्स दक्षिणा, हा
अरे मस्तच. धन्स दक्षिणा, हा बीबी काढल्याबद्दल.
सध्या खूप्पच गडबडीत आहे. नुसती डोकावून जातेय.
नंतर निवांत वाचणार आणि रेसिपीज ट्राय करून बघणार.
इथे कार्ब व कॅलरीची माहीती
इथे कार्ब व कॅलरीची माहीती आहे भारतीय जेवणा बद्दल.:
जरी लिंक ही मधुमेहासाठी असेल तरी दिवसाला १००० कॅलरी असा आहार करायला मदत होइल.
http://www.diabetesindia.com/diabetes/indian_food_exchge.htm
ही साईट पण उपयुक्त आहे-
ही साईट पण उपयुक्त आहे- बर्याच भाज्या, फळं , डाळी यांची पोषणमूल्ये शोधता येतात इथे
http://www.nal.usda.gov/fnic/foodcomp/search/
मेधा, वरील साईट जबरदस्त आहे.
मेधा, वरील साईट जबरदस्त आहे. भरपुर भाज्यातील पोषणमुल्ये मिळत आहेत. खुप आभार तुमचे.
मेधा, चांगली वाटतेय साईट.
मेधा, चांगली वाटतेय साईट. धन्यवाद.
अंडी,मोड आलेली कड्धान्य,
अंडी,मोड आलेली कड्धान्य, सलाड, नटस, सुप, हर्बल टी/ ग्रीन टी, फ्रुटस हे सगळे मधल्या वेळेत खाण्याने भरपुर विटामिन्स, प्रोटीन्स मिळतात अणि जंकफुड पण टळतेच.
अकु, सगळेच पदार्थ, व्वा!
अकु, सगळेच पदार्थ, व्वा! व्वा!
मुगाच्या डाळीची खिचडी मलाही खूप आवडते.
डाएट फूड बरोबर शक्यतो organic
डाएट फूड बरोबर शक्यतो organic or Non-GMO प्रोडक्टच खा.
http://www.infowars.com/gmo-scandal-the-long-term-effects-of-genetically...
12 Indian Foods That Cut Fat
12 Indian Foods That Cut Fat - Books World
http://puputupu.in/word/wordpress/2011/02/12-indian-foods-that-cut-fat/#...
@ reshmasandeep तुम्हि जे
@ reshmasandeep
तुम्हि जे दिलेय ते नेम्के कशासथि आनि कसे वापरावे?
काकडीची खमंग कोशिंबीर. भरपूर
काकडीची खमंग कोशिंबीर. भरपूर (लो फॅट) दही घालून खायची. चवीला मस्त लागतेच आणि कॅलरीज अतिशय कमी. शेंगदाण्याच्या कुटात ज्या काही कॅलरीज असतील तेवढ्याच. तर ते कमी टाकायचं.
मामी, लो फॅट दह्यातील बहुतेक
मामी, लो फॅट दह्यातील बहुतेक सर्वच कोशिंबिरी लो कॅल. दाण्याच्या कुटाऐवजी मोहरी फेसून/ मोहरी पूड/ मिरपूड/ जिरेपूड घातली तर वेगळी व मस्त झण्ण चव येते. टोमॅटो / काकडी/ गाजर/ मुळा/ पालक/ स्वीट कॉर्न/ बीट इ. इ. इ.
मी आजच मुगाची खिचडी करून
मी आजच मुगाची खिचडी करून आणलिये office ला.
अगदि चमचाभरच तेलात मोहरी तडतडवायची... मग चिमूटभर गरम मसाला टाकायचा... तांदूळ धुवून थोडा वेळ ठेवायचे. नंतर मूग डाळ, तांदूळ एकत्र परतून पाणी घालून शिजवायचं.... मस्त खिचडी तय्यार!!!
लो फॅट दह्यातील बहुतेक सर्वच कोशिंबिरी लो कॅल>>>>> अगदी अगदी.... मी रोजच्या जेवणात कोशिंबीर करतेच.... कितीही गडबड असली तरी....
कोशिंबीर :
काकडी/ मुळा/ गाजर/ बीट / tomato यातली एक + दही...(बीटाला दही नाही घालत...)+नावापुरतं शेंगदाण्याचं कूट+ मीठ + चिमूटभर साखर + कोथिंबीर
वरच्या भाज्यांची combo कोशिंबीर पण मस्त लागते...
उदा. काकडी + कांदा + कोथिंबीर
कांदा + tomato + कोथिंबीर
सातु च्या पीठाची खीर पण खुप
सातु च्या पीठाची खीर पण खुप हलकी असते. रात्री च्या जेवणा ऐवजी घेतली तर छान वजन कमी होते.
गोडासाठी मध घालु शकता.
कुची कशी बनवतात ही खीर?
कुची कशी बनवतात ही खीर?
चविष्ट ओटमील : (एका
चविष्ट ओटमील : (एका व्यक्तीकरता)
थोड्या तेलात मोहरी, हिंग, लाल मिर्ची, हिरवी मिर्ची बारीक चिरून आणि कढिपत्ता घालून फोडणी करावी. दोन्-तीन टेबलस्पून ओटमील घालून जरा परतून घ्याव आणि दोन ग्लास पाणी घालावं. मीठ घालून शिजू द्यावं. मधून मधून जरा हलवावं लागतं. पाच मिनिटात पाणी कमी होतं. मग हवं तितकं दही आणि कापलेली ताजी कोथिंबीर घालून एक छोटीशी वाफ येऊ द्यावी. गरमागरम खायला मस्तच लागतं.
ज्यांना ब्लॅंड फूड आवडतं त्यांना खूपच आवडेल. नाहीतर लसणाची चटणी घालून खावं.
माझी लसणाची चटणी : भाजलेले बिनपॉलिशचे पांढरे तीळ अर्धा वाटी, एक वाटी भाजलेल्या आळशीच्या बिया, एक वाटी किंवा हवे तसे आक्रोड. हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यावे. मग त्यात हव्या तितक्या लसूण पाकळ्या, मीठ आणि लाल तिखट घालून पुन्हा बारीक करावे. अतिशय खमंग आणि पौष्टिक.
एक वाटी भाजलेल्या आळशीच्या
एक वाटी भाजलेल्या आळशीच्या बिया>> मामी, आळशीच्या बिया म्हणजे??
थँक्स, मामी. पॉरीज खावुन
थँक्स, मामी. पॉरीज खावुन खावुन नॉशिया आला होता मला. आता alternate दिवशी पॉरिज आणि तुझी रेसिपी असं करेन.
चिऊ, मायबोलीवर सगळ्यात जास्त
चिऊ, मायबोलीवर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे हा. त्यामुळे त्यावर बरीच चर्चा झाली आहे.
इथे बघ:
http://www.maayboli.com/node/21003
आणि इथेही बाफला नाव नसले तरी बघ :
http://www.maayboli.com/node/9103
मनिमाऊ, हे इतकं छान लागतं की
मनिमाऊ, हे इतकं छान लागतं की रोजसुध्दा खाऊ शकशील.
चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द
चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द एकत्र येतील असं कधी वाटल नव्हतं. आता तुमच्या रेसेपीने ओटमील करुन पहाते.
धन्स मामी, बघते.
धन्स मामी, बघते.
@ मामी - धन्यवाद ! अत्तिशय
@ मामी - धन्यवाद ! अत्तिशय चविष्ट ओटमील ! दही घालुन तर फार्रच मस्स्त लागतं !
मामी, छान रेसिपी आहे तिखट ओट
मामी,
छान रेसिपी आहे तिखट ओट मील ची, करुन बघीन :).
मी ही करुन बघेन. एरवी खाववत
मी ही करुन बघेन. एरवी खाववत नाही तब्येतीला चांगलं असलं तरी.
मामी, एक पप्पी तुला. अगं काय
मामी, एक पप्पी तुला. अगं काय यम्मी लागलं ते तिखट ओटमिल. पॉरिज खावुन जीव कंटाळला होता ( कारण रोजचं डिनर ओटस असतं माझं). एकदम आयुष्यात रस निर्माण झाला माझ्या नाही तर फारच अऴणी, बेचव झालं होतं. बरं करायलाही अगदी सोप्पं. पॉरिजको बाय बाय आता. रोजच तुझी रेसिपी. थँक्स.
चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द
चविष्ट ओटमील >> हे दोन शब्द एकत्र येतील असं कधी वाटल नव्हतं. >>> स्वाती, अगदी अगदी. पण ही मामीची रेसिपी भारी जमली.
धन्यवाद मनिमाऊ आणि इतर. मीही
धन्यवाद मनिमाऊ आणि इतर. मीही आता तेच खात खात वाचत आहे. जरा हिंग, दही, कोथिंबीर इ. जास्त घातलं ना की मस्तच होते. फोडणीत डायरेक्ट दहीमिश्रीत पाणी घालून उकळी आल्यावर त्यात ओटमील घालून आणि मग जरा घट्ट झाल्यावर वाफ दिली तरी चालतं. पॉरीज कन्सिस्टन्सी ठेवा, नाहीतर उपम्यासारखं घट्ट करा ..... चॉईस आहे.
मी दिलेल्या पध्दतीनं लसणाची चटणी केलीस की नाही?
चटणी नाही गं केली. काल फार
चटणी नाही गं केली. काल फार घाई झाली होती नविन टेस्टची. आता शनिवार्-रविवार सुट्टी तेव्हा बघते करुन.
Pages