Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 06:24
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
येत असावा महान कंटाळा,
किंवा असावी सर्दी तिला!
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'कॉफी' उडून जाता
असेल टाकला चहा
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
किरणांनी भाजले का
सूर्याच्या तिला?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दीर्घाचा र्हस्व होता...
का राग राग करते?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खावी बिस्कीटे कशी?
- प्रश्न पडला तिला
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दुष्ट 'तो' असावा
त्या भ्रमरापरी
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
असेल का वृत्ती,
'सनातन' फार त्याची?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कढईत जळाले तिच्या,
मासे कोळशापरी
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'काणे' करुन डोळे
का बघते गझलेकडे?
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दिली असावी कदाचित
'आत' वर्दी कुणी!!
गुलमोहर:
शेअर करा
जौदे..............ती नाही येत
जौदे..............ती नाही येत तर तु बघु नकोस वर खिडकी कडे,,,,, >>> असं कसं उदय? एखादवेळेला चुकून आलीच, तर त्याने वर नाही पाहिलं म्हणून नाराज होऊन कायमची खिडकीत येऊन टाटा करायची बंद होईल ना?
कविता चांगली आहे.
कविता चांगली आहे.
(No subject)
नीट जमलयं तुला काटा
नीट जमलयं तुला काटा काढायला..!
अपनी अपनी सोच >> आपला
अपनी अपनी सोच >>
आपला खराखुरा "काहीच्याकाही टीपी" चाललाय. >> अगदी
उदय
उदय
मंदार सिक्सर ठोक्लास
मंदार सिक्सर ठोक्लास एकदम....प्रतिसाद तर भन्नाट आहेत..खरच कैच्याकै
खरेच महान काव्य. "सुदर लिहिले
खरेच महान काव्य. "सुदर लिहिले आहेस, पन टाटा कराला "ती"न आल्याने वैट वाटुन घेहु नए, ......आंSSSSSSSच्छी....."
(No subject)
'वृत्तात' राम नाही का वाटले
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला? >>> इथे 'वृत्तीत' असं वाचायचं का रे भाऊ ????
गझलेला घाबरली असेल.
गझलेला घाबरली असेल.
कौतुक
कौतुक
टाटा !
टाटा !
>>>> खिडकीत येत नाही टाटा
>>>> खिडकीत येत नाही टाटा करायला ती <<<


शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो........ हेऽऽ भगवाऽऽन!
सहज गम्मत म्हणूनः का खिडकीत
सहज गम्मत म्हणूनः
का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की तापला तवा, उरपते करपली पोळी ती ||
का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की जाई दूध उतू, उतरवी घाईघाई ती ||
का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
अवचित बाळ भोकाड पसरे, उरी धरे ती ||
का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की विरघळून गेली, काजळ अंधारात ती ||
का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
मी डोकावे खिडकीत, माझेच मन रिते पाही ||
वाह! लिंबूकाका, वाह!!
वाह! लिंबूकाका, वाह!! स्वतंत्र कविता म्हणून टाका की
>>> स्वतंत्र कविता म्हणून
>>> स्वतंत्र कविता म्हणून टाका की <<< ह्ह्याऽऽ, स्वतंत्र का? झब्बू आहे तो! इथेच बराहे
(पण, माझ्यामते शेवटची दोन कडवी महत्वाची आहेत, शेवटचे कडवे आधी सुचले, म्हणून मग बाकी कडवी रचली)
हा बीबी पण बन्द झाला का ?
हा बीबी पण बन्द झाला का ?
लिंबूकाका, चालू आहे की
लिंबूकाका, चालू आहे की
मस्त! My addition: खिडकीत येत
मस्त!
My addition:
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कारण दिसशील तू
रोज काय म्हणायचे , ok see you!!
बहुतेक समजले.. १-२
बहुतेक समजले.. १-२ सोडून..
आमचा अभ्यास कमी पडतो ना...
(No subject)
सेनापती
सेनापती
खिडकीत येत नाही टाटा करायला
खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कारण दिसशील तू
रोज काय म्हणायचे , ok see you!!>>>>>>>>>>>>
मलाही असच वाटलं होतं.
(No subject)
Pages