खिडकीत येत नाही टाटा करायला ती

Submitted by मंदार-जोशी on 25 January, 2012 - 06:24

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
येत असावा महान कंटाळा,
किंवा असावी सर्दी तिला!

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'कॉफी' उडून जाता
असेल टाकला चहा

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
किरणांनी भाजले का
सूर्याच्या तिला?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दीर्घाचा र्‍हस्व होता...
का राग राग करते?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
खावी बिस्कीटे कशी?
- प्रश्न पडला तिला

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दुष्ट 'तो' असावा
त्या भ्रमरापरी

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
असेल का वृत्ती,
'सनातन' फार त्याची?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'वृत्तात' राम नाही
का वाटले तिला?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कढईत जळाले तिच्या,
मासे कोळशापरी

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
'काणे' करुन डोळे
का बघते गझलेकडे?

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
दिली असावी कदाचित
'आत' वर्दी कुणी!!

शब्दखुणा: 

जौदे..............ती नाही येत तर तु बघु नकोस वर खिडकी कडे,,,,, >>> असं कसं उदय? एखादवेळेला चुकून आलीच, तर त्याने वर नाही पाहिलं म्हणून नाराज होऊन कायमची खिडकीत येऊन टाटा करायची बंद होईल ना? Biggrin

Proud

उदय Rofl

टाटा !

>>>> खिडकीत येत नाही टाटा करायला ती <<< Lol Lol Lol
शाम ढले खिडकी तले, तुम सिटी बजाना छोड दो........ हेऽऽ भगवाऽऽन! Proud

सहज गम्मत म्हणूनः

का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की तापला तवा, उरपते करपली पोळी ती ||

का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की जाई दूध उतू, उतरवी घाईघाई ती ||

का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
अवचित बाळ भोकाड पसरे, उरी धरे ती ||

का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
की विरघळून गेली, काजळ अंधारात ती ||

का खिडकीत आली नाही, टाटा करायला ती
मी डोकावे खिडकीत, माझेच मन रिते पाही ||

>>> स्वतंत्र कविता म्हणून टाका की <<< ह्ह्याऽऽ, स्वतंत्र का? झब्बू आहे तो! इथेच बराहे Proud
(पण, माझ्यामते शेवटची दोन कडवी महत्वाची आहेत, शेवटचे कडवे आधी सुचले, म्हणून मग बाकी कडवी रचली)

मस्त!
My addition:

खिडकीत येत नाही टाटा करायला ती
कारण दिसशील तू
रोज काय म्हणायचे , ok see you!!

Pages