Submitted by pradyumnasantu on 29 January, 2012 - 13:18
माझा मुलगा, इतका प्रेमळ
तुलना श्रावणबाळाशीच केवळ
*
दृष्टी त्याची तेज अशी
दुर्बिण फिकी पडणार
देखणेपणा असा जसा
मदन फिका ठरणार
बुद्धीमान तो असा असे
बृहस्पती हरणार
मैत्री करतो ऐसी की
मैत्रिण सारी चाळ
माझा मुलगा, इतका प्रेमळ
तुलना श्रावणबाळ
*
"माफी" रसिकहो मी चुकलो
सत-असत मिसळुन बसलो
मुलगा माझा अंध असे
शिकण्याचा तर गंध नसे
कुरूप जरी तो असला तरीही
हृदयी कोमलताच वसे
फणसापरी आतून रसाळ
माझा मुलगा, इतका प्रेमळ
तुलना श्रावणबाळ
*
"माफी" रसिकहो मी चुकलो
खोटे ते सांगुन बसलो
मुलगा माझा शिकलेला
डोळस तो व्यवहाराला
कालच मजला सोडुनीया
परदेशी निघुनी गेला
माझ्याऐवजी डॉलरचा
करील तिथे सांभाळ
माझा मुलगा, इतका प्रेमळ
तुलना श्रावणबाळ
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
बापाची व्यथा, नेहमीच्या
बापाची व्यथा, नेहमीच्या झिजलेल्या शब्दांना टाळून वेगळ्या शब्दात पण तितक्याच आर्ततेने मांडलीत तुम्ही प्रद्युम्न. खूप छान वाटली कविता.
अभिनंदन, असा मुलगा नसला तर आणि सहानुभूती, असा मुलगा असला तर.
एम्.कर्णिकः प्रतिसादाबद्दल
एम्.कर्णिकः
प्रतिसादाबद्दल हार्दीक आभार, पण आपण सहानुभूतीचे हक्कदार नाही.
(No subject)
प्रदुम्न, अप्रतिम कविता.खूप
प्रदुम्न, अप्रतिम कविता.खूप सुंदर व मोठा आशय व्यक्त झाला आहेँ,शुभेच्छा!
पंकज2284: आपला अतिशय आभारी
पंकज2284:
आपला अतिशय आभारी आहे. असाच लोभ ठेवा.
चंबू: मनःपूर्वक आभार. असाच
चंबू: मनःपूर्वक आभार. असाच लोभ ठेवावा.
कविता सुंदर आहे
कविता सुंदर आहे प्रद्युम्नजी...
प्रद्युम्नजी काही
प्रद्युम्नजी काही चुकल्यासारखे वाटते का?
पण आपण सहानुभूतीचे हक्कदार नाही>>>>(!)...(?)
>>माझ्याऐवजी डॉलरचा
करील तिथे सांभाळ>>>>अरेरे
वेगळा विषय आवडाली.
विभाग्रजजी: श्री एम.
विभाग्रजजी: श्री एम. कर्णिक सहानुभूतीचे हक्कदार नाहीत याचे कारण पुढीलप्रमाणे: मला बेजबाबदार मुलगा असता तर सहानुभूती शक्य होती. मला मुळात मुलगाच नाही. एकुलती एक मुलगी आहे. दुसरे म्हणजे सह-अनुभूती घेण्यासाठी त्यांचा मुलगातरी तसा असणे जरूरी होते. पण त्यांची मुले अतिशय प्रेमळ व जबाबदार आहेत.अशा परिस्थितीत ते सहानुभूतीचे हक्कदार कसे होऊ शकतील?
प्रतिसादाबद्दल अत्यंत आभारी आहे.
Have a nice day !
छान कविता.
छान कविता.
kiranyake: आपल्या दिलदार
kiranyake: आपल्या दिलदार प्रतिक्रिया आवडतात. त्यांचा मी मनःपूर्वक सन्मान करतो.
फालकोरः आपला प्रतिसाद नसेल तर
फालकोरः आपला प्रतिसाद नसेल तर माझी कविता अपूरी. आभार.
सुंदर कविता.....आवडली..
सुंदर कविता.....आवडली..
दीपकजी धन्यवाद
दीपकजी धन्यवाद