Submitted by Adm on 10 January, 2012 - 13:40
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.
ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जोको डिड इट!
जोको डिड इट!
मरेला मी एवढं चांगलं खेळताना
मरेला मी एवढं चांगलं खेळताना आज पहिल्यांदा पाहिलं. सिक्रेट ड्रिंकचा परीणाम दिसतोय.
चाललं असतं तो जिंकला असता तर. डिजर्विंग ... जोकोविच ढेपाळला होता आज. नशीब ...
पण ...
जोकोविच .
मॅच सही झाली.. चवथ्या सेट
मॅच सही झाली.. चवथ्या सेट मध्ये मरे एकदम ढेपाळला त्यामुळे ५ वा सेट पण तसाच होतो की काय असे वाटत होते आणि झाले पण होते पण मरेनी परत चांगली लढत देऊन ५-५ केले पण शेवटला परत ढेपाळलाच...
गो मरे!! मरेने आज बरेच फॅन
गो मरे!! मरेने आज बरेच फॅन मिळवले बरं का.
विजि, मागची एक राफाबरोबरची सेमि होती त्यात पहिला सेट घेतला तेव्हा मरे उत्तम खेळला होता. म्हणजे तो कसा खेळू शकतो हे मला तेव्हा कळलं पण त्या मॅचमध्ये नंतर ढेपाळला.. आजचा अॅटिट्यूड आवडला. लूजर सारखा खेळला नाही. शेवटच्या सेटमधे जोको वॉज सर्विन्ग फॉर द मॅच तेव्हा. ती ब्रेक केली. पूर्वीच्या मरेने सोडली असती.
गो मरे, गो लेंडल.
हिकु.४ था सेट सोडला मरेने. २ ब्रेक झाल्यानंतर कुठे वाचवत बसा.
कालचे दोन लोक वयस्क झालेत असं वाटत होतं आजचा खेळ बघून तसं अजूनच वाटतंय.
कॅनी.. तसा जर तो सेट सोडला
कॅनी.. तसा जर तो सेट सोडला असेल तर ती चूक म्हणावी लागेल... हे म्हणजे अगदीच वाईट.. प्रयत्न न करण्यापेक्षा प्रयत्न केला असता तर वेगळे घडू शकले असते... शेवटच्या सेट मध्ये सुद्धा तो ५-२ ने मागे होताच की.. आधीच्या सेट मध्येच प्रयत्न केला असता तर त्याचे जिंकण्याचे चान्सेस नक्कीच वाढले असते... काही झाले तरी लढाई न करता शस्त्र खाली ठेवण्यात काहीच अर्थ नाही..
अरे देवा. स्ट्रॅटेजी असते
अरे देवा.

स्ट्रॅटेजी असते ती!
तिसरा सेट एवढा जोरात झाल्यावर पुढचा असा होऊ शकतो. तो गेलेला परत आणण्यात अजून एनर्जी घालवा आणि त्यामुळे त्याच्याही पुढच्यावर परिणाम होणार. मला मरेची काही चूक दिसत नाही. ५ वा सेट असतोच की. त्याच्या प्लॅनप्रमाणे त्याने पुन्हा जोरात सुरुवात केली.
बायकाही कधी कधी दुसरा सेट असा सोडतात. खूप पूर्वी स्टेफीने सोडलेला असा ६-०. मग पुढचा घेतला. इथे मरेला नाही घेता आला म्हणून आधी केली ती चूक होती असं मला वाटत नाही.
कळ्ळ?
आणि मग ५ व्यात पण दोन
आणि मग ५ व्यात पण दोन सर्व्हिस सलग ब्रेक झाल्या की लगेच तो ही सेट सोडून द्यायचा...
स्ट्रॅटेजी असते ते माहितीये मला पण ती थोडीशी अवसान घातकी ठरू शकते... समोरचा जर खेळाडू १६ सीड नाहीतर २४ सीडच्या पुढचा वगैरे असेल तर असला प्लॅन ठिक आहे.. पण जोकोच्या विरुद्ध ही स्ट्रॅटेजी.. फारसं काही पचत नाहीये..
खूप पूर्वी स्टेफीने सोडलेला
खूप पूर्वी स्टेफीने सोडलेला असा ६-०. मग पुढचा घेतला. >>>> निषेध... स्टेफीने तो सोडला नव्हता..! मोनिका सेलेसने जोरदार खेळून जिंकला होता.. कळ्ळं ?
आणि मग ५ व्यात पण दोन सर्व्हिस सलग ब्रेक झाल्या की लगेच तो ही सेट सोडून द्यायचा... >>> हिम्या ह्यात काही लॉजिक आहे का?? पाचव्यासेट मध्ये सोडासोडी करता येणं शक्य नसतं की.. चौथ्याबाबात लालू म्हणत्ये ती शक्यता असू शकते..
हिम्या, पहिले वाक्य विनोदी
हिम्या, पहिले वाक्य विनोदी (चेष्टेने लिहिलं) आहे ना?
एकदा मॅच पाचव्या सेटमध्ये पोचल्यावर तेवढा एकच सेट जिंकायचा असतो.
तिथे तुमचा खेळ उंचावायचा. मग समोर कोणीही असो. उलट जोको आहे म्हणूनच ही स्ट्रॅटेजी. तो सहज देईल का पुढचा सेट? तिसर्या सेट नंतरच पाच सेट होतील हे जवळपास पक्कं होतं.
पग्या, माझ्या मते ती मॅच
पग्या, माझ्या मते ती मॅच सेलेसबरोबर नव्हती. ही अजून एक असेल. त्यावेळी अशीच कोणीतरी होती, मोठी खेळाडू नव्हती. म्हणूनच मला तेव्हा आश्चर्य वाटलेलं.
मी म्हणतोय ती युएस ओपन फायनल
मी म्हणतोय ती युएस ओपन फायनल होती. सेलेसच्या पुनरागमनानंतरची.
नाही, मग ही ती नव्हे, कारण ती
नाही, मग ही ती नव्हे, कारण ती फायनलही नव्हती.
अवांतर- -मरे पीत होता ते
अवांतर-
-मरे पीत होता ते बाटलीत फिक्या पिवळ्या रंगाचे पेय काय होते?
लेंडलने बनवले वाटतं आणि त्यात ट्यूबमधून काहीतरी थेंब टाकून दिले.
- जोको कंपूतली ती लाल ड्रेसमधली मुलगी सारखी उभी रहात होती, तिला 'खाली बस!' असे म्हणावे वाटत होते.
- लोक फार हुल्लडबाजी करत होते.
- नेट लेवलचा एक कॅमेरा एका एन्डला होता त्याने गेम चालू असताना कशाला दाखवतात? 'कलात्मक' वगैरे वाटते की काय ते!??
जोको कंपूतली ती लाल ड्रेसमधली
जोको कंपूतली ती लाल ड्रेसमधली मुलगी सारखी उभी रहात होती, तिला 'खाली बस!' असे म्हणावे वाटत होते.>>गप्पे !
मजा आली आज बघताना. मरे संपला वाटता वाटता जोको वॉज सर्विन्ग फॉर द मॅच असताना मजा करुन गेला.
Aus Open मधे एक त्रास असतो,
Aus Open मधे एक त्रास असतो, शूज स्किड होतात त्याचा आवाज भारी irritating असतो. suppress नाहि करता येत का ?
नेट लेवलचा एक कॅमेरा एका
नेट लेवलचा एक कॅमेरा एका एन्डला होता त्याने गेम चालू असताना कशाला दाखवतात? 'कलात्मक' वगैरे वाटते की काय ते!? >>>>>>>>> अगदी अगदी !!! गेम चालू असताना त्या कॅमेर्यातून दाखवणार्यांना फटके दिले पाहिजेत.. काही धड दिसत नाही !! त्रास नुसता..
लाल ड्रेसमधली मुलगी >>> ती त्याची गर्लफ्रेंड आहे बहूतेक.. मागे कुठेतरी त्या दोघांचे फोटो आले होते पार्टीतले.
बदलली वाटतं आधीची चांगली
बदलली वाटतं
आधीची चांगली होती की.
अटीतटीची झालेली दिसते मॅच
अटीतटीची झालेली दिसते मॅच ..
ज्योकोने भरपूर विश्रांती घेऊन सज्ज रहावं उद्याकरता . शुभेच्छा! गो ज्योको!
गो राफा!!
गो राफा!!
अवांतर उत्तरे- -मरे पीत होता
अवांतर उत्तरे-
-मरे पीत होता ते बाटलीत फिक्या पिवळ्या रंगाचे पेय काय होते? फिदीफिदी लेंडलने बनवले वाटतं आणि त्यात ट्यूबमधून काहीतरी थेंब टाकून दिले.>>> ते लेंडलाच माहिती.. लेंडल पण अधून मधून काहीतरी पित होता पण त्याचा रंग पांढरा होता..
- जोको कंपूतली ती लाल ड्रेसमधली मुलगी सारखी उभी रहात होती, तिला 'खाली बस!' असे म्हणावे वाटत होते.>>> ती जोकोची गर्लफ्रेंड आहे.. AUS Open ची साईट बघा की.. प्लेअर्सच्या टॉप टेन गर्लफ्रेंडसचे फोटू आहेत
- लोक फार हुल्लडबाजी करत होते. >>> अगदी भारतात मॅच चालू असल्यासारखं वाटत होतं नाही..
- नेट लेवलचा एक कॅमेरा एका एन्डला होता त्याने गेम चालू असताना कशाला दाखवतात? 'कलात्मक' वगैरे वाटते की काय ते!?? >>> बघणार्यांना ते स्वतः खेळत आहेत असा फिल द्यायचा प्लॅन दिसतोय....
एकूण मॅच मध्ये रॅलीज जबरी झाल्या.. मध्ये कधीतरी दाखवत होते.. दोघे जण एकूण पळाले ते.. जोको ४.८ किमी आणि त्याच वेळेस मरे ५.२ किमी...
मॅच चांगली झाली. मरे हरला.
मॅच चांगली झाली. मरे हरला.
खरंतर जोको दुसर्या सेटमध्येच इतका कसं काय थकला? फेडररसुद्धा इतक्या लवकर थकत नाही. त्या सेटमध्ये तो सुरूवातीला २-० ने पुढे होता. तो सेट त्याने जिंकला असता तर मरे नेहमीप्रमाणे तीन सेटमध्ये हरला असता.
पण जोको दुसरा सेट हरला आणि तिसरा सेट टायब्रेकरमध्ये गेला, त्यामुळे सामना लांबला. चौथ्या सेटमध्ये जोको जसा खेळला तसा दुसर्या सेटमध्ये खेळला असता तर जरा लवकर संपला असता सामना. शेवटी मरेने थोडा प्रयत्न केला, पण एवढा काही उपयोग नव्हता.
बाकी दोघं नेहमीप्रमाणेच खेळले. मरे काही फार वेगळं भारी खेळला असं वाटलं नाही. फक्त सर्व्हिस त्याने जोकोपेक्षा जरा जास्त चांगली केली. जोकोची फर्स्ट सर्व्ह नीट पडत नव्हती. आणि फेडररने मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे लेंडलचा प्रभाव इतक्यात कसा दिसेल? आत्ता तर सुरूवात केलीये. त्याला वेळ लागतो. त्यामुळे त्याला क्रेडिट देण्यात काही हशील नाही.
सगळीकडे मरेविषयी सांत्वनपर कॉमेन्ट्स वाचून कंटाळा आला. तरी बरं ही फायनल नव्हती, सेमीफायनलच होती. आता नदालविरूद्धची मॅच जरा जड जाईल जोकोला असं वाटतंय. नद्दू काय पॉइन्ट्स सोडत नाही. तो जोकोला पळवणार.
दुहेरीचे सामने मस्त ड्रॅमॅटिक
दुहेरीचे सामने मस्त ड्रॅमॅटिक असतात आणि पेस असला की मेलोड्रॅमाही असतो!
पहिल्या ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी विजेतेपदाबद्दल, आणि पुरुष दुहेरीच्या करिअर स्लॅमसाठी पेसचे अभिनंदन.
पहिल्या सेटच्या टायब्रेकरपासूनच सामना पाहिला आणि पेस-स्टेपनेक मिशन डिमॉलिशन असल्यासारखे खेळले. मझा आया. मार्टिना आवर्जून हजर .
लेडिज फायनल्सचा स्कोर ६-३,६-०? मारियाने पुढच्या स्लॅमसाठी सोडला का दुसरा सेट
व्हिक्टोरिया अझारेंकाच्या रूपाने महिलांमध्ये बर्याच कालावधीनंतर ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी खेळाडू प्रथम मानांकन पटकावेल.
गो राफा!!! लाइन्समन भयानक काम
गो राफा!!!
लाइन्समन भयानक काम करत आहेत. हाकलले पाहिजे सर्वांना.
काय करणार बिचारे. कंटाळले
काय करणार बिचारे. कंटाळले असतील. परत ओव्हरटाईम मिळेल की नाही माहीत नाही. दोघांनी बॉल आपटाआपटी/तोंडपुसने जरा कमी केले तर लवकर संपेल मॅच..

नात्या, हे फक्त आजचे नाही,
नात्या, हे फक्त आजचे नाही, सगळ्या स्पर्धेभर असेच चालू होते.
जोकोविच .
जोकोविच .
जिंकला रे जिंकला जोको
जिंकला रे जिंकला जोको जिंकला!!!!
लाइन्समन भयानक काम करत आहेत.
लाइन्समन भयानक काम करत आहेत. हाकलले पाहिजे सर्वांना. >>> अगदी अगदी !!
लाई भारी मॅच ! पहिला, चौथा आणि पाचवा सेट अत्यंत भारी.. दुसराही ठिक.. तिसरा भयंकर !
नदालने सर्व्हिस चांगली केली ते सेट चांगले झाले. पाचव्या सेटमधला चुकलेला फोरहँड व्हॉली टर्निंग पॉईंट ठरला.. काही काही रॅलीज अत्यंत म्हणजे अत्यंत भारी झाल्या !!! मला टेन्शन येत होतं कितीवेळा..
व्वा!! काय मॅच झाली!!
व्वा!! काय मॅच झाली!! ब्राव्हो जोको ,ब्राव्हो नदाल!!
चौथाच मला सर्वात आवडला.
चौथाच मला सर्वात आवडला. पाचव्यात मिळालेला ब्रेक राफाने घालवला ते पुढे महागात पडले.
Pages