ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 10 January, 2012 - 13:40

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.

ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर मॅच. सस्पेन्स थ्रिलर सिनेमांसारखं अक्षरशः शेवटपर्यंत काय होईल सांगता येत नव्हतं. दोघांनी भारी फाईट दिली आणि दोघांचा फिटनेस अविश्वसनीय होता. पण नदालसारख्या खेळाडूला शारिरीक क्षमतेमध्येसुद्धा पुरून उरणे हे केवळ असामान्य आहे. जोकोविचचे ह्याबाबतीत फार कौतुक वाटले.

चौथा आणि पाचवा सेट महान होते खरंच. चौथ्यामध्ये नदालने जोकोच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतला, आणि पाचव्यात जोकोने नदालच्या.

नदालने सर्व्हिस खरंच चांगली केली. त्याला त्याचा पुष्कळ फायदा झाला. जोकोची फर्स्ट सर्व्ह पार गंडलेली होती. अगदी ५०% पर्यंत आली होती. पण विरोधाभास म्हणजे एवढी चांगली सर्व्हिस करूनसुद्धा जोकोला ब्रेक च्या संध्या जास्त मिळाल्या. शेवटचा आकडा काय होता माहित नाही, पण मध्ये कधीतरी जोको २/८ होता आणि नदाल १/३ होता.

टेनिस मुळातच एक सुंदर खेळ आहे, आणि उत्तरोत्तर ह्या खेळाला एकाहून एक उत्कृष्ट खेळाडू लाभतायेत. असे सामने पाहिल्यावर आपण टेनिसचाहते आहोत ह्याचा आनंद वाटतो. Happy

अतिप्रचंड अशक्य भयानक फॅन्टेस्टींग मॅच.
जोको खेळ डॉमिनेट करत होता. कन्वर्ट करत नव्हता. २१पैकी ६ ब्रेक पॉईंट जिंकले.
शेवटी दमल्यामुले नो मिस टेनिस खेलायला लागल्यावर अनफोर्स्ड एरर्स कमी झाल्या.

तुफान मॅच.

Pages