'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही तिसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.
समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.
मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.
बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.
आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे.
या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
तुम्हांला सर्वांना शुभेच्छा.
बहुदा याचं उत्तंर 'राईट टू
बहुदा याचं उत्तंर 'राईट टू एड्युकेशन' हेच असावं.
चित्र एक - ६ ते १४ वयोगट ६ ते १६ नाही.
चित्र दोन - रिपब्लीक ऑफ चिनच्या झेंड्याचा रंग लाल. त्यांच्या सुधारीत कायद्यांमधे राईट टू एड्युकेशनचा समावेश. तुर्की मधे कुर्दिश पार्टीने आपल्या मातृभाषेमधे राईट टू एड्युकेशनच्या कायद्याची मागणी केली पण ती धुडकावून लावली तेव्हा २४ जणांचा मृत्युही झाला. म्हणजे दोन्ही कडे उठाव, चळवळ, गोळीबार - रक्त - त्यामुळे लाल असावा बहुतेक.
चित्र तीन - हिमाचल प्रदेश ( प्रायमरी एड्युकेशन अॅक्ट ) १९५३.
चित्र चार - दिल्ली दरबार (मुघल दरबार ) coronation darbar जिथे पंचम जॉर्ज यांनी भारताच्या शैक्षणिक धोरणांविषयी जाणून घेतलं होतं. धर्मशाळा, आश्रमशाळा हे सुद्धा राईट टू एड्युकेशनच्या अंतर्गतच येतं ना?
RTE RTE हेच उत्तंर असावं.
सर्व चित्रांना एकत्र
सर्व चित्रांना एकत्र गुंफणार्या, एकत्रित अशा उत्तराची अपेक्षा पूर्ण झालेली नसली, तरी काही मायबोलीकरांनी किल्ला लढवून आणत 'एकत्रितपणे' उत्तर देऊन टाकलं आहे.
प्राची, आशूडी, बिल्वा, सीमा यांना संयुक्तरीत्या विजेते घोषित करत आहोत. यांना 'जन गण मन' हा चित्रपट इंटरनेटवर बघण्यासाठी 'मुंडू'चं सबस्क्रिप्शन देत आहोत. या विजेत्यांना 'मुंडू'च्या सबस्क्रिप्शनच्या ऐवजी २६ जानेवारी २०१२ रोजी पुण्यात होणार्या 'जन गण मन'च्या प्रिमियरचाही पर्याय आहे. विजेत्यांनी कृपया आपली निवड 'माध्यम_प्रायोजक' यांना त्यांच्या संपर्कातून कळवावी.
चारही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच HH यांचेही यशस्वी प्रयत्नाबद्दल अभिनंदन.
---
कोड्याचे उत्तर -
भारत सरकारचा 'शिक्षणहक्क कायदा' (Right to Education Act Or Right of Children to Free and Compulsory Education Act) या कायद्याद्वारे भारतातील ६-१४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
१. या कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे ८६वी घटनादुरूस्ती होय. सरकारने २००२ साली राज्यघटनेची ८६वी दुरूस्ती (amendment, correction) करून शिक्षण हा मूलभूत हक्क केला आहे. याआधी भारतीय नागरिकास ६ मूलभूत हक्क होते, त्यात अधिक एक शिक्षणाचा हक्क. इंग्रजी बोलीभाषेत (slang) एटीसिक्स हा आकडा क्रियापद म्हणूनसुद्धा येतो. 'टु एटीसिक्स (to eighty-six) याचा अर्थ 'एखादी गोष्ट काढून टाकणे' असा आहे. त्याअर्थाने पाहता, आपण ८६व्या दुरूस्तीद्वारे गोष्ट (मूलभूत हक्क) काढून न टाकता उलट एकाने वाढवली आहे. म्हणून ६ + १ हे 'नॉट टु एटीसिक्स'.
२. डावीकडे चीनचा झेंडा, मध्ये 'सर्व शिक्षा अभियाना'चे बोधचिन्ह व उजवीकडे तुर्कस्तानाचा झेंडा. सर्वशिक्षा अभियान हे RTE चे एक फलस्वरूप. प्राथमिक शिक्षणाचे (६-१४ वर्षे वयोगट) सार्वत्रिकीकरण करणे हे अभियानाचे एक ध्येय. या वयोगटातील मुलांचे शिक्षण मोफत व सक्तीचे करणारा कायदा चीन व तुर्कस्तान या देशांमध्येही आढळतो.
३. घटना कलम २१(अ). ८६व्या दुरूस्तीद्वारे राज्यघटनेत २१(अ) हे जास्तीचे कलम घालण्यात आले. याच कलमानुसार शिक्षण हा घटनासिद्ध मूलभूत हक्क झाला आहे. चित्रात दाखवलेली बाग व कोपर्यात औरंगजेबाचे चित्र. म्हणजे मुघलकालीन शाही बाग ('मुघल गार्डन्स'). बाण दाखवतोय ते अक्षांश व रेखांश 'स्वरघाट' या गावाचे. बाण बागेतील रस्त्यावरून काढला आहे. म्हणजे 'कुठलेतरी मुघल गार्डन ते स्वरघाट' हा 'शाही' रस्ता. म्हणजेच महामार्ग. स्वरघाट हे 'राष्ट्रीय महामार्ग २१अ'चे एक टोक. दुसरे टोक 'पिंजोर' या गावी, जिथे एक प्रसिद्ध मुघल बाग आहे.
---
या स्पर्धेतल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
लागला का एकदाचा निकाल.
लागला का एकदाचा निकाल. अभिनंदन प्राची, आशूडी, बिल्वा आणि सीमा
प्राची, आशूडी, बिल्वा आणि
प्राची, आशूडी, बिल्वा आणि सीमा यांचं अभिनंदन
अभिनंदन प्राची, आशूडी, बिल्वा
अभिनंदन प्राची, आशूडी, बिल्वा आणि सीमा
वॉव! धन्यवाद माध्यम प्रायोजक!
वॉव! धन्यवाद माध्यम प्रायोजक! प्राची, सीमा, बिल्वा अभिनंदन तुमचे! हह, तू ही चिकाटीने प्रयत्न केलेस, तुझीही मदतच झाली.
अरे वा या स्पर्धेतल्या भरघोस
अरे वा
या स्पर्धेतल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. >>>> आम्हांलाही छान वाटलं या उपक्रमात भाग घेऊन. धन्यवाद माप्रा!
आशू, सीमा आणि बिल्वा यांचेही अभिनंदन.
वा वा वा, अभिनंदन. त्या
वा वा वा, अभिनंदन. त्या आस्चिग वगैरेचे पण खरंतर अभिनंदन करायला हवे. काय काय डोकी लढवली होती.
अभिनन्दन काय डोकी लढवली होती
अभिनन्दन काय डोकी लढवली होती एकेकीने
विजेत्यांचे आणि हह चे (आणि
विजेत्यांचे आणि हह चे (आणि इतरांचे) अभिनंदन.
त्या शिक्षण अभियान वाल्यांचेही अभिनंदन.
नंदिनी, नको. प्रत्येक लेयर खाली एक ब्लॅक (डार्क) लॅबिरींथ असते. मी उत्तर पूर्ण नव्हते दिले (म्हणजे त्या चित्रांमधे अजुनही अर्थ दडलेला आहे जो ऑथॉरीटीजना लोकांपर्यंत पोचावा असे वाटत नाही). हा बाफ सुरु राहिलाच तर पूर्ण उत्तर लिहीन कधीतरी (ही धमकी नाही).
प्राची, आशूडी, बिल्वा, सीमा,
प्राची, आशूडी, बिल्वा, सीमा, हह अभिनंदन.
माप्रा, कोडं फारच छान बनवलं होतं.
रच्याकने, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का?
कोडं च्या बरोब्बर उलटं डोकं होतं. म्हणजे हे कोडं उलट्या डोक्याची लोकं 'डिकोड' करू शकतात. डिकोड हा मराठी शब्दही कोडं वरूनच आला आहे असं वाटतय. कोडं सोडवलं की ते डीकोडं केलं.
माध्यम प्रायोजक तुमचे खूप
माध्यम प्रायोजक तुमचे खूप आभार ... आम्हि (विजेते सोडुन) कोड्याचे जे भजे करतो त्याचा तुम्हाला "आन्खो देखा हाल" सहन करावा लागतो ...
विजेत्यांचे अभिनंदन ...
रच्याकने, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का?
कोडं च्या बरोब्बर उलटं डोकं होतं. म्हणजे हे कोडं उलट्या डोक्याची लोकं 'डिकोड' करू शकतात >> अगदि !! ... किंवा डोक्यावर पडलेली लोक . . हिहिहि ...
>>>> रच्याकने, तुमच्या
>>>> रच्याकने, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय का? >>>>>
अजुन एक माझ्या लक्षात आलय, की हे सर्वशिक्षा अभियानाचे कोडे सोडवायला बहुतान्श स्त्रीसभासदच इथे हजेरी लावत होत्या. विजेत्यादेखिल स्त्री सभासदच झाल्या आहेत. इन जनरल तरीही असेच का बरे व्हावे?
कारण उलटं का होईना डोकं असावं
कारण उलटं का होईना डोकं असावं लागतं हो!
मामी
मामी
अभिनंदन प्राची, आशूडी, बिल्वा
अभिनंदन प्राची, आशूडी, बिल्वा आणि सीमा
Pages