माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)
समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.
हे म्हणजे चार ऐवजी आठ क्रेडीटचा कोर्स घेतल्यासारखे झाले. तेव्हा चहाच्या किटल्या वगैरे सगळ्या पाट्या टाकून मग ही काही भांडी केली.
फारच थोडी भांडी भट्टीत तडकली- फुटली नाहीत, रंग चांगले आले ती ही काही जमलेली भांडी.
खाद्य पदार्थ ठेवता यावेत म्हणून या भांड्याना आतून क्रिस्टलाइन ग्लेझेस न वापरता Lead Free, Food safe ग्लेझेस वापरले आहेत. क्रिस्टलाइन ग्लेझचा वापर फक्त बाहेरूनच केला आहे.
Turquoise Crystalline Lidded Jar : (७" बाय ५")
१.
२. Glossy Green Crystalline Lidded Jar (८" बाय ६")
३. Purple Crystalline Lidded Jar (६" बाय ६")
४. Off white Crystalline Lidded Jar (६" बाय ५")
५. Turquoise Crystalline Vases (५")
क्रिस्टलाइन ग्लेझेस म्हणजे नक्की काय, भांड्यांवर ते फुलांसारखे दिसणारे क्रिस्टल्स कसे येतात याबद्दल मागच्या भागात लिहीले होते. त्याचा दुवा माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze.
mast mast !
mast mast !
भीषोण सुंदर !!! सगळीच
भीषोण सुंदर !!! सगळीच मृत्तिकापात्रं अप्रतिम
लै भारी रॉणी कुंभार ! पुढच्या
लै भारी रॉणी कुंभार !
पुढच्या गटगला किमतीच्या चिठ्ठ्या लावून आण बरे या सर्व कलाकृती.
( सँटाच्या करवी पाठवून दे म्हणायचा मोह होतोय )
जबरा!!
जबरा!!
सही आहेस रूनी!! सगळी भांडी
सही आहेस रूनी!! सगळी भांडी आवडली!!
सगळीच सुंदर जमली आहे. चार नं.
सगळीच सुंदर जमली आहे. चार नं. च्या बुटबैंगणीचं झाकण खूप आवडलं.
आई शप्पथ... हे तु
आई शप्पथ... हे तु बनवलस???.... खतरनाक यार!!!!?
सगळ्यांना परत एकदा
सगळ्यांना परत एकदा धन्यवाद.
आपण केलेले काम लोकांना आवडतय हे बघून कामाचा उत्साह वाढतो.
विनार्च - अहो नक्की करून बघा. मी याआधी कधीही कुठल्याचे कलेत कधी गती दाखवली नव्हती. आपल्याला जमेल की नाही हा मुद्दा गौण आहे त्यापेक्षा ते करून मजा येणार असेल तर अजून काय पाहीजे.
@मामी - मृत्तिकापात्र :). धन्यवाद.
@झंपी - या "मृत्तिकापात्रांना" आतून फुड सेफ ग्लेझ दिलेला आहे त्यामुळे ही भांडी खाद्यपदार्थांसाठी वापरता येतील. ते वर लिहायचे विसरुन गेले होते, आता तसे लिहीले आहे.
@.अदिती. - हो बरोबर, मिनोतीचे दिवाळी अंकातले लेख वाचून प्रेरणा मिळाली होती.
@मेधा कुठले भांडे हवय सांग पाठवून देते.
भारतात ज्यांना असे क्लास करुन बघायची इच्छा आहे त्यांनी http://www.justdial.com वर तुमच्या भागातले क्लासेस शोधून बघा.
अमेरीकेत कोणाला करायचे असतील तर आपल्या भागातल्या कम्युनिटी कॉलेजमध्ये तसेच तुमच्या भागात रीक्रिएअशन सेंटर असेल तर तिथे बघा. त्यांचे संध्याकाळी/विकेन्डलापण क्लासेस असतात.
आमच्या इथल्या कम्युनिटी
आमच्या इथल्या कम्युनिटी कॉलेजात sculpture असा कोर्स आहे पण फक्त रात्रीची वेळ आहे. जी मला जमणं कठीण वाटतंय. एक टर्म तरी ट्राय करुन बघायला आवडेल.
सायो वर लिहायचे राहीले की
सायो वर लिहायचे राहीले की कम्युनिटी कॉलेज सोबतच आपापल्या रेक सेंटरला चौकशी करा. तिथेही असे क्लासेस चालतात. ६-८ आठवड्यांचे क्लासेस असतात आणि स्वस्तही असतात.
खास व अप्रतिम प्रयोग.
खास व अप्रतिम प्रयोग.
एकदम जबरदस्त
एकदम जबरदस्त
Sundar ahe sarv...........
Sundar ahe sarv...........
अप्रतिम! किती ते सुंदर रंग,
अप्रतिम!
किती ते सुंदर रंग, आकार!
जीयो!
सुरेख आहेत पात्रं.
सुरेख आहेत पात्रं.
जियो यार......... अप्रतिम
जियो यार......... अप्रतिम झाली आहेत सगळीच भांडी.......!!
अतिशय सुंदर कलाकृती आहेत.
अतिशय सुंदर कलाकृती आहेत.
अप्रतिम !!!! मी हल्ली
अप्रतिम !!!! मी हल्ली मायबोली वर नसते, त्यामुळे काय मिस केलय ते दिसतय.
तुझं काम अफाट आहे.
ही पॉटरी? ह्या तर अत्यंत
ही पॉटरी? ह्या तर अत्यंत सुरेख कविता आहेत !!
खुपच सुंदर झाले तुझे काम....
खुपच सुंदर झाले तुझे काम.... तुझे आधीचेहि काम पाहिले... अ प्र ति म !!! .... यासाठी किति वेळ ,कष्ट लागतात याची कल्पना आहे मला..... मी अगदी छोटे भांडे केले.... त्यानंतर Handbuild काम जास्त केले. मला सांगीतले कि तुझ्यासारखे हे असे काम करायला... (बरण्या, मग.).. १-२ वर्ष तरी लागतात.... तु किति वर्ष हे काम करतेस? बरण्याच्या झाकणाचे जे ग्लेझ केलेस ते तर खुपच सुंदर झाले.
तु क्राफ्ट शोज मधे ठेवतेस कि नाहि?
कलाकृती अप्रतीम
कलाकृती अप्रतीम आहे.भांड्यांचे आकार सुंदर आहे.
Dear Rooni, I really liked
Dear Rooni,
I really liked your work, I also enjoy pottery lessons here in DC.
I am doing my phd in UMD, and have been an enthusiastic potter for last few years.
Our class does not have good glazes, or rather we do not experiment in glazing a lot. I would love to meet you and discuss more about glazing techniques, wheel throwing techniques etc.
I am new to Maayboli, so did not know how to reach out to you.
-Neeraja
(neerajad@umd.edu)
नीरजा तुम्हाला इमेल केली आहे
नीरजा
तुम्हाला इमेल केली आहे वर दिलेल्या पत्त्यावर.
Pages