नुकताच मी खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय सुरु केला ! (त्याची निगडी प्राधिकरणात शाखा पण आहे!:)) खरे तर अपघातानेच. माझा एक मित्र एम. एस्सी. नंतर ग्लेनमार्क कंपनी मध्ये संशोधक म्हणुन नोकरी करत होता. पण ५ वर्षांचा नोकरी नंतर त्याला रुटीन कामाचा कंटाळा आल्याने तो नोकरी सोडुन गावी शेती करु लागला. मी भारतात परतल्यावर त्याची भेट घेतली तेंव्हा त्याने "नैसर्गिक्-सेंद्रिय शेती" (सेंद्रिय अन्न म्हणजे इंग्रजीत ऑर्गॅनिक फुड) बद्दल सांगितले. तो अन त्याचे सोबतचे शेतकरी असे जवळपास ३०० शेतकरी एका अध्यात्मिक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यांना पुरक म्हणुन श्री. सुभाष पाळेकर ह्यांचे सेंद्रिय-नैसर्गिक शेती वरील मार्गदर्शन देखील घेत आहेत. शेती मध्ये अध्यात्माची जोड दिल्याने शेतकर्यांच्या काबाड-कष्टाला विचारांची बैठक लाभते असा अनुभव आहे!
मित्र रसायनशास्त्रचा विद्यार्थी असल्याने आपण सेवन करत असलेल्या अन्नामुळे आपणाला किती तोटे सहन करावे लागतात अन त्यामुळे आपले अन पुढील पिढीचे किती नुकासान होते आहे ह्याचे "अॅनालिसिस" करत गेला. त्यातुनच तो सेंद्रिय-नैसर्गिक शेती चळवळीकडे ओढला गेला. ह्या चळवळीत अनेक सुशिक्षित तरुण आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, अन जुने जाणते शेतकरीही आहेत! तेंव्हा या मित्रांनी मिळुन, त्यांच्या शेतीमालाला शहरांमध्ये मार्केट मिळावे अन जेणेकरुन दोन पैसे शेतकर्यांच्या खिशात पडावेत ह्या अपेक्षेने मी काही करु शकत असल्यास काम करावे असे सांगितले.... अन त्यातुन मी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करणार्या शेतमालाचे अन शेती प्रक्रिया मालाचे मार्केटींग करावे असे ठरवले!
सध्या आम्ही सेंद्रिय गुळ अन सेंद्रिय काकवी चे उत्पादन घेत आहोत. नुकतेच आम्ही "सकाळ पेपर पुरस्कृत शॉपींग फेस्टीवल, औरंगाबाद" इथे आमचा सेंद्रिय गुळाचा स्टॉल लावला होता.... आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद लाभला. आम्ही औरंगाबाद इथे कायम स्वरुपी विक्री केंद्र सुरु केले आहे! (पत्ता: श्री सुभाष जगताप, यश सेल्स कॉर्पोरेशन, कासलीवाल मार्केट- बी, सोहम मोटर्स च्या मागे, जालना रोड, एन-२ सिडको, मुकुंदवाडी, औरंगाबाद, Mobile - 9421389217)
अजुन ग्राहकाला सेंद्रिय आणि केमिकल / रसायन विरहीत गुळ ह्यातील फरक कळत नाही. ढोबळ मानाने असे सांगता येइल कि, जो गुळ खाताना दाताना चिकटत नाही, तो सेंद्रिय/नैसर्गिक गुळ! अन जो गुळ दाताना चिकटतो त्यात हमखास केमिकल टाकलेले असणार!!
तांत्रिकदृष्ट्या : जो उस कुठलेही रासायनिक खत न वापरता वाढवला जातो (केवळ शेणखत, गांडुळखत ई वापरले जाते) अन त्यापासुन गुळ बनवताना देखील त्यात कुठलेही केमिकल (हायडा पावडर, ऑर्थो फॉस्पोरिक अॅसिड - जे आरोग्याला अत्यंत घातक असतात) टाकले जात नाही तो गुळ सेंद्रिय किंवा नैस्र्गिक मानता येतो. अशा प्रकारच्या शेतीला शासनमान्य प्रमाणीकरण (मराठीत- सर्टिफिकेशन !) संस्था आपले प्रमाणपत्र देत असतात. महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंग फेडरेशन ( एम्.ओ.एफ्.एफ. )पुणे, आणि एकोसर्ट, औरंगाबाद सारख्या संस्था हे काम करतात. त्या प्रत्येक शेतकर्याकडे जावुन किमान तीन वर्षाची शेती करण्याची पद्धती अभ्यासुन त्याला प्रमाणपत्र देतात. सेंद्रिय पद्धत अन नैसर्गिक पद्धत यात सुक्ष्म बदल आहेत.
वाढत्या लोकसंख्यला दर्जेदार अन्न पुरवणे ही तारेवरची कसरत आहे. अन म्हणुनच अनेक अपप्रवृत्ती ह्यात आहेत. अनेक लोक खोटी लेबल लावुन साधा माल सेंद्रिय (ऑरगॅनिक) माल म्हणुन विकतात! कारण ऑर्गॅनिक मालाला बाजारात जास्त किंमत मिळते.........त्यावर उपाय म्हणजे आपण स्वतः जागरुक राहणे. विक्रेत्याला अनेक प्रश्न विचारुन माहिती मिळवणे. नुकतेच भारतीय अन्न सुरक्षा मानके प्राधिकरण यांनी केलेल्या पाहणीत अनेक राज्यांत १००% पर्यंत भेसळयुक्त अन्न सापडले आहे. महाराष्ट्रा सारख्या राज्यात ४४% दुध भेसळयुक्त आहे, तर एकुण १०% अन्न भेसळयुक्त आहे.
दर्जेदार अन्न मिळावे हा आपला हक्क आहे! यासाठी तांत्रिक माहिती जमा करणे अन ते इतरांना देखील सांगणे हे आपले कर्तव्य आहे!
!! सुदृढ भविष्यासाठी सकस दर्जेदार अन्न !!
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
डॉ. भारत करडक
करडकवाडी, नेवासा, जि. अहमदनगर, महाराष्ट्र
इ मेल- kardakwadi@gmail.com
वेबसाईट www.kardakwadi.org ,
www.facebook.com/kardakwadi
http://bit.ly/agro_produce
घरपोहच सेंद्रिय गुळ : पुणे, औरंगाबाद, मुंबई, अन महाराष्ट्रातील अन्य शहरे!
http://jahirati.maayboli.com/node/373
चंपक, मी येतो आहे तिकडे
चंपक, मी येतो आहे तिकडे सेंद्रिय पध्दतीने बनवलेल्या गुळाच्या तीळाची वडी खायला आणि अश्या प्रकारे शेती करण्यासाठी मला तर नक्कीच आवडेल. एकडाव यायलाच पाहीजे. औरंगाबादच्या प्रदर्शनाबद्दल मी फेसबुकवर पाहिलं होतं पण नीटसं समजलं नाही.
हम्म. कर्नाटकात बनलेला गुळ
हम्म.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कर्नाटकात बनलेला गुळ काहिवेळा थोडा काळसर असतो.
शिवाय बनवताना काही गडबड झाल्यास काळसर झालेला गुळ किरकोळ विक्रीमध्ये
हा बिगर पावडरचा आहे अस सांगुन विकणारे लोक पाहिलेत मी.
मला गुळाची थोडीफार माहिती आहे. म्हणजे चव आणि रंग असे बरेच ऑप्शन असतील तर
माझा अंदाज फार चुकत नाहिये. मी गुळ विक्री केली आहे आणि माझे बाबा अजुनही कोल्हापुरातल्या
गुळ मार्केट यार्डात काम करतात त्यामूळेच असेल कदाचित मला सेंद्रीय गुळ कसा दिसतो आणि कसा चवीला लागतो ह्याची उत्सुकता आहे. चंपक भाउ उत्तर कस मिळऊ ते सांगा.
उत्तम उपक्रम! अभिनंदन.
उत्तम उपक्रम! अभिनंदन.
रसायनविरहित गूळ व रसायनयुक्त गुळातील फरक नुसत्या दृष्टीने, हातात घेऊन ओळखता येतो का? की खाऊन पाहिल्याशिवाय पर्याय नाही?
@सुकी, अजुन कसा पोचला
@सुकी, अजुन कसा पोचला नाहेस्स? घोड्यावर हेस कि ///![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@ झकासरावः तीन पैकी एका ठिकाणी या, प्रात्यक्षिक दावतो !
@ अरुंधती: गुळवे लोक असे "पाहुन" ओळखु शकत असावेत, पण सामान्य माणसाला शक्य नाही. अनेकांना खाल्ल्यामंतरही कळत नाही इतकी रसायनांची सवय होऊन गेली आहे.
मस्त उपक्रम चंपक.. हा मेसेज
मस्त उपक्रम चंपक..
हा मेसेज चळवळीमधल्या इतरांपर्यंतही पोचव..
उत्तम उपक्रम. शिक्षणाचा
उत्तम उपक्रम. शिक्षणाचा उपयोग जनहितासाठी.
छान... आगे बढो..!!!!
छान... आगे बढो..!!!!
आत्ता आहे तो गूळ संपला की
आत्ता आहे तो गूळ संपला की लगेच ऑर्डर करणार.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काकवी पण आहे नाही का? प्रचंड आवडते मला. पण डाएट आडवं येतं
बादवे, तुमच्याकडे पावडर स्वरूपातला ऑर्गॅनिक गूळ पण आहे का? की ढेपच आहे केवळ?
एकदा भेट द्यायला पाहिजे तुझ्या गुर्हाळाला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुकी , चंप्याला वडी बनवता
सुकी , चंप्याला वडी बनवता येते का विचार
मला तर फ्कत साखरेचीच येते बनवता.
यावरचा एक जोक आठ्वला तो सांगते . गुळाचे सँपल घरी आले त्या दिवशी शेजारी घरी आले , चंपक ने टेस्ट घेतली आणि त्यांना म्हट्ला वाहाआआआअ काय पेढ्यासारखाच लागतोय कि ...त्यावर शेजारी बोलला तुम्हाला तर लागेलच हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मि जाम हसले होते
नि, काकवी दोन बॉटल भरुन पड्लिये घरी , घरी ये खायला , डायट च आपण खाल्यानंतर बघू
प्रत्येक काळा गुळ केमिकल
प्रत्येक काळा गुळ केमिकल विरहित नसतो. जरी आपल्याला समजत नसले तरी या मुंगळ्यांना बरोबर समजले. आणि मुंगळेवाला गुळ हा सेंद्रिय नाही तर 'विदाउट केमिकल' आहे. पिवळा रंग येण्यासाठी हॉड्रॉस पावडर वापरली जाते. या सो कॉल्ड 'विदाउट केमिकल' गुळामध्ये फक्त ती पावडर नसते. त्यात असते, आरथो फॉस्फोरिक अॅसिड आणि सिंथेटीक 'भेंडी पावडर'. बर्याच वेळा अॅसिड चे प्रमाण एवढे वाढते कि खाताना जिभेला त्याचा 'चरका' लागतो. वर जो चॉकलेटी गुळ दिसतो त्यात अॅसिड आहे ( पण, तो कोल्हापुर, सांगलीच्या बाजार पेठेत विदाउट केमिकल च्या नावाने विक्रिस उपल्ब्ध आहे. किंमत ४५ रु / किलो रिटेल). तर , जर तुम्ही केमिकल विरहित गुळ विकत घेत असाल तर खात्री करुनच घ्या...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिभेला त्याचा 'चरका'
जिभेला त्याचा 'चरका' लागतो<<<
हो याचा चांगलाच अनुभव आहे.
चंपक, छान. मुंबईत पण तुझा गूळ
चंपक, छान. मुंबईत पण तुझा गूळ विकायची सोय कर. मी वर्षभराचा गूळ इथे घेऊन येईन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंपक मस्त प्रोजेक्ट! इकडे पण
चंपक मस्त प्रोजेक्ट! इकडे पण पाठव थोडा!
छान उपक्रम!
छान उपक्रम!
आणि मी समजत होतो, साखरेपेक्षा
आणि मी समजत होतो, साखरेपेक्षा गुळ बरा, त्यामधे देखिल केमिकल असतात हे माहीतच नव्हत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@निवांत, गुळासोबत मुंगळेसुध्दा पॅक केलेत?
खूप उपयुक्त उपक्रम. मुंबई
खूप उपयुक्त उपक्रम.
मुंबई ग्राहक पंचायतीशी संपर्क करून त्यांच्या मासिक वाटपात ही उत्पादने उपलब्ध करून देता आली तर अनेकांना त्यांचा लाभ घेता येइल तसेच तुम्हालाही मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग मिळेल असे वाटते.
तुम्ही फक्त गुळच बनवता कि
तुम्ही फक्त गुळच बनवता कि आणखीनही उत्पादने आहेत? सेंद्रिय पद्धतीने शेती करायचं माझ्या नवऱ्याच स्वप्न आहे, त्यासाठी Israel ला जाऊन शिकून येतो असं काहीतरी मधून मधून ठरवत असतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल.
चंपक, औरंगाबादला एमआयटी
चंपक, औरंगाबादला एमआयटी कॉलेजवाल्यांनी सेंद्रिय शेती आणि इतर उत्पादनाची सुरवात केली आहे /करणार आहेत. जर औरंगाबादला गेलास तर एमआयटीच्या यज्ञवीर कवड्यांना नक्की भेट. माझा संदर्भ दिलास तरी चालेल (नाही दिलास तरी हरकत नाही, ते भेटतीलच).
सायो , निरजा : पत्ता दिल्यास
सायो , निरजा : पत्ता दिल्यास घरपोहच करु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव धन्यवाद! चौकशी करतो.
अल्पना, औरंगाबाद च्या डिलर ला माहिती घेण्यास सांगितले आहे.
पद्मा : सहकुटुंब करडकवाडी ला या
इस्रायल च्या विमानात बसताना तीन तीन अधिकारी तीन तीन दा चौकशी करुन भंडावुन सोडतात, अन ते कमी म्हणुन कि काय, सगळ्या बॅगा उचकुन परत तुम्हाला एअरपोर्ट वरच पुन्हा पॅकिंग चे स्कील दाखवायला भाग पाडतात? (सँपल प्रश्नः तुम्हाला खात्री आहे का कि तुम्ही बॅग लॉक केल्या नंतर इतर कुणीही ती बॅग डुप्लीकेट चावी ने उघडलेली नाही? तुम्ही रात्री ज्या रुम मध्ये बॅग ठेवली होती, ती रुम व्यवस्थीत लॉक केलेली होती का? तुम्ही ज्या टॅक्सी ने आलात त्या टॅक्सी च्या चालकाने बॅग ला हात लावला का? त्याने बॅग उघडली तर नाही ना? असो. )
चम्पक, तुझ्या प्रधिकरणातल्या
चम्पक, तुझ्या प्रधिकरणातल्या गुळ विक्रिकेंद्राचा पत्ता दे रे.
प्राधिकरण : शॉप ५-६, पुजा
प्राधिकरण : शॉप ५-६, पुजा गार्डन, रायसोनी पतसंस्थे समोर, सेक्टर २६, निगडी.
आकुर्डी चौक : शॉप नं-१३, बी विंग; एस. बी. आय. एटीएम च्या खाली, जै गणेश व्हिजन कॉम्प्लेक्स, आकुर्डी चौक, प्राधिकरण. पुणे. (२६ जानेवारी २०१२ पासुन सुरु ! )
एकदाचा योग्य तो धागा सापडला
एकदाचा योग्य तो धागा सापडला भेसळीसंदर्भातला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गेले काही दिवस मुलांसाठी
गेले काही दिवस मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून दूध आणून पाहीले. शेतक-यांकडून थेट दूध घेऊन विकणा-या डेअर्यांपासून ते पाकिटबंद दूधापर्यंत कशाचीच खात्री देता येत नाही. नव्या डेअरीचे दूध सुरुवातीला चांगले असते पण नंतर एक अनाकलनीय चव येते, चहाला एक विचित्र वास येऊ लागतो. आपण सहसा कायदेशीर कारवाईच्या भानगडीत पडत नाही. एकट्यादुकट्याने तक्रारी देऊन विशेष काही घडेल असं वाटत नाही. शिवाय आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी हे त्रांगडं आहेच. यासाठी दबाव गट तयार करता येईल का ? भेसळ ओळखण्यासाठी कुणी मदत देऊ शकेल का ? असा गट तयार व्हावा असे वाटते आहे. यासाठी वेळ देण्याची माझी तयारी आहे.
http://www.agrowon.com/Agrowon/20101027/4696869353519600143.htm
दूधामधल्या भेसळीसंदर्भात अॅग्रोवन मधला हा लेख.
सरकारी धोरणासंदर्भात मध्यंतरी आलेल्या बातम्या खालील लिंकवर पाहता येतील.
http://www.esakal.com/esakal/20120528/5007498592544373449.htm
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=7&ved=0CE...
http://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=9&ved=0CF...
इथे मात्र वेगळाच सूर आहे ज्याची दखल घ्यावी लागते आहे.
http://marathi.yahoo.com/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%AD%E0%A5%87%...
दिव्यमराठीतली एक सविस्तर आणि चिंताजनक बातमी
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-milk-fraud-in-india-3950918-...
अन्नधान्यात होणारी भेसळ :-
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/04/blog-post_2219.html
एकट्यादुकट्याने तक्रारी देऊन
एकट्यादुकट्याने तक्रारी देऊन विशेष काही घडेल असं वाटत नाही.>>> योग्य जागी केलात तर नक्कि होतो. अनुभव आहे.
परवा मी एक फिल्म
परवा मी एक फिल्म पाहिली....NDTV वर्......की खोट दूध पण तयार करतात लोक.....shampoo ......vegetable oil आणि...पाणी वापरून्......थक्क झालो....लहान लेकरांचा पण विचार नाही करत हे लोक.....
काकवी कशी असते. एकदा मी लाडु
काकवी कशी असते.
एकदा मी लाडु करताना गुळ सांडले होते खुप वेळ झाला पण मुंग्याच लागल्या नाही.
आता कळले.