परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 January, 2012 - 22:50

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही दुसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_2a.jpgquiz_2b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बदामाच्या खिरीचा एक ग्लास पुन्हा रिचवल्यावर:

२ - ४ (यान्ली लैच पीडलं ब्वा!) : काळ्या रंगात लिहिल्याने, काळी दोन का काळी चार? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे हे गाणं आहे की काय? अशी एक शंका ...
त्यावरून देवी सरस्वती, याकुंदेदुतुषारहार धवला, बलसागर भारत, साने गुरूजी हे ही आठवलं .....
आता काय करू?

नेव्हीचे वेगवेगळे युनिफॉर्म्स असतात असं दिसतय आणि त्याला उद्देशून आहे ते. नंबर २ आणि नंबर ४ वाला युनीफॉर्म पूर्ण व्हाईट्ट दिसतायत. इथे पहा

http://www.irfc-nausena.nic.in/modules.php?name=Content&pa=showpage&pid=36

मामी ... तुम्ही म्हणाल्यावर आठवले ...

रबिंन्द्रनाथ टगोर ... त्यांच्या आई .. "शारदा देवी" ... मदर टेरेसा ( not biological mother --> म्हणून त्या ३१६६२ वर फूली )
शारदा देवी यांचे निधन रबिंन्द्रनाथ खूप लहान असताना झाले .. ( दिवार ... बदरायण संबंध लावलाय )
शारदा देवी --> सरस्वती ... नेहमी सफेद साडी ... (नेवी पण सफेद ड्रेस् .. ) ...तिच्या प्रकाशाने \ आशीर्वादाने (सूर्य) ... ४थे चित्र सुद्धा समजते .... Lol

२ किंवा ४ ... म्हण्जे रबिंन्द्रनाथ भावंडात कितवे असे पण असेल Proud

मंजिरी सोमण >> माप्रंनी च शाळा घेतलीये आपली Happy ...

भारतमाता (अभनिंद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा काढलेले भारतमातेचे चित्र. नग्न असलेली हुसैनची भारतमाता नाही.)

पांढरा युनिफॉर्म

म्हणुनच फुली मारली आहे.>>>>>> जामोप्या, Lol

भारतमाता, झेंड्याचे रंग आणि कोणी शत्रू आलाच तर त्याच्याशी दोन च काय चार हात करायला तयार आहोत असा अर्थ २ आणि ४ आकड्यांचा Proud

मंजिरी सोमण , जागोमोहनप्यारे ... हहपूवा ...

कोणी शत्रू आलाच तर त्याच्याशी दोन च काय चार हात करायला तयार आहोत >> नेव्ही चा उपयोग होइलच ...

याचा अर्थ "परदेशी भाषा शिका" असा असेल ...

सगळेच Rofl

पोखरण नं. ३ ?>>>>>> अश्वे, पण आकडे तर २ किंवा ४ च विचारलेत Proud

चारूदत्त, एक्सप्लेन करा की, परदेशी भाषेचं Proud

'जनगणमन' - शताब्दि + सिनेमा साठी हे सगळे रामायण चालू आहे...

'जनगणमन' - ज्या भाषेत आहे ती भाषा आपली मायभाषा नाही ... ( राष्ट्रभाषा आहे कि नाही ? कोणती ? हा धागा त्याचा नाही ... असो) ..

मदर टेरेसा --> परदेशी होत्या .... (जन्माने )

३१६६२ आणि फूली --> आपल्या जिन्स मध्ये नाही .... जे दूसर्याचे आहे ते पण शिका

दिवार .. बर्लिन वाल .... "भिंती पाडा" .. भाषा शिका ... मैत्री करा ... शांती रखा (मदर टेरेसा) नोबेल वगैरे ... .... [ सर्वात महत्वाचे म्हण्जे ते ४थे चित्र कळेल हो एकदाचे ..... :p ] ते चित्र परदेशी भाषेत च आहे ... हेहे

सूर्य -- > जगात सर्वत्र संचार .. संपूर्ण ज्ञान ... (सूर्याला सगळ्या भाषा येतात .. हे मी ठरवलय ... Happy )

जगात सर्वत्र संचार --> करायला नेव्ही ...

२ ? ४? ... फक्त २ नको ४ दिशांनी ज्ञान मिळवा ...

आणि सर्वात महत्वाचे म्हण्जे परदेशी भाषा शिकायला "शाळेत" जावे लागते .... (माप्र खूश .... प्लिझ दिवे घ्या माप्र) ....

एका वाक्यात सगळी चित्रे मारली ....

इथे काहीतरी लिहायचं म्हणून आलं की आधीच्याने लिहिलेले वाचून हसण्यातच वेळ जातोय. तवर अजून कोणतरी प्रकाश पाडतय. Happy

चला आता माझ्याकडून एक प्रयत्न.

मदर टेरेसा म्हणजे अनाथांचे पालन करणारी आई, त्यांचे बहुतांश काम बंगालात झालेले आहे, निरूपा रॉय अमिताभची किंवा शशी कपूरची आई तीपण बंगालीच. अमिताभची आई देखील बंगाली. सूर्य अरूणाचमधे आधी उगवतो व नंतर बंगालमधे उगवतो. बंगाल संबंध समाप्त!

याच्यापुढे कुणीतरी संबंध जोडा बघू.

सर्व सहभागी सदस्यांचे मनापासून आभार :).

उत्तर - पांढरा गणवेष (पांढरा वेषसुद्धा चालले असते.)

मदर टेरेसा. त्यांचा नेहमीचा वेष व त्यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटीचा गणवेष निळी किनार असलेली पांढरी साडी असा आहे.
३१६६२ सध्या गाजत असलेला नग्नतेचा बाफ. नग्नतेच्या विरुद्ध म्हणजे वेष आला.
दीवार चित्रपटाचे प्रसिद्ध भित्तीचित्र (पोस्टर). अमिताभ आणि शशी कपूर यांच्या पार्श्वभूमीला बर्लिन भिंतीचे उपग्रहीय छायाचित्र आहे.
deewaar.jpg

वरील भित्तीचित्रात निरुपा रॉयच्या अंगावर पांढरी साडी आहे. (जाता जाता, निरुपा रॉय यांनी अनेक चित्रपटांत विधवा आईच्या भूमिका केल्या व पांढरी साडी हा त्यांचा गणवेष म्हणता येईल Happy )
खालच्या चित्रात पहिला भाग म्हणजे क्युनिफॉर्म (cuneiform) लिपी होय. त्यावर दिसत असलेल्या 'सी'चा अर्थ 'प्रताधिकारमुक्त आहे' (copyright free) असा होतो. पण क्युनिफॉर्मच्या इंग्रजी स्पेलिंगमधून 'सी' रद्द केले तर उच्चारी 'युनिफॉर्म' राहतो.
सूर्याच्या खाली असलेले भारतीय नौदलाचे चिन्ह. इतर चित्रांसारखे हे चिन्ह सूर्याच्या शेजारी ठेवता आले असते, पण 'ते नेमके सूर्याखालीच का ठेवले' हा विचार अपेक्षित होता. भारतीय नौदलाचे विविध प्रसंगांसाठी विविध गणवेष आहेत. त्यात उन्हाळा/उष्ण हवामान असताना दोन प्रकारचे गणवेष परिधान करता येतात. त्यांना 'ड्रेस नंबर २' व 'ड्रेस नंबर ४' असे म्हणतात. हे संपूर्ण पांढरे असतात.

या उत्तरापर्यंत HHमामी हे दोन सदस्य पोहोचले, तेव्हा त्यांना संयुक्तिकरित्या बक्षीस जाहीर करत आहोत. त्यांचे हार्दिक अभिनंदन Happy आपल्याला प्रत्येकी एक 'मुंडू टीव्ही'चे सबस्क्रिप्शन मिळेल, त्याद्वारे आपल्याला 'जन गण मन' हा चित्रपट मोबाइल अथवा संगणकावर एकदा बघता येईल. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आम्ही लवकरच आपल्याला मायबोलीवरून संपर्क करू.

'अश्विनी के' व 'चारुदत्त' यांनी सातत्याने प्रयत्न केले. ३१६६२चा अर्थ ओळखणार्‍या अश्विनी के या पहिल्या होत्या. तर चारुदत्त यांनी चित्रांतील बारीकसारीक गोष्टींचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला, जो या स्पर्धेत अपेक्षितच आहे. अश्विनी के व चारुदत्त यांच्या उत्साही व उत्साहवर्धक सहभागाबद्दल त्यांचे खास आभार Happy
सर्वच सहभागी सदस्यांचे परत एकदा मनःपूर्वक आभार व पुढील सर्व स्पर्धांमध्येही आपण असाच उदंड प्रतिसाद द्याल अशी आशा Happy

.

Pages