परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 January, 2012 - 22:50

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही दुसरी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

Quiz_2a.jpgquiz_2b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी,

हे कोडं खूप सोपं आहे, इतका विचार करण्याची तशी आवश्यकता नाही.

चित्रं नीट बघा, उत्तर चित्रांतच आहे. आणि हे उत्तर शाळेशी संबंधित आहे, हे लक्षात असू द्या. Happy

पहिल्या चित्रांमधून आईचा संबंध दिसतो. आई हा पहिला गुरू. (शाळेशी संबंधित!)बाकी सूर्य वरूण वगैरे देव दिसतात! Wink रविन्द्रनाथांना गुरुदेव म्हणत.

दोन नंबर की चार नंबर आणि ती लिपी यांचा काय संबंध असावा!!?

उत्तर : अमर्त्य सेन
(आता त्यांचा जन गण मन शी संबन्ध काय माहीत नाही. पण शांती निकेतनशी आहे आणि ते नोबल प्राईज विनर पण आहेत.)

गणवेष किंवा शालेय गणवेष.

पहिली तीन चित्रं शाळा दर्शवतात. आई, बायोलॉजिकल आई नसलेली तरी आपला प्रतिपाळ करणारी.
तिसरं चित्रं क्युनीफॉर्म विदाऊट 'सी' = युनिफॉर्म.
नेव्ही = लष्करी गणवेष.
तळपता सूर्य .... हे जरा फिट करता येत नाहीये. Happy
दोन किंवा चार म्हणजे शाळेतल्या मुलांच्या शर्टाची दोन्-चार बटणं नेहमी तुटलेली असतात म्हणून .... Proud (थोडक्यात काय, हे ही फिट करता येत नाहीये.)

विचार करता अजून एक शक्यता आली :

हा एक संदेश आहे. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाबद्दल : शिक्षण सर्वांकरता
युनिफॉर्म = सर्वांना सरसकट
शाळा = शिक्षण
सूर्य = पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा (हे गाणं सर्वांना शिक्षण देण्याचा संदेश पसरवण्याकरता होतं)
(तरी दोन का चार ते राहतच. शहाणे करून सोडावे दोन-चार जण! असं असेल. नाहीतर विद्यार्थी वन-टू का फोर करून पास होतात असं दाखवायचं असेल) Happy
किंवा हे वर्ष पंतप्रधानांनी 'गणिती वर्ष' म्हणून घोषित केलं आहे याकरता २ किंवा ४ असेल.

असो. माझी मति यापुढे खुंटली आहे.

सेंट मेरी हायस्कूल (Saint Mery High School ) कलकत्ता. तिथे त्यांना सिस्टर मेरी म्हणून ओळखले जायचे. पहिले चित्र - सेंट मेरी सारखे दिसते, सेंट मेरी चर्च ( बर्लिन - मार्टीन ल्युथर किंग ). शशी कपूर आणि अमिताभ बच्चन मदर तेरेसा मिलेनियम अवार्ड ने सन्मानित.

लख्ख (सुर्यासारखा) पांढरा (नेव्ही सारखा) युनिफॉर्म. Lol

त्या वरच्या दिवार (वॉल?), शांती, मदर टेरेसाशी याचा काय सबन्ध असेल? Uhoh

सेंट तेरेसा - या नावाची शाळापण आहे गिरगावात :अजून तारे तोडणारी बाहुली:

तिसरं चित्रं क्युनीफॉर्म विदाऊट 'सी' = युनिफॉर्म. >>> मामी, भारीच Happy

नेव्ही गणवेष
आरमार गणवेष

नाखु, अज्जिबात सोडायचं नाही माप्रांना. कालपासून जगभर दर दर की ठोकरे खात हिंडायला लावलंय त्यांनी Proud

मामी, हह,

तुम्ही योग्य मार्गावर आहात :p

आता फायनल उत्तर देऊन टाका बघू (स्पष्टीकरणासह) Happy

१) मदर तेरेसा - पांढरा युनिफॉर्म किंवा "मदर मेरी तेरेसा व्हाईट" ही बायोग्राफी
२) स्वित्झर्लंड - व्हाईट रिबन कँपेन
३) बर्लिन वॉल- व्हाईट क्रॉसेस
४) क्युनिफॉर्म - C = युनिफॉर्म
५) सूर्य - पांढरा
६) भारतीय नौदल - पांढरा गणवेष

अरे देवा

अमर्त्य सेन त्याचा सम्बन्ध मी शांतीनिकेतन, नोबल प्राईज विनर, वॉल (दिवार) स्ट्रीट (नकाशातील रस्ते..)वरून लावला आहे.

लख्ख (सुर्यासारखा) पांढरा (नेव्ही सारखा) युनिफॉर्म. (हे मामींनी आणि आधी अश्विनीने गणवेष सांगितल्यामुळे.)

पहिल्या चित्राचा (मदर टेरेसा) अर्थ 'मायबोली' असाही मी लावलेला. माय(लेक) आणि खाली दगडात कोरलेली बोली Proud माध्यम प्रायोजक असल्याने मायबोली पण आता जन गण मन शी सम्बन्धीत आहे.

हह Lol

२ किंवा ४ म्हणजे रोल नंबर..... आईसारख्या शाळेमध्ये छान युनिफॉर्म घालून रांगेत रोल नंबर प्रमाणे उभे राहून राष्ट्रगीत म्हणा... Proud बच्चनच्या चित्रात हिरवे गवत आहे... ते शाळेचे ग्राउंड आहे. स्पर्धा समाप्त ! Proud चला जनगनमन म्हणा! Proud

हह, मायबोली .... Biggrin

माप्र, सकाळी खाल्लेल्या बदामाच्या खीरीचा परिणाम आता ओसरल्यामुळे माझा मेंदू यापुढे या विषयावर काम करायला नाखूश आहे. Happy

दोन किंवा चार म्हणजे शाळेतल्या मुलांच्या शर्टाची दोन्-चार बटणं नेहमी तुटलेली असतात म्हणून >>>>>>> Rofl हे म्हणजे तुफानच भारी आहे मामी Lol

दोन किंवा चार म्हणजे शाळेतल्या मुलांच्या शर्टाची दोन्-चार बटणं नेहमी तुटलेली असतात म्हणून ....>>>>> Lol

भारताचा झेंडा हे उत्तर आहे काय?

कारण, हिरवा रंग दिलाय आणि दिवार दाखवलेय म्हणजे भारत-पाकिस्तान पार्श्वभूमी
केशरी रंग सूर्याचा
पांढरा रंग नौदलाचा गणवेश
आणि सूर्य म्हणजे अशोकचक्र

आणि मदर तेरेसा हे भारतमातेचा सिम्बॉल Proud

Pages