सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
रैना, मी दोन दिवस त्याचेच नाव
रैना, मी दोन दिवस त्याचेच नाव आठवत होते. पण तो करड्या रंगाचा होता ना?
दिनेशदा तो उंदीर कम ससा फारच
दिनेशदा तो उंदीर कम ससा फारच क्यूट आहे.मला खूपच आवडला.
जागू, दवण्याचा सुवास इथपर्यंत पोहोचला! मस्त वाटलं फोटो बघून; कारण आजकाल हा सुद्धा दुर्मिळ झालाय.
शांकली मलाही खुप आवडतो हा
शांकली मलाही खुप आवडतो हा वास.
दवण्याचा वास मला पण खूप
दवण्याचा वास मला पण खूप आवड्तो,पण फार दिवस झाले बघायला पण नाही मिळाला.
दिनेशदा , आमच्याकड्च्या मॉलमध्ये लावलाय हा घायपात. अधून मधून चक्कर होतच असते, तेव्हा लक्ष ठेवेल त्याच्या रोपांवर.
नमस्कार मंडळी ! कसे आहात
नमस्कार मंडळी !
कसे आहात ?
सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! (ओफीस मध्ये ब्लोग बंदी,गेले महिनाभर माबोवर येऊ शकलो नाही, म्हणुन या उशीराच्या शुभेच्छा !)
आज मागील निम्मा बैकलॉग पुर्ण केला, पुन्हा नविन वर्षात (कुठल्याही इतर पक्षात न जाता) निगवर प्रवेश केला आहे
:स्मितः
जागू मी इकडे दवणा इतका मिस
जागू मी इकडे दवणा इतका मिस करतेय, आमच्या जेजुरीत दवणेमळा नावाची वस्तीच आहे तिथे जास्तीत जास्त दवणा पिकवून त्याची निर्यात करतात..
सारीका
सारीका
ईन मीन तीन - राजगडावरील एक
ईन मीन तीन -
राजगडावरील एक रान फुल, माझ्या आवडत्या रंगाच>>>> Asteraceae या कुळातलं, Baccharoides anthelmintica (Conyza anthelmintica , Vernonia anthelmintica) या नावाचं फुल असावं हे बहुतेक, ironweed असेही म्हणतात.
धन्यवाद शशांकजी
धन्यवाद शशांकजी
तिच निळी फुले अंबोली घाटात
तिच निळी फुले अंबोली घाटात भरपूर दिसली.
घरच्या बागेसाठी उपयुक्त
घरच्या बागेसाठी उपयुक्त माहीती ( लोकसत्ता).
हिरव्या बहराची घरं
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=203821:...
हो मी सकाळीच चाळून आले रात्री
हो मी सकाळीच चाळून आले रात्री सविस्तर वाचणार आहे. खुप छान वाटत होते वाचताना.
कुंडीतल्या मातीत बारीक शंख
कुंडीतल्या मातीत बारीक शंख होतात आणि त्या नंतर त्यातून बारीक पोरकिड्यासारखे किडे बाहेर पडतात त्यावर उपाय ...कुणी सांगेल काय?
अरे आज सगळे निसर्गप्रेमी कुठे
अरे आज सगळे निसर्गप्रेमी कुठे गडपले ?
माझ्या कढिलिंबावर ६ कोष होते
माझ्या कढिलिंबावर ६ कोष होते काही दिवसांपुर्वी. सगळं झाड निष्पर्ण केलं तरी मी त्यांना राहू दिलं होतं. आता त्यातला एकही कोष दिसत नाहीये आणि झाडाला मात्र फुट आली आहे.
अश्वे त्या कोषातली फुलपाखर
अश्वे त्या कोषातली फुलपाखर मस्त बागडत असतील आता निसर्गात.
मंडळी, कसे
मंडळी, कसे आहात
http://www.esakal.com/esakal/20120105/5586210721424619601.htm
हे पहा
खरंच की निग वर सध्या फारसं
खरंच की निग वर सध्या फारसं कोणी डोकावत नाही वाटतं. गेले कुठे सगळे?
गेले कुठे सगळे?>>>> हिवाळा
गेले कुठे सगळे?>>>> हिवाळा आहे, सगळे मस्त ब्लॅंकेट पांघरून गुडुप !!
हु $$$$$$$$$$$$$$$$$ हु
हु $$$$$$$$$$$$$$$$$ हु $$$$$$$$$$$$ हु $$$$$$$$$$ !!!!!!!!!!
आहे आहे, डोकावतेय पण
आहे आहे, डोकावतेय पण माझ्याकडे लिहिण्यासारखे काहि नाही.
रच्याकने, परवा १ टोमॅटो चिरला तर आतील बियांना, कोंब आले होते. २-३ तरि दिसले. (सकाळच्या गडबडीत) अजुन असतील कदाचीत पण दिलते / पाहिले नाहित. तर ते कोंबच होते का? असे आधि नव्हते पाहिले.
रच्याकने, परवा १ टोमॅटो चिरला
रच्याकने, परवा १ टोमॅटो चिरला तर आतील बियांना, कोंब आले होते
पुर्णा पिकल्यावर होते कधीकधी असे. लगेच तो भाग कुंडीत नेऊन टाकायचा. दोनचार घरचे टोमेटो मिळतील खायला
टाकलाय. शब्दशः टाकलाय.
टाकलाय. शब्दशः टाकलाय. सक्क्क्क्काळी पेरणी चा मी विचार पण नाही करु शकत.
दिनेशदा मुंबइत आले आहेत ना?
दिनेशदा मुंबइत आले आहेत ना? या वर्षी निसर्ग गटक आहे की नाही?
प्रज्ञा एवढी थंडी भरली का ग
प्रज्ञा एवढी थंडी भरली का ग तुला ?
आपले सगळ्यांचे आवडते
आपले सगळ्यांचे आवडते व्यक्तीमत्व श्री. दिनेशदा यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
या भेटीदरम्यान मायबोलीकरांना आणि विशेषतः निसर्गाच्या पारावर गप्पा ठोकणा-यांना भेटायला ते उत्सुक आहेत. (जिस्प्याच्या प्रदर्शनात काही मायबोलीकरांना त्यांनी आधीच दर्शनाचा लाभ दिलाय ते वेगळे )
कोणाच्या घरी भेटण्यापेक्षा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटणे सगळ्यांना सोईचे पडेल असा विचार करुन यावेळी माहिमचे "महाराष्ट्र निसर्ग उद्यान" हे ठिकाण निवडले आहे.
तारिख : २२ जानेवारी २०१२
वेळ : सकाळी ९ ला गेटभेट.
ज्या कोणाला भेटायचे आहे त्यांनी हात वर करावेत. अजुन काही चांगले स्थळ सुचत असले तर तेही सुचवावे. उत्सवमुर्तींना संध्याकाळी लवकर घरी परतायचेय हे लक्षात ठेऊन स्थळ सुचवा. (ते कुर्ल्याला राहतात आणि रात्री उशीराचे परतीचे विमान आहे.)
इथे नावनोंदणी करा -
http://www.maayboli.com/node/31852
कोणी पांढर्या चाफ्याला शेंगा
कोणी पांढर्या चाफ्याला शेंगा आलेल्या पाहिल्या आहेत ? मला परवा दिसल्या.
तसच पानफुटीला फुलं किंवा फळं पाहिलीत कां? त्याची उंची साधारण ६ फुट होती
फोटो टाकेनच.
पानफुटी ६ फुटाची??? मी तरी
पानफुटी ६ फुटाची??? मी तरी पाहिली नाही.
साधना नमुत, वाशित वगैरे
साधना नमुत, वाशित वगैरे उद्यान नाही का ग गटगसाठी ?
उद्याने भरपुर आहेत गं पण
उद्याने भरपुर आहेत गं पण तिथे ती एकाच छापाची सरकारी झाडे नी झुडपे लावलेली आहेत. बोटॅनिकल गार्डन्स बहुतेक नाहीयेतच. (कदाचित एक असावे)
दिनेशबरोबर माहिमच्या पार्कात जायचा बेत जवळजवळ ४ वर्षांपुर्वी ठरवलेला. त्याला नशिबी असलाच तर या २२ला मुहुर्त मिळेल. तुला मिसु आम्ही
Pages