हा चित्रपट पाहिल्यानंतर मला अक्षय कुमारच्या " गरम मसाला " चित्रपटाची आठवण झाली . थीम सुद्धा अगदी तीच आहे . बघताना हसून हसून पोट दुखायला लागते . अंकुश चौधरीला अभिनय आणि दिग्दर्शन अतिशय व्यवस्तीत जमले आहे . तर हा छावा एकाचवेळी तीन तीन गर्ल फ्रेंड्स सांभाळत असतो . त्यातली एक सई ताम्हणकर हिचा फोटोग्राफीचा व्यवसाय असतो आणि हा अंकुश तिला गर्ल फ्रेंड बनवून तिची कार फुकटात चालवत असतो . दुसरी गर्ल फ्रेंड पूजा सावंत , तीची जाहिरातीची फर्म असते परत इथे अंकुश तिचा बॉयफ्रेंड बनून कामाला असतो आणि तिसरी असते कोल्हापुरी मिरची अमृता खानविलकर , अंकुश इथे राहायची सोय होते म्हणून तिच्या बरोबर राहत असतो . sandy , सुभानराव आणि संजय अशी वेगवेगळी नावे बदलून , तिघीबरोबर मजेत फिरत असतो . कधीतरी कुणाला संशय आलाच तर लगेच बुद्धी वापरून लफडे लपवण्यात तो पटाईत असतो . इतर अनेकांनी जबरदस्त कॉमेडी केलेली आहे . हसण्यात आणि अंकुशचे फरफट बघण्यात इंटरवल कधी येतो कळतच नाही .
इंटर्वलच्या अगोदर , एका कामानिमित्त तिघी एकत्र येतात आणि इथेच धमाल कॉमेडीला सुरवात होते . इथून पुढचे जे काही थरार नाट्य आणि हास्यकल्लोळ अनुभवायचा असेल तर चित्रपट जरूर बघा .
झकास : मराठी चित्रपट
Submitted by मुंबईकर on 3 January, 2012 - 15:54
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरा जास्त लिहा....
जरा जास्त लिहा....
माझ्या मते अंकुश , संजय
माझ्या मते अंकुश , संजय नार्वेकर हे गुणी कलाकार आहेत पण त्यांना म्हणावा तसा वाव मिळाला नाही. अंकुश ने नक्कीच संधीच सोनं केलेलं असणार.
याचे रिव्यूज पेपर्स मधे
याचे रिव्यूज पेपर्स मधे चांगले होते पण येथे कोणीतरी लिहीण्याची वाट पाहात होतो. धन्यवाद. बघायला पाहिजे. पण तुम्ही गरम मसाला चा संदर्भ दिल्याने जरा शंका आहे तो आठवत नाही पण त्या कॅटेगरीतील ते अजय देवगण, अर्शद वारसी, अक्षय कुमार, फरदीन खान, अनिल कपूर आणि बाकी जनता असलेले आणि धमाल कॉमेडी म्हणून जाहिरात केलेले बहुतेक पिक्चर्स महाजंक होते.
माझ्या मते अंकुश , संजय
माझ्या मते अंकुश , संजय नार्वेकर हे गुणी कलाकार आहेत पण त्यांना म्हणावा तसा वाव मिळाला नाही. >>>>>> +१
मी पण पाहणार हा सिनेमा.
मी पाहिला.. १ तारखेला... खुप
मी पाहिला.. १ तारखेला... खुप हसलो. खरेतर वर लिहिली आहे तेवढीच कथा आहे. पण सगळा सिनेमा फार्सच्या अंगाने जातो. त्या मुळे अजुन डीटेल लिहीणं कठीण आहे. पण जितेंद्र जोशी चं काम अप्रतीम झालं आहे. त्याने खुप बहार उडवली आहे. मुख्य म्हणजे सगळ्या पात्रांन्ना सारखे फुटेज आहे. मला तरी सिनेमा आवडला. अंकुशने पहीलाच सिनेमा असुन दिग्दर्शक म्हणुन चमकदार कामगीरी केली आहे.
बरा आहे.....(सध्या असलेली
बरा आहे.....(सध्या असलेली मराठी सिनेमाची उंची बघता)
जितेंद्र जोशी चं काम अप्रतीम झालं आहे..>>>>>>>>> हीच काय ती जमेची बाजू आहे.
सई ला अक्टिंग मधल स सुधा कळत
सई ला अक्टिंग मधल स सुधा कळत नाही
अमृता तर अक्टिंग छान च करते आहे
छान आहे चित्रपट! अवश्य बघा.
छान आहे चित्रपट! अवश्य बघा.
सई ला अक्टिंग मधल स सुधा कळत
सई ला अक्टिंग मधल स सुधा कळत नाही>>> अॅक्टिंगमध्ये 'स' कुठे असतो?
अक्टिंगलाच सईमधला 'स' कळत
अक्टिंगलाच सईमधला 'स' कळत नसेल कदाचित.
अंकुश चौधरी ओव्हररेटेड आहे असे मला नेहमी वाटते. पण सिनेमा बघूया म्हणतो.
@ श्री . गरम मसाला ची फक्त
@ श्री . गरम मसाला ची फक्त थोडी थीम आहे . बाकी चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे . पाहून घ्या महणजे कळेल .
मराठी चित्रपट कॉमेडी, ग्रामीण
मराठी चित्रपट कॉमेडी, ग्रामीण या दोनच प्रकारामध्ये अडकले आहेत. त्यामुळे थेटरमध्ये जाऊन पाहणे लोक टाळतात. अँक्शन क्लासिक ,हॉरर, थ्रिलर, सायन्स फिक्शन हे जॉनर तोंडी लावायलासुद्धा दिसत नाहीत.