आरटीओ मधून कायमचा परवाना काढण्याबाबत मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by मेधावि on 6 January, 2012 - 04:17

माझ्या मुलीला तिचे (दुचाकी गियर नसलेल्या गाडीसाठी) लर्नींग लायसन्स संपत आल्यामुळे आता परमनंट लायसन्स काढायचे आहे. आळंदी रोडला लायसन्स काढताना एजंट कडूनच काढा असे बर्याच लोकांनी सुचवले आहे. पण दीडशे रुपये फी असताना एजंट लोक ८५ ०/-रु. सांगत आहेत त्यामुळे काय करावे ह्या विचारात आहे. लर्नींग लायसन्स आम्ही स्वतःच काढले होते तेव्हा फार काही त्रास झाला नव्हता. आणि आपण तिथे "न" जाता कोणि ८५०/- मागितले असते तर एक वेळ ठीक होते पण आपण स्वतः जायचेच, १ दिवस घालवायचाच तर एजंटला पैसे देणे जिवावर येते आहे. कोणी स्वत: जावून ते काढले आहे का? खरंच स्वतःच ते काढण्यात फार कटकटी आहेत का? कुणी मार्गदर्शन करू शकेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मैत्रिणीने स्वतः जावुन काढले होते.. बरेचसे नियम वगैरे विचारतात म्हणे.. हे लर्निंगला की पर्मनंटला ते लक्षात नाही..

पण फक्त ट्रायल असेल तर एजेन्टचा काही उपयोग नाही.. एकट्याने गेलं तरी चालण्याजोगं आहे..

ते नियम लर्नींग मधे होते. तिथे एक ऑनलाईन टेस्ट असते. ते झाले आहे. आता तो ८ चा आकडा काढायला सांगतात बहुतेक. मी पुर्वी माझे लायसन्स स्वतःच काढले होते पण त्याला आता २० वर्षे झाली.

लर्निंग लायसेन्स काढल्यानंतर सहा महिन्यात परमनंट लायसेन्स काढावे लागते.

आरटीओ कार्यालयात जाऊन "अनुज्ञप्ती" विभागामधे याचा फॉर्म मिळेल. फॉर्म भरून झाल्यावर साहेब येऊन ड्रायव्हिंग टेस्ट (आठच्या आकड्याची) घेतात. व त्यानंतर ठराविक दिवसानी परमनंट लायसेन्स मिळते. फॉर्मसोबत फोटो तसेच काही कागदपत्रे लागतात. आरटीओमधे चौकशी केल्यास त्याची माहिती मिळू शकेल. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील आणि गाडी नीट चालवता येत असेल (नियम माहिती असतील) तर एजंटची जरूरी नाही. अर्थात मी रत्नागिरीमधे लायसेन्स काढले होते. पुण्याची माहिती नाही.

मग आता फक्त ट्रायल द्यावी लागेल.. वळताना हाताने इशारा करुन वगैरे.. मग तर एजंट नकोच.. कारण आता एजंट कडुन गेलो आणि ट्रायल नीट झाली नाही तरी परत ट्रायलला बोलावतात.. त्यामुळे आपले आपण गेलो तरी काही फरक पडणार नाही.. फक्त थोडा वेळ जास्त लागेल कारण ड्रायव्हिंग स्कूल वाल्यांचे वार ठरलेले असतात, एका वारी १-२ ड्रायव्हिंग स्कूल असं.. त्या लोकांच्या आधी ट्रायल्स होतात आणि नंतर एकेकटे आल्यांच्या.. असा नियम नाहिये पण त्यांची मेजॉरिटी असल्याने तसं घडतं.. आपल्याला मधे घुसता आलं तर बिनधास्त शिरायचं.. हेल्मेट घेवुन जायला सांगा बरोबर

डायरेक्ट गेल्यावर सुद्धा परवाना मिळेल.. सकाळी लवकर जाणे इष्ट.. जनरली एजंट तर्फे गेलेल्यांच्या टेस्ट नंतर असतात... 8 चा आकडा योग्य प्रकारे काढणे, पाय न टेकवता गाडी चालवणे, वळताना हात दाखवणे, हेलमेट असणे वगैरे गोष्टी बघतात..

फार कटकटी नाहीत! एजंटला पैसे देणे म्हणजे वेगळ्या रांगेतून जाणे कमी वेळात कामं होतात असा समज आहे जो चुकीचा आहे.

सुमेधा ९ ठीक आहे.. ऑफिसर्स १०-१०.३० पर्यंत येतात... ते आल्यानंतर जिथे ट्रायल होते तिथे नंबर लावणं महत्वाचं.. कारण आरटीओ ऑफिसमधे नंबर लावणे वगैरे प्रकार होत नाहीत.. शक्यतोवर ट्रायल घेणार्‍या ऑफिसरच्या आसपास रहायचं.. आणि कितिही गर्दी असेल तरी ट्रायल्स शक्यतो २ वाजेपर्यंत संपतात...

टू व्हिलरचंच असेल तर एजंट बिजंट न करता जा सरळ आपली आपण.

आता इथेच विचारून घेते. लायसन्स रिन्यू केलेल्यांनी प्लीज सांगा.
माझा लायसन्स संपत आलाय. यावर्षी रिन्यू करणे आहे. ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे त्यामुळे मे पर्यंत जगबुडी झाली नाही तर रिन्यू करेन म्हणते. Happy
२० वर्षांपूर्वी पुण्यात काढला होता लायसन्स. आता वास्तव्य मुंबईत. ह्या बदलासाठी काय करावे लागते?
परत परिक्षा बिरीक्षा द्याव्या लागतात का?
माझी मुंबईत पार्ला-अंधेरी परिसरातलं आरटी ऑफिस शोधण्यापासून तयारी आहे.

नीरजा, आधी पत्ता बदलून घे, लायसेन्स संपायच्या आधी. मग मुंबईत रीन्यू करून घे.
आपण गेलं कीही काम होतं. एजन्ट खरंच लागत नाहीत. मी माझा परवाना पुणे आरटीओमधून नवीन करून घेतला होता. सर्व पैशाची पावती मिळाली. काही त्रासही झाला नाही.

अ‍ॅज इन, पुण्याच्या परवान्यावर मुंबईचा पत्ता करून घे. परवान्याची तारीख संपायच्या आधी. मग रिन्यू करणं सोपं जाईल.
थांब, बहुधा दोन्ही एकाच वेळी करणं हे जास्त व्यवहार्य ठरावं.

पूर्ण पणे वेगळ्या शहरात परवाना काढायचा असेल तर लर्निंग पण परत काढावा लागतो.. त्यामुळे आधीचा संपण्याची वाट न बघता मुंबई मधला परवाना काढून घे नी..

परवान्यात बदललेल्या शहराचा पत्ता नव्याने समाविष्ट करून मिळत नाही? Uhoh त्यासाठी पहिल्यापासून सुरूवात करावी लागते?

त्यामुळे आधीचा संपण्याची वाट न बघता मुंबई मधला परवाना काढून घे नी..>> पण मग पहिला पुण्याचा परवाना संपवायचा, आणि मुंबईचा नवा परवाना काढायचा. असं चालेल ना?

परवान्यात बदललेल्या शहराचा पत्ता नव्याने समाविष्ट करून मिळत नाही?<<<
नाही असं होत नाही बहुतेक तरी.
पण जनरली कुणी परवाना संपायच्या आधीच नवीन पत्त्यावरचा काढायला जात नसावेत. निदान राज्य बदललेलं नसेल तर. कारण त्याने तसा फरक पडत नाही.

नाही नाही.. फक्त पत्त्याचा बदल करून घेऊ शकतो ना चालू परवान्यावरच? पत्ता बदलला की कसं बँक, महावितरण इत्यादींना कळवतो, तसं?
पण हिमांशू तर म्हणतोय की पत्ता बदल = शहर बदल असेल तर शिकाऊ परवान्यापासून सुरूवात करावी लागेल.
असो. फार चर्चा झाली Happy

माझ्यावर हा सव्यापसव्य करण्याची वेळ आली होती. माझा मुंबई आरटीओचा, लग्नाआधीच्या नावाचा परवाना पाकिट मारल्यामुळे गहाळ झाला. मग नवीन परवाना घ्यायचाच आहे तर नवीन नावाचा, नवीन पत्त्याचा परवाना घेऊ असा विचार करून गेले तर तिथल्या ऑफिसरने मला शब्दश: साष्टांग नमस्कार घालून सांगितले की बाई, तुम्ही फक्त हरवलेला जुना परवाना नवीन करून घ्या. तेवढंच आम्हाला 'बहुतेक' जमेल.
तो बहुतेक शब्द घात करेल असे वाटत होते, कारण माझ्याकडे ना जुन्या परवान्याचा नंबर होता ना प्रत होती. पण सुदैवाने परवाना दिल्याची तारीख माझ्या लक्षात असल्याने त्यांच्या गोदामात त्या तारखेच्या पोत्यात त्यांच्याकडची प्रत मिळाली आणि मला अखेर परवाना मिळाला.

वैनी तुमचा फंडा पुण्यातल्या पुण्यात चालतो... बाहेरच्या शहरातून आल्यावर नवीन लर्निंग सकट करण सोपे जाते.. इति आरटीओत काम करणारे एक काका.. सायलीच्या परवान्याचे तसेच करावे लागले आहे..

Nee punyachya Rto Madhun license cancle karayche ani ti Noc mumbaichya tuhha patta asalelya Rto la dyaychi mag nave licence milte. Punha learning chi garaj nahi.

Me atach 2 months purvi karun ghetle

अ‍ॅड्रेस चेंज करुन का नाही मिळत?? माझ्या मते मिळायला हवा. किरणने मुंबईपासुन नवी मुंबई पत्ता बदलुन घेतलेला मागे. त्यामुळे पुणे पासुन मुंबई बदलुन द्यायला पण हरकत नसावी.

सुमेधा, एजंट वगैरे नकोच. स्वतःच जा. आम्ही कायम स्वतः जाउन सगळ्या प्रकारची लायसन्सची कामं आज पर्यंत केली आहेत.

सर्वांच्या माहितीस्तव-
माझा चारचाकीचा परवाना सोलापुरच्या पत्त्याचा, जुन्या नावाने होता. मी तो नुकताच बदलुन नवीन नाव (पहिल्या नावात बदल= सबस्टॅन्शिअल चेंज) असल्याने, मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट नोटिफिकेशन आदि दाखवुन जुन्या परवान्यात बदल करुन घेतला. हे सगळे ड्रायव्हिंग स्कुल वाल्याने करुन दिले. पहिले स्कुटीचे लायसन्स मी बिना एजंट काढले होते.