रुक्मिणीदेवी अरुंदेलांच्या चेन्नईला नव्यानं सुरू झालेल्या ’कलाक्षेत्र’ गुरुकुलात तेव्हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांचं वास्तव्य होतं. रोज पहाटे गुरुदेव तिथल्या विद्यार्थ्यांसमवेत संगीत आणि नृत्याच्या अभ्यास करत. विद्यार्थ्यांशी संवाद साधत. त्यांना शिकवत आणि त्यांच्याकडून शिकतही. अशाच एका पहाटे एक विद्यार्थी त्यांना म्हणाला, "गुरुदेव, सूर्योदय अजून व्हायचाय. आकाशातल्या तारका अजूनही स्पष्ट दिसत आहेत. गार वारा वाहतोय. अशा या सुरेख वातावरणात आपण आम्हांला आपल्याला सर्वांत भावलेलं आणि आम्हांला प्रेरित करेल, असं गाणं कृपया ऐकवाल का?" गुरुदेवांनी क्षणभर विचार केला, आणि आपल्या मोकळ्या आवाजात गायला सुरुवात केली...
जनगणमन अधिनायक जय हे
भारतभाग्यविधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग...
रुक्मिणीदेवींनी नंतर पुढे कधीतरी लिहिलं, "गुरुदेव विद्यार्थ्यांसमोर राष्ट्रगीत गायले त्याला आता अनेक वर्षं झालीत. मिसेस कझिन्स यांनी गुरुदेवांच्या चालीबरहुकुम नोटेशन तयार केलं होतं तिथल्या तिथे. शोधायलाच हवं ते आता. ते नोटेशन कुठेशी हरवलं असलं तरी गुरुदेवांचा स्वच्छ, नितळ आवाज अजून मी विसरलेले नाही. एका प्रखर राष्ट्रभक्ताचा तो आवाज होता. त्या आवाजातून या राष्ट्राप्रतीचं प्रेम स्पष्ट जाणवत होतं. गुरुदेवांनी रचलेली अनेक गाणी मी त्यापूर्वी आणि नंतरही गुरुदेवांच्या तोंडून ऐकली. पण त्या पहाटे गुरुदेवांकडून ऐकलेलं ते या देशाची महती सांगणारं गाणं अद्वितीयच होतं."
१९११ साली दिल्लीत दरबार भरणार होता. पंचम जॉर्ज बादशाह त्यानिमित्तानं भारतात येणार होता. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलणार होती, आणि त्यामुळं दिल्लीत तर तयारीला उधाण आलं होतं. ब्रिटिश शासनाप्रती आत्मीयता बाळगून असणारे सर प्रद्योतकुमार ठाकुर दिल्लीतल्या तयारीवर देखरेख करत होते. बंगालची फाळणी तेव्हा नुकतीच रद्द झाली होती. म्हणून पंचम जॉर्जाचं आपण स्वागत करून आभार मानावेत, असं त्यांना वाटलं, आणि त्यासाठी एक गीत रचण्याची विनंती त्यांनी गुरुदेव ठाकुरांना केली. ही विनंती ऐकून रवींद्रनाथ चिडलेच. वंगभंग रद्द झाल्याचा त्यांना आनंद झाला असला, तरी ब्रिटिश साम्राज्यशाहीचे आभार मानावेत, त्या साम्राज्यशाहीचं स्वागत करावं, अशी त्यांची अजिबातच इच्छा नव्हती. ब्रिटिशांनी भारतात घडवून आणलेल्या काही सुधारणांचं त्यांना कौतुक होतं, मात्र ब्रिटिश साम्राज्यशाहीला त्यांचा तीव्र विरोधच होता. त्यांनी प्रद्योतकुमारांना नकार कळवायचं ठरवलं. पण स्पष्ट ’नाही’ कसं म्हणायचं? रवींद्रनाथांनी याबद्दल पुलिनबिहारी सेन यांना २० नोव्हेंबर, १९३७ रोजी लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं होतं -
’मागे एकदा माझे मित्र हेमचंद्र मलिक आणि बिपिनचंद्र पाल माझ्या घरी आले होते. त्यांनी मला एक विनंती केली. या भारतदेशाला दुर्गेची उपमा देणारं, आणि दुर्गापूजेचा संबंध राष्ट्रभक्तीशी जोडणारं एक गीत मी लिहावं, असं ते मला म्हणाले. हे गीत दुर्गापूजेच्या वेळी सर्वत्र गाऊन राष्ट्रभक्तीचं स्फुल्लिंग चेतवावं, असं त्यांना वाटत होतं. मी त्यांना ताबडतोब नकार दिला. जर केवळ साहित्यिक कारणांसाठी कोणी मला असं गीत लिहायला सांगितलं असतं, तर कदाचित मी ते लिहिलंही असतं. पण श्रद्धेचा, धर्माचा आणि राष्ट्रनिष्ठेचा संबंध लावणे हे चूकच. माझ्या मित्रांना माझी भूमिका अर्थातच पटली नाही. ते हट्टच धरून बसल्यावर मी ’भूवनमनमोहिनी’ हे गाणं रचलं. या गाण्यातून श्रद्धा, अस्सल राष्ट्रनिष्ठा यांचा प्रत्यय येत नाही, हे स्पष्टच आहे. शिवाय हिंदू नसलेल्या व्यक्तीला हे गाणं कदाचित आवडणार नाही, हेही खरं आहे. पण त्यावेळी मी ते गाणं इच्छा नसताना लिहिलं खरं. बादशाह भारतात येणार होता, तेव्हाही असंच घडलं होतं. एका स्नेह्यानं केलेल्या विनंतीला नकार देऊनही तो हट्टच धरून बसल्यावर मी त्याला गाणं लिहून दिलं. पण त्या गाण्यात बादशाहाची थोरवी गायली नव्हती. ’जनगणमन अधिनायक’ हे गाणं भारताच्या भाग्यविधात्याची थोरवी सांगणारं गाणं आहे. खडकाळ, कठीण मार्गावरून या देशाला, इथल्या नागरिकांना मार्गक्रमण करण्यास मदत करणार्या त्या भाग्यविधात्याप्रती आदर व्यक्त करणारं ते गाणं आहे. माझे स्नेही सरकारी अधिकारी असले तरी ते बुद्धिमान होते. त्यांच्या निष्ठा ब्रिटिशांप्रती असल्या तरी पंचम किंवा षष्ठ जॉर्ज या देशाचा भाग्यविधाता असूच शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं.'
पंचम जॉर्ज बादशाहाच्या स्वागतासाठी मग दक्षिणाचरण सेनांनी गाणं रचलं, आणि गुरुदेवांनी रचलेलं ’जनगणमन’ २७ डिसेंबर, १९११ रोजी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं. अधिवेशनाची सुरुवात ’वंदे मातरम’नं झाली होती, आणि शेवटच्या दिवशी ’गाहा आज हिंदुस्तान’ हे गीत गायलं गेलं. ’जनगणमन’ अधिवेशनात गाण्यात आलं, त्याच्या आधी काँग्रेसनं बादशाहाचं स्वागत करणारा, आणि वंगभंग रद्द केल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव मांडला होता. गुरुदेवांनी रचलेलं गाणं हे बादशाहाचं गुणगान करणारं आहे, असा गैरसमज त्यामुळे लगेच पसरला. अर्थात काव्याची जाण असणार्या राष्ट्रभक्तांना ’जनगणमन’च्या सामर्थ्याची चांगलीच कल्पना होती. देशबंधू चित्तरंजन दासांनी गुरुदेवांच्या घरी जाऊन हे अद्वितीय गाणं रचल्याबद्दल त्यांचा सत्कार केला होता. नेताजी सुभाषचंद्र बसूंनी १९४२ साली 'आझाद हिंद सरकार'ची स्थापना केल्यावर ’जनगणमन’ला राष्ट्रगीताचा दर्जा दिला होता. महात्मा गांधीही अनेक सभांमध्ये हे गाणं गाणाच्या आग्रह धरत असत. २४ जानेवारी, १९५० रोजी ’जनगणमन’ची भारताचं राष्ट्रगीत म्हणून निवड झाली.
आपलं राष्ट्रगीत सर्वप्रथम गायलं गेलं त्याला शंभर वर्षं पूर्ण होत असताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. बावन्न सेकंदांचं हे गाणं आपल्या मनात आपल्या देशाविषयीचा अभिमान निर्माण करतं. हा देश आपला आहे, या देशाशी आपलं नातं आहे, याची लखलखीत जाणीव हे गाणं आपल्याला करून देतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याला आता अनेक दशकं लोटली. गुरुदेवांनी ज्याची आळवणी केली, तो ’भारतभाग्यविधाता’ही या देशाचा गाडा मार्गी लावू शकणार नाही, असं वाटण्याइतपत परिस्थिती बदलली आहे, असं कधीकधी वाटतं. आपण सारे एक आहोत, आणि आपल्या सर्वोच्च निष्ठा या देशाप्रतीच आहेत, अशा भावना राष्ट्रगीत गाताना निर्माण होतात. पण सर्वत्र माजलेलं अराजक, जातीय आणि धार्मिक विद्वेष, आर्थिक व नैतिक भ्रष्टाचार, सामाजिक न्यायाचा अभाव यांच्या पार्श्वभूमीवर ’जनगणमन’चे सूर क्वचित विसंगत वाटतात.
’जन गण मन’ हा चित्रपट २६ जानेवारी, २०१२ रोजी जगभरात प्रदर्शित होतो आहे. सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत काम करणार्या एका ध्येयनिष्ठ शिक्षकाची, आणि त्या गावातल्या विद्यार्थ्यांची, तिथल्या सामाजिक विषमतेची कहाणी सांगणार्या या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत मायबोली.कॉम.
यानिमित्तानं मायबोलीवर आम्ही घेऊन आलो आहोत अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम!
राष्ट्रगीताशी आपली पहिली ओळख अर्थातच शाळेमध्ये होते, आणि मग आपल्या आठवणींमध्ये राष्ट्रगीताला महत्त्वाची जागा मिळते. सुरुवातीला राष्ट्रगीतचं महत्त्व, अर्थ असं काहीही न समजता जोरजोरात म्हटल्याची आठवण असो, किंवा अर्थ समजल्यावर मनापासून म्हटलेलं राष्ट्रगीत असो, सुरात गाणार्यांना स्टेजवरून राष्ट्रगीत म्हणताना पाहण्याची आठवण असो, किंवा स्वतः स्टेजवरून राष्ट्रगीत म्हणण्याची आठवण असो! बरंच काही आठवतं... शाळेत, एखाद्या कार्यक्रमात किंवा अगदी चित्रपटगृहातही उभं राहून मोकळ्या आवाजात हे गाणं म्हणणं हा विलक्षण अनुभव असतो. समोर पडद्यावर मूकबधिर मुलं असोत, किंवा सियाचीनला तैनात असणारे आपले शूर सैनिक, त्यांच्यासह ’जनगणमन’ आळवताना ’देश माझा, मी देशाचा’ ही भावना प्रबळ होते.
परदेशात आपलं राष्ट्रगीत ऐकण्याचा आणि म्हणण्याचा अनुभवही आगळाच! आज शिक्षणानिमित्त, कामानिमित्त देशाबाहेर वास्तव्य करणार्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे. परक्या भूमीत 'जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता' ऐकताना, म्हणताना मन उचंबळून न आलं तरंच नवल. परदेशात राहताना, तिथल्या समाजात मिसळताना त्या त्या देशाचं राष्ट्रगीत ऐकण्याची, समजून घेण्याची संधी हाही एक निराळाच अनुभव असतो. आपल्या भारतात राष्ट्रगीताचा केला जाणारा सन्मान, राष्ट्रगीताचा इतिहास इत्यादी गोष्टींची तुम्ही राहत असलेल्या देशाच्या राष्ट्रगीताच्या परंपरेशी तुलनाही क्वचित केली जाते. किंवा आपण पाऊलही न ठेवलेल्या देशाचं राष्ट्रगीत शब्दांमुळे, चालीमुळे मनात घर करून राहतं.
आपल्या लाडक्या राष्ट्रगीताच्या शताब्दीवर्षाच्या निमित्तानं अशा असंख्य आठवणींना आपण उजाळा देऊयात. 'जनगणमन'शी संबंधित आठवणी, अनुभव, दुसर्या देशांची राष्ट्रगीतं, तिथले अनुभव, आठवणी आपण समस्त मायबोलीकरांना सांगूयात!
ही स्पर्धा नसून कार्यक्रम आहे. शब्दसंख्येचं बंधन नाही. अट फक्त एकच. तुमच्या आठवणी, अनुभव कृपया याच बाफवर प्रतिसादात लिहाव्यात. त्यासाठी वेगळा बाफ उघडू नये.
शाळेत, एखाद्या कार्यक्रमात
शाळेत, एखाद्या कार्यक्रमात किंवा अगदी चित्रपटगृहातही उभं राहून मोकळ्या आवाजात हे गाणं म्हणणं हा विलक्षण अनुभव असतो. समोर पडद्यावर मूकबधिर मुलं असोत, किंवा सियाचीनला तैनात असणारे आपले शूर सैनिक, त्यांच्यासह ’जनगणमन’ आळवताना ’देश माझा, मी देशाचा’ ही भावना प्रबळ होते. >>> किंवा खेळाच्या मैदानावर जेव्हा याची धुन वाजते तेव्हा...
चित्रपट्गृहात ती सियाचिनची क्लिप पाहताना तर माझे दरवेळी डोळेच भरून येतात.
माझ्या लहानपणी चित्रपट
माझ्या लहानपणी चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीत थिएटरमधे ऐकवत असत. तो काळ आणीबाणीच्या पुर्वीचा, पण बांगला देशच्या मुक्तीलढ्यानंतरचा. तसा शांतीचा काळ आणि त्यामूळेच कि काय, शहरातील लोकांत राष्ट्रभावना तितकिशी प्रबळ नव्हती. लोक राष्ट्रगीताचा मान न ठेवता, थिएटरबाहेर चालू पडत. मग पुढे ते दाखवणे बंदच झाले.
आणीबाणी ते कारगील या काळात परत सामान्य लोकांत राष्ट्रीय एकात्मकतेची भावना वाढीला लागली. मग परत थिएटरमधे ते दाखवायला लागले. ९९ टक्के लोक ऊभे राहून राष्ट्रगीताचा मान ठेवतात. क्वचित काही जण बसून राहतात, पण बाकीचे त्यांना ऊभे राहण्यास भाग पाडतात. हे बघून खरेच आनंद वाटतो.
---
राष्ट्रगीताबद्दल आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. नायजेरियात तिथल्या सरकारच्या प्रेरणेने मोठा खत कारखाना ऊभारला जात होता. त्यानिमित्त एक कार्यक्रम होता. स्थानिक लोकांनी अनेक लोकगीते आणि नृत्य सादर केली.
आम्ही भारतीय प्रेक्षक म्हणून होतो. त्यानी आम्हाला गाणे म्हणण्याचा आग्रह केला.
आम्ही भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेले १५/२० जण होतो.
आम्हाला सर्वांना पाठ असलेलं, चालीवर म्हणू शकू असे एकच गाणे आठवले. ते अर्थातच राष्ट्रगीत.
आम्ही सर्वांनी ते म्हणायला सुरवात केली, नकळत एकमेकांचे हात घट्ट धरले गेले, आणि त्या गाण्याला स्थानिक लोकांनी उस्फुर्त ताल दिला. आजही ते आठवले कि अंगावर रोमांच उठतात.
राष्ट्रगीत हा तर प्राथमिक
राष्ट्रगीत हा तर प्राथमिक शाळांच्या रोजच्या प्रार्थनेचा महत्वाचा भाग. पहिली ते सातवी चौदा रांगा करून शाळेसमोर जोरजोरात ओरडून गायलेले राष्ट्रगीत आजही आठवते. सातवीच्या मुलामुलींचा एक दहाजणांचा ग्रूप समोर उभा राहून माइकवरून राष्ट्रगीत म्हणायचा त्यांच्यापेक्षा मोठा आवाज निघावा म्हणून समोरचे सगळी ताकद लाऊन ओरडायचे. आता एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत गाण्याची वेळ आली तर आवाज कमी राहील याकडे लक्ष ठेवावे लागते.
दिनेशदा, नायजेरियातली आठवण
दिनेशदा, नायजेरियातली आठवण सहीच!!
कभी खुषी कभी गम - एक अत्यंत
कभी खुषी कभी गम - एक अत्यंत बेगडी चित्रपट. पण त्यातल्या एका प्रसंगात जेंव्हा 'जन गण मन' बघितले तेंव्हा 'रोमांचीत होणे' याचा अनुभव आला. आयुष्यात फार कमी वेळा अनुभवलेल्या सुवर्ण-क्षणांपैकी तो एक होता.
भारतावर, भारतीय संस्कृतीवर (तिच्या दोषांसकट) प्रेम करणारी आई. तिच्या समोर तिचा मुलगा शाळेच्या (ते ही इंग्लंडमधल्या) वार्षिक संमेलनात जेंव्हा भारताचे राष्ट्रगीत गातो तेंव्हा डोळ्यात पाणी न येते तरच नवल होते. करण जोहरला त्या प्रसंगातून नक्की काय सांगायचे होते ते मला माहित नाही पण कळत-नकळत त्याने माझे स्वप्न पडद्यावर दाखवले आहे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केले त्यांच्याच देशात एक सामान्य भारतीय भारताचे राष्ट्रगीत गातोय आणि त्याला ब्रिटीश लोक उठून उभे राहिलेत.
एक ख्वाबसा देखा है तावीर कब बनेगी?
कॉलेजात असताना काही काळ
कॉलेजात असताना काही काळ 'विवेकानंद केंद्रासाठी' स्वयंसेवक म्हणून काम केले. त्या वेळी प्रत्येक स्वातंत्र्यदिन तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आसपासच्या कुठल्यातरी एखाद्या खेड्यातील शाळेतून आम्ही बाल संस्कार शिबीर घेत असु. त्यापैकी एक शिबीर आम्ही करमाळा तालुक्यातील 'कवे' या गावी घेतले होते. ध्वजवंदनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. एकीकडे शाळेतील सगळी मुले 'सावधान' मुद्रेत ध्वजाला प्रणाम करून 'जन गण मन' म्हणत होती आणि नेमके त्याच वेळेला शाळेचे एक शिक्षक तंबाखु चोळण्यात मग्न होते. राष्ट्रगीत होइपर्यंत आम्ही (मी, बसवराज देशमुख (सोलापूर शाखेचे सचिव) आणि सुहास देशपांडे (एक केंद्र कार्यकर्ता) शांत राहीलो. पण राष्ट्रगीत संपताच जावून त्या शिक्षकाची खरडपट्टी काढली. त्यावर त्याचे स्पष्टीकरण अजबच होते.....
म्हणे खरेतर वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत व्हायला हवे होते. 'जन गण मन' ला मी राष्ट्रगीत मानत नाही. असा संताप आला त्या माणसाचा. हा अनुभव त्यानंतरही खुप वेळा आला. आताही आंतरजालाच्या मदतीने अनेकजण याला फाटे फोडण्याचा प्रयत्न करत असतात. जन-गण-मन आज राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारले असल्याने त्याच्या इतिहासाची पाने उघडून "बिटवीन द लाईन्स" शोध घेण्याचे जे काही प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने आंतरजालाच्या माध्यमातून चालले आहेत ते पाहुन विषण्णता वाटते.
असो, या निमीत्ताने...
मुळ गीताची पाची कडवी ! यातले पहीले कडवे आपले राष्ट्रगीत म्हणून स्विकारले गेले आहे.
जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||
अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री
तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री
दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे
संकंट दुखयात्रा
जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||
घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल रविच्छवि पुर्व उदयगिरि भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले
तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||
स्त्रोत : विकीपिडीया
९९ टक्के लोक ऊभे राहून
९९ टक्के लोक ऊभे राहून राष्ट्रगीताचा मान ठेवतात. >>> ह्यावरुन ज्युनीयर कॉलेजचे दिवस आठवले. आमच्या कॉलेजच्या बिल्डींग समोरच शाळेची बिल्डींग...कॉलेजला येताना रोड क्रॉस करावा लागत असे. बरेचदा उशीर झाला असला की सकाळी शाळेत म्हटलं जाणारं राष्ट्रगीत रोड क्रॉस करतानाच कानांवर यायचं आणि..झपाझप उचलली जाणारी पावलं तिथेच थबकायची..राष्ट्रगीत संपलं की मग आम्ही आमच्या वाटेला..कितीही उशीर झाला असला तरी. एकदा तर अगदी रोडच्या मधेच उभ्या होतो राष्ट्रगीत चालु असताना..दोन-तीन गाड्या तेवढ्या थांबल्या होत्या...फार नाही...पण कुणीच रागावलेलं आठवत नाही
आताही गिरगावात माझ्या सासरी आमच्या बिल्डींगच्या समोरच एक शाळा आहे. सकाळच्या कामांमध्ये माझं घर आणि कॉरीडर मध्ये सारख्या आत बाहेर खेपा होतात. पण कितीही घाई असली तरी त्या शाळेतलं राष्ट्रगीत कानांवर येताच आपोआप पाऊलं जागच्याजागी थबकतात आणि काही सेकंद उभं रहायला लावतात ते संपेपर्यंत...'यु आर नेव्हर सो लेट टु नॉट स्टॅन्ड स्टिल फॉर नॅशनल अॅन्थम' ही शाळेतली शिकवण अंगी बाणली गेलीये बहुदा.
चित्रपट्गृहात ती सियाचिनची क्लिप पाहताना तर माझे दरवेळी डोळेच भरून येतात.>>> अगदी अगदी..ते मी एकाच थीएटरला पाहिलंय आतापर्यंत पण संपेपर्यंत समोरचा पडदा धुसर झाला होता नक्कीच!
ती सियाचिनची राष्ट्रगीताची
ती सियाचिनची राष्ट्रगीताची क्लिप पहाताना खरंच डोळे भरुन येतात.
तशीच एक होती मुक मुलांचं राष्ट्रगीत.
दुपारी वर्ल्डकपची फायनल सुरवातीपासुन पार टॉस उडवतानापासुन बघायची म्हणुन टीव्ही लावलेला आणि अचानक राष्ट्रगीत चालु झालं स्टेडियमवर. अक्षरशः अंगावर काटा येणं कशाला म्हणतात ते अनुभवलं होतं. सगळे खेळाडु उभे आणि सगळ्यांचे डोळे पाणावलेले. धोनीने तर राष्ट्रगीत संपता संपता डोळे टिपलेलेही दिसलं.
इथे परदेशात वावरताना, १५
इथे परदेशात वावरताना, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीचं थेट प्रक्षेपण राष्ट्रगीतासाठी आवर्जून बघीतलं जातं
दिनेशदां आणि लली + १. योडी अगदी अगदी
दिनेशदा नायजेरियातला किस्सा खासच
महत्त्वपूर्ण माहिती.
महत्त्वपूर्ण माहिती. धन्यवाद.
जन गण मन शी जोडलेल्या शाळेतल्या आठवणी प्रत्येकाकडे असतीलच. मला आठवते ती पाचवीत असतानाची गोष्ट, शाळेत राष्ट्रगीत सुरु झाले. हायस्कूलचा पहिलाच आठवडा होता. अजून शिस्तीची सवय कुणालाच झाली नव्हती. बाई वर्गात आल्या नव्हत्या तोपर्यंत. इतका दंगा चालू होता की माईकवरुन सुरु झालेले राष्ट्रगीतही कुणाला ऐकू आले नाही! आख्ख्या शाळेत शांतता आणि आमच्या वर्गाचा टीपेचा आवाज! राष्ट्रगीत सुरु झाल्याने बाई वर्गात येता येता समोर अंगणातच थांबल्या आणि तिथून त्या रोखून वर्गाकडे पाहत होत्या. जनगणमन संपल्यावर त्या वर्गात आल्या आणि त्याची रागीट नजरच पुरेशी ठरली. त्यांनी सर्वांना वर्गाबाहेर काढलं आणि शाळेच्या अंगणात बरोबर मध्यभागी उभं केलं. दोन्ही हात वर करुन एक तास उभं राहण्याची शिक्षा. बाई तिथेच उभ्या राहिल्या उन्हात. येता जाता इतर शिक्षिका त्यांना विचारायला लागल्या तेव्हा शरमेने मान खाली गेली आमची.पंधरा मिनिटातच हात भरुन आले. मुली घाबरल्या. रडायला लागल्या. पुन्हा असं करणार नाही, म्हणू लागल्या. तेव्हा अर्ध्या तासानंतर हात खाली करायला सांगितले. राष्ट्रगीत, त्याचं महत्व सारं बाईंनी समजावलं. आणि पाचवीतल्या मुलींना राष्ट्रगीताचा अर्थ लिहीता येणार नाही म्हणून दुसर्या दिवशी प्रतिज्ञेचा अर्थ लिहून आणायला सांगितला. काय लिहीला होता ते आता आठवत नाही पण दुसर्या दिवशी माझी वही बाईंनी वर्गात वाचून दाखवली होती.या घटनेचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला टीव्हीवर लागलेले राष्ट्रगीत ऐकू आले की मी झटकन गादीतूनही उठून ताठ स्तब्ध उभी राहत असे!
महत्व पूर्ण माहिती.दिनेशदा
महत्व पूर्ण माहिती.दिनेशदा नायजेरियाचा किस्सा खासच:)
माझ्या शाळेमधे प्रार्थना
माझ्या शाळेमधे प्रार्थना (पसायदान), राष्ट्रगीत आणि शेवटी प्रतिज्ञा असा क्रम असायचा.
आठवी/नववी मधली ४/५ मुलं आणि मुली स्टेजवरून प्रार्थना म्हणत. बाकी आम्ही सर्वजण समोर. आजारी मुलांना व्हरांड्यामधे उभं राहण्याची सवलत होती. पण कोणी ना कोणी बघून जाई, की खरंच बरं नाहीये, की फक्त इच्छा नाहीये. प्रार्थना चालू असताना जर कोणी एकमेकांशी बोलताना दिसलं तर आमचे पीटीचे सहाफूट भोसले सर त्या मुलाकडे अतिशय प्रेमाने बघत. आणि प्रार्थना संपली की त्या आणि त्याच्या सर्व बांधवांवर खूप प्रेम करत असत. राष्ट्रगीतावेळी हालचाल झाली की बोनस.
स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गायले जाणारे राष्ट्रगीत अगदी खास असायचं. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख - भागवत सर काही मुलांकडून ढोलताशा, एक त्रिकोणी आकाराचं (मेटलचं) वाद्य (हे मधेमधे टींग-टींग असं वाजायचं ) , बासरी वगैरे पाचसहा वाद्यांचा वाद्यवृंद घेऊन राष्ट्रगीताची धुन बसवत असत. हे दोन दिवस धरून वर्षातून फार फार तर आठदहा वेळाच हे असे. पण मस्त वाटायचं.
एनसीसी / आर एस पी / गाईड मधली मुलं मुली, काही ठराविक दिवशी तो-तो ठराविक गणवेश घालत असत. इतर सगळे मात्र नेहेमी पांढरा शर्ट खाकी पँट. गुरुवारी बिगर ड्रेस
काही वर्षांपूर्वी जपान एम्बसीमधे राष्ट्रगीत ऐकण्याचा योग आला, तेव्हा मन भरून आलं! परप्रांतात गेल्यावर आपल्या भारतीयतत्वाची जाणीव करून देण्यासाठी, राष्ट्रगीतासारखं काहीच नाही. सर्वजण स्तब्ध आणि नजर राष्ट्रध्वजाकडे!
काल इथे जुबैल सौदी अरेबिया
काल इथे जुबैल सौदी अरेबिया मधे मी राहतो त्या बिल्डिंग मधे नववर्ष दिनाचा कार्यक्रम साजरा झाला. बहुसंख्य तेलगु मंडळीं बरोबर मी व माझा मित्र सहभागी झालो होतो. कार्यक्रमाचा शेवट एका सर्वात लहान असणार्या मुलाच्या जनगणमन.. गायनाने झाला. हा मुलगा इतका लहान की तो नुकतेच सलग तेलगु वाक्ये नीट बोलायला शिकला आहे. त्याला बिल्डिंगमधल्याच एका काकांनी कडेवर घेतले होते. त्याच्या कोवळ्या आवाजात आम्ही मोठ्यांनी केव्हा आपले आवाज मिसळले कळलेच नाही. अनेक दिवसांनी "ती" खास भावना अनुभवली.
राष्ट्रगीतासंबंधीच्या आठवणी
राष्ट्रगीतासंबंधीच्या आठवणी ..वॉव.
शाळेत सुरेल मुलामुलींना राष्ट्रगीत गाण्याची संधी लाभत असे त्यात मी. त्यामुळे पब्लिक खुन्नस खाऊन असायचे. आणि रोज कोणी ना कोणीतरी लवकर आटपा असे सांगायचे.
एकदा चांगले पीजीला कुठल्याश्या महत्वाच्या कार्यक्रमात पसायदान आणि राष्ट्रगीत गायचे होते. पसायदान उत्तम झाले. आणि राष्ट्रगीत!!! देवा!!! ५२ सेकंदापेक्षा जास्त झाले म्हणून प्राचार्यांनी चांगली खरडपट्टी काढली. मला का कोण जाणे 'जय हे' ला उगाचच गायकी दाखवायची हुक्की आली होती, त्याने एकुणात जास्त वेळ लागला. बापरे एकोणीसाव्या वर्षी साध्या शब्दात खाल्लेली झाप इतकी लागली की त्यापेक्षा दोन थोबाडीत खाल्लेल्या परवडल्या असत्या. त्यानंतर आयुष्यात कधी 'शो ऑफ' करायचा मोह व्हायचे फारच कमी ओकेजन्स आले.
नंतर काही वर्षांनी रेहमानचे नवीन ठाय लयीतले राष्ट्रगीत आले, तेव्हा मला हटकुन प्राचार्यांची आठवण येत असे. एकदा कुठल्याश्या कार्यक्रमात तोक्योला म्हणायचे होते. पब्लिकने आग्रह धरला की रेहमानचे म्हण. प्राचार्य किमान तिन समुद्रापार लांब होते, पण म्हणले नको. मी म्हणायचे असेल तर नेहमीचेच म्हणणार फॅशनीचे नाही.
परदेशात राष्ट्रगीत म्हणताना मात्र खरंच भरुन येत असे. घशात दुखत असे आणि मला वाटतं मनातही. हे अतिशयोक्ति किंवा मेलोड्रामॅटिक वाटण्याचे माझे तरी 'माज' दिवस संपले. वय वाढले. शब्दांना अर्थ मिळाला.
२०११ विश्वचषक अंतिम खेळाच्या दिवशी मायबोली गटग होते. खेळ सुरु होताना, राष्ट्रगीताला सगळी पोरंटोरं आणि अर्थातच आम्ही मोठेही उभे राहिलो. फार छान वाटले.
माझी मुलगी अगदी लहान असल्यापासून राष्ट्रगीत म्हणायची. कुठेही. एक टोपली उपडी टाकुन त्यावर उभे राहुन त्याचे स्टेज करुन अगदी धोशात म्हणत असे.
http://www.youtube.com/watch?v=n2rQN8guEDM
ते रेहमान चे जनगणमन आहे ते
ते रेहमान चे जनगणमन आहे ते चूक आहे ना? चार वेळा "जय हे" म्हणतात ते गायक आणि अजून कोणिच केस कशी नाही टाकली? कुठे तक्रार करायची काही कल्पना...? (ते fame cinema थिएटरमध्ये दाखवतात ते, भारतबाला कम्पनीचे..)
राष्ट्र्गीत आक्षेप व खंडनः
राष्ट्र्गीत आक्षेप व खंडनः
Jana Gana Mana - an explanation by Mr P L Deshpande
In the issue of 3 May 1980 of Maharashtra Times of Mumbai I read a letter by Mr Bal Jere. He states that Ravindranath Tagore definitely composed the famous song Jana Gana Mana to welcome King George V. In support of his argument he refers to the issues of contemporary Anglo-Indian papers like the Statesman and the Englishman.
[ Note - The term Anglo Indian does NOT mean people of mixed race. It means British people in India. The papers run by them were called the Anglo-Indian Press, whereas papers run by Indians were called the Native opinion] Reuter, the famous English news-agency had also reported in a similar fashion.
However, the report of the annual session of the Indian National Congress of December 1911 does not say that Jana Gana Mana, which Mr Jere supposes to have been composed for welcoming King George V, was sung at its session for that purpose. The news item is like this -
On the first day of 28th annual session of the Congress, proceedings started after singing Vande Mataram. On the second day the work began after singing a patriotic song by Babu Ravindranath Tagore. Messages from well wishers were then read and a resolution was passed expressing loyalty to King George V. Afterwards the song composed for welcoming King George V and Queen Mary was sung. Thus there is clear distinction between the song composed by Tagore and the one composed by some one else for welcoming King George V and Queen Mary.
Now let us turn to the issue of Amritbazar Patrika dated 28 December 1911. It reported, "The proceedings of the Congress party session started with a prayer in Bengali to praise God (song of benediction). This was followed by a resolution expressing loyalty to King George V. Then another song was sung welcoming King George V.
On 28 December The Bengalee (paper of Surendranath Banerjee) reported, "The annual session of Congress began by singing a song composed by the great Bengali poet Babu Ravindranath Tagore. Then a resolution expressing loyalty to King George V was passed. A song paying a heartfelt homage to King George V was then sung by a group of boys and girls."
Thus it is quite clear that in the official record of the Congress Party as well as in the newspapers run by Indians, that the song composed by Ravindranath Tagore was a patriotic song, and that the song that was sung afterwards welcoming King George V was NOT Jana Gana Mana. The Anglo-Indian papers did not know the difference between the two songs and therefore created a wrong impression.
Just one month after the annual session of Congress, i.e. in January 1912 Jana Gana Mana was published in the Tatvabodhini Patrika of Adi-brahmosamaj under the title Bharata Bhagya Vidhata, alternative title of the song is Brahmasangeet. The central theme, expressed by the phrase 'Bharat Bhagya-Vidhata' refers to the Avatar - descent of God - appearing in every age to destroy the evil and to protect the righteous. This is made clear in the third verse of the song.-
Patan abhyudaya bandhure pantha, yugayuga dhavit yatri
Tum chirasarathi tava rathachakray mukharita path dinaratri
Daruna viplava majay tava shankhadhwani bajay Sankata dhukha trata
Jana gana partha parichayaka jaya hay
Bharata bhagya vidhata
The phrase Chirasarathi (charioteer) clearly refers to the god Krishna in the Bhagvat-Gita, who is the 'Eternal Charioteer guiding the pilgrims who experience highs and lows as they travel along life's path. The poet says, "In my dire difficulty the sound of your conch reassures me." The blowing of a conch at the start of any religious ceremony and before a 'just war' (dharma-yuddha) is an ancient Indian / Hindu tradition. It gives us inspiration. In Bengal, even today, a conch is sounded at the beginning of an auspicious ritual (mangal karya). Those who are familiar with Hindu philosophy would know that the song celebrates the victory of the 'Eternal Charioteer' the god Krishna. The pro-British Anglo-Indian press, through ignorance, assumed the song to be a welcoming song for the King Emperor. In those days, during its annual sessions, the Congress invariably passed a resolution expressing loyalty to the British Crown. Moreover, in December 1911 King George V and his Queen were already in India (Delhi Darbar was held on 12 December 1911). So the reporters of the Anglo-Indian papers got mixed up, put two and two together and assumed that the song 'Jana Gana mana' was composed by Tagore to welcome the Emperor. But the British administrators in India were fully aware that Tagore did not support British Imperialism.
Just one month after Jana Gana Mana was sung at the Congress session, Director of Public Instructions (as it was called in those days. We would now call him Director of Education) for East Bengal issued a secret circular. Somehow it was discovered by the paper Bengalee and they published it in their issue of 26 January 1919. The circular had banned Government servants from sending their children to Shantiniketan. It also warned that if children remained in Shantiniketan, it will affect the service of those parents. After this threat many government servants withdrew their children from Shantiniketan, which was seriously affected by this Government circular.
Mr Prabodhachandra Sen says, "If Ravindranath had sunk so low that he would praise the British King Emperor, there was no need for such a government directive." Any one who has studied the life of Ravindranath knows that right from the start the British Authorities in India viewed his school Shantiniketan with suspicion.
We find the concept of Bharata Bhagya Vidhata in Tagore's novel Gora, one year before the song was composed. Towards the end of this novel, Gora the hero of the novel says to Pareshbabau, '…… only you possess the liberation mantra, that is why you have not gained any position of authority in any sect. Consider me your child and give me the mantra honouring a deity, respected by all sects (Hindu, Muslim, Christian, Brahmo and all others). The door to that deity's shrine will never be closed to people of any community, or person at any time. That deity is not just of Hindus but of all the people in this land, Bharatavarsha.
The glorification of the deity of all India is central to the idea of 'Bharata-bhagya-vidhata' in the song 'Jana-Gana-Mana.' Tagore has repeated that idea many times in his prose and poetry. One of his poems begins with the lines :-
Desha desha nanadita kari mandrita tava bheri
Ashilo jo to veera vrinda asana tava gheri.
[Your war drums and trumpets respond in all parts of India, blessing the brave who surround your throne.]
That poem, honouring the Supreme Deity, also used to be sung at the Congress Sessions.
The Poet says further
Jana gana patha tava
Jayaratha chakramukhara aaji
Spandita kari dig
Diganta uthilo shankha aaji
Meaning "The path followed by countless humans, today, reverberates by the sound of your chariot's wheels. Make all directions vibrate by the sound of your conch."
Thus, even before composing the song Jana Gana Mana, Tagore had been invoking the great God for arousing the masses and making them aware of their heritage and raising our self-respect. Ravindra Nath's mind had been nurtured through the study of the Upanishadas, and because of it, he was obviously attracted by the idea of God's Avatar on earth for the destruction of the evil.
Mr Jere refers to the paper Statesman which in December 1911 describes the song - Jana Gana Mana as a welcoming song for the King Emperor and in 1917 the same paper described it as 'a national (patriotic) song' while referring to the annual session of Congress in that year. How can the song serve two widely different purposes? Moreover in 1917 the Congress passed from being controlled by Moderates into the hands of Militants. At the annual session of Congress in 1917 Deshbandhu Chittaranjan Daas drew attention to this song and said, " It is a song for glory and victory of India." How can a great patriot from Bengal, like Daas who was an erudite scholar say that the song sung to welcome King George V was also a song for glory and victory of India? That is absurd.
Now let us see what Ravindranath himself has said about the reason behind composing Jana Gana Mana. For a number of years, a rumour was spreading that Tagore composed Jana Gana Mana to welcome King George V at the request of a high ranking government officer. On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. Ravindranath says, " I was stunned to hear of the request by a high ranking government officer. I was furious. In the song Jana Gana Mana I have praised the God Bharat Bhagya Vidhata who is the constant charioteer of travellers through the ages, he who guides through all the difficult circumstances, he who is born in many ages. He can never be King George V or VI or any other George. That truth dawned on my 'Loyal friend', because however strong his loyalty to the foreign rulers was, he was not devoid of intelligence. I also did not compose this song especially for the Congress."
Again in his letter of 19 March 1939 he writes, " I should only insult myself if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind.
(Purvasa, Phalgun, 1354, p738.)
Mr Jere is not therefore correct in saying that Ravindranath never gave any explanation. I accept Tagore's explanation as the spirit behind this song. During our freedom struggle, outstanding patriots from Bengal like Chittaranjan Daas and Subhashchandra Bose, had praised this song (Jana Gana Mana) as Patriotic and National. Thousands had sung it for gaining inspiration during our freedom struggle. Whatever has been written by those who did not like Tagore, must be discarded. Just as we must discard remarks about Shivaji by merchants of East India Company or Muslim chroniclers. In their opinion Shivaji was nothing but a bandit and was worth sending to hell. How can we rely on anti-Tagore Anglo-Indian papers or the likes of 'Shanivarer Chithi'? Mr Jere relies on the book Indian National Anthem edited by Mr Prabodhachandra Sen and published by Vishvabharati, which quotes Statesman and Shanivarer Chithi. But the same book also contains the references that I have quoted. Why did not Mr Jere consider those? The book also contains remarks by Tagore.
I want to say something in passing. Vande Mataram by Bakimchandra was also a favourite song of Ravindranath. In December 1896 Congress held its annual session in Calcutta. On the very first day Tagore selected a tune for this song and sang it. He called it an inspiring song, before the session started to deal with various matters. From this day onwards Vande Mataram used to be sung at annual sessions of the Congress. After setting it to music Tagore sang that song to Bakimchandra. We find this information in Anandbazar Patrika (5 Ashwin Vangashaka 1344).
Which one should be our national anthem? Vande Mataram or Jana Gana Mana? That is a separate issue. I consider both to be superb patriotic songs. But to denounce Jana Gana Mana without realising the meaning behind it and to say that it was composed to welcome King George V is insulting to Tagore. It is demeaning to the noble concept of the Charioteer through all the ages. We must study the full meaning behind that song and treat it with respect and without preconceptions.
I have written this letter to dispel misunderstanding of Mr Jere as well as your readers. Hence the long letter.
P L Deshpande Maharashtra Times
16 May 1980
---------------------------
A note by Dr V S Godbole of Bedford, England, who collected all the details about this song.
We also need to bear in mind that during the Delhi Darbar of December 1911, King George V had to openly declare that the partition of Bengal was annulled. The constant public agitation of eight years had born fruit. It was therefore natural for the Moderate leaders of the Indian National Congress to rejoice and welcome the King Emperor.
Readers should also refer to Bhagvat-Gita, chapter four- stanzas 7 and 8
Yada yada he dharmasya, glanirbhavati Bharat
Abhyuthanam adharmasya, tadamananm srujamyaham ||7 ||
Oh Arjuna, whenever the righteousness (Dharma) is in decline and evil spirit (Adharma) is spreading, I am born on the Earth (Avatar)
Paritranadaya sadhunam, Vinashaya cha dhushkrutam
Dharmasanthapanarthaya sambhavami yuge yuge || 8||
For defending and protecting the righteous people and for destruction of the devils
I am born in various ages for re-establishing Dharma.
This is the concept of Bharat Bhagya Vidhata in Tagore's poem.
by V S Godbole, London
Ref: http://satyashodh.com/janaganaman/index.htm
Readers can see song sung at
Readers can see song sung at Delhi Darbar to welcome King George V on same link @the end with Bengali text and its English meaning, also Tagore's own interpretation in his handwriting is available
http://satyashodh.com/janaganaman/index.htm
रैना, ३ समुद्र लांब! मस्त
रैना, ३ समुद्र लांब! मस्त आठवण. आणि ते हॉटेल प्रेसिडेंटमधले राष्ट्रगीत मी विसरलेच होते. एका क्षणात गटगचं सारं वातावरण किती बदलून गेलं होतं नाही? धन्यवाद.
तक्रार, आक्षेप, मते, चर्चा यासाठी वेगळा बाफ काढावा कृपया. या धाग्याचा उद्देश वेगळा आहे.
बरोबर १० वर्षांपूर्वी मी
बरोबर १० वर्षांपूर्वी मी स्वीडन येथे ३ महिन्यासाठी गेले होते नोव्हेंबर२००१ ते फेब्रुवारी २००२ असा तो कालावधी होता. २६ जानेवारी ला मला आपल्या प्रजासत्ताक दिनाची खूप आठवण येत होती. त्यासुमारास माझी एक मैत्रीण पण तिच्या नवरया बरोबर तिकडे आली होती. २६ जानेवारीला शनिवार संध्याकाळ होती आणि आम्ही आमच्या एका स्वीडिश मैत्रिणीच्या घरी चहापान करत होतो. तेव्हा एकमेकांना गाणी म्हणण्याचा आग्रह चालला होता. मी आणि माझी मैत्रीण दोघींनी आधी जाहीर केले कि आता आम्ही आमच्या देशाचे राष्ट्रगीत म्हणणार आहोत तरी सर्वांनी उभे राहावे आणि हे गीत ऐकावे. त्याप्रमणे सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि आम्ही दोघींनी जन गण मन हे आपले राष्ट्रगीत गायले. तेव्हा मला खूप छान वाटले आणि मन भरून आले. परदेशामध्ये गेले कि आपल्या देशाची जास्त किंमत कळते हेच खरे.
आशुडी.. खुपच छान अनुभव
आशुडी.. खुपच छान अनुभव सांगितला.
माझी एक शंका आहे.. वर लिहिल्याप्रमाणे ""गुरुदेवांनी क्षणभर विचार केला, आणि आपल्या मोकळ्या आवाजात गायला सुरुवात केली...
जनगणमन अधिनायक जय हे
भारतभाग्यविधाता
पंजाब सिंधु गुजरात मराठा...""
मुळ रचनेत सिंधु शब्द हा सिंध असा होता असे ऐकलेय..पण विकिपिडिया पण मूळ शब्द सिंधुच सांगतेय..
खूप लहान होते. अगदीच ३रीत
खूप लहान होते. अगदीच ३रीत वगैरे असेन. तेव्हा जन गण मन हे राश्ट्रगीत वगैरे आहे हे फक्त रोज शाळेत म्हणतो म्हणून माहित होते पण अर्थ काहीही माहीत नव्ह्ता. जस.. रोज कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो तसंच हे एक गाणं/श्लोक! बस्स!
तेव्हा आमच्या शाळेत गॅदरिंगची धूम चालली होती. बरेच नाच बसवणं चाललं होतं. कुठल्यातरी कृष्णाच्या गाण्यावर बाईंनी नाच बसवला होता त्यात मीही होतेच. घरी आल्यावर माझ्यातला कलाकार /डान्सर अचानक जागा झाला. आणि मी आरशासमोर उभी राहून जन गण मन वर डान्स बसवला. आई तेव्हा शेजारच्या काकूकडे गप्पा मारायला गेली होती. आई घरी आल्यावर तिला मोठ्या उत्साहात समोर बसवून स्वत : राष्ट्रगीत गात नाच करून दाखवला. आईने शांतपणे माझा नाच पूर्ण होईपर्यंत संयम राखला.. शेवटी जय हे, जय हे... जय जय जय जय हे...! वरती मी फारच अवेशात नाचले.. आणि मग खूप आनंदात, अपेक्षेने आईकडे पाहिले. आई शांत होती.
'कसा वाटला नाच, सांग ना..' इति मी.
नाच म्हणून ठीक आहे.. पण राष्ट्रगीत चालू असताना सावधान मध्ये उभं रहायचं असतं.... हलायचंही नसतं, कारण ते आपल्या देशाचं गौरव गीत असतं.. !'
फाड्!!!! आईचं हे वाक्य ऐकून खाडकन कोणीतरी कानाखाली आवाज काढावा तसं झालं... आणि एकदम रडू आलं. मग आईने जवळ घेऊन राष्ट्रगीत म्हणजे काय.. त्याचा अर्थ काय.. हे समजावून सांगितला. आणि मग तेव्हापासून राष्ट्रगीत कुठेही कानावर पडलं की पाय आपोआप 'सावधान' होऊ लागले.
'जन गण मन' चे सूर विसंगत कसे
'जन गण मन' चे सूर विसंगत कसे होतील बंधू?
झालीच असेल तर आपली निष्ठा आणि आपली जाणीव विसंगत झाली असेल.
परदेशात असताना खुप भरुन येतं
परदेशात असताना खुप भरुन येतं राष्ट्रगीत ऐकताना!
ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेण्याच्या प्रक्रियेमधला शेवटचा टप्पा म्हणजे एका सरकारी कार्यक्रमात सिटीझनशिप सर्टफिकेट घेणे. या कार्यक्रमात अर्थातच ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत गायले जाते. समोर एका मोठ्या स्क्रीनवर वाचुन ते गाणे अपिक्षित असते. मी जेव्हा या कार्यक्रमाला गेले होते तेव्हा भारताचे नागरिकत्व सोडायचे आणि दुसर्या देशाचे घ्यायचे या कल्पनेने कितीही नाही म्हटले तरी मनात खुप चलबिचल होत होती. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्गीत सुरु झाले तरी माझ्या मनात 'जन गण मन' च वाजत होते! यांत्रिकपणे समोरचे वाचत होते.
ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीतही छान आहे पण 'जन गण' चा जोष त्यात नाही असे मला नेहमीच वाटते.
पंजाब सिंधु(/सिन्ध) गुजरात
पंजाब सिंधु(/सिन्ध) गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
हे म्हणताना नेहमी माझ्या डोळयांसमोर भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर या प्रांतांची माणसे उभी आहेत असे दृश्य येते..
गंमत म्हणून सांगायचं तर अश्या रचनेत 'मराठा' शीर्षस्थानी (नेता म्हणून) दिसतो - डावीकडे तीन लोक, उजवीकडे तीन लोक!
सर्किट ब्येष्ट इम्याजिनेशन
सर्किट ब्येष्ट इम्याजिनेशन
अरे वा.. आज खुप दिवसांनी हा
अरे वा.. आज खुप दिवसांनी हा धागा सापडला. (आभार चिनुक्स).
माझी राष्ट्रगीताविषयीची आठवण. दहावीच्या परीक्षेला ज्या शाळेत नंबर आला होता त्याला अगदी चिकटून एक शाळा होती. त्यांची राष्ट्रगीत म्हणायची वेळ आणि आमची परीक्षा सुरु व्हायची वेळ बहुतेक वेळा एकच असायची. खुपदा इतर मुले पेपरची बेल झाल्यावर सारे काही विसरुन पेपर लिहायला सुरुवात करायचे. पर्यवेक्षकही राष्ट्रगीत चालू असतांना पेपर वाटायचे. (ते तरी काय करणार म्हणा..) मी आणि माझी एक जिवलग मैत्रीण मात्र शांतपणे उभे राहुन राष्ट्रगीत पुर्ण झाल्यावरच खाली बसुन पेपर लिहायला लागायचो. आमचा पेपर वेळेत पुर्ण होईल हा आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्ती यातली कोणती भावना त्या वेळी प्रबळ होती सांगता येत नाही. पण हि आठवण कायम मनात राहिला आहे.
मग परत थिएटरमधे ते दाखवायला
मग परत थिएटरमधे ते दाखवायला लागले. ९९ टक्के लोक ऊभे राहून राष्ट्रगीताचा मान ठेवतात. क्वचित काही जण बसून राहतात, पण बाकीचे त्यांना ऊभे राहण्यास भाग पाडतात. हे बघून खरेच आनंद वाटतो.>>>+१ सियाचिनची क्लिप बघताना डोळे धूसर,अंगावर काटा उभा रहातो.
२ महिन्यांपूर्वी स्टेशनजवळचा चप्पलगाळेवाला भावगीतं ऐकावी तसं बसून राष्ट्रगीताची कॅसेट ऐकत होता.त्याला एकदम ओरडून ती टेप बंद करायला लावली.वाईट इतकंच की आपण काही चूक केली हेच त्याच्या गावी नव्हते.नंतर पाहिले तर समोर पोलीसही उभा होता.त्याच्याही गावी ही गोष्ट नव्ह्ती.या उदासीनतेचे वाईट वाटते.
राजकीय धागे वाचून वाचून आलेल
राजकीय धागे वाचून वाचून आलेल frustation घालवलं या धाग्यानी .
राजकीय धागे वाचून वाचून आलेल
राजकीय धागे वाचून वाचून आलेल frustation घालवलं या धाग्यानी .>>>>>१००%