Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
दिठी =दृष्टी
दिठी =दृष्टी
ऐसपैस शब्दातील पैसचा अर्थ
ऐसपैस शब्दातील पैसचा अर्थ अवकाश घेतला तर ऐसचा अर्थ काय आहे? का दुसरी काही व्युत्पत्ती आहे त्या शब्दाची?
कुमार१ | 28 December, 2011 -
कुमार१ | 28 December, 2011 - 18:30 नवीन
'विचारतळे' हा शब्द 'think tank' या अर्थी योग्य वाटतो का? कोणी अधिक योग्य शब्द सुचवेल ?
<<
विचार डबके
कसा वाटतो??
विचारगट हा शब्दच अर्थवाही
विचारगट हा शब्दच अर्थवाही वाटतोय. अगदी शब्दशः भाषान्तर 'नाईन कम टू माय नोझ' असे हास्यास्पद होईल. विचारगट शब्दाने अर्थहानीही होत नाही...
विचारगट या शब्दाचा विग्रह
विचारगट या शब्दाचा विग्रह विचारांचा गट असा होइल. विचारवंतगट असे हवे मग.
"खूप सुख" / "खूप आनंद" - याला
"खूप सुख" / "खूप आनंद" - याला एक शब्द काय ??
अत्यानंद / परमानंद.
अत्यानंद / परमानंद.
माधव, सेम पिंच.
माधव, सेम पिंच.
किंवा परमसुख
किंवा परमसुख
अश्विनी, खूप आनंद = माधव
अश्विनी, खूप आनंद = माधव नव्हे
आणि सेम पिंच हे दोन शब्द आहेत.
डोंबल.
डोंबल.
डोंबल म्हणजे खूप सुख / "खूप
डोंबल म्हणजे खूप सुख / "खूप आनंद ????????
हे हे ... फुल time pass ...
हे हे ... फुल time pass
...
घरासाठी (माझ्या आजीच्या) काय
घरासाठी (माझ्या आजीच्या) काय नाव सुचवाल ?? ("श्रमसाफल्य" ... अमुक तमुक क्रूपा .. वगैरे नको )
घरटे, निवारा
घरटे, निवारा
'शुभं करोति', 'तथास्तु' ....
'शुभं करोति', 'तथास्तु' .... किंवा लतादींचे 'प्रभुकुंज'
आजी आजोबांना विचारून
आजी आजोबांना विचारून पहा:
@चारुदत्त | 6 January, 2012 - 12:10 नवीन
घरासाठी (माझ्या आजीच्या) काय नाव सुचवाल ?? ("श्रमसाफल्य" ... अमुक तमुक क्रूपा .. वगैरे नको )
एका व्हीडीओ क्लीपमध्ये
एका व्हीडीओ क्लीपमध्ये निवेदिका खालील वाक्य म्हणते. त्याचा अर्थ नीट स्पष्ट होत नाहीये. संदर्भासाठी आधीचंही एक वाक्य देतेयः
"फोर्ट के वॉल के अंदर है वधवान शहरके गुजराती रंग| (पॉज)
नगरसेठोंकी बनवायी हवेलीयाँ जो यहाँ के गुजराती रंगोंकी बांधीयाँ है|
हे बांधीयाँ म्हणजे काय? खालच्या वाक्याचा अर्थ काय होतो?
याचा बांधणी वस्त्राशी काही संबंध आहे का? कारण हे वधवान शहर बांधणीसाठी प्रसिद्ध आहे आणि या वाक्याच्या एक सेकंद आधी बोलणारी मुलगी बांधणी साडीला हात लावताना दाखवली आहे.
विचारगट या शब्दाचा विग्रह
विचारगट या शब्दाचा विग्रह विचारांचा गट असा होइल. विचारवंतगट असे हवे मग.
>>>
विचारवन्त गट शब्द फारच मोठा वाटतो. त्यामुळे वापरण्यास ऑड वाटतो. सामासिक शब्दाचा उद्देश मुळी सुटसुटीत , कम्बाईन्ड शब्द वापरण्याचा असतो जेणे करून वर्णनात्मक शब्द होणार नाही.विचारगटचा विग्रह विचार करण्यासाठी तयार केलेला नेमलेला गट असाही होऊ शकतो. जसे की 'कृतीगट', याचा विग्रह 'कृतींचा गट' असाही होऊ शकतो तुमच्या लॉजिकप्रमाणे, पण आपण 'कृती करणारा गट' हाच अर्थ प्रथमदर्शनी घेतो ना?
इब्लिस : .... हे हे .... मला
इब्लिस : :d .... हे हे ....
मला घरासाठी चांगाली नावे हवी आहेत !!! ...खरच...
घरासाठी (माझ्या आजीच्या) काय
घरासाठी (माझ्या आजीच्या) काय नाव सुचवाल ?? ("श्रमसाफल्य" ... अमुक तमुक क्रूपा .. वगैरे नको )
>>
स्वप्नशिल्प
इच्छापूर्ती
नंदादीप
परिपूर्ती
संचित
घरासाठी माझी आवडती
घरासाठी माझी आवडती नावे:
शुभंकरोति
तथास्तु
गुरुपुष्प
गुरुपुष्य
'कैवल्य' या शब्दाचा अर्थ काय?
'कैवल्य' या शब्दाचा अर्थ काय?
'मोक्ष', 'मुक्ती'.
'मोक्ष', 'मुक्ती'.
सचिन आणि चिन्मय या दोन
सचिन आणि चिन्मय या दोन शब्दाचा अर्थ काय?
१. सचिनचा एक अर्थ तर 'इन्द्र'
१. सचिनचा एक अर्थ तर 'इन्द्र' असा असून ते नाव इन्द्राची पत्नी 'शची' पासून तयार झाले आहे. स्वतंत्र अर्थाने या नावाकडे पाहिल्यास 'अर्क' असाही होतो (अर्क चांगल्या अर्थाने घेणे गरजेचे आहे कारण आपल्या मराठीत 'अर्क' म्हणजे स्लॅन्ग स्वरूपात प्रामुख्याने वापरला जातो).
२. चिन्मय = ज्ञानी, बुद्धीमान, तेजस्वी
हे बरोबर आहे. सचिन हा
हे बरोबर आहे. सचिन हा अपभ्रष्ट शब्द आहे. मूळ शब्द शचीन्द्र आहे. अशोकने वर सांगितल्याप्रमाणे.
चिन्मय ह्या नावाच्या अर्थाला जागणारे एक मायबोलीकर आहेतच...
'कैवल्य' या शब्दाचा अर्थ
'कैवल्य' या शब्दाचा अर्थ काय?
>>
जसे 'एक' या शब्दावरून 'ऐक्य' आला आहे किंवा 'प्रमुख' वरुन प्रामुख्य हा शब्द आला आहे, त्याप्रमाणे 'केवल' ह्या शब्दावरुन 'कैवल्य' हा शब्द आला आहे. केवळ असण्याचा गुणधर्म म्हणजे कैवल्य.
हिंदू धर्मातील तत्वज्ञानानुसार दृश्य आणि अदृश्य विश्वात केवळ एकच एक तत्व भरून राहिले आहे, त्याला ब्रह्म असे म्हणतात. केवळ ब्रह्म आहे आणि दुसरे काही नाही ह्य सिद्धांताला अद्वैत सिध्दांत (non duality) म्हणतात. त्यानुसार कैवल्य आणि अद्वैत हे समानार्थी शब्द आहेत.
संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयात कैवल्यमुक्ती वगैरे शब्द ते वापरतात. त्या एकमेव तत्वाचा आपल्याला उलगडा होणे म्हणजे कैवल्यपद प्राप्त होणे किंवा कैवल्यमुक्ती मिळणे. त्यामुळे कैवल्यचा प्रत्यक्ष अर्थ मुक्ती असा नाही आहे. अप्रत्यक्षरित्या तसा अर्थ घेतला जातो.
योगायोगाने वर 'चिन्मय' शब्दाचा अर्थ विचारला आहे. हा शब्दही आपल्या तत्वज्ञानातून आला आहे. हे जे एकच एक तत्व आहे (ब्रह्म) त्याचे स्वरूप तत्वज्ञानात 'सत् चित् आणि आनंद' असे सांगितले आहे. चित् ह्या शब्दाचा मूळ अर्थ 'जिवंत' असा आहे, आणि जिवंत म्हणजे आजूबाजूला घडणार्या गोष्टींचे ज्ञान होणारा. पण अद्वैत तत्वज्ञानानुसार ज्ञान आणि ज्ञान होणारा हे द्वैतही अस्तित्वात नाहीये. त्यामुळे ब्रह्म हे चित् मय (चिन्मय) आहे, म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. वर अशोक ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या शब्दाचा व्यावहारिक अर्थ ज्ञानी किंवा बुद्धिमान असा करतो.
सुंदर विवेचन केले आहे
सुंदर विवेचन केले आहे श्री.फचिन यानी. चिन्मयचा व्यावहारिक अर्थ ज्या तत्वज्ञानातून प्रकट झाला आहे त्याबद्दल वाचल्यावर हे नाव आणखीनच आवडू लागले असे मी म्हणेन. यापूर्वी काही अभ्यासाच्या निमित्ताने "चिन्मय मिशन" कार्याच्या संदर्भात वाचन झाले होते. स्वामी चिन्मयानंदांनी गीता आणि उपनिषदे यातून भारतीय संस्कृतीचा त्यानी युरोप आणि अमेरिकेत केलेल्या प्रसार कार्याची थोडीफार माहितीही होती. खरे तर ते नावच ("चिन्मयानंद") पुरेसे बोलके वाटले होते. त्यांच्या व्यासंगाला ते पुरेपूर शोभतेही.
फचिन बिनचूक छटा दाखवल्या आहेस
फचिन बिनचूक छटा दाखवल्या आहेस दोन्ही श्ब्दार्थात.
सचिन ह्याचा बौध्द धर्माशी पण काही संबंध आहे कुणाला तो संदर्भ माहित आहे का?
Pages