कैवल्य

Submitted by संजयb on 1 January, 2012 - 01:49

अरे थांब जरा.
कानोसा घे.
तो घंटांचा मंद नाद ऐक
धुपाचे उठणारे वलय पहा.
 तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा.
हात जोड अन विश्वरूप आठव.
 मनातील विचार विकार
अशा निराशा
शंका लोभ ख्शोभ
विरतात का बघ .
विरले ? जिंकलास!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टंकलेखनाच्या चुका सांभाळा.
पुढच्या लेखनाला शुभेच्छा!
नुतन वर्षाभिनंदन.

कुठे जावे?
या जगाचे पाश तोडून...
कुठे जावे?

मायेचे मोह सारे
आभास भावनांचे,
आशांचे तरंग
दिसताक्षणी लुप्त.

कधीतरी फुलणारे
पण राखेत निद्रिस्त निखारे
तेच ते सामान्य हुंकार
नसे कही आगळे.

राखेतल्या निकृष्ट जिवांचे
तेच विकारांचे तांडव
उभे राहणार्‍याला
राखेचे मणा-मणाचे बंधन.

कोणी कोठे जात नाही
कोणी कोठे पोहचत नाही
फक्त धडपड अनाठायी.

उडत्या धूरळ्याला म्हणती
यश!!
एकमेकाच्या पाठीवर थाप
खोट्या समाधानाची.

पुढील लेखनास शुभेच्छा.

अरे थांब जरा.
कानोसा घे.
तो घंटांचा मंद नाद ऐक
धुपाचे उठणारे वलय पहा.
तिरक्या किरणात उजळलेला विठोबा बघा.
हात जोड अन विश्वरूप आठव.
मनातील विचार विकार
अशा निराशा
शंका लोभ क्षोभ
विरतात का बघ .
विरले ? जिंकलास!

Back to top