सैरभैर

Submitted by pradyumnasantu on 29 December, 2011 - 16:00

सैरभैर

आज ५ जुन
उद्या मान्सून
उद्याच यायचं भेटायला तर
ये होउन मुसळधार
वेळीच पाउस सुरू होण्याचं
सुख आहे अपरंपार

नाही तर असं कर
उष्म्यानं हैराण माझी आई ठेवते बर्फाची पिशवी माथ्यावर दुपारी
तू होउन ये ती पिशवी
नाहीतरी तुझं येणं तिच्यासाठी वळवाच्या सरी
जिवलग टपो-या गारा बिलोरी

किंवा दुपारी येणारा पोष्टमन बन तू
जसा थकलेला तो
माझ्या व्हरांड्यात विसावतो
मी दिलेलं सरबत पिउन पुन्हा भटकंतीला जातो
मला वाटतं सेवा घडली देवाची
किंवा तू पोष्टमन बनलीस तर देवीची

नाहीतर हो प्राध्यापक कोठुरकर
माझे अर्थशास्त्राचे लेक्चरर
क्लास आहे त्यांचा उद्या बाराला
झोपायला एकदम चांगला
तू बनलिस कोठुरकर तर
अर्थशास्त्रातल्या आकड्यापेक्षा
पाहीन तुझ्या वेणीतला

सर्वोत्तम म्हणजे बनून ये परिक्षेची सुपरवायझर
आणि सांग मला की "कॊपी कर"
आय नीड इट बाई
तुझ्या माथ्यावर अक्षता फेकून आलो
तेव्हापासून अभ्यासाला हात लावलेला नाही

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणि सांग मला की "कॊपी कर"
याच्या पुढे 'अन माझी अंगझडती घे' असं येतंय की काय असे वाटले. पण जबरा कलाटणी.

अवांतर: माझ्या कवितांना तुमचा पहीला अन तुमच्या कवितांना माझा पहिला प्रतिसाद पाहून इतरांना उगीचच शंका येईल ब्वॉ, की हे ऐकमेकांचेच कौतूक करतात.

मी इथे अमेरिकेत भारतातील घड्याळाच्या १२ तास अंतरावर आहे. माझा प्रतिसाद पहिला असणार तर क्षम्य असावा.
आपण भारतात असाल तर मला डॉन बनावे लागेल.

>>> माझा प्रतिसाद पहिला असणार तर क्षम्य असावा.
आपण फारच मनावर घेता ब्वॉ. क्षम्य बिम्य काय एकदम. विनोदाने बोलतो. तेवढाच कामाच्या गडबडीत विरंगूळा.

अन आमी भार्तात जरी आस्लो तरीबी अमेरीकन तालावर अन तासावर नाचूं र्‍हायलोय.

बस्स का राव !. तिचं (तिच्याशी नाही !) वाजलं म्हणून सैरभैर आहात होय? असा... असा....! अशा चांगल्या चांगल्या कविता सैरभैर होऊन लिहिणार असाल तर उत्तमच आहे वाचकांसाठी. पु.ले.शु.