Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
शोनू, ओथंबा आणि 'ओथंबून'चा
शोनू, ओथंबा आणि 'ओथंबून'चा संबंध नसावा.
नेटवर शोधल्यावर ज्ञानेश्वरीत हा शब्द काही ठिकाणी वापरलेला दिसला. उदा:
>>
उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२॥
हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा ।
इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥ १०२२ ॥
प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी ।
माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥ १०२३ ॥
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे ।
- तो 'उपद्रष्टा' आहे. प्रकृतीला आधारभूत झालेला आहे, पण तिच्या विकारांत सहभागी नाही. (अभिचाकशीती)
<<घन ओथंबून येती मधे ओथंबून
<<घन ओथंबून येती मधे ओथंबून चा अर्थ काय मग ?<<<
काठोकाठ भरणे किंवा भरुन वाहु लागणे.
विहिर ओथंबुन वाहु लागली. यात आहे तोच अर्थ.
विहीर ओसंडून वाहते ,ओथम्बून
विहीर ओसंडून वाहते ,ओथम्बून नाही. ओथम्बुन म्हणजे संपृक्त होणे. सॅच्युरेट. आता फुटतील की मग फुटतील या अवस्थेला !प्रत्यक्ष (पाणी )बाहेर पडण्याची क्रिया अद्याप व्हायची आहे....
हा शब्द आधी होउन गेला की नाही
हा शब्द आधी होउन गेला की नाही माहित नाही.
'विचक्षणा' म्हणजे काय?
"विचक्षणा" ~ विशेष म्हणजे मी
"विचक्षणा" ~
विशेष म्हणजे मी अगदी कालपरवा एका वाचकाच्या संदर्भात जालीय घडामोडीतच हे 'विचक्षण' विशेषण वापरले होते. याचा अर्थ अत्यंत सखोलपणे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून आपले मत मांडणारी व्यक्ती. ज्याला 'छिद्रान्वेषी' म्हणू शकू. "चिकित्सक" अशा अर्थानेही वापरले जाते.
"विचक्षणा" ~ चारी बाजूंनी शोध घेऊन मगच मांडण्यात आलेले मत. 'सखोल' अभ्यासक असे ही अशा व्यक्तीच्या संदर्भात म्हटले जाते.
छान आहे हा शब्द
छिद्रान्वेषी म्हणजे 'फक्त '
छिद्रान्वेषी म्हणजे 'फक्त ' चुकांचा शोध घेणारा. छिद्रांचे अन्वेषण म्हणजे शोध घेणारा. त्यामुळे तो शब्द एकांगी आहे. व त्याला निगेटीव्ह शेड आहे...
नक्की ? पण 'छिद्रान्वेषी'
नक्की ?
पण 'छिद्रान्वेषी' स्वभावाच्या व्यक्तीची तशी वर्तणूक "निगेटिव्ह" कसे म्हणता येईल ? म्हणजे एखाद्या गोष्टीचा काटेकोरपणे पाठपुरावा करणे एखाद्याचा स्वभाव असेल तर ते संशोधनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
उदा. मोहोंजडदो आणि हडाप्पा उत्खननात हिंदू संस्कृतीचा शोध लागला म्हणून संशोधकांनी आपले शोध न थांबविता त्यातील शिल्पांचा/विविध वस्तुंचा कालावधी निश्चित करण्यासाठी अगदी रेडिओकार्बन डेटिंग पद्धतीचा वापर करून त्यानुसार त्याचे रीझल्ट्स जोपर्यंत हाती येत नव्हते तो पर्यंत त्यानी आपले पेपर्स प्रसिद्ध केले नव्हते. मला वाटते हा देखील "छिद्रान्वेषी" स्वभावाचा एक चांगला नमुना होऊ शकतो. मग तसे असेल तर त्याला निगेटिव्ह टिंट असते असे मानने जड जाते.
(निव्वळ चुकाच शोधायच्या असतील तर मग त्या हटवादीपणानेही शोधणारे समाजात असतातच. इसापनीतीमधील लांडगा आणि बकरीच्या पिलाची कथा अशाच स्वरूपाची आहे.)
पण असे असले तरीही "विचक्षण" साठी 'चिकित्सक' तरी नेमके आहे.
अशोक पाटील
अशोक तुम्ही 'फक्त' शब्दाकडे
अशोक तुम्ही 'फक्त' शब्दाकडे लक्ष दिलेले दिसत नाही..
विचक्षण म्हणजे ज्याला सारासार
विचक्षण म्हणजे ज्याला सारासार विचार करण्याची स्वच्छ (स्पष्ट) दृष्टी (खरे तर क्षमता) (=विवेकबुद्धी)प्राप्त झाली आहे असा तो...
विचक्षण बाबतीत मोल्सवर्थबाबा
विचक्षण बाबतीत मोल्सवर्थबाबा Shrewd असेही म्हणतो. आता या shrewd ला तसे पाहिले तर कावेबाजपणाची एक छोटीसी का होईना टिंट आहेच. पण तुम्ही म्हणता तसे 'विवेकबुद्धी' ने वर्तन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीस 'विचक्षण' हे संबोधन ठीक बसते.
अशोक पाटील
'विचारतळे' हा शब्द 'think
'विचारतळे' हा शब्द 'think tank' या अर्थी योग्य वाटतो का? कोणी अधिक योग्य शब्द सुचवेल ?
'खात्री' हा शब्द मी एका
'खात्री' हा शब्द मी एका मासिकात सर्व ठिकाणी "खातरी" असा लिहिलेला पाहिला. यापैकी नक्की कोणता शब्द बरोबर आहे?
खात्री.. खातरजमा हा शब्द
खात्री.. खातरजमा हा शब्द वापरायचा असेल तर खातर हा शब्द त्यात वापरतात.
बाजोंना छिद्रान्वेषीबद्दल
बाजोंना छिद्रान्वेषीबद्दल अनुमोदन. संशोधक हे चिकित्सक असतात, तसेच वस्तुनिष्ठ असतात (किंवा वस्तुनिष्ठता ही चिकित्सकवृत्तीचा परिपाक असते असेही म्हणता येईल.) अशोक यांनी दिलेल्या उदाहरणात संशोधकांची वस्तुनिष्ठता दिसून येते. तसेच, काटेकोरपणे पाठपुरावा करणे म्हणजे चिकाटी व व्यवस्थितपणा यांचा संगम (मेटिक्युलस).
विचारतळे जरा शब्दानुवाद वाटतो. त्यातून 'एका व्यक्तीच्या मनातील विचारांचा समूह' असा अर्थ सूचित होतोय. तुम्हाला अपेक्षित तोच व तेवढाच अर्थ निघेल असे नाही. विचारमंथनस्थळ/गृह?
१६ व्या शतकातील विष्णुदास
१६ व्या शतकातील विष्णुदास नामा (संत नामदेव नव्हेत) या कविने लिहिलेली "रात्र काळी घागर काळी" ही गवळण खूपच सुंदर आणि "काळ्या" रंगाचा रचनेत मुबलक वापर करून कृष्णाविषयीची ओढ त्यात प्रकट झाली आहे. गोविंद पोवळे आणि सहकारी यानी गायिलेली ही रचना पूर्वी आकाशवाणी मुंबईच्या सकाळच्या ११ च्या 'कामगार सभा' या कार्यक्रमात हटकून लागत असे.
या रचनेत एके ठिकाणी "बुंथ काळी बिलवर काळी" असा उल्लेख येतो. मी काही ठिकाणी "बुंथ = एक गळ्यातील दागिना, गोट" या अर्थाने वाचला तर काही ठिकाणी "बुंथ = पदर, बुरखा" या अर्थानेही. यातील नक्की कोणता असावा ? बिलवर आणि गोट यांची संगती जमते. पदर वा बुरखा आणि तोही काळा असू शकतो ? कारण ही गोपिका कृष्णभक्तीत रंगली असली तरी ती 'काळी साडी' नेसलेली - जी आपल्या शास्त्रात अशुभ मानली जाते - असू शकेल ?
मग 'बुंथ' चा वेगळाही अर्थ असेल का ?
अशोक पाटील
विचारगट
विचारगट
रात्र काळी..... सर्व काही
रात्र काळी..... सर्व काही काळे म्हणजेच कृष्ण आहे असे सांगून कृष्णाशी संपूर्ण तादात्म्य सुचवले आहे. इथे बुंथी म्हणजे कुठलाही अर्थ घेतला तरी फरक पडू नये. बुरखा साधारणपणे काळाच असतो, ते आश्चर्याचे नाही. बिलवरसुद्धा काळे आहे. म्हणजे तो तथाकथित दागिनासुद्धा वेगळा दिसत नाही. सर्वकाही 'कृष्ण' आहे, हा मुद्दा.
बुंथ = बुरखा, इथं दिलेय
बुंथ = बुरखा, इथं दिलेय त्याप्रमाणे http://dsal.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%AC%E0%A5%81%E0...
(दुसरे उदा. - खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी)
"बुंथ = एक गळ्यातील दागिना, गोट" हा अर्थ माहीत नव्हता.
"बुंथ = एक गळ्यातील दागिना,
"बुंथ = एक गळ्यातील दागिना, गोट" हा अर्थ माहीत नव्हता.
नाही, गजाननराव; माझा तसा अर्थ असण्याचा आग्रह नाही. मीदेखील असेच जालावर कुठेतरी 'गोटपाटल्या' संदर्भात बुंथ (किंवा बुंथी) चा वापर वाचल्याचे स्मरते, म्हणून तसा इथे उल्लेख केला. तसा त्याचा अर्थ नसेलही. फक्त 'बिलवर' सोबत आल्याने तोही एक दागिन्याचा प्रकार कुणीतरी मानला असावा.
खरे तर तुम्ही दिलेल्या दुव्यावरून मोल्सवर्थनेदेखील 'पदर, बुरखा' या अर्थानेच 'बुंथ' ला घेतले आहे असे दिसतेच. श्री.अरभाट म्हणतात तशी ती गवळण सर्वार्थाने "कृष्णमय" म्हणून काळी आहेच, फक्त आपल्या संस्कृतीत "काळी साडी" नेसून ती प्रेमिका कृष्णाची पूजा करीत असेल काय ? एवढीच शंका माझ्या मनी आली होती. [कदाचित तिने अन्य रंगाचीही साडी नेसली असेल पण ती कान्हात इतकी गुंतली आहे की तिला आपला पेहरावही यमुनेच्या जळाप्रमाणे काळा झालेला दिसत असेल.]
अशोक पाटील
धन्यवाद अरभाट व मी अमी.
धन्यवाद अरभाट व मी अमी.
'प्रर्त्यायोजन' म्हणजे काय
'प्रर्त्यायोजन' म्हणजे काय इंग्रजीत?
संदर्भः शक्तीचे प्रर्त्यायोजन
फक्त आपल्या संस्कृतीत "काळी
फक्त आपल्या संस्कृतीत "काळी साडी" नेसून ती प्रेमिका कृष्णाची पूजा करीत असेल काय ? एवढीच शंका माझ्या मनी आली होती. >>> काळी साडी का नाही नेसू तिने? काळी चंद्रकळा तर आपल्या संस्कृतीत कौतुकाने नेसली जाते
बाकी सर्वकाही 'कृष्ण' असाच भाव आहे यात.
वर्षा... 'डेलिगेशन ऑफ पॉवर्स'
वर्षा... 'डेलिगेशन ऑफ पॉवर्स'
धन्यवाद जोशी. मूळ शब्द
धन्यवाद जोशी.
मूळ शब्द प्रत्यायोजन आहे हे समजलं नंतर. पण माझ्याकडील कागदपत्रात ’प्रर्त्यायोजन’ असाच छापला होता. असो.
कौपीन म्हणजे काय? कफन/ कफनी
कौपीन म्हणजे काय? कफन/ कफनी त्याचा अपभ्रंश आहे का?
कौपीन म्हनजे लंगोटी. मग ते
कौपीन म्हनजे लंगोटी. मग ते कफनी कसे होईल. ?
ओके. म्हणजे कौपीनधारी म्हणजे
ओके. म्हणजे कौपीनधारी म्हणजे लंगोटी घातलेले.
मग कफनी हा उर्दु शब्द आहे का?
कफन आहे. कफनी काही मुसलमान
कफन आहे. कफनी काही मुसलमान घालीत नाहीत. पण कफनी शब्द निदान कफनावरून सुचला असावा...:)
(१) सान्वी ह्या शब्दाचा
(१)
सान्वी
ह्या शब्दाचा "लक्ष्मी" वगळता अन्य काय अर्थ होतो.
(२)
"सा" अक्षराने सुरू होणारे लक्ष्मी किंवा पार्वतीचे वरील नाव वगळता अन्य काही नाव आहे का.
याचे उत्तर आपण माझ्या विपूत टाकले तरी चालेल,
माझ्या एका माबोकर नसलेल्या कलीगला हे हवं आहे.
धन्स बाजो! अजुन एक. 'दिठी'
धन्स बाजो!
अजुन एक. 'दिठी' या शब्दाचा अर्थ काय?
Pages