हॅपी हॉलिडेज.. !
अटलांटामधल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त दिव्यांची रोषणाई केली जाते. संध्याकाळी सूर्यास्त होता होता म्हणजे साधारण पाच वाजता बाग उघडते आणि १० वाजेपर्यंत उघडी असते. तसही थंडीमध्ये बर्याच झाडांची पानं गळून गेलेली असतात, फुलं, पानं बघायला येणार्या पर्यटकांचा ओघ आटलेला असतो. ह्या रोषणाईच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जाते. गेले दोन वर्ष ही रोषणाई बघायला जाणं राहून जात होतं, पण यंदा मात्र योग आला. तिथे काढलेल्या ह्या प्रकाशचित्रांसह तुम्हां सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नाताळ तसेच नववर्षाच्या लखलखत्या शुभेच्छा !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्ही अगदी वेळेत निघून सूर्यास्त व्हायच्या आधी बागेत पोचलो. अगदी सुरुवातीपासूनच दिव्यांच्या माळा दिसायला लागल्या.
पार्किंग, तिकीटे काढणे वगैरे सोपस्कार पारपडेपर्यंत अंधार झालाच. मग ती झाडं अशी दिसायला लागली.
आत शिरल्या शिरल्या ख्रिसमस ट्री च्या आकाराचं दिव्यांचं झाड मध्यभागी बनवलं होतं.
ह्या झाडाच्या पलिकडे दिव्यांनी उजळून निघालेला वॉक-वे होता. वॉक-वेच्या दोन्ही बाजूंच्या निष्पर्ण झाडांवर माळा सोडलेल्या होत्या.
एका बाजूचा वॉकवे निळसर दिव्यांनी उजळला होता तर दुसरीकडचा हिरव्या.
पुढे वॉकवे वर स्नो-फ्लेक्सच्या आकारातल्या प्रकाशाच्या रांगोळ्या घातल्या होत्या!
काही ठिकाणी झाडाच्या खोडांवर रोषणाई केली होती...
...तर काही ठिकाणी खोडांच्या आधाराने मनोरे उभारलेले होते.
दुसर्या विभागात ह्या माशीने स्वागत केलं.
पुढे ही सूर्यफुलं दिसली. ही पाहून मला दूरदर्शनवर लागणार्या पिकावर पडणार्या कुठल्यातरी किडीसंदर्भातली एक जाहिरात लागायची त्याची आठवण झाली!
मग ही फुलपाखरं आली.
आणि सगळ्यांत शेवटी खरोखरचा हिरवा रंग उडून गेलेली पण दिव्यांचा हिरवा रंग पांघरलेली झाडं आली.
ह्या झाडांच्या साधारण मध्यभागी "शकूना"ची poinsettia ची पानं लावलेलं भलंमोठं ख्रिसमस ट्री होतं.
सगळ्यांत आतमध्ये गाण्यांच्या तालावर रोषणाई बदलणारे मोठमोठे दिवे होते. आजुबाजूच्या झाडांवरचे दिवे, मागे डाऊनटाऊनच्या बिल्डींग्ज आणि सुरू असलेली Christmas Carols ह्यासगळ्यांमुळे फारच भारावून टाकणारं वातावरण तयार झालं होतं.
एकंदरीत तिथला उत्साहं, उत्सवी वातावरण, आनंद पाहून सगळ्यांना अगदी मोठ्याने "Happy Holidays!!!!" असं म्हणावसं वाटत होतं.
मस्त! "Happy Holidays!!!!"
मस्त!
"Happy Holidays!!!!"
मस्त अप्रतिम फोटो ... कोणता
मस्त अप्रतिम फोटो ... कोणता कॅमेरा?
धन्यवाद ऋयाम, अंजली.. कॅमेरा
धन्यवाद ऋयाम, अंजली..
कॅमेरा Canon Rebel EOS T3i आहे.
सह्हीच! खुपच छान आहेत फोटो!
सह्हीच! खुपच छान आहेत फोटो!
मस्त रे पराग...
मस्त रे पराग...
मस्त. ख्रिसमसचे लाईट्स पहायला
मस्त. ख्रिसमसचे लाईट्स पहायला मलाही आवडतात.
हॅपी हॉलिडेज.
सुपर्ब. हा नजारा काही औरच
सुपर्ब. हा नजारा काही औरच असतो.
सुंदर फोटो आहेत रे पराग!
सुंदर फोटो आहेत रे पराग!
पोएन्सेटियांचं क्रिसमसझाड फारंच आवडलं. लई फेस्टिव्ह!
नवा कॅमेरा जमलेला दिसतोय
नवा कॅमेरा जमलेला दिसतोय !
मस्त्त आलेत फोटो
फोटो मस्त आहेत रे पराग. त्या
फोटो मस्त आहेत रे पराग. त्या रोषणाईमधून चालत फिरता येतं हे फारच छान वाटलं
मिनेसोटात एका पार्कमध्ये खूप भव्य प्रमाणात रोषणाई असायची. रस्ताभरुन दोन्ही बाजूंना असे लाईट्स आणि डिझाईन्स. पण ती गाडीतून बसून बघायची असायची. खाली उतरता नाही यायचं. तसंही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बाहेरच्या हवेत फिरत बघणं कठीणच.
दिव्य फोटो! हॅपी हॉलिडेज!
दिव्य फोटो! हॅपी हॉलिडेज!
दिव्यांची रोषणाई मस्त आहे.
दिव्यांची रोषणाई मस्त आहे. सणासुदीचे वातावरण.
मस्त आहेत. मी झब्बू
मस्त आहेत. मी झब्बू देणार.
शेवटी ती अण्वस्त्रे आणि बॉम्बगोळे कसले?
ती अण्वस्त्रे आणि बॉम्बगोळे
ती अण्वस्त्रे आणि बॉम्बगोळे कसले? >> ती इराक मधून बाहेर पडल्यावर मिळालेली अस्त्रे.
पराग - मस्त फोटो!
सायो तुम्ही रॉक्कफेलरला अजून गेला नाहीत का? कसलं खास वातावरण आहे तिथे, यंदा एक फिल्मही केली आहे. ती मस्त आहे. जाऊन याच.
आम्ही लाईट्स बघायला म्हणून
आम्ही लाईट्स बघायला म्हणून मुद्दाम नाही गेलो. मला वाटतं दोन वर्षापुर्र्वी गेलो होतो. जरी जवळ असलं तरी मुद्दाम प्लॅन करुन सिटीत जाणं होत नाही.
पराग - मस्त फोटोज रे !
पराग - मस्त फोटोज रे !
ते क्रिसमस स्टार (तेच ते
ते क्रिसमस स्टार (तेच ते शकुनाचे) लावलेले ख्रिसमस ट्री खूप आवडले.
हॅपी हॉलीडेज्.
धन्यवाद सगळ्यांना! शोनू.. हो
धन्यवाद सगळ्यांना!
शोनू.. हो नाईट मोड जमला बर्याच वेळाने!
लालू.. झब्बू दे नक्की.. !
त्या रोषणाईमधून चालत फिरता येतं हे फारच छान वाटलं >>> अगो.. अगदी. आम्हांलाही हेच वाटलं !
मस्त!
मस्त!
छान! हॅपी हॉलिडेज्!
छान! हॅपी हॉलिडेज्!
सुपर्ब!!सुपर्ब्!!!सुपर्ब प्रक
सुपर्ब!!सुपर्ब्!!!सुपर्ब
प्रकाशरांगोळ्या तर खासच!!!
मस्तय एकदम..
मस्तय एकदम..
रोश्णाईचा कन्सेप्ट मस्तच !!
रोश्णाईचा कन्सेप्ट मस्तच !! फोटोज पण सुंदर आहेत !!!