रक्तदाब मोजण्याचं यंत्र : माहिती हवी आहे

Submitted by गजानन on 21 December, 2011 - 07:08

नमस्कार,

मला रक्तदाब मोजण्यासाठी घरगुती डिजिटल यंत्र घ्यायचं आहं. फ्लिपकार्टवर बरेच पर्याय दिसले. कोणत्या कंपनीचं यंत्र अचूक वाचन दाखवणारं आणि टिकाऊ असते, याची कृपया माहिती द्या. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्हाय बा.. अस्लं कधी वापरलं नाही.. आम्हाला ते आपलं मर्क्युरी कॉलमवालं म्हाईत आहे.. त्याची माहिती पाहिजे असेल तर सांगतो.. पन त्याला स्टेथोस्कोप लागतो.

गजाभाउ, अगदी अलिकडल्या मशिनीबद्दल माहित नाही, पण ४-५ वर्षांपूर्वी तरी कमर्शियली मिळणार्‍या मशिनबद्दल डॉक्टर नातेवाईकांचं मत चांगलं नसे. मार्जिन ऑफ एरर चिकार असते. एकच मशीन समजा डॉ कडच्या पेक्षा ५ पॉइंट जास्त दाखवत असेल तर ते रोजच तसं दाखवेल ही पण गॅरंटी नसते.

गजाननराव,

रक्तदाब मोजण्याकरता डिजिटल यंत्र वापरू नका असा अनेक डॉक्टरांनी व केमिस्ट्स ने सल्ला दिलेला आहे. त्यावरची रिडींग अनेकवेळा चुकीची येतात व मार्जिन ऑफ एरर खूप मोठी असते. डॉक्टर उभा मर्क्युरी कॉलम असलेले यंत्र जास्त करून वापरतात.

डिजिटल उपकरणाची अचुकता ही पारा असलेल्या पेक्षा कमी असते. बहुतेक सर्व वैद्य पारा असलेले उपकरण वापरतात. पण घरच्याघरी दररोज बघायला डिजीटल चांगले आहे. अचुकता कमी असते हे गृहित धरुन काही कमी जास्त रीडींग आल्यास घाबरुन न जाता थोड्यावेळाने परत तपासा.
ऑमरॉन कंपनीची उपकरणे पण नावाजलेली आहेत. घेताना अप्पर आर्म (दंडाला लावता येणारे) उपकरण घ्या. मनगटाला / बोटाला लावायची पण आहेत , ती शक्यतो नको.

डिजीटल मशीन ( कुठल्याही कंपनीच) ) वापरण्या आधी ते तुमच्या डॉ. कडे नेऊन calibrate करुन आणावे. डॉ. च्या ऑफीस मधे साधारण तीन रीडिंग्स घेउन त्याचं अ‍ॅव्हरेज मशीन बरोबर कंपेअर करुन error margin काढावा. एक जनरल गाइड लाइन म्ह्णून याचा उपयोग होतो. तसच बी. पी. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला बघावे . सकाळची झोप झाल्या झाल्या लगेच, मधे कधीतरी, तसेच झोपायच्या आधी, तसेच जेव्हा बी. पी.रीलेटेड काही लक्षण उदा. चक्कर, डोकेदुखी आले तर त्या त्या वेळेला . अशा सगळ्या नंबरांची तारीख, वार, वेळेनुसार नोंद ठेवावी. डायग्नोसीस करता हे फार उपयोगी पडते.
वरील प्रकारच्या नोंदी करणं हा एका डॉ. नेच सुचवलेला पर्याय आहे.
घरी, स्वतःच स्वतः वापरायसाठी डिजीट्ल ला पर्याय नाही बहुतेक.

महागुरू यांना अनुमोदन.
पुण्या मधल्या डॉक्टरांनी (गरवारे कॉलेज समोरचे हॉस्पिटल) आम्हाला एक अजून एक सुचवले कि, जर का घरात कोणाला वेळ असेल तर परिचारिका पारा असलेले यंत्र कसे वापरायचे ते शिकवतील, पण वेळ काढून या दोन तीन दिवस.
त्यांनी हे हि सागितले कि, घरी यंत्र असेल कि माणसे थोडे बर वाटले नाही कि लगेच यंत्र लावतात आणि चेक करतात, यांनी थोडा रक्त दाब वाढला असेल तर यंत्रा चे आकडे बघितले तर आजून वाढू शकतो ( tension मुळे). त्या मुळे घरी यंत्रा असेल तर, ठराविक वेळेलाच रीडिंग घ्या ( उदा दर रविवारी सकाळी उठल्यावर ).

अरे याच्या किम्मती काय आहेत? कुणी सान्गू शकेल का?
काये ना की गेली कित्येक वर्षे मी ठरवतोय की ते यन्त्र घ्यायचे. आता डिजिटल आलीत तर ती घेऊयात असेही ठरवले. पण मुहुर्त लागत नाहीये.
पण ते मशिन आणले ना? की हे असे लावुन ठेवणार बोटाला किन्वा मनगटा-दन्डाला वगैरे!
अन बघणार रिडीन्ग, तिकडे लिम्बीने हाक मारली की बघा किती झालय रिडीन्ग, कशी हाक मारली त्यानुसारही रिडीन्ग. ती समोरच कमरेवर हात ठेऊन उभी राहिली कि लगेच रिडीन्ग, तिची पाठ फिरली की त्या वेळचेही रिडीन्ग, कधी कुठे काय कमीजास्त होतय ते बघणार Proud
इतकच कशाला? इकडच्या कोणत्या आयडीच्या कोणत्या विषयावरील पोस्ट्स वाचल्या, पोस्टसच काय नुस्ती हेडीन्ग जरी वाचली किन्वा आयडीचे नाव जरी वाचले तरी रिडिन्गमधे किती फरक पडतो त्याचा अभ्यास करणार. Wink
तेव्हा कृपया कृपया मला माझे बजेट ठरविण्याकरता किम्मतीचे सान्गा हो कुणीतरी! Happy

गजानन भारतामध्ये पार्‍याशिवायचे पण मेकॅनिकल असे रक्तदाब मोजायचे यंत्र मिळते. त्याचे रिडींग बरेच अचूक असते असे आमच्या डॉ.नी सांगितले अर्थात त्यालापण स्टेथोस्कोप लागतो.ठाण्याला बाफना सर्जिकल्स मधे मिळायला हवे. स्टेथोस्कोप वापरून रक्तदाब बघायचे तंत्र खूप सोपे आहे.

वावावा!
मास्तुरे,
इथे मात्र आपण सहमत बर्का.

>>
मास्तुरे | 21 December, 2011 - 19:20 नवीन

गजाननराव,

रक्तदाब मोजण्याकरता डिजिटल यंत्र वापरू नका असा अनेक डॉक्टरांनी व केमिस्ट्स ने सल्ला दिलेला आहे. त्यावरची रिडींग अनेकवेळा चुकीची येतात व मार्जिन ऑफ एरर खूप मोठी असते. डॉक्टर उभा मर्क्युरी कॉलम असलेले यंत्र जास्त करून वापरतात.

इब्लिस धन्यवाद. मला पण हे घ्यावेसेच वाटत होते. ग्लुको मीटर पण ( उगीचच) त्याऐवजी वेळेवारी डागदराकडे जाउन चार शब्द बोलून बीपी चेक करून घ्यावे हे उत्तम ना? पैसे वाचवले. पण मला बीपी चेक करून घ्यायचीच भीती वाट्ते.

इंडियन मेडिकल असोशिएशनचे आय एम ए न्युज नावाचे मासिक निघते.. त्यात नोव डिस २०११ च्या अंकात मिनिस्ट्री ऑफ हेल्थकडून आय एम ए ला एक पत्र आले आहे. त्यात असे म्हटले आहे की मर्कुरी विषारी असल्याने मर्क्युरी असणारे थर्मामीटर व बी पी यंत्रे वापरु नयेत. ! त्याऐवजी दुसरी यंत्रे वापरावीत. मी आजच वाचले. ( आणि आम्ही डॉक्टर मंडळी सांगतोय मर्क्युरीवाले चांगले असते म्हणून Proud )

हे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ म्हणजे हॅरी पॉटरमधले मिनिस्ट्री ऑफ मॅजिक सारखे आहे.. नुस्ते उलटसुलट परिपत्रके काढणे एवढाच यांचा उद्योग ! मिनिस्ट्रीचे पत्र १४ सप्ट. २०११ तारखेचे आहे.

डब्ल्यु एच ओ कडून वारं फिरलेलं दिस्तय! http://www.who.int/water_sanitation_health/publications/2011/mercury_the...

http://whqlibdoc.who.int/publications/2011/9789241548182_eng.pdf

मर्क्युरी न्युरोटॉक्सिक असते म्हणून हे चालले आहे म्हणे!

जामोप्या, यात नविन ते काय?
खूप मागे बर्‍याच वर्षान्पूर्वी (१९९५ ते ९८ चे दरम्यान) असाच सरकारी फतवा आलेला की असलेली सर्व मेक्यानिकल फ्रॅन्किन्ग मशिन्स बाद करुन तिथे नविन डिजिटल मशिन्स बसवा. झाले, भारतभर सर्व ठिकाणची आधीची मशिन्स बदलुन नविन मशिन बसविली गेली. मेक्यानिकल इन्डियन मेकची मशिन १८००० पर्यन्त होती, तर नविन मशिनचि किम्मत १,१०,००० होती. नविन मशिन सप्लाय करणार्‍या कम्पन्या पूर्णतः परकीय होत्या. यात कुणाकुणाचे उखळ कसे कसे पान्ढरे होते हे काय गुपित आहे का? त्यावेळचा पोस्टखात्याचा मन्त्री सुखराम सध्या तुरुन्गात आहे म्हणे, पण वेगळ्याच आरोपान्खाली.
हे असेच चालते इन्डियात, अन मग झक्कीसारखे काही बोलले तर मात्र देशातल्या लोकान्ना राग येतो.
असो.
मी इकडे आलेलो सान्गायला की मी आत्ताच मगाशी जाऊन ब्लडप्रेशर कसे बघायचे ते मर्क्युरी मापकयन्त्रावरुन समजुन/शिकुन घेतले.! Happy
[आता एक युनिट आणून घरी ठेवणार, अन लिम्बी चिडत्ये असे वाटू लागले की लगेच तिचे बीपी तपासणार. Proud (नन्तर मला माझेही तपासायला लागेल तो भाग निराळा Sad ) Proud ]

तेच तर मलाही बोलायचे होते.... मर्कुरी विषारी असतो म्हने.... बी पी च्या मशीनमधला पारा लोक तोंडात घेतात की काय!

मी इकडे आलेलो सान्गायला की मी आत्ताच मगाशी जाऊन ब्लडप्रेशर कसे बघायचे ते मर्क्युरी मापकयन्त्रावरुन समजुन/शिकुन घेतले.!

अभिनंदन. Happy

<>>>> मर्कुरी विषारी असतो म्हने.... बी पी च्या मशीनमधला पारा लोक तोंडात घेतात की काय! <<<
असं कसं जामोप्या म्हण्तोस तू? Wink
या विषयांमधे आयुष्याची तपश्चर्या असलेले तज्ञ डागदर सायन्टिस्ट लोक जेव्हा पार्‍याच्या विषारीपणाला महत्वाचं मानतात तेव्हा एकतर त्यांच्याइतका अभ्यास करून ते मत खोडून काढावं कींवा आपल्यापेक्षा बरंच ज्ञान असलेल्यांचं मत म्हणून ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी करावा. नाही का? Proud Wink

ओह, फतवा हे होय! मग सध्या उपलब्ध असलेली पार्‍याची यन्त्रे स्वस्तात मिळतील का? काही शक्यता?

जामोप्या, इमा, जिमा इ. विषयी नवा बाफ काढावा ही न वि.
सर्कारी बिन्डूकप्णा च्या लै स्टोर्‍या आहेत माझ्या कडे.
असल्या मूर्ख नोकरशाही फतव्यांना अडवून योग्य जागी भांडण करण्यासाठी आय एम ए ला लोक हवे आहेत. येताय का सोबत?

पॅनासोनिकचे यंत्र घेतले. (http://www.letsbuy.com/panasonic-ew-3108-bp-monitor-p-14532)

सध्यातरी डॉक्टरच्या वाचनांबरोबर या यंत्रावर घेतलेली रक्तदाबाची वाचनं जुळतायत. तुम्हा सगळ्यांना माहितीबद्दल धन्यवाद.